जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.331/2008. प्रकरण दाखल दिनांक – 13/10/2008. प्रकरण निकाल दिनांक –25/03/2009. समक्ष - मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती. सुजाता पाटणकर. सदस्या. मा. श्री.सतीश सामते. सदस्य. 1. गिरीष बाबुभाई ठक्कर वय वर्षे 52, व्यवसाय व्यापार, रा. दिलीपसिंह कॉलनी नांदेड जि. नांदेड. 2. हरीष बाबुभाई ठक्कर पस, 50 वर्षे, धंदा व्यापार, रा.दिलीपसिंह कॉलनी, नांदेड. अर्जदार विरुध्द रंजन इलेक्ट्रीकल अन्ड इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन उदावंत बिल्डींग, दुसरा मजला, श्रीनगर बसस्टॉप, गैरअर्जदार श्रीनगर, नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.व्ही.व्ही.नांदेडकर. गैरअर्जदारा तर्फे - अड.जी.पी.वटटमवार. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार रंजन इलेक्ट्रीकल यांच्या ञूटीच्या सेवे बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे दाखल केली आहे. अर्जदार क्र.1 व 2 हे फोटो व्हीजन या संस्थेचे भागीदार आहेत. त्यांना त्यांचे वजिराबादस्थित दूकानाचे नूतनीकरण केल्यामूळे तेथे वातानूकूलीत यंञ बसवायचे होते. त्यासाठी त्यांनी गैरअर्जदारास ब्लू स्टार कंपनीच्या एसी साठी आपली ऑर्डर नोंदविली व त्यासाठी त्यांनी दि.17.08.2007 रोजी कॅनरा बँकेचा चेक द्वारे रु.24,000/- ची पूर्ण रक्कम दिली. ऑर्डर देताना दूकानांचे उदघाटन सोहळा दि.04.09.2007 रोजी ठरला होता. त्याप्रमाणे त्याआधी किंवा त्यादिवशी गैरअर्जदारांनी एसी बसवायचे मान्य केले होते. मध्यंतरी ब-याच वेळा गैरअर्जदाराकडे पाठपूरावा करुनही त्यांचे हलगर्जीपणामूळे ते उदघाटनाचे दिवशीपर्यत एसी बसवू शकले नाहीत. त्यामूळे कार्यक्रम थांबू नये यासाठी अर्जदार यांनी होल्टांज कंपनीचा दूसरा एसी बसवून घेतला. यानंतर उदघाटनाचे दूसरे दिवशी दि.05.09.2007 रोजी गैरअर्जदार यांनी एसी पाठविला पण तो बसवून न घेता अर्जदार यांनी वापस पाठविला. वेळेत अर्जदार यांचे काम न केल्यामूळे अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना रक्कम वापस मागितली व त्यांनी त्यांची चूक कबूल करुन दि.17.09.2007 रोजी यू.टी.आय. बँकेचा चेक द्वारे पूर्ण रक्कम वापस दिली. गैरअर्जदार यांनी केलेल्या विलंबामूळे अर्जदार यांना नूकसान झाले व मानसिक ञास झाला. त्यासाठी गैरअर्जदार यांना कायदेशीर नोटीसही पाठविली पण त्यांचे उत्तर गैरअर्जदार यांनी दिले नाही. म्हणून रु.50,000/- व दि.04.09.2007 पासून 18 टक्के व्याज गेरअर्जदाराकडून मिळावेत अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. ते ब्लू स्टार कंपनीचे अधिकृत विक्रेते आहेत. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचे दूकानात येऊन ऑर्डर दिली व दोन चेकद्वारे रु.24,000/- रक्कम ही दिली. गैरअर्जदार यांचे नियम व अटीस अर्जदारास सांगितल्या होत्या. अर्जदाराची रक्कम प्राप्त झाल्या बरोबर गैरअर्जदार यांनी ती रक्कम ब्लू स्टार कंपनीस पाठवून एसी घेतला. काही अडचणीमूळे कंपनी कडून एसी पाठविण्यास उशिर झाला. यात गैरअर्जदार यांची काही चूक नाही. एसी उदघाटनाच्या दूस-या दिवशी आला असता त्यांनी तो ताबडतोब अर्जदार यांचे दूकानात पाठविला परंतु त्यांनी तो न बसवून घेता वापस केला. अर्जदारानी त्यांना ऑर्डरच्या वेळेस दिलेली रक्कम वापस मागितली असता त्यांनी चेकद्वारे पूर्ण रक्कम अर्जदार यांना वापस केली आहे. त्यावेळेस त्यांनी कोणताही उजर न बाळगता त्यांनी ती रक्कम दि.17.09.2007 रोजी स्विकारलेली आहे. विलंब होण्यामागे गैरअर्जदार यांचा कोणताही अप्रामाणीक हेतू नव्हता. अर्जदारांनी एसी वापस केल्यामूळे उलट गैरअर्जदार यांचे नूकसान झालेले आहे. अर्जदार यांनी दि.24.09.2007 रोजी म्हणजे रक्कम घेतल्यानंतर कायदेशीर नोटीस पाठविली. त्यांला उत्तर देणे गैरअर्जदारावर बंधनकारक नव्हते. गैरअर्जदार यांनी पूर्ण रक्कम वापस केल्यानंतर त्यांचेतील करार संपूष्टात आला आहे. म्हणजे गैरअर्जदार यांनी सेवेत कोणतीही ञूटी केलेली नाही, सबब अर्जदार यांची तक्रार फेटाळण्यात यावी अशी मागणी केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपआपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होय. होते काय ? 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी फोटो व्हीजन हे त्यांचे दूकानासाठी गैरअर्जदार यांचेकडे दि.17.08.2007 रोजी रु.24,000/- देऊन एसी बूक केला होता. परंतु गैरअर्जदारांनी तो एसी वेळेत पूरवीला नाही व त्याबददल त्यांनी दि.17.09.2007 रोजीला अर्जदाराच्या मागणीप्रमाणे रक्कम वापस केलेली आहे. आता राहिला प्रश्न फक्त अर्जदारास झालेल्या मानसिक ञासाबददल व गैरसोयीबददल. अर्जदार यांनी गैरअर्जदाराचा जो ऑर्डर फॉर्म दाखल केला आहे यात Delivery Within 8 days असे स्पष्टपणे म्हटलेले आहे. ही ऑर्डर दि.14/08/07 ला जरी बूक केलेली असेल परंतु प्रत्यक्ष अर्जदाराने दि.17/08/07 ला रक्कम दिली तेथून जरी आठ दिवस गृहीत धरले तरी दि.25.08.2007 पर्यत एसी पूरवीणे आवश्यक होते परंतु गैरअर्जदार हे दि.05.09.2007 पर्यत एसी देऊ शकलेले नाहीत. गैरअर्जदाराच्या मते ही रक्कम त्यांनी ब्लू स्टार कंपनीस पाठविली व तेथून एसी येण्यास विंलब झाला पण विलंब का झाला ? यांचा समंर्पक उत्तर किंवा पूरावा गैरअर्जदारांनी दाखल केलेला नाही. फक्त विलंब झाला म्हणजे अडचण काय आली ? हे स्पष्ट होत नाही व काही अडचण नसेल तर मग एसी पूरविण्यास उशिर का झाला हा प्रश्न निर्माण होतो. अर्जदाराच्या दूकानाचा नूतनीकरण सोहळा असल्यामूळे एसी न मिळाल्यामूळे त्यांची गैरसोय झाली व गैरअर्जदार यांनी आठ दिवसांत एसी पूरवण्याचे वचन दिलेले असताना त्यांनी तब्बल 10 दिवसांनी उशिराने एसी आणला. अर्जदाराने रक्कम जरी स्विकारली असली तरी त्यांनी पाठविलेल्या दि.24.09.2007 रोजीच्या नोटीसला गैरअर्जदाराने उत्तर दिले नाही. अर्जदाराने विनाअट जर रक्कम स्विकारली असेल तर त्यांनी नोटीसला उत्तर देऊन तसे करणे आवश्यक होते परंतु तसे झाले नाही. अर्जदारानी त्यांचे नूकसान झाले व मानसिक ञास झाला म्हणून रु.51,000/- मागितलेले आहेत ही त्यांची मागणी अवास्तव वाटते. कारण मार्केट मध्ये ब-याच कंपनीचे एसी उपलब्ध आहेत. हा एसी नाही मिळाला तर दूस-या कंपनीचा एसी ते बसवू शकतात. त्यामूळे केवळ एसी नसल्यामूळे अर्जदाराचे नूकसान रु.51,000/- होणे शक्य नाही. गैरअर्जदारांनी ऐक्सीस कंपनीचे स्टेटमेंट दाखल केलेले आहे. त्याप्रमाणे दि.27.08.2007 रोजी एसी साठी ब्लू स्टार कंपनीस पाठविल्याचे दिसून येते. अर्जदार यांनी दिलेली रक्कम किमान 10 दिवस गैरअर्जदार यांचेकडे पडून राहीली व त्यानतंर ती रक्कम पाठविली. यांचा अर्थ गैरअर्जदारांनी ती रक्कम वापरुन 8 दिवसांनी उशिरा रक्कम पाठविली व तेवढाच विलंब एसी ची डिलेव्हरी देण्यास झाला. यात गैरअर्जदार यांनी रक्कम पाठविण्यास हलगर्जीपणा केला असे दिसून येते. त्यामूळे पर्यायाने दोघांनाही ञास झाला. अर्जदार यांनी चढया भावाने दूस-या कंपनीचा एसी खरेदी केला आहे असा उल्लेख जरी केलेला आहे तरी त्यांनी दूस-या एसी बददल किती रक्कम दिली यांचा उल्लेखही केलेला नाही व पूरावा ही दिलेला नाही म्हणून त्यांची रु.51,000/- ची मागणी मंजूर करण्याजोगी नाही असे या मंचाचे मत आहे. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवादेण्यामध्ये ञूटी केल्याचे दिसून येते म्हणून गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना शास्ती म्हणून रक्कम रु.4,000/- देणे योग्य राहील. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत दोन्ही अर्जदार यांना मिळून एकूण रक्कम रु.4000/- त्यांना झालेल्या मानसिक ञासाबददल दयावेत. 3. दावा खर्च म्हणून रु.1,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |