Maharashtra

Osmanabad

CC/15/352

Amrushi Manik Madke - Complainant(s)

Versus

Rajyog Bajaj Bajaj allianz general Insurance co.ltd. - Opp.Party(s)

Adv. P.V. Wadgane

09 Dec 2016

ORDER

DISTRICT CONSUMER REDRESSAL FORUM OSMANABAD
Aria of Collector Office Osmanabad
 
Complaint Case No. CC/15/352
 
1. Amrushi Manik Madke
R/o Kawlewada Mondha Kallam Tq. Kallam Dist. osmanabad
Osmanabad
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Rajyog Bajaj Bajaj allianz general Insurance co.ltd.
Apposite to Dyaneshwer temple Osmanabad Tq. & Dist. osmanabad
Osmanabad
Maharashtra
2. Bajaj Allianz General Insurance co.ltd.
Rajendra Bhavan 2nd floor, Ratna Prabha Motors Adalat road Osmanabad
Osmanabad
MAHARASHTRA
3. Bajaj Allianz General Insurance co.ltd.
apposite to Market yard gate no 2, Latur Tq. & Dist. osmanabad
Latur
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.V. Kulkarni. PRESIDENT
 HON'BLE MR. M.B. Saste MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 09 Dec 2016
Final Order / Judgement

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्‍मानाबाद.

 

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 352/2015.

तक्रार दाखल दिनांक : 16/09/2015.

                                                           तक्रार आदेश दिनांक : 09/12/2016.                                निकाल कालावधी: 01 वर्षे 02 महिने 25 दिवस   

 

 

अंबऋषी माणिक मडके, वय 40 वर्षे,

व्‍यवसाय : शेती, रा. कावळेवाडा, मोंडा,

कळंब, ता. कळंब, जि. उस्‍मानाबाद.                               तक्रारकर्ता

                   विरुध्‍द                          

 

(1) राजयोग बजाज, बजाज इलियांस जनरल इन्‍शुरन्‍स

    कंपनी लि., ज्ञानेश्‍वर मंदिराच्‍या समोर, उस्‍मानाबाद.

    (वि.प. क्र.1 विरुध्‍द तक्रार रद्द केली.)

(2) बजाज इलियांस जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.,

    राजेंद्र भवन, दुसरा मजला, रत्‍पप्रभा मोटर्सच्‍या

    समोर, अदालत रोड, औरंगाबाद.

(3) बजाज इलियांस जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.,

    गाळा क्र.32 व 34, नावंद आर्केड, कव्‍हा रोड,

    मार्केट यार्ड गेट क्र.2 समोर, लातूर, ता.जि. लातूर.

    (वि.प. क्र.3 विरुध्‍द तक्रार रद्द केली.)                          विरुध्‍द पक्ष

 

 

                   गणपुर्ती  :-   श्री. एम.व्‍ही. कुलकर्णी, अध्‍यक्ष

                      श्री. मुकूंद बी. सस्‍ते, सदस्‍य 

 

                   तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ :  पी.व्‍ही. वडगणे

                   विरुध्‍द क्र. 2 पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : पी.व्‍ही. सराफ

 

न्‍यायनिर्णय

 

श्री. एम.व्‍ही. कुलकर्णी, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

 

1.    तक्रारकर्ता यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्‍यात असा आहे की, त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.1 कडून बजाज डिस्‍कव्‍हर गाडी क्र.एम.एच.25/ए.ए.8780 खरेदी केली आहे. गाडी खरेदी करताना विरुध्‍द पक्ष क्र.1 याचे शोरुममध्‍ये विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 कंपनीच्‍या प्रतिनिधीकडून गाडीकरिता विमा उतरवलेला होता. त्‍याचा पॉलिसी क्रमांक ओजी-14-2010-1802-00008562 आहे. दि.17/9/2014 रोजी तक्रारकर्त्‍याच्‍या गाडीचा अपघात झाला. पोलीस स्‍टेशन, युसूफ वडगांव, जि. बीड येथे गुन्‍हा रजि. क्र.125/2014 नोंद करुन घटनास्‍थळ पंचनामा केला. अपघातामध्‍ये तक्रारकर्त्‍याच्‍या गाडीचे रु.24,430/- नुकसान झाले. तक्रारकर्त्‍याचे पुढे असे अभिकथन आहे की, त्‍याने विरुध्‍द पक्षांकडे क्‍लेम फॉर्म, डिसचार्ज व्‍हावचर, इन्‍शुरन्‍स कव्‍हरनोटी, ड्रायव्‍हींग लायसेन्‍स, आधार कार्ड, आर.सी. बुक, गाडी दुरुस्‍तीची बिले इ. कागदपत्रे जमा केली. त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्र.1 याच्‍या मागणीप्रमाणे कागदपत्रे देऊनही त्‍यास विमा रक्‍कम दिलेली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून रु.24,430/- नुकसान भरपाईसह मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे.

 

2.    तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत जबाब, घटनास्‍थळ पंचनामा, ड्रायव्‍हींग लायसेन्‍स, एफ.आय.आर., जॉब कार्ड बील, पॉलिसी प्रमाणपत्र, नोटीस, कागदपत्रे मागणी करणारे विरुध्‍द पक्षाचे पत्र, आर.सी. बूक, आधार कार्ड, बँक पासबूक इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.

 

3.    विरुध्‍द पक्ष क्र.1 व 3 यांचेविरुध्‍द तक्रारकर्त्‍याने नोटीस बजावणीकरिता आवश्‍यक स्‍टेप्‍स न घेतल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.1 व 3 विरुध्‍द तक्रार रद्द करण्‍यात आली.

 

4.    विरुध्‍द पक्ष क्र.2 यांनी अभिलेखावर लेखी उत्‍तर दाखल केले असून तक्रारीतील विधाने व मजकूर अमान्‍य केला आहे. त्‍यांच्‍या कथनाप्रमाणे वाहन क्र.एम.एच.25/ए.ए.8780 करिता तक्रारकर्त्‍याचे नांवे विशिष्‍ट अटी व शर्तीस अधीन राहून पॉलिसी क्र. ओजी-14-2010-1802-00008562 दि.28/2/2014 ते 27/2/2015 कालावधीकरिता दिलेली होती. त्‍यांचे प्रतिवादाप्रमाणे तक्रारकर्त्‍याचे असहकार्य व कागदपत्राच्‍या अपूर्ततेमुळे तक्रारकर्त्‍याच्‍या विमा दावा नामंजूर केला नाही किंवा निर्णयीत केलेला नाही. तक्रारकर्त्‍याने विमा दाव्‍याचा निर्णय घेण्‍यासाठी मागणी केलेली कागदपत्रे सादर केली नाहीत. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला नुकसान भरपाई मागण्‍याचा प्रश्‍नच येत नाही. शेवटी त्‍यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्‍याची विनंती केली आहे.

 

5.    तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष यांचे लेखी उत्‍तर व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीमध्‍ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ उपस्थित होणा-या वादमुद्दयांची कारण‍मीमांसा त्‍यांच्‍यापुढे दिलेल्‍या उत्‍तराकरिता खालीलप्रमाणे देण्‍यात येते.

 

 

 

 

            मुद्दे                                    उत्‍तर

 

1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्‍या सेवेमध्‍ये

     त्रुटी केल्‍याचे सिध्‍द होते काय ?                                                                होय.    

2. तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ?                       होय.

3. काय आदेश ?                                        अंतिम आदेशाप्रमाणे.

 

कारणमीमांसा

 

6.    मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारकर्त्‍याच्‍या बजाज डिस्‍कव्‍हर मोटार सायकलचा विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 यांनी विमा उतरला, हे विरुध्‍द पक्ष क्र.2 ला कबूल आहे. विरुध्‍द पक्ष क्र.1 हा मोटार सायकलचा विक्रेता आहे. तोच बजाज अलियांझ इन्‍शुरन्‍स कंपनी, उस्‍मानाबादचा प्रतिनिधी असल्‍याचे दर्शवलेले आहे. विरुध्‍द पक्ष क्र.3 इन्‍शुरन्‍स कंपनीचे लातूर कार्यालय असून विरुध्‍द पक्ष क्र.2 उस्‍मानाबाद कार्यालय आहे. विरुध्‍द पक्ष क्र.2 चे म्‍हणणे आहे की, तक्रारकर्त्‍याने मागितलेला अपघात विमा त्‍याने अद्याप मंजूर किंवा नामंजूर केलेला नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला अपघाताग्रस्‍त वाहन तपासावयास दिले नाही. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला जरुर कागदपत्रांची मागणी केली होती. पण तक्रारकर्त्‍याने ती पूर्ण केलेली नाही.

 

7.    तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे दि.17/9/2014 रोजी गाडीचा अपघात झाला. असे दिसते की, अंकूश जोतीराम दाभाडे, रा. अंबेजोगाई याने युसूफ वडगांव पोलीस स्‍टेशन, ता.केज येथे फिर्याद दिली. त्‍याच्‍या मोटार सायकलला तक्रारकर्त्‍याच्‍या मोटार सायकलने धडक देऊन त्‍याचा भाऊ इंद्रजीत याचा मृत्‍यू घडवला; तर मेव्‍हना दशरथ याला जखमी केले. आपल्‍या गाडीचा अपघात कसा झाला ? याबाबत तक्रारकर्त्‍याने तक्रारीत काहीही म्‍हटलेले नाही. फक्‍त गाडीचे नुकसान झाले; ते रु.24,430/- चे झाले, असे म्‍हटले आहे. पोलिसांनी केलेल्‍या घटनास्‍थळ पंचनाम्‍याची प्रत तक्रारकर्त्‍याने हजर केलेली आहे. फिर्यादीची प्रत पण हजर केलेली आहे. त्‍यामध्‍ये सुध्‍दा तक्रारकर्त्‍याची मोटार सायकल कोण चालवत होते, याबद्दल खुलासा नाही.

 

8.    तक्रारकर्त्‍याने राजयोग बजाजचे जॉब कार्ड हजर केलेले आहे. त्‍याप्रमाणे दुरुस्‍तीसाठी खर्च रु.24,430/- दाखवला आहे. विरुद पक्षाने दिलेल्या पॉलिसीची प्रत तक्रारकर्त्‍याने हजर केलेली आहे. ती पॉलिसी दि.28/2/2014 ते 27/2/2015 या कालावधीची आहे.

 

9.    तक्रारकर्त्‍याने क्‍लेम फॉर्मची प्रत हजर केलेली नाही. मात्र डिसचार्ज व्‍हावचर, ड्रायव्‍हींग लायसेन्‍स, आधार कार्ड, आर.सी. बूक व बिले विरुध्‍द पक्षाकडे दिल्‍याचे म्‍हटलेले आहे. विरुध्‍द पक्षाच्‍या दि.24/2/2015 चे पत्राप्रमाणे क्‍लेम फॉर्म, डिसचार्ज व्‍हावचर, बँक अकाऊंट डिटेल्‍स, आय.डी. प्रुफ, मोटार ड्रायव्‍हींग लायसेन्‍स, आर.सी. बूक 7 दिवसात हजर करावेत, असे तक्रारकर्त्‍याला कळवलेले होते. तक्रारकर्त्‍याने आता आर.सी.बूक, ड्रायव्‍हींग लायसेन्‍स, आधार कार्ड, बँक पासबूकच्‍या प्रती तक्रारीसोबत दाखल केलेल्‍या आहेत. त्‍याच्‍या प्रती विरुध्‍द पक्षाला सुध्‍दा दिलेल्‍या आहेत. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने त्‍या आधारे तक्रारकर्त्‍याचा क्‍लेम मंजूर करणे जरुर होते. अद्यापि क्‍लेम मंजूर न करुन विरुध्‍द पक्षाने सेवेत त्रुटी निर्माण केली आहे, असे आमचे मत आहे. म्‍हणून मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.

 

आदेश

 

(1) विरुध्‍द पक्ष क्र.2 याने तक्रारकर्त्‍याचा क्‍लेम नियमाप्रमाणे 1 महिन्‍याच्‍या आत मंजूर करावा.

      (2) विरुध्‍द पक्ष क्र.2 याने तक्रारकर्त्‍याला या तक्रारीचा खर्च म्‍हणून रु.3,000/- द्यावेत.

                                                                               

(श्री. मुकूंद बी. सस्‍ते)                                  (श्री. एम.व्‍ही. कुलकर्णी)

       सदस्‍य                                               अध्‍यक्ष

       जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्‍मानाबाद.

-00-

 
 
[HON'BLE MR. M.V. Kulkarni.]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. M.B. Saste]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.