// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 76/2015
दाखल दिनांक : 31/03/2015
निर्णय दिनांक : 23/06/2015
प्रदीप गोपालराव चिद्दरवार
वय 56 वर्षे, धंदा – व्यापार
रा. गांधी चौक, अंबादेवी रोड,
अमरावती जि. अमरावती : तक्रारकर्ता
// विरुध्द //
राणा लॅन्डमार्कस् प्रा.लि.
डायरेक्टर योगेश नारायणराव राणा
रा. लक्ष्मी नारायण निवास, कॅम्प रोड,
अमरावती ता.जि. अमरावती.
व्दारा जैल सुप्रिटेंडेन्ट सेंट्रल जैल, अमरावती
ता.जि. अमरावती : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. जुनेजा
विरुध्दपक्ष तर्फे : एकतर्फा आदेश
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 23/06/2015)
ग्राहक तक्रार क्रमांकः 76/2015
..2..
मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
1. तक्रारदाराने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
2. तक्रारदाराचे कथना प्रमाणे विरुध्दपक्ष हा राणा लॅंड मार्कस् या नावाने बांधकाम व्यवसाय करतो. विरुध्दपक्ष बांधित असलेल्या कठोरा जि. अमरावती येथील श्री लक्ष्मीनारायण राणा रेसिडेन्सी यातील सदनिका बांधकाम करुन ती विकण्याची योजना सुरु केली होती. तक्रारदारास सदनिका घ्यावयाची असल्याने त्याने विरुध्दपक्षासोबत बोलणे केले व श्री लक्ष्मीनारायण राणा रेसिडेन्सी यातील सदनिका क्रमांक 301 मध्ये 535 चौ.फुट रु. ७,५१,०००/- ला खरेदी करण्याचा करार विरुध्दपक्षा सोबत केला, तक्रारदाराने विरुध्दपक्ष यांना एकूण रु. १,८७,५००/- या सदनिकेच्या किंमती पैकी दिली होती. विरुध्दपक्षाने या कराराबाबत तक्रारदारास इसारचिठ्ठी करुन दिली होती त्यानुसार सदनिकेचा ताबा 2 वर्षात देण्याचे विरुध्दपक्षाने कबुल केले.
3. तक्रारदाराचे कथना प्रमाणे विरुध्दपक्ष यांनी इसारचिठ्ठी प्रमाणे कोणतेही बांधकाम सुरु केले नाही व सदनिकेचा ताबा तक्रारदाराला दिलेला नाही त्यामुळे विरुध्दपक्षाची ही कृती
अनुचित व्यापार प्रथा व सेवेतील त्रुटी झाल्याने तक्रारदार यास मानसिक तसेच शारिरीक त्रासही झालेला आहे. याबाबत तक्रारदाराने
ग्राहक तक्रार क्रमांकः 76/2015
..3..
दि. १८.२.२०१५ रोजी विरुध्दपक्ष यांना नोटीस दिली परंतु त्यानंतरही विरुध्दपक्षाने त्या नोटीसला उत्तर दिले नाही व सदनिकेचे बांधकामाबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. यासाठी नुकसान भरपाई मिळावी म्हणून ही तक्रार दाखल करण्यात आली.
4. विरुध्दपक्ष यांना मुदत देवून त्यांनी लेखी जबाब दाखल केला नाही त्यामुळे सदरचे प्रकरण हे विरुध्दपक्षाच्या लेखी जबाबाशिवाय चालविण्यात आले.
5. तक्रारदारा तर्फे अॅड. श्री. जुनेजा यांचा युक्तीवाद ऐकला.
6. तक्रारदाराने तक्रार अर्जात नमूद केलेल्या बाबी शाबीत करण्यासाठी निशाणी 2 ला दस्त दाखल केले. त्यानुसार श्री लक्ष्मी नारायण रेसिडन्सी या नावाने जी इमारत बांधणार होता त्यातील सदनिका क्र. ३०१ मधील 535 चौ. फुट रु. ७,५१,०००/- मध्ये विकण्याचा करार केला. सदनिकेचा ताबा 2 वर्षात देण्याबद्दल करार केला होता. त्यात असे नमूद आहे की, या सदनिकेच्या किंमती पैकी रु. १,८७,५००/- विरुध्दपक्षाला तक्रारदाराकडून प्राप्त झाले होते. परंतु विरुध्दपक्षाने अजुन पर्यंत इमारतीचे बांधकाम सुरु केलेले नाही तसेच करारा प्रमाणे सदनिकेचा ताबा मुदतीत दिला नाही. तक्रारदाराने दि. १८.२.२०१५ रोजी जी नोटीस विरुध्दपक्षाला पाठविली होती तिला विरुध्दपक्षाने उत्तर दिलेले
ग्राहक तक्रार क्रमांकः 76/2015
..4..
नाही. यावरुन हे सिध्द होते की, विरुध्दपक्षाने तक्रारदाराकडून घेतलेले रु. १,८७,५००/- हे स्वतःच्या फायद्यासाठी वारले असून कराराचा भंग केलेला आहे त्यामुळे त्यांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करुन सेवेत त्रुटी केलेली आहे. सबब खालील आदेशा प्रमाणेतक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो.
अंतीम आदेश
- तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो.
- विरुध्दपक्ष यांनी तक्रारदाराला रु. १,८७,५००/- (अक्षरी रु. एक लाख सत्याअंशी हजर पांचशे फक्त) दि. ६.६.२०१२ पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाच्या आत परत करावी.
- विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारास मानसीक व शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई रु. १०,०००/- (अक्षरी रु. दहा हजार फक्त) व या तक्रारीचा खर्च रु. २,०००/- (अक्षरी रु. दोन हजार फक्त) द्यावे.
- आदेशाची प्रत उभय पक्षकारांना विनामुल्य द्यावी.
दि. 23/06/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष