एकत्रित निकालपात्र :-(दि.01/12/2010) (श्री एम.डी.देशमुख,अध्यक्ष) (01) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवालांना नोटीस आदेश झालेला आहे. सामेनवाला यांनी म्हणणे दाखल केलेले आहे. सुनावणीच्या वेळेस दोन्ही बाजूंच्या वकीलांनी युक्तीवाद केलेला आहे. उपरोक्त दोन्ही तक्रारीतील विषयामध्ये साम्य आहे. सबब हे मंच एकत्रितरित्या निकाल पारीत करीत आहे. (02) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी- सामनेवाला पत संस्थेमध्ये तक्रारदार क्र.1 यांनी त्यांच्या मयत मुलगा राजू शंकर मगदूम यांचे नांवे ठेव ठेवलेली आहे. त्याचा ग्राहक तक्रार क्र.निहाय तपशील पुढीलप्रमाणे :- ग्राहक तक्रार क्र.279/08 :- दि.03/04/2000 रोजी ठेव पावती क्र.1945 अन्वये रक्कम रु.30,000/- द.सा.द.शे. 17 % व्याजाने ठेवली होती. त्यांची मुदत दि.19/05/2000 रोजी संपलेली आहे. ग्राहक तक्रार क्र.280/08 :- दि.04/04/2001 रोजी ठेव पावती क्र.2856 व 2859 अन्वये प्रत्येकी रक्कम रु.50,000/- द.सा.द.शे. 17 % व्याजाने ठेवली होती. त्यांची मुदत दि.20/05/2001 रोजी संपलेली आहे. (03) तक्रारदार पुढे सांगतात, सामनेवाला क्र. 3 ते 16 यांनी तक्रारदारांच्या मयत मुलगा राजू शंकर मगदूम यांनी संस्थेत अपहार केला आहे असा खोटा प्रचार केला व ठेवीच्या रक्कमा देणेचे नाकारले. सामनेवाला क्र. 3, 4 व 12 यांनी तक्रारदारांचा मुलगा राजू शंकर मगदूम यांचेवर मोठा दबाव आणून रक्क्म रु.2,40,000/-बेकायदेशीररित्या भरणा करुन घेतलेले आहे.उपरोक्त उल्लेख केलेल्या ठेवी व्याजासह देणेचे नाकारलेल्या आहेत. सबब उपरोक्त ठेव रक्कमा व्याजासह देणेचा आदेश व्हावा.शरिरीक मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/-, वकील फी रु.500/- देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केलेली आहे. (04) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ ठेव पावत्यांच्या सत्यप्रती, मा.ना.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांना दिले निवेदनाची प्रत, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांनी सहाय्यक निबंधक कागल यांना दिलेले पत्र,भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या जिल्हाध्यक्षांनी जिल्हा उपनिबंधक कोल्हापूर यांना दिलेले पत्र, जिल्हा उपनिबंधक यांनी सामनेवाला संस्थेच्या पदाधिकारी यांना दिलेले पत्र, जिल्हा उपनिबंधक यांनी सहायक निबंधक, जिल्हाधिकारी यांना लोकशाही दिनाचे अनुषंगाने दिलेले पत्र, तक्रारदाराने वकीलांमार्फत सामनेवाला यांना दिलेली नोटीसची प्रत, त्याची युपीसीची प्रत,सामनेवाला यांना नोटीस पोहोचलेची पोष्टाची रजि. ए.डी.ची पोहोच पावती, सदर नोटीसला सामनेवाला क्र. 7 व9 यांनी दिलेले उत्तर, तक्रारदाराचे मुलाचा मृत्यूचा दाखला, सामनेवाला संस्थेचया संचालक मंडळाची यादी इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच दि.17/02/2010 रोजी रे.क्रि.के.नं.236/05 मधील नि.1 वरील आदेशाची प्रत,तसेच दोषारोप अंतीम अहवाल, कालमर्यादार स्मरणपत्र लोकशाही दिनसंदर्भ, उपनिबंधक,सह. संस्था कोल्हापूर यांचे पत्रांची प्रत दाखल केली आहेत. (05) सामनेवाला क्र. 3, 4, 11, 14, 15 यांनी एकत्रित म्हणणे दाखल केले आहे व तक्रारदारांची तक्रार नाकारलेली आहे. ते त्यांचे म्हणणेत पुढे सांगतात, मयत राजू शंकर मगदूम हे सामनेवाला संस्थेचया विक्रमनगर शाखेत नोकरीस होते. सदर शाखेत एकूण रक्कम रु.12,83,300/-इतक्या रक्कमेचा अपहार झालेला आहे. त्यामुळे मयत राजू मगदूम व सामनेवाला क्र.16यांचेसह चौघांविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. (06) सदर सामनेवाला पुढे सांगतात, तक्रारदार हे ठेवीदार आहेत तसेच कर्जदार आहेत. सदरचे कर्ज थकीत असलेने सहायक निबंधक सहकारी संस्था कोलहापूर यांनी कलम 101 खाली हुकूमनामा पारीत केलेला आहे. तक्रारदार व त्यांचा मयत मुलगा राजू मगदूम यांच्या नांवे थकीत कर्जाची रक्कम ही ठेव रक्कमेपेक्षा अधिक असलेने रक्कम देणेचा प्रश्नच उदभवत नाही. ठेवीची मुदत दि.19/05/2006 रोजी संपलेली आहे. व 8 वर्षाच्या कालावधीनंतर दाखल केलेली तक्रार मुदतीत आहे हे म्हणणे दिशाभूल करणारे आहे. कर्ज बुडविण्याच्या हेतूने सदरची तक्रार दाखल केली आहे. सबब सदरची तक्रार फेटाळणेत यावी अशी विनंती केलेली आहे. (07) सदर सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेसोबत राजू शंकर मगदूम यांचा कर्ज मागणीचा अर्ज, वचन चिठ्ठी, कर्ज रोखा, इकरार पत्र, प्रशासक नियुक्तीचा उपनिबंधक यांच्या आदेशाची प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (08) या मंचाने उपलब्ध कागदपत्र तसेच दोन्ही बाजूंच्या वकीलांचा युक्तीवाद सविस्तर ऐकूण घेतलेला आहे. तक्रारीत उपरोक्त उल्लेख केलेली ठेवी सामनेवाला संस्थेमध्ये ठेवलेल्या आहेत व त्याच्या मुदती संपलेल्या आहेत ही बाब या मंचाचे निदर्शनास आणून दिलेली आहे. सदरच्या ठेवी या तक्रारदारांचा मयत मुलगा राजू मगदूम यांचे नांवे ठेवलेचे दिसून येत आहे व त्यास तक्रारदार हे वारस आहेत असे प्रतिपादन प्रस्तुत प्रकरणी केलेले आहे. सामनेवाला यांनी त्यांचे म्हणणेमध्ये तक्रारदार व त्यांचा मयत मुलगा राजू मगदूम यांनी कर्ज घेतलेले आहे व सदरचे कर्ज थकीत असलेचे प्रतिपादन केलेले आहे. परंतु थकीत कर्जासंबंधीचे कोणतीही वस्तुस्थिती प्रस्तुत पकरणी दाखल केलेली नाही. तक्रारदाराने युक्तीवादाच्या वेळेस कोणतेही थकीत कर्ज नसलेबाबतचे कथन केलेले आहे. सामनेवाला यांनी कर्ज खातेचा उतारा दाखल केलेला नाही. त्यामुळे केवळ कर्ज थकीत आहे असे त्यांचे म्हणणेत प्रतिपादन केलेशिवाय कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. तसेच सदर कर्जास ठेवी तारण ठेवलेल्या आहेत या बाबतचाही पुरावा दाखल केलेला नाही. केवळ पोलीस स्टेशनला फौजदारी स्वरुपाची फिर्याद दाखल केली या कारणावरुन ठेव रक्कम नाकारता येणार नाही. इत्यादीचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारीत उल्लेख केलेल्या ठेवींच्या रक्कमा व्याजासह परत कराव्यात या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदर देय रक्क्मा देणेची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी सामनेवाला क्र. 3 ते 15 यांची राहील व सामनेवाला क्र.16 हे सामनेवाला संस्थेचे कर्मचारी असलेने त्यांची जबाबदारी संयुक्तिक राहील. आदेश 1. प्रस्तुतच्या तक्रारी मंजूर करणेत येतात. 2. सामनेवाला यांनी ग्राहक तक्रार क्र.279/08 मधील ठेव पावती क्र.1945 वरील रक्कम रु.30,000/- तक्रारदारास अदा करावी. सदर रक्कमेवर ठेव कालावधीकरिता ठेव पावतीवर नमुद व्याजदर म्हणजे द.सा.द.शे. 17 % दराने व्याज अदा करावे व मुदत संपले तारखेपासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत सदर रक्कमेवर द.सा.द.शे.6 टक्के व्याज अदा करावे. 3. सामनेवाला यांनी ग्राहक तक्रार क्र.280/08 मधील ठेव पावती क्र.2856 व 2859 वरील प्रत्येकी रक्कम रु.50,000/- असे एकूण रक्कम रु.1,00,000/- तक्रारदारास अदा करावी. सदर रक्कमेवर ठेव कालावधीकरिता ठेव पावतीवर नमुद व्याजदर म्हणजे द.सा.द.शे. 17 % दराने व्याज अदा करावे व ठेवीची मुदत संपले तारखेपासून ते संपूर्ण रक्कम अदा होर्इपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के व्याज अदा करावे. 4. वरील सर्व रक्कम सामनेवाला क्र. 3 ते 15 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तसेच सामनेवाला क्र.16 यांनी फक्त संयुक्तिकरित्या तक्रारदारांना अदा कराव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |