Maharashtra

Satara

CC/10/182

shri laxman vitthal jadhav - Complainant(s)

Versus

rajkumar gandhi gar.big.sheti sah pat sanstha prshasak shri dilip pawar - Opp.Party(s)

shinde

27 Dec 2010

ORDER


ReportsDistrict Consumer disputes redressal Forum Satara Near Cooperative Court Sadara Bazar Satara-415001
CONSUMER CASE NO. 10 of 182
1. shri laxman vitthal jadhavbhaktwadi tal koregoan dist satarasatara ...........Appellant(s)

Vs.
1. rajkumar gandhi gar.big.sheti sah pat sanstha prshasak shri dilip pawarkoregoan tal koregoan dist satarasatara ...........Respondent(s)


For the Appellant :
For the Respondent :

Dated : 27 Dec 2010
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

                                                            नि. 20
मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर
                                          तक्रार क्र. 182/2010
                                          नोंदणी तारीख – 29/7/2010
                                          निकाल तारीख – 27/12/2010
                                          निकाल कालावधी – 148 दिवस
श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्‍यक्ष
श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्‍या
श्री सुनिल कापसे, सदस्‍य
 
(श्री सुनिल कापसे, सदस्‍य यांनी न्‍यायनिर्णय पारीत केला)
------------------------------------------------------------------------------------
श्री लक्ष्‍मण विठ्ठल जाधव
रा.भक्‍तवाडी, ता.कोरेगाव
जि.सातारा                                        ----- अर्जदार
                                           (अभियोक्‍ता श्री.संग्राम मुंढेकर)
      विरुध्‍द
1. राजकुमार गांधी ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्‍था
    मर्यादित कोरेगाव तर्फे प्रशासक श्री दिलीप पवार
2. चेअरमन, राजकुमार गांधी ग्रामीण बिगरशेती सह.
    पतसंस्‍था मर्यादित कोरेगाव
    श्रीकांत रामनारायण मर्दा
    रा.मु.पो. कोरेगाव ता.कोरेगाव जि. सातारा        ----- जाबदार
                                            (अभियोक्‍ता एकतर्फा )
 
न्‍यायनिर्णय
 
    अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्‍यात खालीलप्रमाणे -
1.     अर्जदार हे जाबदार संस्‍थेचे सन 2003 पासून बचत खात्‍याचे ग्राहक आहेत. सदरचे खात्‍यामध्‍ये रक्‍कम रु.24,380/- एवढी रक्‍कम शिल्‍लक आहे. अर्जदार यांना त्‍यांचे आईचे उपचारासाठी सदरच्‍या रकमेची आवश्‍यकता असलेने त्‍यांनी सदर रकमेची मागणी जाबदार यांचेकडे केली. तथापि जाबदार यांनी अर्जदार यांना रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली. अर्जदार यांनी जाबदार यांना दि.16/6/2009 रोजी वकीलांचेमार्फत रजिस्‍टर्ड पोस्‍टाने नोटीस पाठवून रकमेची मागणी केली. सदरची नोटीस जाबदार यांना मिळाली. तथापि जाबदार यांनी नोटीशीला उत्‍तर दिले नाही अथवा अर्जदार यांची रक्‍कमही परत दिलेली नाही. थोडक्‍यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्‍यात यावयाची रक्‍कम न दिल्‍यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्‍थेचे ग्राहक आहेत.  त्‍यामुळे जाबदार संस्‍थेकडून बचत खात्‍यातील रक्‍कम परत मिळण्‍यासाठी अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्‍ये अर्जदार यांनी एकूण रक्‍कम रु. 24,380/- व त्‍यावरील व्‍याज तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/-. ची मागणी केलेली आहे.
 
2.    प्रस्‍तुत तक्रारअर्जाचे कामी जाबदार क्र.2 यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे नि.16 ला दाखल करुन अर्जदारचे तक्रारअर्जातील मजकूर नाकारलेला आहे. अर्जदार हे जाबदार संस्‍थेचे सभासद असलेने त्‍यांनी सहकार कायद्यातील तरतुदींप्रमाणे दाद मागणे आवश्‍यक आहे. सहकारी संस्‍था अधिनियम 1960 च्‍या तरतुदींनुसार अर्जदारने तक्रारअर्जापूर्वी जाबदार यांना नोटीस देणे आवश्‍यक आहे. अर्जदार यांनी विथड्रॉवल स्‍लीप भरुन त्‍यावर स्‍वाक्षरी करुन रक्‍कम मागणेसाठी ते कधीच आले नव्‍हते. संस्‍थेच्‍या नियमानुसार अर्जदार यांनी विथड्रॉवल स्‍लीप भरुन दिल्‍यास जाबदार आजही रक्‍कम देणेस तयार आहेत. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.2 यांचे कथन आहे.
3.    अर्जदार यांचे नि.18 वरील आदेशानुसार जाबदार क्र.1 यांना प्रस्‍तुत प्रकरणातून वगळण्‍यात आले आहे.
4.    अर्जदार यांनी या अर्जाचे कथनातील सिध्‍दतेसाठी नि. 2 ला शपथपत्र दिलेले आहे. ते शपथपत्र पाहिले. अर्जदार यांनी नि. 5 सोबत दाखल केलेले बचत खात्‍याचे मुळ पासबुक पाहिले.
 
5.    जाबदार यांनी त्‍यांचे कैफियतीमध्‍ये असे कथन केले आहे की, अर्जदार हे जाबदार संस्‍थेचे सभासद असलेने त्‍यांनी सहकार कायद्यानुसार दाद मागणे आवश्‍यक आहे. परंतु अर्जदार हे जरी जाबदार यांचे सभासद असले तरी त्‍यांनी ग्राहक या नात्‍याने जाबदार संस्‍थेच बचत खाते उघडले आहे व त्‍यामध्‍ये रक्‍कम ठेवली आहे. अर्जदार व जाबदार यांचेमधील वाद हा सहकारी संस्‍थेचा सभासद व सहकारी संस्‍था यांचे दरम्‍यानचा वाद नसून तो ठेवीदार ग्राहक व पतसंस्‍था यांचे दरम्‍यानचा वाद आहे. सबब या मंचास अर्जदार यांचे तक्रारअर्जावर निर्णय देण्‍याचे कार्यक्षेत्र आहे असे या मंचाचे मत आहे.
6.    जाबदार यांनी त्‍यांचे कैफियतीमध्‍ये पुढे असे कथन केले आहे की, तक्रारअर्ज दाखल करणेपूर्वी महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था अधिनियम 1960 मधील तरतुदींनुसार अर्जदार यांनी जाबदार यांना नोटीस देणे आवश्‍यक आहे. परंतु ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार अशा प्रकारची नोटीस देणे अर्जदारवर बंधनकारक नाही. त्‍यामुळे जाबदार यांचे सदरचे कथनात तथ्‍य दिसून येत नाही.
7.    जाबदार यांनी असे कथन केले आहे की, अर्जदार यांनी विथड्रॉवल स्‍लीप भरुन दिली नाही त्‍यामुळे त्‍यांना रक्‍कम अदा करता येणार नाही. परंतु अर्जदार यांनी त्‍यांचे तक्रारअर्जात व शपथपत्रात असे स्‍पष्‍ट कथन केले आहे की, त्‍यांनी जाबदार यांना वकीलांचेमार्फत नोटीस पाठविली होती परंतु जाबदार यांनी त्‍यास कोणताही प्रतिसाद दिला नाही. सदरचे कथन जाबदार यांनी त्‍यांचे कैफियतीमध्‍ये नाकारलेले नाही. अर्जदार यांची नोटीस मिळालेनंतर जाबदार यांनी त्‍यांना लेखी उत्‍तर पाठवून त्‍यांचेकडून विथड्रॉवल स्‍लीप भरुन त्‍यांना रक्‍कम अदा करणे आवश्‍यक होते परंतु अशा प्रकारची कोणतीही कार्यवाही जाबदार यांनी केलेली दिसत नाही. सबब जाबदार यांनी अर्जदार यांना देय असलेली रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केलेली आहे. थोडक्‍यात जाबदार यांनी अर्जदार यांना द्यावयाच्‍या सेवेत कमतरता केलेली आहे. सबब या प्रकरणी मंचाचे असे स्‍पष्‍ट मत झाले आहे की, अर्जदार यांना जाबदार यांनी कबूल केलेली सेवा म्‍हणजे बचत खात्‍यातील शिल्‍लक रक्‍कम मागणी करुनही अर्जदार यांना दिलेली नाही. अशा प्रकारे अर्जदार हे जाबदार यांचेकडून रक्‍कम मिळणेस पात्र आहेत असे दिसून येत आहे.
 
8.    या सर्व कारणास्‍तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्‍यात येत आहे.
 
आदेश
1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे.
2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र. 2 यांनी अर्जदार यांना खालीलप्रमाणे
    रकमा द्याव्‍यात.
    अ. बचत खाते क्र.1174 वरील शिल्‍लक रक्‍कम बचत खात्‍याचे नियमाप्रमाणे देय
        होणा-या व्‍याजासह द्यावी.
    ब. मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 3,000/- द्यावेत.
    क. अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु. 2,000/- द्यावेत.
3. सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या न्‍यायमंचात जाहीर करणेत आला.
सातारा
दि. 27/12/2010
 
 
 
(सुनिल कापसे)           (सुचेता मलवाडे)         (विजयसिंह दि. देशमुख)
   सदस्‍य                   सदस्‍या                     अध्‍यक्ष
 
 
 
 

Smt. S. A. Malwade, MEMBERHONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT Mr. Sunil K Kapse, MEMBER