::निकालपत्र:: (पारीत व्दारा – श्री नितीन माणिकराव घरडे , मा.सदस्य ) (पारीत दिनांक –03 जुलै, 2013 ) 1. विरुध्दपक्षा कडून भूखंडाचे विक्रीपत्र करुन मिळण्यासाठी तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारकर्त्याचे कथन थोडक्यात येणे प्रमाणे-
3. विरुध्दपक्ष रक्षक रियल ईस्टेट प्रायव्हेट लिमिटेड ही प्रोप्रायटरी फर्म असून श्री रक्षक रमेशराव काळे हे सदर फर्मचे प्रोप्रायटर (मालक) आहेत. जमीनीची खरेदी विक्री करणे, शेतजमीनीचे ले-आऊट पाडून त्यामधील भूखंडाची नागरीकानां/ग्राहकानां विक्री करणे हा सदर फर्मचा व्यवसाय आहे.
4. विरुध्दपक्षाने सुरु केलेल्या मासिक किस्त योजने अंतर्गत तक्रारकर्त्याने मौजा पांजरा, तहसिल व जिल्हा नागपूर येथील प.ह.नं.53, प्रस्तावित शनैश्वरा कॉलिनीतील भूखंड क्रमांक-383, क्षेत्रफळ 2000 चौरसफूट व भूखंड क्रमांक-384, क्षेत्रफळ-2000, एकूण क्षेत्रफळ 4000 चौरसफूट, प्रती चौरस फूट किंमत रुपये-25/-प्रमाणे एकूण मोबदला रक्कम रुपये-1,00,000/- मध्ये खरेदी करण्याचे ठरविले. दि.18.04.2006 रोजीचे बयानापत्रा प्रमाणे, तक्रारकर्त्याने, विरुध्दपक्षाकडे रुपये-10,000/- चा भरणा केला व उर्वरीत रक्कम मासिक किस्त रुपये-1000/- प्रमाणे व 50% रक्कम रुपये-45,000/-भूखंडास अकृषक परवानगी प्राप्त झाल्या नंतर व त्यानंतर दि.20 जून, 2006 रोजी रुपये-10,000/- आणि उर्वरीत रक्कम भूखंडाचे नोंदणीपूर्व मार्च-2008 पर्यंत भरणा करण्याचे बयानापत्रान्वये तक्रारकर्त्याने मान्य केले. दिनांक-18.04.2006 पासून 02 वर्षाचे आत भूखंडाचे विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे नावे नोंदवून देण्याचे विरुध्दपक्षाने बयानापत्रा मध्ये कबुल केले होते.
5. दिनांक-18.03.2006 पासून ते दिनांक-30.06.2009 पर्यंत या कालावधीत तक्रारकर्त्याने, विरुध्दपक्षाकडे भूखंडापोटी वेळोवेळी एकूण रुपये-1,00,000/- चा भरणा केला व त्या संबधाने विरुध्दपक्षाने त्यांचे फर्मचे
CC-12-69.doc नावाने, तक्रारकर्त्यास, भूखंडापोटी रक्कम मिळाल्या बाबत पावत्या दिल्यात, ज्या तक्रारकर्त्याने अभिलेखावर दाखल केलेल्या आहेत. अशाप्रकारे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक ठरतो. करारा प्रमाणे भूखंडाची संपूर्ण किंमत तक्रारकर्त्या कडून प्राप्त झाल्या नंतरही, विरुध्दपक्षाने भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र, तक्रारकर्त्याचे नावे करुन दिले नाही. म्हणून तक्रारकर्त्याने अधिवक्ता श्री एस.एस.तांबुलकर यांचे मार्फतीने विरुध्दपक्षास नोंदणीकृत डाकेने दि.21.05.2012 रोजी नोटीस पाठविली, सदर नोटीस विरुध्दपक्षास दि.22.05.2012 रोजी मिळाल्या बाबत रजिस्टर पोच तक्रारकर्त्यास प्राप्त झाली परंतु विरुध्दपक्षाने सदर नोटीसला कोणताही प्रतिसाद दिला नाही. सदर नोटीसची पोच अभिलेखावर दाखल आहे. म्हणून शेवटी तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार न्यायमंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली दाखल करुन खालील मागण्या विरुध्दपक्षा विरुध्द केल्यात. 6. तक्रारकर्त्याच्या मागण्या- (1) विरुध्दपक्षाने, तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिल्याचे जाहिर करण्यात यावे. (2) विरुध्दपक्ष करारा प्रमाणे मौजा पांजरा, तालुका जिल्हा नागपूर, प.ह.नं.53 मधील भूखंड क्रं-383 व 384, एकूण क्षेत्रफळ 4000 चौरस फूटची नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे नावे करुन देण्यास असमर्थ ठरल्यामुळे, सदर दोन्ही भूखंडापोटी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे जमा केलेली एकूण रक्कम रुपये-1,00,000/- द.सा.द.शे.18% दराने व्याजासह परत करण्याचे विरुध्दपक्षास निर्देशित करण्यात यावे. (3) तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक मानसिक त्रास व आर्थिक नुकसानी बद्दल रुपये-1,00,000/- आणि तक्रारखर्च रुपये- 4000/- व नोटीस खर्च रुपये-10,000/- विरुध्दपक्षास देण्याचे आदेशित व्हावे. 7. प्रस्तुत न्यायमंचा तर्फे यातील विरुध्दपक्षास नोंदणीकृत डाकेने नोटीस जारी करण्यात आली. सदर न्यायमंचाची नोटीस विरुध्दपक्षास दि.13/12/2012 रोजी प्राप्त झाल्या बद्दलची पोच अभिलेख “निशाणी क्रं-6 ए” वर दाखल आहे. अशा प्रकारे विरुध्दपक्षास न्यायमंचाची
CC-12-69.doc नोटीस प्राप्त होऊन सुध्दा विरुध्दपक्षा तर्फे कोणीही न्यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा लेखी उत्तरही न्यायमंचा समक्ष दाखल केले नाही, म्हणून विरुध्दपक्षा विरुध्द सदर प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश न्यायमंचाने दि.01.07.2013 रोजी पारीत केला. 8. तक्रारकर्त्याने पान क्रं 30 वर पुरसिस दाखल करुन त्याव्दारे तक्रारकर्त्याची तक्रार, दाखल दस्तऐवज हाच लेखी युक्तीवाद समजावा असे कळविले. तसेच तक्रारकर्त्याचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. अभिलेखावर दाखल दस्तऐवजांचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले.
09. प्रस्तुत प्रकरणात न्यायमंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालील प्रमाणे नोंदविलेले आहेत. मुद्दा उत्तर
(1) विरुध्दपक्षकाराने, त.क.ला दिलेल्या सेवेत कमतरता सिध्द होते काय? ………………होय.
(2) काय आदेश? ………………………………….... अंतीम आदेशा प्रमाणे :: कारण मीमांसा :: 10. तक्रारकर्त्याने भूखंडा संबधाने उभय पक्षामध्ये झालेले बयानापत्र, भूखंडा बाबत विरुध्दपक्षाने (“विरुध्दपक्ष” म्हणजे रक्षक रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड प्रोप्रायटरी फर्म तर्फे प्रोप्रायटर रक्षक रमेशराव काळे ) त.क.कडून वेळोवेळी रकमा मिळाल्या बाबत जारी केलेल्या पावत्या, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास अधिवक्ता यांचे मार्फतीने नोंदणीकृत डाकेने पाठविलेली नोटीस, पोस्टाची पावती, पोच पावती इत्यादी दस्तऐवजाच्या प्रती अभिलेखावर दाखल केल्यात. त्यावरुन विरुध्दपक्षाने, तक्रारकर्त्यास, मौजा पांजरा, तहसिल व जिल्हा नागपूर येथील प.ह.नं.53, प्रस्तावित शनैश्वरा कॉलिनीतील भूखंड क्रमांक-383, क्षेत्रफळ 2000 चौरसफूट व भूखंड क्रमांक-384, क्षेत्रफळ-2000, एकूण क्षेत्रफळ 4000 चौरसफूट, प्रतीचौरसफूट किंमत रुपये-25/-प्रमाणे एकूण मोबदला रक्कम रुपये-1,00,000/- मध्ये विक्री करुन देण्याची बाब दिनांक-18.04.2006 रोजीच्या बयानापत्रा वरुन दिसून येते. तसेच तक्रारकर्त्या
CC-12-69.doc कडून भूखंडापोटी बयाना दाखल रुपये-10,000/- विरुध्दपक्षाने स्विकारल्याची बाबही सदर बयानापत्रा वरुन स्पष्ट होते. दि.18.04.2006 रोजीचे बयानापत्रा प्रमाणे, उर्वरीत रक्कम मासिक किस्त रुपये-1000/- प्रमाणे व 50% रक्कम रुपये-45,000/-भूखंडास अकृषक परवानगी प्राप्त झाल्या नंतर व त्यानंतर दि.20 जून, 2006 रोजी रुपये-10,000/- आणि उर्वरीत रक्कम भूखंडाचे नोंदणीपूर्व मार्च-2008 पर्यंत भरणा करण्याचे बयानापत्रान्वये तक्रारकर्त्याने मान्य केले. दिनांक-18.04.2006 पासून 02 वर्षाचे आत भूखंडाचे विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे नावे नोंदवून देण्याचे विरुध्दपक्षाने बयानापत्रा मध्ये कबुल केले होते.
11. दिनांक-18.03.2006 पासून ते दिनांक-30.06.2009 पर्यंत या कालावधीत तक्रारकर्त्याने, विरुध्दपक्षाकडे करारातील नमुद दोन्ही भूखंडापोटी वेळोवेळी एकूण रुपये-1,00,000/- चा भरणा केला व त्या संबधाने विरुध्दपक्षाने त्यांचे फर्मचे नावे, तक्रारकर्त्यास, रक्कम मिळाल्या बाबत पावत्या दिल्यात, ज्या तक्रारकर्त्याने अभिलेखावर दाखल (निशाणी क्रं-2-B ते 2-O पान क्रं 12 ते 19 प्रमाणे ) केल्यात. 12. तक्रारकर्त्याचे कथना नुसार त्याने, विरुध्दपक्षाकडे, अशाप्रकारे करारातील नमुद दोन्ही भूखंडापोटी वेळोवेळी एकूण रुपये-1,00,000/- चा भरणा केलेला आहे. तक्रारकर्त्याने हे कथन प्रतिज्ञालेखावर केलेले आहे तसेच विरुध्दपक्षाने सुध्दा न्यायमंचा समक्ष उपस्थित होऊन त्यांचा प्रतिवाद दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने, विरुध्दपक्षाकडे, करारातील नमुद दोन्ही भूखंडापोटी वेळोवेळी एकूण रक्कम रुपये-1,00,000/- चा भरणा केल्याची बाब तक्रारकर्त्याचे कथन, प्रकरणातील उपलब्ध करारनामा आणि पावत्यांच्या प्रती यावरुन सिध्द होते, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 13. तक्रारकर्त्याने करारातील नमुद दोन्ही भूखंडापोटी वेळोवेळी एकूण रुपये-1,00,000/- जमा करुनही तसेच वारंवार पाठपुरावा करुनही विरुध्दपक्षाने विहित मुदतीत नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे नावे करुन दिले नाही, तसेच तक्रारकर्त्याने अधिवक्ता यांचे मार्फत पाठविलेला नोटीस, विरुध्दपक्षास दि.22.05.2012 रोजी प्राप्त होऊनही सदर नोटीसला कोणताही प्रतिसाद दिला
CC-12-69.doc नाही व तक्रारकर्त्याचे मागणीची पुर्तता केली नाही. विरुध्दपक्षाची सदरची कृती तक्रारकर्त्याला दिलेली दोषपूर्ण सेवा दर्शविते, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 14. प्रस्तुत न्यायमंचा तर्फे यातील विरुध्दपक्षास नोंदणीकृत डाकेने पाठविलेली नोटीस दि.13/12/2012 रोजी प्राप्त होऊनही (पोच-निशाणी क्रं-6 ए) विरुध्दपक्षा तर्फे कोणीही न्यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा आपले लेखी उत्तरही प्रकरणात दाखल केले नाही. 15. तक्रारकर्त्याने ,विरुध्दपक्षाकडे करारातील नमुद दोन्ही भूखंडापोटी जमा केलेली एकूण रक्कम रुपये-1,00,000/- द.सा.द.शे.18% दराने व्याजासह परत मिळण्याची मागणी केली तसेच अन्य अनुषंगीक मागण्या केलेल्या आहेत. न्यायमंचाचे मते, तक्रारकर्त्याने करारातील नमुद दोन्ही भूखंडापोटी विरुध्दपक्षाकडे जमा केलेली रक्कम रुपये-1,00,000/- शेवटची किस्त जमा केल्याचा दि.30.06.2009 ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.12% दराने व्याजासह परत मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. 16. विरुध्दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे, तक्रारकर्त्यास झालेला शारिरीक , मानसिक त्रास व आर्थिक हानी बद्दल रुपये-10,000/- आणि तक्रार अर्जाचे खर्चा बद्दल रुपये-2000/- नुकसान भरपाई मिळण्यास तक्रारकर्ता पात्र ठरतो, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे.
17. वरील वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही, प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत- ::आदेश:: 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) विरुध्दपक्षास निर्देशित करण्यात येते की, तक्रारकर्त्यास त्याने करारातील नमुद दोन्ही भूखंडा पोटी जमा केलेली रक्कम रुपये-1,00,000/-(अक्षरी रु. एक लक्ष फक्त) शेवटची किस्त जमा तारीख-30/06/2009 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे. 12% दराने व्याजासह परत करावी.
CC-12-69.doc 3) विरुध्दपक्षाने, तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासा बद्यल व आर्थिक नुकसानी बद्यल रु.-10,000/-(अक्षरी रु. दहा हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रु.-2000/-(अक्षरी रुपये-दोन हजार फक्त) द्दावेत. 4) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्षाने सदर निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसाचे आत करावे.. 5) निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. |