तक्रार क्रमांक –606/2009 तक्रार दाखल दिनांक – 15/09/2009 निकालपञ दिनांक – 05/12/2009 कालावधी - वर्ष महिना दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे श्रीमती. आसावरी अविनाश गोखले रा.A/401, 4था मजला, रत्नतेज को.ऑ.हाफ.सो.लि., पार्शवनाथ इंजिनियरींग कॉलेजच्या मागे कासारवडवली, ठाणे(प)400 607. ...तक्रारकर्ता विरुध्द दि. सेक्रेटरी, ब्लॉक नं. A/402 रत्नतेज को.ऑ.हॉ.सो.लि., पत्ता-सर्वे नं.25, कासारवडवली, घोडबंदर रोड,पार्शवनाथ इंजिनियरींग कॉलेजच्या मागे, ठाणे(प)400 607. ...विरुध्दपक्षकार गणपूर्तीः सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा श्री.पी.एन.शिरसाट, मा.सदस्य सौ.भावना पिसाळ ,मा.सदस्या उपस्थितीः-तक्रारकर्त्यातर्फे वकील प्रथमेश गोखले विरुध्दपक्षकार एकतर्फा -निकालपत्र - (पारित दिनांक-05/12/2009) सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा यांचेद्वारे आदेशः- तक्रारदार यांनी दि.15/09/2009 रोजी निशाणी 1 प्रमाणे सविस्तर तक्रार अर्ज दाखल केलेले आहे त्यांचे थोडक्यात स्वरुप पुढील प्रमाणेः- तक्रार ही विरुध्द पक्षकार सोसायटीची सदस्य असुन विरुध्द पक्षकार यांनी सेवा व्यवस्थित दिली नाही सेवेत त्रृटि केली म्हणुन सदर तक्रार अर्ज त्यांचे विरुध्द दाखल केला आहे. आक्टोबर -नोव्हेबर 2008 मध्ये 'ए' विंगचे प्रवेशाजवळ अचानकरित्या आग लागली त्यामध्ये सर्व सदनिकाधारकांचे मिटर्सचे नुकसान झाले काही .. 2 .. जळालेने सोसायटीमार्फत तक्रारकर्ता यांचा विद्युत मिटर नं.9004729144 हा ही जळाले कोणतीही मिटींग न घेता 'ए' व 'बि' विगचे सर्व सदनिकाधारकांची रु.2,000/-दिले म्हणुन अन्य सर्व सदनिकाधारकांचे मिटर नविन बसविणेत आली पण तक्रारकर्ता यांना मिटर देण्यात आले नाही अखेर सदर तक्रार मंचात दाखल करत विनंती मागणी केली आहे की- 1.सोसायटी एम.एस.एडी.सी.एल कडुन त्वरित सदनिका नं.A/401ला नविन विद्युत पुरवठा मिटर विद्युत पुरवठा सुरू करावा. विरुध्द पक्षकार यांनी विद्युत मिटर व पुरवठा न दिल्याने सेवेत त्रृटी केली आहे हे घोषित करणे. 2.विद्युत पुरवठा सुरू करुन देण्यासाठी सोसायटी ने योग्यती त्वारीत दखल घ्यावी. 3.तात्पुरत्या अर्जावर आदेश होवुन त्वरित विद्युत पुरवठा सुरू करुन देण्याचे आदेश व्हावेत. 4.तक्रारकर्ता यांनी एम.एस.ई.सी.एल यांचकडे रक्कम रु.725/- विद्युम मिटरसाठी भरणा केले आहेत ते विरुध्द पक्षकार यांनी देण्याबाबत आदेश व्हावेत. 5.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांना नाहक आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासासाठी म्हणुन रक्कम रु.2,000/- नुकसान भरपाई मिळावी. 6.सदर अर्जाचा खर्च रु.10,000/- विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांना द्यावा व अन्य अनुशांगीक दाद तक्रारकर्ता यांचे बाजुने मिळावी अशी विनंती मागणी केली आहे.
2. विरुध्द पक्षकार यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्यात आली होती ती मिळाल्याची पोहच पावती मंचात दाखल केली आहे दिनांक 05/11/2009 रोजी विरुध्द पक्षकार यांनी लेखी जबाब संधी देवुन ही दाखल न केल्याने ''नो डब्ल्यु एस'' आदेश पारित करणेत आले व 19/11/2009 रोजी एकतर्फा चौकशी करिता प्रकरण नेमणेत आले तथापी तदनंतर दि. 25/11/2009 रोजी ही विरुध्द पक्षकार यांना संधी देण्यात आली तथापी अखेर पर्यंत लेखी युक्तीवाद ही दाखल न केल्याने एकतर्फा सुनावणी पुर्ण करुन एकतर्फा अंतिम आदेश पारित करण्यात .. 3 .. आले म्हणुन हे पुढील आदेशांचे पालन करणेस पात्र, बंधनकारक व जबाबदार आहेत.
3. तक्रारदार यांनी दाखल केलेला अर्ज, कागदपत्रे, प्रतिज्ञापत्र, लेखी युक्तीवाद यांची सुक्ष्मरित्या पडताळणी व अवलोकन केले असता पुढील मुद्दे उपस्थित झाले व कारण मिमांसा देऊन आदेश पारीत करणेत आले. 3.1. तकारकर्ता हे विरुध्द पक्षकार यांचे ग्राहक आहेत. सेवेसाठी विरुध्द पक्षकार यांचे कडे खर्चाची रक्कम भरुन आलेले असल्याने 'सदस्य' आहेत. सर्व सदनिकाधारकांचे सन 2008 मध्ये जळालेले मिटर प्रत्येकी रक्कम रु.2,000/- घेवुन बदलुन दिले आहे. परंतु तक्रारकर्ता यांचे बदलुन अथवा नविन मिटर जोडुन विद्युत पुरवठा दिलेला नाही. ही सेवेतील त्रृटी, निष्काळजीपणा व हलगर्जीपणा व जाणुन बुजुन अन्याय एखाद्यावरच करणेचा प्रकार आहे. म्हणुन विरुध्द पक्षकार हे दोषीत आहे हे घोषित करणे भाग पडले आहे. विरुध्द पक्षकार हे जाणुन बुजुन मंचात हजर राहिलेले नाही ही बाब अत्यंत गंभीर आहे व लक्ष वेधणारी आहे हे ही गृहीत धरणे न्यायोचित, विधियुक्त व संयुक्तिक आहे. तक्रारकर्ता यांनी विद्युत मिटर सोसायटी मार्फत जोडुन देण्याविषयीचे प्रयत्न करावयाचे होते व आहेत. पण विरुध्द पक्षकार सोसायटीने लेखी दखल न घेतलेने अखेर दि.25/05/2009 रोजी अशी लेखी नोटीस दिली आहे ती दाखल केलेली आहे. दि.06/06/2009 रोजी नोटीस दिली आहे पण त्याची दखल घेतली नाही यावरुन जाणुन बुजुन विद्युत पुरवठ्यापासुन वंचित तक्रारकर्ता यांना ठेवलेले आहे हे सिध्द होते. विद्युत पुरवठा असे अत्यंत आवश्यक व दररोजचे गरजेचे असुन सुध्दा त्यापासुन आलिप्त विरुध्द पक्षकार यांना ठेवता येणार नाही. तथापी तीच कृती केलेली आहे हे सिध्द होते (essential Commodities Act) प्रमाणे ही कायद्याचा भंग केलेला आहे हे सिध्द होते व झालोले आहे व मंचाने गृहीत धरलेले आहे. 3.2. तक्रारकर्ता यांनी क्रासचेक नं.173777 हा दि.06/11/2005 चा 1,000/-, दि.03/11/2008 रोजी 000026 चा रु.1,000/- चेक अशी रु.2,000/- सोसायटीचा दिला असुनही सोसायटीने विद्युत पुरवठा व मीटर जोडणी करुन घेण्यासाठी कंपनी कडुन प्रयत्न न करणे अन्य सर्वांणा विद्युत पुरवठा सुरू करुन देणे व फक्त तक्रारकर्ता यांनाच मिटर .. 4 .. न देणे ही बाब अन्यायकारक आहे. विद्युत मिटर का देवु शकत नाहीत व नव्हते हे मंचापुढेही स्पष्टकरणे आवश्यक होते पण जाणुन बुजुन मंचातही उपस्थित न रहाणे म्हणजेच विनाकारण तक्रारकर्ता यांना एखाद्या आकासाने विद्युत पुरवठा देत नाहीत, हेच सिध्द होते. प्रत्यक्ष भेटल्यानंतर कायदेशिर नोटिस पाठविले नंतर ही दखल न घेणे म्हणजे विरुध्द पक्षकार हेच जाणुन बुजुन तक्रारकर्ता यांना नाहक त्रास देत आहेत व त्यामुळे तक्रारकर्ता यांचे आर्थिक, शारिरीक व मानसिक रित्याही नुकसान झालेले आहे हे सिध्द होते. जाणुन बुजुन दखल न घेणे ही सेवेतील त्रृटी, निष्काळजीपणा व हलगर्जीपणा आहे. 3.3. तक्रारकर्ता यांनी ही एम.एस.ई.डी.सी कडे दि.03/07/2009 रोजी प्रत्यक्ष भेटुन 720/- रुपये भरले आहे की पावती दाखल केलेले आहे. म्हणजेच मिटर मिळणेसाठी प्रत्यक्ष कंपनीकडे जावुन ही प्रयत्न केलेले आहे हे ही सिध्द होते. दि.06/07/2009 रोजी वायरमन कडुन सर्व वायरिंगही नविन करुन घेतली आहे पण विरुध्द पक्षकार यांनी मिटर देणेबाबत एम.एस.ई.बी कडे पुढील प्रयत्न केले नाही म्हणुन आदेश. -आदेश - 1.तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अशंतः मंजूर करण्यात आला आहे.
2.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांना त्वरित विद्युत पुरवठा मिटर जोडणी करण्यात विद्युत पुरवठा कंपनी कडुन देण्याबाबतचे प्रयत्न व सहकार्य त्वरित करण्याचे आहे. विद्युत पुरवठयापासुन सोसायटी व कंपनीने गैरसोय करण्याचा व अडचणी निर्माण करण्याचे कोणतेही हक्क व अधिकार नाहीत म्हणुन आदेश प्रत मिळणेपासुन 48 तासांचे आत विद्युत पुरवठा व मिटर जोडणी करावेत.
3.परित आदेशांचे पालन न केलेस विरुध्द पक्षकार यांचे वर कडक कार्यवाही दरखास्त दाखल झालेस करणेत येईल, गय केली जाणार नाही व दंडात्मक कार्यवाईचे आदेश करणेत येतील.
.. 5 .. 4.सदर अर्जाचा खर्च रु.2,000/-(रु. दोन हजार फक्त) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांना द्यावी व कोणत्याही प्रकारचे त्रास देण्याची तसदी व तोसिस करु नये.
5.सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्क देण्यात यावी. 6.तक्रारदार यांनी मा.सदस्यांकरीता तक्रार दाखल केलेल्या दोन प्रती (फाईल)त्वरीत परत घेऊन जाव्यात. अन्यथा मंच जबाबदार राहणार नाही. म्हणुन केले आदेश. दिनांकः- 05/12/2009 ठिकाणः-ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट)(सौ.भावना पिसाळ)(सौ.शशिकला श.पाटील) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|