Maharashtra

Ahmednagar

CC/17/340

1. Gulab Suresh Dhaktode - Complainant(s)

Versus

Ramesh Ganpatrao Salunke - Opp.Party(s)

Adv Shaikh

04 Oct 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/17/340
( Date of Filing : 11 Dec 2017 )
 
1. 1. Gulab Suresh Dhaktode
A/P Dharangoan Road, Kopargoan, Tal. Kopargoan
Ahmednagar
Maharashtra
2. Ratnmala Gulab Dhaktode
A/P Dharangoan Road, Kopargoan, Tal. Kopargoan
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Ramesh Ganpatrao Salunke
A/P Subhadra nagar, Near Ganpati Temple, Kopargoan, Tal. Kopargoan, For power of attorney Vidhya Ramesh Salunke, Prop. Veer Developers Kopargoan, Tal. Kopargoan
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 04 Oct 2019
Final Order / Judgement

(द्वारा मा.सदस्‍य : श्री.महेश निळकंठ ढाके)

___________________________________________________________

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.    तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदार क्र.१ व २ हे पती-पत्‍नी  असुन ते मौजे कोपरगाव, ता.कोपरगांव, जि.अहमदनगर येथ्‍ज्ञे कायम स्‍वरूप वास्‍तव्‍यास आहे. सामनेवाले हे व्‍यवसायाने बिल्‍डर्स असुन त्‍यांचा विर डेव्‍हलपर्स साईनक्षत्र सर्वे नं.२००/२ अे जुना टाकळी रोड, कोपरगांव, जि. अहमदनगर येथे साईनक्षत्र हाईटस या साईटचे कामकाज चालू आहे.

     मिळकतीचे वर्णन पुढीलप्रमाणेआहे.

     तुकडी जिल्‍हा अहमदनगर पोट तुकडी व ता. कोपरगांव पैकी कोपरगांव नगर पालिका हद्दीमधील निवासी बिन शेती प्‍लॉट मिळकत –

     स.नं.                   चौ.मिटर          आकार रू.-पैसे

    २००(२अ पै) ७          २०२४                १४-०९       

यांची चतुःसिमा

पुर्वेस – स.नं. २०० पैकी कातकडे यांचे क्षेत्र

दक्षिणेस – नाला

पश्चिमेस – खडकी रस्‍ता

उत्‍तरेस  - स.नं.२०० पैकी वाघस्‍कर यांचे क्षेत्र

     यात विर डेव्‍हलपर्स ए विंग व बी विंग या इमारतीचे बांधकाम चालू आहे. यापैकी तक्रारदारस जो फ्लॅट खरेदीने देण्‍याचा सौदा केला आहे त्‍या मिळकतीचा तपशील पुढीलप्रमाणे.

ए विंग साई नक्षत्र हाईट्स मधील

     फ्लॅट क्रमांक     क्षेत्र चौ.मिटर

     ए – २०४         ६४ – ८२

याची चतुःसिमा

पुर्वेस - पॅसेज व फ्लॅट नं.२०३

दक्षिणेस – मोकळी जागा  व पलीकडे नाला

पश्चिमेस – मोकळी जागा व पलीकडे टाकळी रोड

उत्‍तर – फ्लॅट नं.१५

खरेदीची किंमत रूपये १६,००,०००/- अक्षरी रू. सोळा लाख मात्र

३.  तक्रारदाराने सामनेवालेस भरणापोटी दिलेल्‍या रकमेचा तपशील   खालीलप्रमाणे –

   १.   दि.२८/४/२०१६ रोजी फ्लॅट बुकिंगसाठी रोख ५१,०००/- (अक्षरी रूपये एक्‍कावन्‍न हजार मात्र) दिले.

   २. दि.१०/५/२०१६ रोजी २,००,०००/- (अक्षरी रू.दोन लाख मात्र) चेकने अदा 

      केले.

   ३.   दि.२२/६/२०१६ रोजी १,००,०००/- (अक्षरी रू.एक लाख मात्र) चेक ने अदा केले.

   ४. दि.२४-०६-२०१६ रोजी रक्‍कम रूपये १,५०,०००/- (अक्षरी रू. एक लाख

   पन्‍नास हजार मात्र) रोख अदा केली.

 

येणेप्रमाणे तक्रारदाराने सामनेवालेस एकुण रक्‍कम रूपये ५,०१,०००/- (अक्षरी रूपये (अक्षरी रूपये पाच लाख एक हजार मात्र) चा भरणा केलेला आहे.  परंतु सामनेवाला याने दि.०१-०९-२०१६ रोजी केलेल्‍या साठेखताचे फ्लॅट विक्रीच्‍या  कारारनाम्‍यामध्‍ये केवळ एक लाख रूपयांचा भरणा मिळालेला आहे, असे दाखविलेले आहे उर्वरित रक्‍कम दिल्‍याबाबतचा सामनेवाला याने साठेखतात कोणताही उल्‍लेख केलेला नाही.  सदर भरण्‍यापोटी सामनेवाला याने तक्रारदारास विर डेव्‍हलपर्स या नावाने भरणा मिळाल्‍याच्‍या पावत्‍या दिलेल्‍या आहेत व तक्रारदाराने दिलेली रक्‍कम रूपये ५,०१,०००/- (अक्षरी रूपये पाच लाख एक हजार मात्र) ची रक्‍कम वजा जाता तक्रारदाराकडे आजरोजी फक्‍त रक्‍कम रूपये १०,९९,०००/- (अक्षरी रूपये दहा लाख नव्‍वयाण्‍णव हजार मात्र) देणे बाकी आहे. सदरचा फ्लॅट बुक करतांना सामनेवाला याने तक्रारदारास ए विंग मधील सर्व फ्लॅट बुक झालेले आहे व फ्लॅटसचे व इमारतीचे अपुर्ण राहिलेले बांधकाम लवकरच करून सदरचा फ्लॅट राहण्‍यायोग्‍य करून देवु असा विश्‍वास व भरवसा सामनेवाले यांनी तक्रारदारास दिलेला होता. परंतु ए विंग मध्‍ये जो फ्लॅट सामनेवाले याने तक्रारदारास दिलेला आहे त्‍या इमारतीचे व फ्लॅटचे बांधकाम अद्याप पुर्ण झालेले नाह. फ्लॅट बुक करतांना सामनेवाले याने तक्रारदारास जे आश्‍वासन दिले होते त्‍याप्रमाणे सामनेवाले यांनी पुर्तता केली नाही. सदरचा फ्लॅट बुक केल्‍यापासुन अर्धवट काम केल्‍याचे स्थितीत पडलेला आहे. सामनेवालेकडे इमारतीचे बांधकाम पुर्ण करण्‍यास रक्‍कम उपलब्‍ध नसल्‍याने सदर इमारतीचे बांधकाम रखडलले आहे. त्‍यामुळे तक्रारदार हे जास्‍त दिवस फ्लॅटचा ताबा मिळण्‍याची वाट पाहु शकत नाही. अशाप्रकारे सामनेवाले यांनी अपुर्ण सेवा दिलेली आहे.    

     तक्रारदाराची विनंती अशी आहे की,  तक्रारदाराने सामनेवाले यास दिलेली रक्‍कम रूपये ५,०१,०००/- व्‍याजासह परत मिळावी. तक्रारदार याचा रजिष्‍टर साठेखतापोटी झालेला खर्च स्‍टॅम्‍प डयुटी व नोंदणी फी रक्‍कम रूपये ९६,०००/- व खरेदी खर्च रक्‍कम रूपये ४,०००/- अशी एकुण रक्‍कम रूपये १,००,०००/- परत मिळावी. तक्रारदारास सामनेवालेकडुन विनाकारण शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला त्‍यासाठी सामनेवालेकडुन तक्रारदारास कॉम्‍पेनसेशन रक्‍कम रूपये १,००,०००/- मिळावी, सदर अर्जाचा झालेला खर्च वकील फीसह सामनेवालेकडुन रक्‍कम रूपये ५०,०००/- मिळावा, सदर तक्रार अर्जाचे कामी तक्रारदारास आवश्‍यकता पडल्‍यास साक्षीदार व पुरावा देण्‍याची परवानगी मिळावी व तक्रारदारास आवश्‍यकता पडलयास अर्जात दुरूस्‍ती करण्‍याची परवानगी मिळावी.

४.   तक्रारदाराने तक्रारीसोबत नि.२ वर शपथपत्र दाखल केले आहे. निशाणी ६ वर दस्‍तऐवज यादीसोबत ९ कागदपत्रांच्‍या छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या  आहेत. त्‍यामध्‍ये तक्रारदार व सामनेवाले यांचे झालेला रजिष्‍टर करारनामा, सामनेवाले याने तक्रारदारास दिलेल्‍या पैशांची रिसीट, तक्रारदाराने सामनेवाला यास पाठविलेली नोटीस, तक्रारदाराने सामनेवाले यास पाठविलेल्‍या नोटीसची केल्‍याची पावती, सामनेवाले यास नोटीस मिळाल्‍याची पोहच पावती, सामनेवाले याने तक्रारदाराला दिलेले नोटीस उत्‍तर, फोटो दाखल आहे. नि.१४ वर तक्रारदाराने पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले आहे. निशाणी क्र.१५ वर दस्‍तऐवज यादीसोबत तक्रारदाराने ५ कागदपत्रांच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत.  त्‍यामध्‍ये सामनेवालेंना रक्‍कम रूपये ५१,०००/- दिल्‍याची पावती, सामनेवालेंना रक्‍कम रूपये २,००,०००/- दिल्‍याची पावती, सामनेवालेना रक्‍कम रूपये १५,००,०००/- दिल्‍याची पावती, साठेखत दस्‍त दाखल केले आहे. नि.१७ वर लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

५.   तक्रारदाराची तक्रार दाखल करून सामनेवाले यांना नोटीस काढण्‍यात आली. सामनेवाले हे मंचाची नोटीस मिळून हजर झाले व त्‍यांनी नि.१२ वर कैफीयत दाखल केली. त्‍यामध्‍ये त्‍यांनी असे म्‍हटले आहे की, तक्रारदाराचा अर्ज मान्‍य नाही कबुल नाही. तक्रारदाराने तक्रार कलम २ मधील दिलेला भरणापोटी रकमेचा तपशील खरा नाही. तक्रारदाराने पाठविलेल्‍या नोटीसमध्‍ये व सदर प्रकरणातील पान नं.२ वरील कलम २ मधील भरणा तारखा यामधील विसंगती तक्रारदाराची लबाडी दाखवुन देत आसल्‍याने सदरचा भरणा सामनेवाला यास मान्‍य व कबुल नाही.  तक्रारदारासोबत झालेल्‍या साठेखतामधील शर्तीप्रमाणे तक्रारदाराने सामनेवालेस रक्‍कम रूपये १,००,०००/- मात्र दिलेले आहे व उर्वरीत रक्‍कम रूपये १५,००,०००/- ही तक्रारदाराने सामनेवाले यास दस्‍तात नमुद बांधकाम पुर्ण झाल्‍यानंतर देण्‍याचे कबुल केले तसेच सदर रक्‍कम रूपये १६,००,०००/- मात्र व्‍यक्तिरिक्‍त तक्रारदारास दस्‍त नमुद बांधकामाशिवाय इतर सुविधा आवश्‍यक असल्‍याचे सांगितले व त्‍याप्रमाणे तक्रारदार यास सदर सदनिका तक्रारदाराचे आवडी निवडीप्रमाणे त्‍यातील मटेरीयलबाबततची तडजोड व त्‍यामुळे होणारा खर्चातला फरक यासाठी सामनेवाला याने रक्‍कम रूपये ४,५०,०००/- वेगळे देण्‍याचे कबुल केले. सदरची रक्‍कम तक्रारदाराने सामनेवालेस दिलेली आहे. या रकमेचा साठेखत दस्‍तात नमूद व्‍यवहाराशी कोणताही संबंध नाही. तक्रारदाराने केवळ रक्‍कम रूपये १,००,०००/- दिलेले असुन सामनेवालेने टप्‍पा क्र.७ पर्यंतचे रक्‍कम रूपये १५,६८,०००/- चे काम पुर्ण करूनही सामनेवालेने  तक्रारदाराकडे वारंवार मागणी करूनही कोणतीही रक्‍कम अदा केली नाही. तक्रारदारास दस्‍त क्र.३१३५/२०१६ मधील सदनिका हवी असल्‍यास तक्रारदाराने सामनेवालेशी पुन्‍हा चर्चा करून चालू बाजारभावाप्रमाणे सदनिकची किंमत निश्‍चीत करावी व दस्‍त नमूद भरणा देण्‍याचे अटी शर्तीप्रमाणे त्‍यातील ठरलेल्‍या  किंमतीच्‍या ९८ टक्‍के रक्‍कम सामनेवालेस अदा करावी. सामनेवालेने ठरलेल्‍या  कोणत्‍याही अटी शर्तीचा भंग केलेला नाही.  त्‍यामुळे सदरची तक्रा खर्चासह रद्द करण्‍यात यावी, अशी विनंती सामनेवले यांनी केली आहे.   

          सामनेवाले यांनी कैफियतीच्‍या पुष्‍ट्यर्थ नि.१३ वर शपथपत्र, नि.१६ वर पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले आहे. नि.१८ वर सामनेवालेने लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

६.    तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, त्‍यात दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले यांनी दाखल केलेली कागदपत्रे, खुलासा, तसेच उभयपक्षांचा लेखी युक्तिवाद पाहता न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांचे उत्‍तर आम्‍ही  सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.

अ.नं.   

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

सदरची तक्रार ही या ग्राहक मंचात चालविणे योग्‍य आहे काय ?

 

 नाही

(२)

आदेश काय

अंतिम आदेशा प्रमाणे

 

कारणमिमांसा

७.  मुद्दा क्र. (१) :   तक्रारदारने काही रक्‍कम चेकने दिल्‍याचे म्‍हणतो पण रोखीच्‍या पावत्‍या आहेत.  तक्रारदार म्‍हणतो की, रक्‍कम रूपये ५,०१,०००/- सामनेवालेने घेतले व योग्‍य काम केले नाही. किती दिवसात बांधकाम पुर्ण हाईल, हे साठेखतात नमुद नाही.  जो ‘A’ चा फ्लॅट बुक केला त्‍याचे काही अंशीच काम झालेले आहे. कंम्‍पाऊंड केले नाही, नळ कनेक्‍शन नाही, लाईटची व्‍यवस्‍था नाही, ड्रेनेज नाही, पाण्‍याची टाकी नाही, फ्लॅट बुक करतांना जे आश्‍वासन दिले ते पुर्ण केले नाही. यावर सामनेवाले यांनी असे म्‍हटले आहे की, तक्रारदाराने रक्‍कम रूपये १,००,०००/- दिले त्‍या व्‍यतिरिक्‍त नाही. ‘सदनिका तक्रारदाराचे आवडी निवडीप्रमाणे त्‍यातील मटेरीयलबाबततची तडजोड व त्‍यामुळे होणारा खर्चातला फरक यासाठी सामनेवाला याने रक्‍कम रूपये ४,५०,०००/- वेगळे देण्‍याचे कबुल केले. यापैकी फरकाची रक्‍कम रूपये ४,०१,०००/- तक्रारदाराने सामनेवालेस दिली. दस्‍त पान क्र.३ मध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे प्रोजेक्‍टचे सातव्‍या  टप्‍प्‍यापर्यंत काम पूर्ण करूनही तक्रारदाराने रक्‍कम देणेचे कबुल करूनही वचन पाळलेले नाही.  त्‍यामुळे शर्तींचा भंग केला आहे व रक्‍कम रूपये १,००,०००/- व्‍यतिरिक्‍त  कोणतीही रक्‍कम अदा न केल्‍याने सामनेवालेचे मोठे नुकसान झाले आहे.  शर्तीचा भंग केल्‍याने करारनामा आपोआप रद्द झाला आहे.

 

     सदर तक्रारीचे व कागदपत्रांचे अवलोकन करता असे दिसते की, तक्रारदाराने सामनेवालेस फ्लॅट बुकींगबाबत एकुण रक्‍कम रूपये ५,०१,०००/- दिल्‍याचे म्‍हटले आहे व सामनेवालेला रक्‍कम रूपये १,००,०००/- तक्रारदाराने दिले त्‍या व्‍यतिरीक्‍त नाही, असे सामनेवालेने म्‍हटले आहे. तक्रारदाराने सामनेवालेस पुर्ण पैसे दिले नाही, असा सदरचा वाद आहे.  सदरचा वाद दिवाणी स्‍वरूपाचा असल्‍याने सदरची तक्रार या मंचाने चालविणे योग्‍य नसल्‍याने सदरची तक्रार चालविण्‍याचा हक्‍क या मे.मंचास नाही. तक्रारदाराने योग्‍य त्‍या न्‍यायालयात दाद मागणेसाठी जावे, या निष्‍कर्षाप्र हे मंचत येत आहे.  सबब मुद्दा क्र. १ चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येत आहे.

  मुद्दा क्र. (२) : मुद्दा क्रमांक १ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.   

आदेश

१.

तक्रारदाराची तक्रार दिवाणी स्‍वरूपाची असल्‍याने नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे.

 

२.

तक्रारदाराला त्‍याची तक्रार योग्‍य न्‍यायालयात दाखल करण्‍याची परवानगी देण्‍यात येत आहे. 

 

३.

उभय पक्षकार यांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

 

४.

या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

 

५.

 तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’

 फाईल परत करावी.

 
 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.