Maharashtra

Thane

CC/46/2021

DEEPALI RAMESH BALEL - Complainant(s)

Versus

RAJKUMAR KAILASH SETH - Opp.Party(s)

ADV DEEPAK PRADHAN

04 Mar 2021

ORDER

ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग
रुम नं.214, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय इमारत, ठाणे-400 601
 
Complaint Case No. CC/46/2021
( Date of Filing : 19 Jan 2021 )
 
1. DEEPALI RAMESH BALEL
FLAT NO 304,SURBHI BANK OF INDIA STOFF HSG SOC LTD,NEAR JUNI DOMBIVLI SHIVMANDIR,DOMBIVLI WEST,THANE 421202
THANE
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. RAJKUMAR KAILASH SETH
NEAR SHANTI KUTIR BUILDING,ROOM NO 11,KAJI MANZIL CHAWL,BUDHIYA WADI,SV RD POWAI,MUMBAI 400072
MUMBAI
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. S.Z.PAWAR PRESIDING MEMBER
 HON'BLE MS. POONAM V.MAHARSHI MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 04 Mar 2021
Final Order / Judgement

मा.अध्यक्षपद रिक्त.

तक्रारदारांतर्फे ॲड दीपक प्रधान हजर.  त्यांचा तक्रार दाखल करणेकामी युक्तीवाद ऐकण्यात आला.

तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनानुसार तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून जुनी वापरलेली ॲक्टीवा 5जी ही गाडी रक्कम रु.28,000/- मध्ये घेण्याचे ठरविले व त्यांनी सामनेवाले यांना रक्कम रु.3,150/- आगाऊ अदा केले.  सदर रक्कम भरणा केल्यानंतर सदरहू गाडी तक्रारदारांच्या ताब्यात देण्याचे सामनेवाले यांनी कबुल केले होते.  परंतू, सामनेवाले यांनी सदरहू गाडीचा ताबाही दिला नाही व वरील अंशत: रक्कमही तक्रारदारांना परत केली नाही.  सबब, तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 2019 अंतर्गत दाखल केली आहे.

वस्तुत: सदरची तक्रार जुन्या गाडीच्या पुनर्विक्रीबाबत (Resale) बाबत आहे.  ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या कलम 2 (7) (i) मधील तरतुदीनुसार पुनर्विक्रीच्या व्यवहारातील तक्रारदार हे “ग्राहक” या संज्ञेत बसत नाही. 

सबब, तक्रारदार हे “ग्राहक” या संज्ञेत बसत नसल्याने, प्रस्तुतची तक्रार दाखल न करता दाखल टप्प्यावर तक्रारदारांना योग्य त्या न्यायासमोर दाद मागण्याची मुभा देऊन दाखल टप्प्यावर खारीज करण्यात येते.

खर्चाबद्दल आदेश नाहित.

प्रकरणांत हाच अंतिम आदेश समजण्यात यावा.

आदेशाची साक्षांकित प्रत तक्रारदारांना विनामुल्य व विनाविलंब पाठविण्यात यावी.

 
 
[HON'BLE MR. S.Z.PAWAR]
PRESIDING MEMBER
 
 
[HON'BLE MS. POONAM V.MAHARSHI]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.