Maharashtra

Kolhapur

CC/16/149

Krushnat Padurang Patil - Complainant(s)

Versus

Ravindra Dattatray Kachare,Chairman Herle Nagari Sah.pat. - Opp.Party(s)

P.V.Kulkarni

29 Sep 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/16/149
( Date of Filing : 01 Jun 2016 )
 
1. Krushnat Padurang Patil
Top,Tal.Hatkangle,
Kolhapur
2. Swapnil Krushnat Patil
As Above
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Ravindra Dattatray Kachare,Chairman Herle Nagari Sah.pat.
Herle,Tal.Hatkangle,
Kolhapur
2. Shivaji Gangaram Tipugade,Secretary Herle Nagari Sah.Pat.
As Above
Kolhapur
3. Arjun Krushnat Patil,Director Herle Nagari Sah.Pat.
As Above
Kolhapur
4. Sanjiv Jambo Upadhye,Director Herle Nagari Sah.Pat.
As Above
Kolhapur
5. Kumar Dhondiram Bedekar,Director Herle Nagari Sah.Pat.
As Above
Kolhapur
6. Ajit Jinu Ingale,Director Herle Nagari Sah.Pat.
As Above
Kolhapur
7. Uday Khandirao Bhosale, Director Herle Nagari Sah.Pat.
As Above
Kolhapur
8. Uttam Bhimrao Patil,Director Herle Nagari Sah.Pat.
As Above
Kolhapur
9. Arun Ramchandra Muthe,Director Herle Nagari Sah.Pat.
As Above
Kolhapur
10. Shekhar Maruti Khabade,Director Herle Nagari Sah.Pat.
As Above
Kolhapur
11. Mahammad Ramjan Pendhari,Director Herle Nagari Sah.Pat.
As Above
Kolhapur
12. Sripati Nivrutti Patil,Director Herle Nagari Sah.Pat.
As Above
Kolhapur
13. Subhash Aanna Patil,Director Herle Nagari Sah.Pat.
As Above
Kolhapur
14. Balaso Aanandrao Hawaldar,Director Herle Nagari Sah.Pat.
As Above
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 29 Sep 2018
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

(व्‍दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्‍या)

 

1.     तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे—

  

      तक्रारदार क्र.1 हे तक्रारदार क्र.2 यांचे वडील आहेत.  तक्रारदारांनी आपल्‍या दुधाच्‍या व्‍यवसायातून काटकसर करुन वि.प. संस्‍थेकडे काही रकमा अल्‍पमुदत ठेवी म्‍हणून ठेवलेल्‍या होत्‍या.  त्‍याचा तपशील पुढीलप्रमाणे –

 

तक्रारदार क्र.1 कृष्‍णात पांडुरंग पाटील

 

अ.क्र.

ठेवपावती क्र.

ठेव रक्‍कम

रु.

ठेव ठेवलेची तारीख

ठेव संपलेची तारीख

व्‍याजदर

1

343

30,000/-

18/5/06

17/5/09

11%

2

770

30,000/-

16/3/07

15/3/10

11%

3

511

30,000/-

19/9/06

18/9/06

11%

4

053

30,000/-

27/8/07

26/8/10

11%

5

054

30,000/-

27/8/07

26/8/10

11%

6

177

31,000/-

10/8/07

09/8/10

11%

7

000362

30,000/-

11/3/05

10/3/08

11%

8

000660

30,000/-

13/7/05

22/7/08

11%

9

00898

30,000/-

22/11/05

21/11/08

11%

10

000900

30,000/-

23/11/05

22/11/08

11%

11

053

30,000/-

25/7/06

24/7/09

11%

12

111

15,000/-

15/2/06

14/2/09

11%

13

112

15,000/-

15/2/05

14/2/09

11%

14

137

15,000/-

28/2/06

27/2/09

11%

15

136

15,000/-

28/2/06

27/2/09

11%

16

113

15,000/-

15/2/06

14/2/09

11%

 

 

 

 

 

तक्रारदार क्र.2 स्‍वप्‍नील कृष्‍णात पाटील

 

अ.क्र.

ठेवपावती क्र.

ठेव रक्‍कम

रु.

ठेव ठेवलेची तारीख

ठेव संपलेची तारीख

व्‍याजदर

1

115

15,000/-

15/2/06

14/2/09

11%

2

114

15,000/-

15/2/06

14/2/09

11%

3

116

15,000/-

15/2/06

14/2/09

11%

 

 

सदर ठेवींची मुदत संपलेनंतर तक्रारदार यांनी दि.4/4/16 रोजी व तदनंतर अनेक वेळा वि.प. यांचेकडे, व्‍याजासह होणा-या रकमेची मागणी केली असता वि.प. संस्‍थेने सदरची रक्‍कम परत करण्‍यास टाळाटाळ केली.  म्‍हणून तक्रारदारांनी वकीलामार्फत दि. 6/4/16 रोजी वि.प. यांना नोटीस पाठविली. परंतु नोटीस मिळूनही वि.प. यांनी त्‍यास कोणताही प्रतिसाद दिला नाही.  सबब, वर नमूद ठेवींची व्‍याजासह होणारी रक्‍कम रु.9,23,318/- वि.प. यांचेकडून मिळावी, सदर रक्‍कम पूर्ण परतफेड होईपर्यंत त्‍यावर द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याज, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.10,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्‍हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. 

 

2.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत ठेवपावत्‍यांच्‍या साक्षांकीत प्रती, तक्रारदारांनी वि.प. यांना पाठविलेल्‍या नोटीसची प्रत, सदर नोटीस मिळालेच्‍या पोहोच पावत्‍या इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच तक्रारदाराने तक्रारअर्ज दुरुस्‍ती प्रत, पुराव्‍याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तसेच वि.प. संस्‍थेच्‍या अवसायकांविरुद प्रकरण चालविणेबाबत मिळालेल्‍या परवानगीचे पत्र दाखल केले आहे.

 

3.    प्रस्‍तुतकामी वि.प.क्र.1 ते 4 व 6 ते 14 यांना मंचाचे नोटीसीची बजावणी होवून देखील ते वारंवार पुकारता गैरहजर.  सबब वि.प.क्र.1 ते 4 व 6 ते 14 यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश पारीत करणेत येतो.  वि.प.क्र.5 हे मयत असलेने त्‍यांना प्रस्‍तुत कामातून कमी केलेले आहे.

 

4.    प्रस्‍तुतकामी वि.प. पतसंस्‍थेवर अवसायक श्री एम.जी. शिंदे यांची नेमणूक झालेली असलेने मा. उपनिबंधक, सहकारी संस्‍था यांनी दि. 2/2/17 रोजी अवसायकाविरुध्‍द दावा दाखल करणेकामी परवानगी दिलेली असून सदरचे पत्राची प्रत तक्रारदारांनी प्रस्‍तुतकामी दाखल केलेली आहे.  त्‍यानुसार वि.प. संस्‍थेचे अवसायक यांना प्रस्‍तुतकामी वि.प.क्र.15 म्‍हणून सामील केले आहे. 

 

5.    वि.प.क्र.15 अवसायक यांनी याकामी ता. 30/10/17 रोजी म्‍हणणे दाखल केले आहे. वि.प. क्र.15 अवसायक यांचे कथनानुसार, त्‍यांनी वि.प. संस्‍थेचा ताबा घेवून लेजरचा आढावा घेतला असता मुद्दल रु. 5,000/- व 10,000/- रकमेचे सदर संस्‍थेने रु. 1,25,864/-, 2,87,997/- व 1,99796/- इतक्‍या रकमा 27 कर्जदारांच्‍या येणे दाखविलेल्‍या आहेत.  महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था कायदा कलम 44अ प्रमाणे रु. 10,000/- मुद्दल असेल तर दामदुप्‍पट रु.20,000/- इतकी रकमेची वसुली करता येते असे असताना एवढया मोठया रकमा वसूल करणे बेकायदेशीर आहे.  तसेच मुद्दल रु.10,000/- च्‍या पुढील कर्जाचे बॅलन्‍स देखील खूप मोठया रकमा दाखविल्‍या आहेत.  त्‍यामुळे वसुलीमध्‍ये अडचणी निर्माण होताहेत.  अवसायक मंडळाने उपनिबंधक, हातकणंगले, यांचेशी चर्चा करुन सरळ व्‍याजाने वसुली चालू केली आहे.  पण कर्जे 17 ते 18 वर्षापूर्वींची असल्‍याने सदर वसुलीसाठी कालावधी लागणार आहे.  सदर संस्‍थेचे शासकीय ऑडीट होणे आहे.  ऑडीटनंतर ब-याच गोष्‍टी स्‍पष्‍ट होतील.  ऑडीटनंतरच संचालक मंडळावर 88 दाखल होईल यासाठी कालावधी लागणार आहे.  तक्रारदारांनी आपणाकडे ठेव रक्‍कम व्‍याजासह मागणी केली आहे.  ऑडीटनंतर कर्जाची रक्‍कम निश्चित झाल्‍याखेरीज वसुली किती होते, त्‍या प्रमाणात ठेव रक्‍कम अदा करुन उर्वरीत रक्‍कम संचालक मंडळावर 88 करुन वसूल करणेच्‍या असलेने सध्‍यातरी ठेवीवर व्‍याज देता येणार नाही. वसुलीची कारवाई कर्जदारांवर चालू आहे.  कर्जे वसूल होण्‍यास कालावधी लागणार आहे.  ही वस्‍तुस्थिती आहे.  तरी सर्व बाबींचा विचार करुन ठेवीदारास रक्‍कम अदा करणेस सहा महिन्‍याचा कालावधी द्यावा ही विनंती असे म्‍हणणे अवसायक यांनी दाखल केले आहे.

 

      याकामी वि.प.क्र.15 यांनी वि.प.क्र.1 संस्‍थेच्‍या लेजरच्‍या पानांच्‍या काही प्रती दाखल केल्‍या आहेत.

 

6.   तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प.क्र.15 यांचे म्‍हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, पुराव्‍याचे शपथपत्र यांचा विचार करता निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

अ. क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ?

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय ?     

होय.

3

तक्रारदार हे ठेवींची व्‍याजासहीत होणारी रक्‍कम व मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.

4

अंतिम आदेश काय ?

अंशतः मंजूर.

 

 

कारणमिमांसा

 

मुद्दा क्र. 1

 

7.    प्रस्‍तुतकामी तक्रारदार क्र.1 हे तक्रारदार क्र.2 चे वडील आहेत.  तक्रारदार क्र.1 हे तक्रारदार क्र.2 यांचे वडील आहेत.  तक्रारदारांचा दुधाचा व्‍यवसाय आहे.  त्‍यांनी आपल्‍या संसारात अत्‍यंत काटसकर करुन स्‍वतःच्‍या घराचे बांधकाम करणेकरिता उपयोगी येईल या हेतूने वि.प. संस्‍थेकडे काही रकमा अल्‍पमुदत ठेवी म्‍हणून ठेवलेल्‍या होत्‍या.  त्‍याचा तपशील पुढीलप्रमाणे –

 

तक्रारदार क्र.1 कृष्‍णात पांडुरंग पाटील

 

अ.क्र.

ठेवपावती क्र.

ठेव रक्‍कम

रु.

ठेव ठेवलेची तारीख

ठेव संपलेची तारीख

व्‍याजदर

1

343

30,000/-

18/5/06

17/5/09

11%

2

770

30,000/-

16/3/07

15/3/10

11%

3

511

30,000/-

19/9/06

18/9/06

11%

4

053

30,000/-

27/8/07

26/8/10

11%

5

054

30,000/-

27/8/07

26/8/10

11%

6

177

31,000/-

10/8/07

09/8/10

11%

7

000362

30,000/-

11/3/05

10/3/08

11%

8

000660

30,000/-

13/7/05

22/7/08

11%

9

00898

30,000/-

22/11/05

21/11/08

11%

10

000900

30,000/-

23/11/05

22/11/08

11%

11

053

30,000/-

25/7/06

24/7/09

11%

12

111

15,000/-

15/2/06

14/2/09

11%

13

112

15,000/-

15/2/05

14/2/09

11%

14

137

15,000/-

28/2/06

27/2/09

11%

15

136

15,000/-

28/2/06

27/2/09

11%

16

113

15,000/-

15/2/06

14/2/09

11%

 

तक्रारदार क्र.2 स्‍वप्‍नील कृष्‍णात पाटील

 

अ.क्र.

ठेवपावती क्र.

ठेव रक्‍कम

रु.

ठेव ठेवलेची तारीख

ठेव संपलेची तारीख

व्‍याजदर

1

115

15,000/-

15/2/06

14/2/09

11%

2

114

15,000/-

15/2/06

14/2/09

11%

3

116

15,000/-

15/2/06

14/2/09

11%

 

सदरचे पावत्‍यांची झेरॉक्‍सप्रती तक्रारदार यांनी मा. मंचात तक्रारीसोबत दाखल केलेल्‍या आहेत.  सदरचे पावत्‍यांचे या मंचाने अवलोकन केले असता, सदर पावत्‍यांवर वि.प. पतसंस्‍थेचे नांव नमूद आहे.  सदर मुदतबंद ठेव पावतीवर सदर संस्‍थेचे चेअरमन व शाखाधिकारी यांच्‍या सहया आहेत.  सदरच्‍या पावत्‍या वि.प. यांनी नाकारलेलल्‍या नाहीत.  सबब, सदर मुदतबंद ठेवपावत्‍यांवरील गुंतविलेल्‍या रकमेचा विचार करता, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत या निष्‍कर्षाप्रत‍ हे मंच येत आहे.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.2    

 

8.    उपरोक्‍त मुद्दा क्र.1 मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत.  प्रस्‍तुतकामी वि.प. ही महाराष्‍ट्र सहकार कायद्याखाली नोंदणी झालेली संस्‍था आहे.  तक्रारदार यांनी मुदतबंद ठेवपावत्‍यांवरील रकमेची व्‍याजासहीत रितसरपणे मुदत संपलेनंतर वि.प. पतसंस्‍थेकडे ता. 4/4/16 रोजी व तदनंतर वेळोवेळी मागणी केली.  ता. 6/4/16 रोजी तक्रारदारांनी वि.प. यांना नोटीसही पाठविलेली आहे.  सदरचे नोटीसीच्‍या प्रती व पोहोच पावत्‍या तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत दाखल केलेल्‍या आहेत.  तक्रारदार यांनी त्‍यांचे पुराव्‍याचे शपथपत्रामध्‍ये वि.प. यांना वेळोवेळी सदरचे रकमेची मागणी केली आहे. या बाबीचा विचार करता सदरची तक्रार मुदतीत असून सदरचे तक्रारीस सततचे कारण (Continuous cause of action) घडले आहे.  सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांना मुदतबंद ठेवपावतीवरील व्‍याजासह रक्‍कम आजतागायत परत न करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.  प्रस्‍तुतकामी वि.प.क्र.1 ते 4 व 6 ते 14 यांना संधी देवूनही ते मा. मंचात गैरहजर असलेने त्‍यांचेविरुध्‍द दि.18/12/17 रोजी एकतर्फा आदेश पारीत करणेत आलेला आहे.  प्रस्‍तुतकामी वि.प. पतसंस्थेवर अवसायकाची नेमणूक झालेली असलेने तक्रारदार यांनी ता.2/2/16 रोजी अवसायकाविरुध्‍द काम चालविणेची परवानगी घेवून प्रस्‍तुतकामी अवसायकांना पक्षकार केलेले आहे.  ता. 30/10/17 रोजी अवसायकांनी म्‍हणणे दाखल केलेले असून त्‍याचे अवलोकन केले असता, मुद्दल रु.10,000/- च्‍या पुढील कर्जाचे बॅलन्‍स देखील खूप मोठया रकमा दाखविल्‍या आहेत.  त्‍यामुळे वसुलीमध्‍ये अडचणी निर्माण होताहेत.  अवसायक मंडळाने उपनिबंधक, हातकणंगले, यांचेशी चर्चा करुन सरळ व्‍याजाने वसुली चालू केली आहे.  पण कर्जे 17 ते 18 वर्षापूर्वींची असल्‍याने सदर वसुलीसाठी कालावधी लागणार आहे.  सदर संस्‍थेचे शासकीय ऑडीट होणे आहे.  ऑडीटनंतर ब-याच गोष्‍टी स्‍पष्‍ट होतील.  ऑडीटनंतरच संचालक मंडळावर 88 दाखल होईल यासाठी कालावधी लागणार आहे.  तक्रारदारांनी आपणाकडे ठेव रक्‍कम व्‍याजासह मागणी केली आहे.  ऑडीटनंतर कर्जाची रक्‍कम निश्चित झाल्‍याखेरीज वसुली किती होते, त्‍या प्रमाणात ठेव रक्‍कम अदा करुन उर्वरीत रक्‍कम संचालक मंडळावर 88 करुन वसूल करणेच्‍या असलेने सध्‍यातरी ठेवीवर व्‍याज देता येणार नाही. वसुलीची कारवाई कर्जदारांवर चालू आहे.  कर्जे वसूल होण्‍यास कालावधी लागणार आहे.  ही वस्‍तुस्थिती आहे.  तरी सर्व बाबींचा विचार करुन ठेवीदारास रक्‍कम अदा करणेस सहा महिन्‍याचा कालावधी द्यावा ही विनंती केली आहे.  सदरचे म्‍हणणेवरुन सदर संस्‍थेचे शासकीय लेखापरिक्षण झाले नसलेचे दिसून येते.  तथापि तक्रारदारास रक्‍कम अदा करणेस सहा महिन्‍याचा कालावाधी द्यावा असे कथन केले आहे. म्‍हणजेच अवसायकांनी तक्रारदारांच्‍या मुदतबंद ठेवपावत्‍या मान्‍य केलेल्‍या आहेत.  प्रस्‍तुतकामी अवसायक हे शासननियुक्‍त प्रशायकीय अधिकारी आहेत.  परंतु पदाधिकारी नाहीत. तथापि सहकार कायद्यान्‍वये सदरचे मुदतबंद ठेवपावत्‍या तक्रारदारास परत अदा करण्‍याची जबाबदारी संस्‍थेतर्फे अवसायकाची आहे.  परंतु सदरची मुदतबंद ठेव पावत्‍याची जबाबदारी वि.प. यांचेतर्फे अवसायक यांचेवर वैयक्तिक स्‍वरुपात टाकता येणार नाही.  तथापि अवसायकांचे म्‍हणणेवरुन तक्रारदारांचे सदरचे मुदत ठेवपावत्‍यांची रक्‍कम परतीसाठी वि.प. पतसंस्‍था तर्फे अवसायक हे संयुक्तिकरित्‍या जबाबदार आहेत असे या मंचाचे मत आहे.

 

9.    प्रस्‍तुतकामी वि.प.नं.5 हे मयत झाले असलेने त्‍यांना वगळलेले आहे.  प्रस्‍तुत कामी तक्रारदारांनी वि.प. यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या सदरचे मुदतबंद ठेवपावत्‍यावंरील रकमांची मागणी केलेली आहे.  वि.प.क्र.1 ते 4 व 6 ते 14 यांना या मंचाचे संधी देवून देखील ते गैरहजर आहेत. त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश पारीत केलेला आहे.  वि.प.क्र.2 हे सदर संस्‍थेचे सेक्रेटरी आहेत.  सबब, वि.प.क्र.2 हे सदर संस्‍थेचे कर्मचारी असलेमुळे त्‍यांचेववर तक्रारदाराचे मुदतबंद ठेवपावतीची जबाबदारी टाकता येत नाही असे या मंचाचे मत आहे.  अवसायकांनी दाखल केलेल्‍या म्‍हणणेवरुन सद्यपरिस्थितीत सदर संस्‍थेचे शासकीय ऑडीट झालेले नाही.  ऑडीट नंतरच संचालक मंडळावर कलम 88 प्रमाणे कारवाई होईल.  यासाठी कालावधी लागणार आहे.  यावरुन सदर संचालकांविरुध्‍द अद्याप सहकार कायद्यान्‍वये कलम 88 प्रमाणे चौकशी होवून अहवाल प्राप्‍त नाही.  त्‍या कारणाने सदर संचालकांविरुध्‍द वैयक्तिक जबाबदारी निश्चित करणे योग्‍य नाही. त्‍या अनुषंगाने हे मंच पुढील मा. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडयांचा आधार घेत आहे. 

  [1]       Supreme Court, in Special Leave Petition No.14085/2013, dated, 17.04.2013

(Deposit Insurance & Credit Gaur.Corpn. Verus Rajendra Madhukar Deval & ors.)  It was observed by their Lordships of the Apex Court that’

“That present matter are concerning the liability of the Director and the State Consumer Disputes Redressal Commission and the National Commission have rightly held that the Directors themselves are not personally liable.  Hence, we do not see any reason to interfere and Special Leave Petition accordingly dismissed.”

            [2]       First Appeal No.16/1070, State Commission Mumbai

                        Manager Yashodhara Co-op. Credit Soc.Ltd. Sangli & ors.

                   Versus

         Bhavana Bhosale

In the observation of Hon’ble Apex Court the Director can’t be held personally liable.

 

प्रस्‍तुत न्‍यायनिवाडयांचा विचार करता वि.प. यांचेवर वैयक्तिक जबाबदारी निश्चित करता येणार नाही.  तक्रारदारांचे पुराव्‍याचे शपथपत्राचे अवलोकन केले असता वि.प. संस्‍थेचा कारभार व व्‍यवस्‍थापन हे संचालक मंडळाच्‍या ताब्‍यात होते.  संस्‍थेचे आर्थिक गैरव्‍यवस्‍थापनामुळे तसेच मनमानी कर्जवाटपामुळे संस्‍था डबघाईस येवून संस्‍थेचा कारभार व व्‍यवहार बंद पडला आहे.  संस्‍थेच्‍या गैरकारभारामुळे व दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारदार यांची रक्‍कम संस्‍थेत‍ अडकून पडली आहे.  तक्रारदारांचे सदरचे कथनाचा विचार करता, तक्रारदाराचे मुदतबंद ठेवपावत्‍या परत करणेची सर्वस्‍वी जबाबदारी ही वि.प. यांची होती. सदरचे मुदतबंद ठेवपावत्‍या अद्याप अदा न करुन वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे.  वि.प. ही पतसंस्‍था सहकार कायद्यान्‍वये नोंदणीकृत संस्‍था असून कायदेशीर अस्तित्‍व असलेली व्‍यक्‍ती आहे.  सदर संस्‍थेचा कारभार संचालक मंडळामार्फत चालत होता.  तक्रारदार यांनी सदरची मुदतबंद ठेवपावती वि.प. यांचे कारकिर्दीत ठेवलेली आहे.  वि.प. या जबाबदार व्‍यक्‍ती आहेत.  महाराष्‍ट्र सहकार कायद्याचे कलम 73 नुसार वि.प. यांचेवर संयुक्तिकरित्‍या जबाबदारी निश्चित केलेली आहे.  सबब, वि.प. क्र.1, 3, 4 व वि.प.क्र.6 ते 15 यांनी संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना सदरचे मुदतबंद ठेवपावत्‍यांच्‍या रकमा व्‍याजासह आजतागायत अदा न करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  सबब, मुद्दा क्र.2 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.3    

 

10.   उपरोक्‍त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता, वि.प. क्र.1, 3, 4 व वि.प.क्र.6 ते 15 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे.  सबब, तक्रारदार हे वि.प. नं.1, 3, 4, व 6 ते 14 व वि.प.क्र.15 पतसंस्‍था तर्फे अवसायक यांचेकडून संयुक्तिकरित्‍या खालील नमूद मुदतबंद ठेवपावत्‍यांवरील रकमा पावतीवरील नमूद व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर ठेवपावत्‍यांची मुदत संपले तारखेपासून सदरची संपूर्ण रक्‍कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के प्रमाणे व्‍याज मिळणेस पात्र आहेत.  प्रस्‍तुत कामी वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार यांना मानसिक त्रास व शारिरिक त्रास झाला तसेच सदरचे तक्रारअर्जासाठी खर्च करावा लागला.  त्‍याकारणाने तक्रारदार हे वि.प. नं.1, 3, 4, व 6 ते 14 व वि.प.क्र.15 पतसंस्‍था तर्फे अवसायक यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत.  सबब, मुद्दा क्र. 3 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.4  -  सबब आदेश.

 

 

- आ दे श -

                       

 

  1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो. 

 

  1. वि.प. क्र.1, 3, 4, 6 ते 14 यांनी संयुक्‍तरित्‍या तसेच वि.प.क्र.15 संस्‍थेतर्फे अवसायक यांनी संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील तपशीलात नमूद मुदतबंद ठेवपावत्‍या वरील रकमा व्‍याजासह अदा कराव्‍यात तसेच सदर रकमांवर मुदतबंद ठेवपावत्‍यांची मुदत संपले तारखेपासून सदरची संपूर्ण रक्‍कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍केप्रमाणे व्‍याज अदा करावे.

 

तक्रारदार क्र.1 कृष्‍णात पांडुरंग पाटील

 

अ.क्र.

ठेवपावती क्र.

ठेव रक्‍कम

रु.

ठेव ठेवलेची तारीख

ठेव संपलेची तारीख

व्‍याजदर

1

343

30,000/-

18/5/06

17/5/09

11%

2

770

30,000/-

16/3/07

15/3/10

11%

3

511

30,000/-

19/9/06

18/9/06

11%

4

053

30,000/-

27/8/07

26/8/10

11%

5

054

30,000/-

27/8/07

26/8/10

11%

6

177

31,000/-

10/8/07

09/8/10

11%

7

000362

30,000/-

11/3/05

10/3/08

11%

8

000660

30,000/-

13/7/05

22/7/08

11%

9

00898

30,000/-

22/11/05

21/11/08

11%

10

000900

30,000/-

23/11/05

22/11/08

11%

11

053

30,000/-

25/7/06

24/7/09

11%

12

111

15,000/-

15/2/06

14/2/09

11%

13

112

15,000/-

15/2/05

14/2/09

11%

14

137

15,000/-

28/2/06

27/2/09

11%

15

136

15,000/-

28/2/06

27/2/09

11%

16

113

15,000/-

15/2/06

14/2/09

11%

 

तक्रारदार क्र.2 स्‍वप्‍नील कृष्‍णात पाटील

 

अ.क्र.

ठेवपावती क्र.

ठेव रक्‍कम

रु.

ठेव ठेवलेची तारीख

ठेव संपलेची तारीख

व्‍याजदर

1

115

15,000/-

15/2/06

14/2/09

11%

2

114

15,000/-

15/2/06

14/2/09

11%

3

116

15,000/-

15/2/06

14/2/09

11%

 

  1. वि.प. क्र.1, 3, 4, 6 ते 14 यांनी संयुक्‍तरित्‍या तसेच वि.प.क्र.15 संस्‍थेतर्फे अवसायक यांनी संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- (रक्‍कम रुपये पाच हजार मात्र) व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- (रक्‍कम रुपये तीन हजार मात्र) अदा करावी. 

 

  1. जर वरील ठेवींपोटी काही रक्‍कम वि.प. यांनी यापूर्वी तक्रारदारास अदा केली असेल तर ती वळती करुन घेण्‍याचा वि.प. यांचा हक्‍क सुरक्षित ठेवण्‍यात येतो.

 

  1. वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.

 

  1. विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्‍द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

  1. आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.