// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 70/2015
दाखल दिनांक : 31/03/2015
निर्णय दिनांक : 02/07/2015
नागसेन साहेबराव वाकपांजर
वय 33 वर्षे, धंदा – व्यापार
रा. शिवाजी नगर, बनोसा (दर्यापूर)
ता. दर्यापूर जि. अमरावती : तक्रारकर्ता
// विरुध्द //
राणा लॅंड मार्कस् प्रा.लि.,
तर्फे डायरेक्टर श्री योगेश नारायणराव राणा
वय 38 वर्षे, धंदा व्यापार
व्दारा जैल सुप्रिटेंडेन्ट अमरावती सेंट्रल जैल,
जैल रोड, अमरावती : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. एन. कलंत्री
विरुध्दपक्ष तर्फे : एकतर्फा आदेश
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 02/07/2015)
ग्राहक तक्रार क्रमांकः 70/2015
..2..
मा. रा.कि. पाटील, सदस्य
1. तक्रारदाराने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
2. तक्रारदाराचे थोडक्यात असे म्हणणे आहे की, विरुध्दपक्ष हे राणा लॅन्डमार्क प्रा.लि. चे संचालक असून त्यांचा सदनिका बांधणे व ते विकण्याचा व्यवसाय आहे.
3. सदर व्यवसाया अंतर्गत विरुध्दपक्षाने शेत सर्व्हे नं. १९०/१-बी मौजे रहाटगांव ता.जि. अमरावती येथे श्री. लक्ष्मीनारायण राणा रेसिडेन्सी येथे सदनिका बांधण्याचे ठरविले. तक्रारदाराने सदर सदनिके मधील एक सदनिका विकत घेण्याचे ठरविले. त्यानुसार तक्रारदाराने दि. १६.५.२०१३ रोजी विरुध्दपक्षा सोबत करारनामा केला. सदर करारनाम्यानुसार सदर राणा रेसीडेन्सी मधील विंग जी, सदनिकाक्र. ४०५, एक हॉल, बेड रुम इत्यादी सुपर बिल्टअप क्षेत्र ५९० फुट असे होते. सदर सदनिका, करारनाम्याप्रमाणे रु. ८,००,०००/- अशा किंमतीची असुन, तक्रारदाराने विरुध्दपक्षाला आगाऊ रक्कम रु. २,००,०००/- चा भरणा केला. करारनाम्या प्रमाणे सदर सदनिकेचा ताबा 2 वर्षाचे आत देण्याचे ठरले होते.
4. तक्रारदाराला 11 महिन्यानंतर असे आढळून आले की, विरुध्दपक्षाने सदनिका बांधकाम सुरु केले नसुन,
ग्राहक तक्रार क्रमांकः 70/2015
..3..
भविष्यात पण ते सुरु करण्याची शक्यता नव्हती. विरुध्दपक्षाने दि. ३०.६.२०१३ रोजी एक संमतीपत्र विरुध्दपक्षाने तयार करुन, 2 वर्षाचे आत बांधकाम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु विरुध्दपक्षाने करारनामा व संमती पत्राचा भंग केल्यामुळे दि. १६.२.२०१४ रोजी तक्रारदाराने एक कायदेशीर नोटीस वकीलामार्फत पाठविली. परंतु सदर नोटीस विरुध्दपक्षाने नो क्लेम हया शे-यासह परत पाठविली.
5. अशा प्रकारे दि. ७.२.२०१३ व दि. २०.४.२०१३ रोजी तक्रार करण्याचे कारण घडल्यामुळे तक्रारदाराने सदर तक्रार वि. मंचात दाखल करुन विनंती केली की, विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी करुन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला म्हणून तक्रारदाराने विरुध्दपक्षाकडे जमा केलेले रु. २,००,०००/- हे दि. १६.५.२०१३ पासुन द.सा.द.शे. 12 टक्के प्रमाणे व रु. १,००,०००/- नुकसान भरपाईसह परत करावे. तक्रारदाराला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु. २५,०००/- व तक्रार खर्च रु. १०,०००/- विरुध्दपक्षाकडून मिळण्यात यावे. तक्रारदाराने निशाणी 2 प्रमाणे दस्त 1 ते 8 दाखल केले.
6. विरुध्दपक्षाला नोटीस प्राप्त झाल्यानंतर निशाणी 9 प्रमाणे अर्ज सादर करुन, विरुध्दपक्षाला म्हणणे मांडण्यासाठी वेळ
ग्राहक तक्रार क्रमांकः 70/2015
..4..
मागुन घेतला. वि. मंचाने पुरेसा वेळ देऊन सुध्दा विरुध्दपक्षाने लेखी जबाब व से न दिल्यामुळे सदर प्रकरण विरुध्दपक्षाच्या लेखी जबाबाशिवाय पुढे चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
7. तक्रारदाराचा तक्रार अर्ज व दाखल केलेले दस्तावेज, तक्रारदाराच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद, विरुध्दपक्षाचा लेखी अर्ज यावरुन वि. मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेतलीत.
मुद्दे उत्तर
- विरुध्दपक्षाने अनुचित व्यापार प्रथेचा
अवलंब करुन सेवेत त्रुटी केल्या आहेत का ? होय
- तक्रारदार हा शारिरीक व मानसिक त्रासापोटी
नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे का ? होय
- आदेश काय ? अंतीम आदेशा प्रमाणे
कारणे व निष्कर्ष ः
8. तक्रारदारातर्फे अॅड. श्री. एन. कलंत्री यांनी त्यांच्या तोंडी युक्तीवादात त्यांच्या मुळ तक्रार अर्जातील वक्तव्याचा पुर्नरुच्चार करुन, तसेच विरुध्दपक्षाला नोटीस मिळून सुध्दा त्यांचे तर्फे सदर प्रकरणात कोणीही हजर न झाल्यामुळे
तक्रार अर्जातील प्रार्थने प्रमाणे नुकसान भरपाई देण्याची विनंती वि. मंचासमोर केली.
ग्राहक तक्रार क्रमांकः 70/2015
..5..
9. तक्रारदारातर्फे दाखल केलेल्या दस्त 2(1) प्रमाणे, तक्रारदार व विरुध्दपक्षा मध्ये दि. १६.५.२०१३ रोजी झालेल्या लेखी करारनामा व इसार चिठ्ठी प्रमाणे सदर सदनिकेचा ताबा करारनाम्याच्या तारखेपासुन 2 वर्षाचे आत देण्याचे ठरले होते. सदरनिकेची किंमत रु. ८,००,०००/- ठरली होती व तक्रारदाराने विरुध्दपक्षाला दि. ७.२.२०१३ रोजी रु. ५०,०००/- व दि. २०.४.२०१३ रोजी रु. १,५०,०००/- रोख दिल्याचे सदर करारनाम्यावरुन दिसून येते. तसेच दस्त 2/8 प्रमाणे विरुध्दपक्षाने सर्व ग्राहकांसाठी एक संमतीपत्र तयार करुन पहिल्या हप्त्याच्या दिनांकापासुन 2 वर्षाचे आत सदर सदनिकेचा ताबा देण्याचे मान्य केले आहे. त्याप्रमाणे विरुध्दपक्षाने सदर सदनिकेचा ताबा त.क. ला देणे अपेक्षीत होते. परंतु त.क. च्या म्हणण्याप्रमाणे विरुध्दपक्षाने कामाला काहीही सुरुवात केली नव्हती व तशी शक्यता पण नव्हती. अशा प्रकारे विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी करुन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे दिसुन येते. तसेच तक्रारदाराने विरुध्दपक्षाची वेळोवेळी भेट घेवून सुध्दा त्यांनी तक्रारदाराला समाधानकारक उत्तर दिले नाही म्हणून मुद्दा क्र. 1 ला होकारार्थी उत्तर देण्यात येते.
ग्राहक तक्रार क्रमांकः 70/2015
..6..
10. मुद्दा क्र. 2 चा विचार करता, विरुध्दपक्षाने तक्रारदाराकडून अॅडव्हान्स बुकींगची रक्कम घेवून सुध्दा करारनाम्या प्रमाणे तिचा उपयोग न करता, सदर रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी इतर कामासाठी उपयोग करुन घेतला व तक्रारदाराच्या सदनिका बांधण्यासाठी काहीही कार्यवाही केली नाही. अशा प्रकारे तक्रारदाराला नक्कीच शारिरीक व मानसिक त्रास झाला असणार व त्यासाठी विरुध्दपक्ष हे स्वतः जबाबदार आहेत हया निष्कर्षाप्रत वि. मंच आले असून मुद्दा क्र. 2 ला होकारार्थी उत्तर देण्यात येते. त्यानुसार तक्रारदाराची तक्रार अंशतः मान्य करण्यात येऊन खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येते.
अंतीम आदेश
- तक्रारदाराचा अर्ज अंशतः मान्य करण्यात येते.
- विरुध्दपक्षाने तक्रारदाराकडून घेतलेली बुकींग रक्कम रु. २,००,०००/- व्याजासह द.सा.द.शे. 9 टक्के दराने दि. १६.५.२०१३ ते रक्कम देय दिनांकापर्यंत, परत करावी.
ग्राहक तक्रार क्रमांकः 70/2015
..7..
- तक्रारदाराला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई रु. १०,०००/- व तक्रार खर्च रु. २,०००/- असे एकूण रु. १२,०००/- विरुध्दपक्षाने तक्रारदाराला द्यावे.
- आदेशाच्या प्रती दोन्ही पक्षांना विनामुल्य द्यावीत.
दि. 02/07/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष