जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 608/2009. तक्रार दाखल दिनांक:12/11/2009.
1. श्री. भारत शिवशंकर झुंजे, वय 65 वर्षे,
2. सौ. शुभांगी भारत झुंजे, वय 58 वर्षे,
3. सौ. मनिषा एस. मलशेट्टी, वय 41 वर्षे,
4. सौ. सुनिता जी. कनगी, वय 39 वर्षे,
5. सौ. उज्वला डी. झुंजे, वय 26 वर्षे,
सर्व रा 10, हर्षद अपार्टमेंट, भवानी पेठ, सोलापूर. तक्रारदार
ग्राहक तक्रार क्रमांक : 609/2009. तक्रार दाखल दिनांक:12/11/2009.
श्री. प्रसाद कृष्णा कुलकर्णी, वय 40 वर्षे, रा. ब्लॉक नं.21,
स्वामी विवेकानंद सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर. तक्रारदार
ग्राहक तक्रार क्रमांक : 610/2009. तक्रार दाखल दिनांक:12/11/2009.
1. श्री. व्यंकट रामचंद्र नन्नवरे, वय 60 वर्षे,
2. सौ. सोभा व्यंकट ननवरे, वय 53 वर्षे,
दोघे रा. 87/88, रो-हाऊस, सेकंड फेज, अवंती नगरी,
मुरारजी पेठ, सोलापूर. तक्रारदार
ग्राहक तक्रार क्रमांक : 638/2009. तक्रार दाखल दिनांक:23/11/2009.
श्री. जगदीशचंद्र के. कुलकर्णी, रा. ब्लॉक नं.101,
दमाणी नगर, लक्ष्मी पेठ, सोलापूर. तक्रारदार
ग्राहक तक्रार क्रमांक : 640/2009. तक्रार दाखल दिनांक:23/11/2009.
श्री. जगदीशचंद्र के. कुलकर्णी, रा. ब्लॉक नं.101,
दमाणी नगर, लक्ष्मी पेठ, सोलापूर. तक्रारदार
ग्राहक तक्रार क्रमांक : 698/2009. तक्रार दाखल दिनांक:23/11/2009.
श्री. एकनाथ भानुदास जगदाळे, वय 55 वर्षे,
पॉवर ऑफ एटर्णीहोल्डर : सौ. विद्या एकनाथ जगदाळे,
रा. 297-ए, विजय निवास, दमाणी नगर, सोलापूर. तक्रारदार
ग्राहक तक्रार क्रमांक : 699/2009. तक्रार दाखल दिनांक:23/11/2009.
1. श्री. शामराव वामन देशपांडे, वय 71 वर्षे,
2. श्री. धनंजय शामराव देशपांडे, रा. जुना पुना नाका,
अवंती नगर, रो-हाऊस नं. सी-5, सोलापूर. तक्रारदार
ग्राहक तक्रार क्रमांक : 5/2010. तक्रार दाखल दिनांक:02/01/2009.
1. सौ. अनुपमा अश्विनीकुमार जोग, वय 55 वर्षे,
2. श्री. अश्विनीकुमार अंबाजी जोग, वय 59 वर्षे,
3. श्री. अमीत अश्विनीकुमार जोग, वय 35 वर्षे,
4. सौ. संध्या अमीत जोग, वय 35 वर्षे, सर्व रा. 20,
राखी अपार्टमेंट, दमाणी नगर, सोलापूर. तक्रारदार
ग्राहक तक्रार क्रमांक : 20/2010. तक्रार दाखल दिनांक:20/01/2009.
श्री. भीमसेन वरदराव कुलकर्णी, वय 83 वर्षे,
रा. अर्जून टॉवरजवळ, सैफूल, विजापूर रोड, सोलापूर. तक्रारदार
ग्राहक तक्रार क्रमांक : 21/2010. तक्रार दाखल दिनांक:20/01/2009.
सौ. छाया शेखर जेऊरे, वय 46 वर्षे, रा. बी/639,
कर्णिक नगर, बिज्जा बिल्डींग, सोलापूर. तक्रारदार
ग्राहक तक्रार क्रमांक : 22/2010. तक्रार दाखल दिनांक:20/01/2009.
श्री. महेंद्र नारायण भिडे, वय 35 वर्षे, रा. 162/8,
रेल्वे लाईन्स, आळंदकर बंगला, सोलापूर. तक्रारदार
ग्राहक तक्रार क्रमांक : 23/2010. तक्रार दाखल दिनांक:20/01/2009.
1. श्री. सूर्यभान शंकर पवार, वय 70 वर्षे,
2. सौ. प्रमिला सूर्यभान पवार, वय 60 वर्षे,
दोघे रा. 25, शरण बसवेश्वर नगर, आकाशवाणी
केंद्राजवळ, एम.आय.डी.सी. रोड, सोलापूर. तक्रारदार
ग्राहक तक्रार क्रमांक : 24/2010. तक्रार दाखल दिनांक:20/01/2009.
श्री. अंबादास लक्ष्मण महिंद्रकर, वय 35 वर्षे,
रा. प्लॉट नं.48, जिल्हा परिषद शाळेजवळ, विजय नगर,
कुंभारी, ता. द.सोलापूर, जि. सोलापूर. तक्रारदार
ग्राहक तक्रार क्रमांक : 25/2010. तक्रार दाखल दिनांक:20/01/2009.
1. सौ. काशिबाई महादेव सरवले, वय 61 वर्षे,
2. सौ. सुमन बाळासाहेब चौधरी, वय 32 वर्षे,
रा. श्रीदेवी नगर, पार्ट-2, आकाशवाणीजवळ,
एम.आय.डी.सी. रोड, सोलापूर. तक्रारदार
ग्राहक तक्रार क्रमांक : 66/2010. तक्रार दाखल दिनांक:03/03/2009.
1. श्री. अशोक धोंडोपंत खोबरे, वय 60 वर्षे,
2. सौ. उज्वला अशोक खोबरे, वय 59 वर्षे,
3. श्री. देशभुषण अशोक खोबरे, वय 26 वर्षे,
4. कु. भाग्यश्री अशोक खोबरे, वय 28 वर्षे,
5. कु. राजश्री अशोक खोबरे, वय 24 वर्षे,
सर्व रा. 139, मातृछाया निवास, सुशिल नगर,
विजापूर रोड, नेहरु नगरजवळ, सोलापूर. तक्रारदार
ग्राहक तक्रार क्रमांक : 67/2010. तक्रार दाखल दिनांक:03/03/2009.
सौ. विजयमाला देवचंद पानपट, रा. 87, कमला नगर,
विजापूर रोड, सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
श्री. राजकुमार शाह, मॅनेजींग डायरेक्टर, वर्धमान कार्डस्
मार्केटींग प्रा.लि., रजि. ऑफीस, 4, सुयश अपार्टमेंट,
चंडक गार्डन, बुधवार पेठ, सोलापूर. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष
सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य
सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : रमेश एम. मनुरे
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : एस.व्ही. न्हावकर
आदेश
सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. वरील सर्व तक्रारीतील तक्रारदार यांच्या तक्रारींचे स्वरुप, त्यातील नमूद प्रश्न, विरुध्द पक्ष इ. एकसारखे असल्यामुळे या तक्रारींचा निर्णय एकत्रीत देण्यात येत आहे.
2. तक्रारदार यांच्या तक्रारी थोडक्यात अशा आहेत की, विरुध्द पक्ष प्रोप्रायटर असलेल्या 'वर्धमान कार्डस मार्केटींग प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीमध्ये त्यांनी खालीलप्रमाणे रक्कम मुदत ठेवीद्वारे गुंतवणूक केलेली आहे.
ग्राहक तक्रार क्रमांक | ठेव रक्कम (रुपयामध्ये) | देय व्याज दर द.सा.द.शे. | ठेवीचा प्रकार | मागणी केलेली रक्कम (ठेव रक्कम व त्यावरील व्याज) |
608/2009 | रु.9,35,000/- | 16 टक्के | समृध्द ठेव योजना | रु.10,09,850/- |
609/2009 | रु.4,83,000/- | 16 टक्के | समृध्द ठेव योजना | रु.5,29,896/- |
610/2009 | रु.7,48,000/- | 16 टक्के | समृध्द ठेव योजना | रु.8,37,757/- |
638/2009 | रु.17,08,000/- | 16 टक्के | समृध्द ठेव योजना | रु.19,13,191/- |
640/2009 | रु.8,50,000/- | 16 टक्के | समृध्द ठेव योजना | रु.9,52,105/- |
698/2009 | रु.5,35,000/- | 16 टक्के | समृध्द ठेव योजना | रु.5,49,284/- |
699/2009 | रु.1,35,000/- | 16 टक्के | समृध्द ठेव योजना | रु.1,38,600/- |
5/2010 | रु.2,57,500/- | 16 टक्के | समृध्द ठेव योजना | रु.2,64,250/- |
20/2010 | रु.16,000/- | 16 टक्के | समृध्द ठेव योजना | रु.18,982/- |
21/2010 | रु.1,19,000/- | 16 टक्के | समृध्द ठेव योजना | रु.1,36,468/- |
22/2010 | रु.2,80,000/- | 16 टक्के | समृध्द ठेव योजना | रु.3,21,107/- |
23/2010 | रु.1,50,000/- | 16 टक्के | समृध्द ठेव योजना | रु.1,58,008/- |
24/2010 | रु.25,000/- | 16 टक्के | समृध्द ठेव योजना | रु.26,002/- |
25/2010 | रु.78,000/- | 16 टक्के | समृध्द ठेव योजना | रु.82,124/- |
26/2010 | रु.1,00,000/- | 16 टक्के | समृध्द ठेव योजना | रु.1,16,020/- |
67/2010 | रु.95,000/- | 16 टक्के | समृध्द ठेव योजना | रु.1,10,204/- |
3. तक्रारदार यांनी उपरोक्त नमूद रक्कम गुंतवणूक केल्यानंतर योजनेनुसार विरुध्द पक्ष यांनी काही महिने व्याज दिले आणि त्यानंतर अचानक व्याज देणे बंद केले. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याशी संपर्क साधला असता खोटी आश्वासने देऊन धमकी देण्यास सुरुवात केली. तसेच विरुध्द पक्ष यांनी ठेव योजनेचे व्याज व मूळ ठेव रक्कम मुदतीनंतर परत केलेली नाही. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांना नोटीस पाठवूनही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन ठेव रक्कम व त्यावरील होणा-या व्याजाची एकूण रक्कम द.सा.द.शे. 16 टक्के व्याज दराने मिळावी, अशी विनंती केलेली आहे.
4. विरुध्द पक्ष यांना नोटीस मिळाल्यानंतर ते मंचासमोर हजर झाले. त्यांना उचित संधी देऊनही त्यांनी म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द कैफियतीशिवाय तक्रार चालविण्याचा आदेश करण्यात आला.
5. तक्रारदार यांची तक्रार व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच त्यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा
दिली आहे काय ? होय.
2. तक्रारदार ठेव रक्कम व्याजासह मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्ष
6. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विरुध्द पक्ष यांच्याकडे समृध्द ठेव योजनेमध्ये वेळोवेळी रक्कम गुंतवणूक केल्याचे ठेव पावतीवरुन निदर्शनास येते. तक्रारदार यांना ठेवीचे व्याज देण्याकरिता व ठेवीची मुदत संपल्यानंतर ठेव परत करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे, अशी तक्रारदार यांची प्रमुख तक्रार आहे.
7. विरुध्द पक्ष यांनी सुरु केलेल्या समृध्द ठेव योजनेच्या पत्रकाचे अवलोकन करता, ठेवीचा गुंतवणूक कालावधी किमान 3 वर्षे व कमाल 5 वर्षे असून ठेवीवर द.सा.द.शे. 16 टक्के दराने चक्रवाढ व्याज देण्याचे त्यांनी कबूल केले आहे. त्याशिवाय त्यांनी मॅच्युरिटीनंतर बोनस देण्याचे नमूद केले आहे.
8. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे ठेवीद्वारे रक्कम गुंतवणूक करुन त्यावर व्याज मिळविण्यासाठी वित्तीय सेवा घेतलेली आहे. तक्रारदार यांना ठेवीचे व्याज देणे बंद केल्यामुळे व ठेवीची मुदत संपल्यानंतर विरुध्द पक्ष यांना वेळोवेळी मागणी करुनही त्यांना ठेव रक्कम व व्याज देण्यात आलेले नाही. ठेव रक्कम मुदत संपल्यानंतर किंवा मुदतपूर्व त्यावरील देय व्याजासह परत करणे, ही विरुध्द पक्ष यांची करारात्मक जबाबदारी व कर्तव्य आहे. विरुध्द पक्ष यांनी मंचासमोर म्हणणे दाखल केले नसले तरी ठेविदारांकडून त्यांनी ठेवी स्वीकारल्याचे व ठेव रक्कम देणे बाकी असल्याचे तोंडी कबूल केले आहे. वरील विवेचनावरुन तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी ठेव रक्कम व त्यावरील व्याज परत न करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे विरुध्द पक्ष हे तक्रारदार यांच्या ठेव रकमा परत करण्यास संपूर्णत: जबाबदार ठरतात. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. विरुध्द पक्ष यांनी खालीलप्रमाणे नमूद ग्राहक तक्रारीमध्ये तक्रारदार यांना ठेव रक्कम व्याजासह या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.
ग्राहक तक्रार क्रमांक | विरुध्द पक्ष यांनी द्यावयाची एकूण ठेव रक्कम (ठेव रक्कम व त्यावरील व्याज) | ठेव रकमेवर द्यावयाचे व्याज द.सा.द.शे. | ठेव रकमेवर व्याज देण्याची तारीख |
608/2009 | रु.10,09,850/- | 16 टक्के | दि.27/7/2010 |
609/2009 | रु.5,29,896/- | 16 टक्के | दि.27/7/2010 |
610/2009 | रु.8,37,757/- | 16 टक्के | दि.27/7/2010 |
638/2009 | रु.19,13,191/- | 16 टक्के | दि.27/7/2010 |
640/2009 | रु.9,52,105/- | 16 टक्के | दि.27/7/2010 |
698/2009 | रु.5,49,284/- | 16 टक्के | दि.27/7/2010 |
699/2009 | रु.1,38,600/- | 16 टक्के | दि.27/7/2010 |
5/2010 | रु.2,64,250/- | 16 टक्के | दि.27/7/2010 |
20/2010 | रु.18,982/- | 16 टक्के | दि.27/7/2010 |
21/2010 | रु.1,36,468/- | 16 टक्के | दि.27/7/2010 |
22/2010 | रु.3,21,107/- | 16 टक्के | दि.27/7/2010 |
23/2010 | रु.1,58,008/- | 16 टक्के | दि.27/7/2010 |
24/2010 | रु.26,002/- | 16 टक्के | दि.27/7/2010 |
25/2010 | रु.82,124/- | 16 टक्के | दि.27/7/2010 |
66/2010 | रु.1,16,020/- | 16 टक्के | दि.27/7/2010 |
67/2010 | रु.1,10,204/- | 16 टक्के | दि.27/7/2010 |
2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी प्रत्येकी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
(सौ. संगिता एस. धायगुडे÷)
अध्यक्ष
(सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
|
|