Maharashtra

Dhule

CC/13/39

Shri Bhojusing Samhusing Jamadar - Complainant(s)

Versus

Rasi Seeds Pvt. Ltd. - Opp.Party(s)

D.D.Joshi

21 Nov 2014

ORDER

Consumer Disputes Redressal Forum,Dhule
JUDGMENT
 
Complaint Case No. CC/13/39
 
1. Shri Bhojusing Samhusing Jamadar
A/P. Thalner,Tal. Shirpur, Dist. Dhule
Dhule
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Rasi Seeds Pvt. Ltd.
273, kamrajavarroad, Attur,636102,Dist. shelm (TAMILNADU)
sHELM
Tamilnadu
2. M/S. Shweta Traders
Thalner, Tal. Shirpur
Dhule
Maharashtra
3. M/S. Bhagirath Traders
Shirpur,
Dhule
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V.R.Londhe PRESIDENT
 HON'BLE MR. S.S. Joshi MEMBER
 
For the Complainant:D.D.Joshi, Advocate
For the Opp. Party:
ORDER

 

निशाणी नं.१ वरील आदेश

 

(१)       सामनेवाले क्र.१ यांनी उत्‍पादीत केलेल्‍या व सामनेवाले क्र.२ यांनी विक्री केलेल्‍या कापसाचे बियाण्‍यापासून तक्रारदारास उत्‍पन्‍न मिळाले नाही असे नमूद करुन, त्‍यांचेकडून नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्‍वये या मंचात दाखल केली आहे. 

 

(२)       सदर प्रकरणी मंचासमोर कामकाज सुरु असतांना दि.३०-०९-२०१४ रोजी सामनेवाले यांनी नि.नं. १६ वर पुरसीस दाखल केली आहे.  त्‍यात त्‍यांनी   “याकामी सदर तक्रारदाराचे व जाबदेणार यांचे आपसात समझोता होऊन सदर तक्रारदारास तसे Compensation दिलेले आहे Acknowledgement आणि  दिलेला चेकची झेरॉक्‍स प्रत दाखल करित आहोत.  सबब विनंती की, सदर तक्रारदाराचा तक्रार अर्ज निकाली काढण्‍यात ” असे नमूद केले आहे व त्‍यावर सामनेवाले यांच्‍या विद्वान वकिलांची स्‍वाक्षरी आहे.

(३)       सामनेवाले यांनी दाखल केलेली नि.नं. १६ वरील पुरसीस व त्‍यासोबतच्‍या दि.०३-०४-२०१४ रोजीच्‍या Acknowledgement of compensation चे अवलोकन करता तक्रारदार व सामनेवाले यांच्‍यात मंचाबाहेर आपसात सामंजस्‍याने तडजोड झाली असून, तक्रारदारांनी नुकसान भरपाईपोटी सामनेवाले यांच्‍याकडून रक्‍कम  १,२२,१४८/- (अक्षरी रक्‍कम रुपये एक लाख बावीस हजार एकशे अठ्ठेचाळीस मात्र) स्‍वीकारले आहेत व त्‍यावर त्‍यांची स्‍वाक्षरी आहे.  सामनेवाले यांच्‍या या अर्जावर तक्रारदार यांचे म्‍हणणे सादर करण्‍याचा आदेश दि.३०-०९-२०१४ रोजी करण्‍यात आला होता.  या दिवशी आणि त्‍यानंतरच्‍या तारखेला म्‍हणजे दि.१७-११-२०१४ रोजी तक्रारदारयांचे वकील मंचात उपस्थित होते.  तथापि, त्‍यांनी त्‍यावर म्‍हणणे दाखल केलेले नाही.  मात्र सामनेवाले यांनी नि.नं.१६ वर दाखल केलेली पुरसीस आणि त्‍यासोबत दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता उभयतात कोणताही वाद शिल्‍लक राहिला नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  म्‍हणून तक्रारदारांच्‍या तक्रारीचे निवारण झाले असल्‍याने सदर प्रकरण निकाली काढणे योग्‍य होईल असे मंचाचे मत आहे.   सबब सामनेवालेंची पुरसीस मंजूर करण्‍यात आली असून, खालील प्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे.   

आदेश

 (अ)  तक्रारदार यांची तक्रार निकाली काढण्‍यात येत आहे. 

      (ब)  तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही. 

धुळे.

दिनांक : २१-११-२०१४ 

                  (श्री.एस.एस.जोशी)       (श्री.व्‍ही.आर.लोंढे)

                      सदस्‍य                अध्‍यक्ष

                      जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.   

 
 
[HON'BLE MR. V.R.Londhe]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. S.S. Joshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.