Maharashtra

Akola

CC/14/189

Smt.Shridevi Vasantkumar Sabale - Complainant(s)

Versus

Rajesh Shakarrao Raut - Opp.Party(s)

Self

18 Nov 2016

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Akola ( Maharashtra )
District Consumer Disputes Redressal Forum Akola ( M.S.)
 
Complaint Case No. CC/14/189
 
1. Smt.Shridevi Vasantkumar Sabale
R/o. Vasantchaya, Durga Chowk, Bhagwat Plot, Akola
Akola
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Rajesh Shakarrao Raut
Harsha Sankul, Infront of R L T College, Akola
Akola
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. S.M. Untawale PRESIDENT
 HON'BLE MR. Kailas Wankhade MEMBER
 HON'BLE MRS. Bharati Ketkar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 18 Nov 2016
Final Order / Judgement

::: आ दे श :::

( पारीत दिनांक :18.11.2016 )

आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार

           सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये,  दाखल करण्यात आली असून थोडक्यात खालील प्रमाणे आहे.

     तक्रारकर्ती ही सेवानिवृत्त मुख्याध्यापिका असून, तिच्या मालकीचे दुमजली पक्के घर भागवत प्लॉट, दुर्गा चौक, खानदेश डेअरी समोर प्लॉट नं. 1/10 शिट नं. 64 जागेवर आहे.  विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी विरुध्दपक्ष क्र. 2 ते 4 सह तक्रारकर्तीचे वर उल्लेख केलेले घर बांधुन दिले आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 यांचे मार्गदर्शना प्रमाणे त्यांनी काढून दिलेल्या नकाशाप्रमाणे विरुध्दपक्ष क्र. 2 ते 4 काम करित होते व तक्रारकर्तीकडून कामाचा मोबदला घेत होते. काम पुर्ण केल्याबाबत विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्तीस तसे प्रमाणपत्र दि. 25/8/2007 रोजी दिले. पण प्रत्यक्षात काम करीत असतांना बाहेरील फाटका समोरचा जीना, सेंट्रींग काढीत असतांना कोसळला असता, सिमेंट खराब असल्याचे सांगुन पुन्हा नव्याने बांधावा लागला. बिल्डींगचा स्लॅब तुकडया तुकडयाने टाकला व त्याकरिता मिक्सींग मशिनचा वापर न करता हात कलाईने, सिका किंवा डॉक्टर फिक्सईट आणून देण्यास तयार असतांना सुध्दा, नकार दिला.  सन 2007 च्या पावसाळयात हॉलचे छत व हॉलची भिंत, त्या भिंतीतून दर्शनच्या बेडरुम मधील बल्बच्या होल्डर मधुन पाण्याची धार लागली होती. हे सर्वपाणी एकत्र होऊन खालच्या मजल्यावरील डायनिंग रुममध्ये जिन्याच्या पायऱ्यावरुन वाहत येऊन जमा झाले व छतातुन गळायला लागले.  या बाबत विरुध्दपक्ष यांना सांगीतले असता विरुध्दपक्ष क.1 यांनी टेरेकोटा नावाच्या रंगाचा थर वरच्या हॉलच्या कवलांवर लावून गॅप बुझवून घेतल्या. त्यानंतर 2008 मध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा वरील प्रमाणे तोच त्रास झाला, त्यामुळे तक्रारकर्तीच्या घरातील सामानाचे नुकसान झाले. सन 2008 व 2009 ला पावसाळयात पुन्हा वरील प्रमाणेच त्रास झाला असता, शब्बीरभाई टेक्श्चरवाले यांचेकडून कवेलुवर कुठल्याश्या केमीकलचा थर लावून व कवेलुंच्या गॅप्स बुजवून घेतल्या. तक्रारकर्तीस सन 2007 ते 2009 ह्या तीन वर्षात दोनदा कलरींग करावे लागले.  सन 2010 व 2011 ला पुन्हा वरील प्रमाणेच त्रास झाला. या बाबत विरुध्दपक्ष क्र. 1 ला सांगून सुध्दा त्यांनी काहीच केले नाही.  सन 2012 च्या पावसाळयात पुन्हा तोच त्रास झाला. भिंतीचे प्लॅस्टर भिंत सोडून फुगल्याचे प्रमाण वाढले, विरुध्दपक्ष क्र. 3 हे सर्व पाहून गेला व रेतीत खुप माती होती व रेती धुवून न घेतल्याचा हा परिणाम आहे, असे म्हणला.  कवेलु व स्लॅबमधील गळणाऱ्या पाण्यामुळे छताचे पीओपीचे सिलींग पण भिजायला लागले व फुगायला लागले. तेंव्हा विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी पीओपी ठेकेदार यांना बोलावून एअर पासींग करिता पीओपीच्या छताला दोन तिन ठिकाणी जाळया बसवून घेतल्या.  त्यानंतर विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी काहीही कार्यवाही केली नाही. तक्रारकर्ती दि. 6/9/2014 ते 20/9/2014 पर्यंत सर्व कुटूंबियासमवेत गुजरात व राजस्थानच्या सहलीला गेले असता, त्यांनी शाम वानखडे व सचिन काळेला झोपायला ठेवले, दि. 21/9/2014 रोजी सचिन काळे ज्या जागी झोपला होता व तो रात्री 1.30 वाजता टॉयलेटला गेला, त्याच वेळी पीओपीचे सिंलींग पडले. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. सदर घटना घडल्यावर विरुध्दपक्ष क्र. 3  यांना फोन केल्यावर ते आले व त्यांनी सर्व प्रकार पाहीला व म्हणाला की, केंव्हा तरी असे हाईल, याची मला भिती होती, तसेच रेती ही माती मिश्रीत होती, ती धुवून घेतली नाही, स्लॅबला वॉटर प्रुफींग करुन घेणे आवश्यक होते, कवेलु व्यवस्थीत लावायला पाहीजे होते, स्लॅब मशीन कलाईचा पाहीजे होता, असे म्हणाले.  त्यानंतर विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी हा प्रकार पाहीला व काहीतरी तोडगा काढू, असे ते म्हणाले, परंतु त्यानंतर विरुध्दपक्ष क्र. 1 तक्रारकर्तीकडे फिरकलेच नाहीत.  विरुध्दपक्ष क्र. 1 ते 4 यांनी त्यांना दिलेले काम व्यवस्थतीपणे पुर्ण केले नाही आणि त्यामुळे तक्रारकर्तीला जवळपास 2,00,000/- चा खर्च करावा लागला. तक्रारकर्तीने दि. 28/10/2014 ला रजिस्टर पोष्टाद्वारे विरुध्दपक्ष क्र. 1 यांना नोटीस पाठविली.  विरुध्दपक्ष क्र. 1 ने  सदर नोटीसला दिशाभुल देणारे उत्तर पाठविले. अशा प्रकारे विरुध्दपक्षांनी सेवा देण्यास न्युनता दर्शविली आहे व म्हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्तीची तक्रार मंजुर करण्यात यावी.  तक्रारकर्तीस झालेल नुकसानीची व मानसिक त्रासाची नुकसान भरपाई रु. 2,00,000/- अधिक शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु. 1,00,000/- व कोर्ट खर्च रु. 5,000/- विरुध्दपक्ष क्र. 1 ते 4 यांनी द्यावा, असा आदेश पारीत करण्यात यावा.

      सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 11 दस्तऐवज   पुरावा म्हणून  जोडण्‍यात आले आहे.

 

विरुध्‍दपक्ष 1 यांचा लेखीजवाब :-

2.            विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल करुन, त्याद्वारे तक्रारीतील आरोप नाकबुल केलेले आहेत. विरुध्दपक्ष क्र. 1 ने असे नमुद केले की,  विरुध्दपक्ष क्र. 1 हा वास्तु विशारद असून त्याचे मुख्य काम घराचे नकाशे काढणे, तसेच घराचे डिझाईन तयार करुन देणे आहे.  विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा हा व्यक्तीगत व्यवसाय असून त्यांचे सोबत कुठलेही बांधकाम अभियंता किंवा कारागिर काम करीत नाहीत. तक्रारकर्तीला तिच्या जुन्या घरावरील बांधकाम करावयाचे होते, त्यामुळे तिच्या विनंतीवरुन विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तिला दुसऱ्या माळयाचे डिझाईन करुन त्या प्रमाणे नकाशा काढून दिला होता.  तक्रारकर्तीने बांधकामाचा ठेका कोणाला दिला, तसेच बांधकामाचे सामान कुठून, कुठल्या प्रकारचे आणले, या बाबत विरुध्दपक्ष क्र. 1 ला कुठलीही माहीती नाही. विरुध्दपक्ष क्र. 1 ला बांधकाम अथवा त्याच्या गुणवत्तेबद्दल माहिती नाही, नकाश्या प्रमाणे बांधकाम चालु आहे अथवा नाही, हे तो तक्रारकर्तीच्या विनंतीवरुन वेळोवेळी येवून पाहत होता.  बांधकामात काही त्रुटी असल्यास किंवा निकृष्ट दर्ज्याचे साहीत्य वापरुन बांधकाम केले असल्यास, त्यामुळे होणाऱ्या नुकसानीस विरुध्दपक्ष क्र. 1 कुठल्याही प्रकारे जबाबदार नाही. तक्रारकर्तीने दाखल केलेले हे प्रकरण मुदतीच्या बाहेर आहे, कारण तक्रारकर्तीच्या म्हणण्याप्रमाणेच बांधकाम 2007 साली पुर्ण झाले व त्यानंतर सन 2008 साली तिच्या लक्षात आले की, बांधकामात त्रुटी आहे, त्यामुळे सदर प्रकरण मुदतीच्या बाहेर असल्यामुळे चालु शकत नाही. सदर प्रकरण वि मंचासमोर चालु शकत नाही, कारण सदरहु प्रकरण हे तांत्रिक बाबीवर अवलंबुन आहे.  तक्रारकर्तीने ज्या त्रुटी बाबत हे प्रकरण दाखल केलेले आहे, त्याच्याशी विरुध्दपक्ष क्र. 1 चा संबंध नाही.  बांधकाम करणारे व्यवसायींकांनी तक्रारकर्तीशी स्वतंत्ररित्या करार करुन बांधकाम केलेले आहे.  विरुध्दपक्ष क्र. 1 यांवर सोपविलेले काम म्हणजेच डिझायनिंग व नकाशा करणे, हे विरुध्दपक्ष क्र. 1 ने व्यवस्थीत केलेले असून त्याबद्दल तक्रारकर्तीची देखील तक्रार नाही.  त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 ने कोणतीही त्रुटी केली नाही, म्हणून सदर प्रकरण खर्चासह खारीज करण्यात यावे.

 

विरुध्‍दपक्ष 2, 3, 4 यांचा लेखीजवाब :-

     विरुध्दपक्ष क्र. 2,3 व 4  यांनी त्यांचा संयुक्त लेखी जबाब दाखल करुन, त्याद्वारे तक्रारीतील आरोप नाकबुल केलेले आहेत. विरुध्दपक्ष क्र. 2,3 व 4 यांनी पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्तीची तक्रार मुदतबाह्य असून विरुध्दपक्ष क्र. 2 ते 4 यांच्यामध्ये कोणताही ग्राहक संज्ञेचा सबंध येत नाही.  विरुध्दपक्ष क्र. 2 ते 4 अशिक्षीत असून दैनंदिन मजुरीवर काम करणारे अकुशल मजुर आहे.  विरुध्दपक्ष क्र. 2 हे अकुशल मजुरांचा पुरवठा करणारे कंत्राटदार आहे व त्या मजुरांनी  विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे बरोबर व योग्य काम केले आहे. विरुध्दपक्ष क्र. 2 ते 4 यांनी फक्त मजुरीवर काम केले असून कोणतीही तज्ञाची सेवा दिली नाही.  विरुध्दपक्ष क्र. 1 हे त्या विषयातील निष्णात असल्यामुळे सदरहू तक्रारकर्ती यांना विरुध्दपक्ष क्र. 1 ने सेवा दिली आहे. विरुध्दपक्ष क्र. 2 ते 4 च्या गैरहजेरीत विरुध्दपक्ष क्र. 1 हे त्यांचे दुस-या साईटवरील मजुर आणून तक्रारकर्तीच्या घराचे बांधकाम करुन देत होते.  त्यामुळे सदर तक्रार विरुध्दपक्ष क्र. 2 ते 4 च्या विरुध्द खर्चासहीत खारीज करण्यात यावी.  

3.    त्यानंतर तक्रारकर्तीने प्रतिउत्तर व लेखी युक्तीवाद दाखल केला व तसेच उभय पक्षांनी तोंडी युक्तीवाद केला.

::: का र णे  व  नि ष्‍क र्ष :::

4.        सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 2 ते 4 यांच्या लेखी जबाबाशिवाय प्रकरण चालवण्याचा आदेश दि. 26/3/2015 रोजी मंचाने केला होता,  त्यानंतर रु. 500/- दंड आकारुन न्यायाच्या दृष्टीने दि. 24/7/2015 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 ते 4 यांचा लेखी जबाबही स्विकारण्यात आला.  त्यानंतर तक्रारकर्तीचा कमीश्नरचा अर्ज मंजुर केल्यावर दि. 1/12/2015 रोजी नियुक्त कमीश्नरने घटनास्थळाची पाहणी करुन दि. 7/12/2015 ला अहवाल सादर केला.  सदर अहवाल विरुध्दपक्षाच्या गैरहजेरीत झाल्यामुळे विरुध्दपक्षाने आक्षेप घेतला.  त्यामुळे पुन्हा तक्रारकर्तीचेच खर्चाने दि. 10/1/2016 रोजी मोक्यावर पाहणी करुन दि. 7/12/2015 च्याच अहवालावर ठाम असल्याचा अहवाल, कमीश्नरने दिला व तो दि. 15/1/2016 रोजी मंचासमोर दाखल करण्यात आला.  त्याच दिवशी तक्रारकर्तीने लेखी युक्तीवाद दाखल केला.  विरुध्दपक्ष क्र. 2 ते 4 चे वतीने कमीश्नरच्या अहवाला बाबत लेखी हरकत नोंदविली.  त्यानंतर दि. 10/2/2016 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 ते 4 च्या वतीने तक्रार मुदतबाह्य असल्याने खारीज करण्याचा अर्ज केला.  सदर अर्जावर उभय पक्षांचे म्हणणे ऐकल्यावर विरुध्दपक्ष क्र. 2 व 4 विरुध्द सन 2007 पासून कोणतेही कारण घडले नसल्याने त्यांचे विरुध्द प्रकरण मुदतबाह्य असल्याने त्यांना या प्रकरणातुन वगळण्याचे आदेश दि. 9/3/2016 रोजी देण्यात आले.

       त्यामुळे सदर प्रकरणात तक्रारकर्ती व विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांनी दाखल केलेले दस्त व उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकुन काढलेल्या निष्कर्षांचा अंतीम आदेशाचे वेळी विचार करण्यात आला.

     सदर प्रकरणात दाखल असलेल्या दस्तांवरुन तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 कडून पैशांच्या मोबदल्यात सेवा घेतल्याचे दिसून येते.  त्यामुळे तक्रारकर्ती ही विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 ची ग्राहक असल्याचे ग्राह्य धरण्यात येते.

       तकारकर्तीच्या तक्रारीनुसार विरुध्दपक्ष क्र. 1 च्या मार्गदर्शनानुसार श्री संतोष सरदार हे बांधकाम ठेकेदार यांनी विरुध्दपक्ष क्र. 3 व इतर मजुरांमार्फत तक्रारकर्तीच्या घराच्या वरच्या मजल्याचे काम पुर्ण करुन दिले.  त्याचे  कंम्प्लीशन सर्टीफिकेट दि. 25/8/2007 रोजी तक्रारकर्तीला दिले. पण प्रत्यक्ष काम पुर्ण करतांनाच बाहेरील फाटका समोरचा जीना, सेंट्रींग काढत असतांनाच कोसळला व सिमेंट खराब असल्याचे सांगुन, पुन्हा नव्याने बांधला.  सदरहु प्रमाणपत्र दिल्यावर व काम पुर्ण झाल्यावर कामातील त्रुटी निदर्शनास यायला लागल्या.  सन 2007 च्या पावसाळयातच नवीन स्लॅब मधुन पाणी गळायला सुरुवात होऊन पाण्याची धार लागली व ते पाणी खालच्या मजल्यावर जमा व्हायला लागले. विरुध्दपक्ष क्र. 1 यांना बोलावून दाखवल्यावर जास्त पावसाचे कारण सांगुन अजुन 30 ते 35 हजार खर्च करुन दुरुस्ती करण्यात आली.  परंतु पुन्हा सन 2008 मध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे पाणी गळून तक्रारकर्तीचे खालच्या मजल्यावरील फर्निचर खराब झाले.  तेंव्हा विरुध्दपक्ष क्र. 1 ने प्लायवुड निकृष्ट असल्याचे कारण देऊन पेस्ट कंट्रोलर, आशीष जैनला बोलावून नव्याने केलेल्या फर्निचर व घराला पेस्ट कंट्रोलींग करुन घेतले.  सन 2009 च्या पावसाळयातही मागच्या सारखाच त्रास झाला.  सन 2007 ते 2009 या तीन वर्षात दोनदा कलरींग करावे लागल्याने, तक्रारकर्तीला विनाकारण खर्च सोसावा लागला. दि. 9/7/2010 रोजी पडलेल्या पावसाने गळणारे पाणी घरभर वाहु लागल्याने तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्र. 1 ला फोन केला.  त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 ने गवंड्यामार्फत बेडरुम वरील टेरेसच्या टाईल्समध्ये केमीकल टाकुन सर्व गॅप्स व्हाईट सिमेंटने बुजवून घेतल्या, परंतु आर्थिक अडचणीमुळे उर्वरित वॉटर प्रुफींगचे काम तक्रारकर्तीने नंतर करावयाचे ठरविले.  सन 2012 मधील पावसाळयात मागच्याच प्रसंगाची पुनरावृत्ती झाल्याने, छाताचे पीओपी सिलींग पण भिजायला लागुन फुगायला लागले. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 ने पीओपी ठेकेदारामार्फत पीओपीच्या छताला एअर पासींग करिता दोन तीन ठिकाणी स्टेनलेस स्टीलच्या जाळया बसवून घेतल्या.  सन 2013 मध्ये पाणी गळायला लागल्यावर तक्रारकर्तीच्या बोलावण्यावरुन विरुध्दपक्ष क्र. 1 ने फोन करुन पुन्हा वॉटर प्रुफींग वाल्याला बोलावले, त्याच्या अंदाजाने तक्रारकर्तीला साधारण 1 ते 1.30 लाखाचा खर्च लागणार होता.  तेवढी रक्कम तक्रारकर्तीजवळ, त्यावेळी नसल्याने तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्र. 1 ला त्याचे खर्चाने काम सुरु करायला सांगीतले,  परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 ने फोन घेणेही बंद केले.

     दि. 21/9/2014 च्या मध्यरात्री पीओपीचे सिलींग प्रचंड आवाजासह कोसळले, परंतु सुदैवाने जीवीतहानी झाली नाही. दुसऱ्या दिवशी तक्रारकर्तीच्या बोलावण्यावरुन विरुध्दक्ष क्र. 1 ने तक्रारकर्त्याच्या घरी येऊन परिस्थिती बघीतली.  त्याचे सांगण्यावरुन तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष 1 ने सुचवलेल्या माणसांकडून काम करुन घेण्यास सुरुवात केली,  पण त्यानंतर विरुध्दपक्ष क्र. 1 व अन्य कोणीही तिकडे‍ फिरकलेच नाही व फोनही उचलत नसल्याने तक्रारकर्तीने दि. 28/10/2014 ला नोटीस दिली. विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांनी केलेल्या अपुर्ण सदोष कामामुळे तक्रारकर्तीला आर्थिक, मानसिक, शारीरिक नुकसान झाले आहे.  त्यामुळे तक्रारकर्तीने मंचात तक्रार दाखल केली आहे.

    यावर, उत्तर देतांना विरुध्दपक्ष क्र. 1 ने त्यांच्या जबाबात असे म्हटले आहे की, सदर प्रकरण मुदतीच्या बाहेर असल्याने खारीज करण्यात यावे.  विरुध्दपक्ष क्र. 1 हा आर्कीटेक्ट असून,त्याचे मुख्य काम घराचे नकाशे काढणे, तसेच घराचे डिझाईन तयार करुन नकाश्याप्रमाणे काम हे आहे किवा नाही, हे बघणे, एवढेच आहे.  बांधकामाचे लोखंड बांधणी तसेच सिमेंट व वाळु, हयांचे मिक्सींग किती प्रमाणात असावे व ते सामान कुठून आणले, ह्या बाबत विरुध्दपक्ष क्र. 1 ला कुठलीही माहीती नाही.  हे सर्व काम ठेकेदार किंवा सिव्हील इंजीनिअर करतात.  विरुध्दपक्ष क्र. 1 यांचे सोबत कुठलेही अभियंता किंवा कारागीर काम करीत नाही.  केवळ नकाश्या प्रमाणे बांधकाम चालु आहे अथवा नाही, हे तो तक्रारकर्त्याच्या विनंतीवरुन वेळोवेळी येवून बघत होता, या व्यतिरिक्त तक्रारकर्तीशी अथवा तिच्या बांधकामाशी संबंध नाही. तक्रारकर्तीने ज्या त्रुटींबद्दल हे प्रकरण दाखल केले आहे, त्याच्याशी विरुध्दपक्ष क्र. 1 चा कुठलाही संबंध नाही अथवा ज्यांनी बांधकाम केले त्यांच्याशीही विरुध्दपक्षाचा संबंध नाही,  त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 ला झालेल्या त्रासाबद्दल तक्रारकर्तीची तक्रार दंडासह खारीज करावी.

        विरुध्दपक्ष क्र. 3 ने त्यांच्या जबाबात से म्हटले आहे की, विरुध्दपक्ष क्र. 3 हा अशिक्षत मजुर असून, विरुध्दपक्ष क्र. 1 ने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे काम करीत होता.  तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 हा इतर कंत्राटदारांकडून सुध्दा दैनंदिन रोजंदारीवर मजुर आणून, तक्रारकर्तीचे काम करीत होता.  विरुध्दपक्ष क्र. 3 हा अकुशल मजुर असल्याकारणाने, त्यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 चे सांगण्यावरुन काम करुन, आपले मजुरीचे पैसे घेतले आहे व विरुध्दपक्ष क्र. 1 च्या आदेशाप्रमाणे तक्रारकर्तीचे काम करुन दिले आहे.  विरुध्दपक्ष क्र. 3 हजर नसेल त्यावेळी, त्याच्या गैरहजेरीत विरुध्दपक्ष क्र. 1 दुसऱ्या साईटवरील मजुरांकरवी तक्रारकर्तीच्या घराचे बांधकाम करुन देत होता.  विरुध्दपक्ष क्र. 1 हे त्या विषयातील निष्णात असल्याने त्यांनी त्या विषयाचे तज्ञ म्हणून सेवा दिली आहे,  त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 3 यांना तक्रारर्तीच्या नुकसानीस जबाबदार धरता येणार नाही.  त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 3 यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी.

       उभय पक्षांचे म्हणणे ऐकल्यावर मंचाने दाखल दस्तांचे अवलोकन केले.  विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी प्रकरणात हजर झाल्यावर दि. 10/4/2015 रोजी प्राथमिक हरकत दाखल करुन, तक्रारीस कारण 7 ते 8 वर्षापुर्वी घडल्याने, सदर तक्रार मुदतबाह्य असल्या कारणाने, खारीज करण्यात यावी, असे म्हटले. यावर मंचाने दाखल दस्तांचे आधारे व तक्रारीवरुन तक्रारकर्तीच्या तक्रारीस कारण सन 2007 ते सन 2014 पर्यंत सतत घडत आले असल्याचे मान्य करुन विरुध्दपक्ष क्र. 1 चा हरकतीचा अर्ज नामंजुर करण्यात आला.

         विरुध्दपक्ष क्र. 2 व 4 यांना, त्यांचा युक्तीवाद ऐकून   तक्रारीतुन विरुध्दपक्ष म्हणून वगळल्याने केवळ विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 विरुध्दचे आक्षेपातील सत्यता, दस्तांचे आधारे व उभय पक्षांचे युक्तीवादाच्या आधारे तपासण्यात आली. 

       दाखल तक्रारीवरुन व‍ विरुध्दपक्ष क्र. 3 च्या जबाबावरुन विरुध्दपक्ष क्र. 3 हे गवंडी काम करणारे मजुर असून विरुध्दपक्ष क्र. 1 च्या निर्देशानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आहे.ते बांधकाम क्षेत्रातील तज्ञ नसुन, केवळ तज्ञ व्यक्ती, यांच्या निर्देशानुसार काम करणारे असल्याने, तक्रारकर्तीला झालेल्या नुकसानीची जबाबदारी विरुध्दपक्ष क्र. 3 वर टाकता येणार नाही, या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.

      दाखल दस्तांचे काळजीपुर्वक वाचन केल्यावर प्रकरणात दाखल असलेले शेख युनुस व श्री आशीष जैन यांचे प्रतिज्ञालेख,  विरुध्दपक्ष क्र. 3 चा जबाब, नियुक्त कमीश्नरचा अहवाल, दाखल पावत्या व खुद्द विरुध्दपक्ष क्र. 1 चा जबाब व प्रतिज्ञालेख, विरुध्दपक्ष क्र. 1 विरुध्द पुरावा असल्याचे मंचाच्या निदर्शनास आले.

   विरुध्दपक्ष क्र. 1 ने त्यांच्या अधिकच्या कथनात असे नमुद केले आहे की, विरुध्दपक्ष क्र. 1 हा आर्कीटेक्ट असल्याने ते केवळ नकाशा काढण्याचे काम करुन, त्या प्रमाणे बांधकाम होते की नाही, हे बघणे त्यांचे काम आहे.  सिव्हील इंजिनिअर नसल्याने बांधकामाचे लोखंड बांधणी तसेच सिमेंट व वाळु यांचे मिक्सींग किती प्रमाणात असावे, याच्याशी विरुध्दपक्ष क्र. 1 चा संबंध नाही व ह्या बाबत त्यांना कुठलीही माहीती नाही.

       परंतु, दाखल पावत्या व्हाऊचर, कोटेशनवर विरुध्दपक्ष क्र. 1 च्या स्वाक्षऱ्या व त्यांच्या ऑफीसचा शिक्का दिसून येतो ( पृष्ठ क्र. 66 ते 98 व पृष्ठ क्र. 152 ते 156 ) पृष्ठ क्र. 152 वरील सर्टीफिकेट वरुन विरुध्दपक्ष क्र. 1 ने  रुपये 6,14,525.00 तक्रारकर्तीच्या एकुण बांधकामाचा अंदाजीत खर्च दिलेला होता. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 ने केवळ नकाशा काढून दिल्याचे काम केले, हे विधान मंचाला विश्वासार्ह्य वाटत नाही. त्याच बरोबर विरुध्दपक्ष क्र. 3 ने त्यांच्या जबाबातील अधिकच्या कथनात असे नमुद केले की, ते दैनंदिन काम करणारे मजुर असून, विरुध्दपक्ष क्र. 1 च्या सांगण्याप्रमाणे काम करुन देत होते.  विरुध्दपक्ष क्र. 1 हे त्या विषयाचे निष्णात असल्यामुळे, सदर तक्रारकर्तीला विरुध्दपक्ष क्र. 1 ने त्या विषयाचे तज्ञ असल्याकारणाने, सेवा दिली आहे.  विरुध्दपक्ष क्र. 3 च्या गैरहजेरीत विरुध्दपक्ष क्र. 1 हे त्यांचे दुस-या साईटवरील ( बांधकामाच्या स्थळावरुन ) मजुर आणून तक्रारकर्तीच्या घराचे बांधकाम करुन देत होते.

    त्यामुळे, विरुध्दपक्ष क्र. 1 ने त्यांच्या जबाबातील परिच्छेद क्र. 8 मध्ये नमुद केलेले, विरुध्दपक्ष क्र. 3 शी त्यांचा काहीही संबंध नाही व विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी कधीही विरुध्दपक्ष क्र. 1 च्या सोबत किंवा हाताखाली काम केले नाही, हे विधान मंचाला ग्राह्य धरता येणार नाही.

     विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी त्यांच्या जबाबातील परिच्छेद क्र. 4 मध्ये नमुद केले की, त्यांनी आशीष जैन नावाच्या व्यक्तीला फोन केला नाही किंवा त्यांला बोलाविले नाही.  परंतु प्रकरणातील पृष्ठ क्र. 127 वरील प्रतिज्ञालेखात श्री आशीष जैन यांनी स्पष्टपणे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्र.1 श्री राजेश राऊत, आर्कीटेक्ट तथा बांधकाम तज्ञ, यांचे सांगण्यावरुन तक्रारकर्तीच्या घराचे व ओलाव्यामुळे फर्नीचरला लागलेल्या उधळीचे निवारणार्थ पेस्ट कंट्रोलिंगचे काम केले.  त्याचा मोबदला साबळे मॅडम / तक्रारकर्ती यांचेकडून मिळाला व सदरचे काम श्री राजेश राऊत / विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी नेमुन दिलेल्या सुचनेप्रमाणे केले आहे.

        याला उत्तर देतांना विरुध्दपक्ष क्र. 1 ने त्यांच्या पृष्ठ क्र. 143 वरील प्रतिज्ञालेखात असे म्हटले की, आशीष जैन यांनी खालच्या मजल्याचे पेस्ट कंट्रोल केले व सदर प्रकरण पहील्या माळयाबद्दल आहे.  म्हणून आशीष जैन यांच्या प्रतिज्ञालेखातील मजकुराचा हया प्रकरणाशी काहीही संबंध नाही. परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 ने बांधकामात केलेल्या त्रुटीमुळेच वरचा मजला गळत असल्याने व ते पाणी खालच्या मजल्यावर साचत असल्यानेच, खालच्या मजल्याला ओल येऊन फर्नीचर खराब झाले असल्याचे तक्रारकर्तीने तिच्या तक्रारीत म्हटलेले आहे.

          तक्रारकर्तीतर्फे दुसरा प्रतिज्ञालेख शेख युनुस यांनी दिला व तो प्रकरणात पृष्ठ क्र. 124 वर आहे.  सदर प्रतिज्ञालेखातही विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी शेख युनुस व श्री नरेश भाटी यांना ऑफीसला बोलावून घेतले व तक्रारकर्तीच्या घराच्या नुकसानी बद्दल सांगीतले व या तिघांनी साईट बघुन काम करण्याचे ठरवले असल्याचे नमुद आहे.  शेख युनुस यांचे कथनानुसार विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी श्री राठोड व श्री जाधव यांना कवेलु काढून स्लॅब छिलणे, टाईल्स काढून, सर्व माल टाईल्स व कवेलु सहीत खाली उतरविण्याचे उधडे दिले.  त्यानंतर दि. 7/10/2014 पासून विरुध्दपक्ष क्र. 1 च्या सुचनेनुसार वॉटर प्रुफिंगच्या कामास सुरुवात केल्याचे व तक्रारकर्ती आणि शेख युनुस वारंवार फोन करत असतांना विरुध्दपक्ष क्र. 1 ने प्रतिसाद दिला नसल्याचेही म्हटले आहे.

    सदर प्रतिज्ञालेखाबद्दलही विरुध्दपक्ष क्र. 1 ने त्यांच्या प्रतिज्ञालेखात उत्तर देतांना असे म्हटले की, सदर प्रतिज्ञालेख जाणुनबुजून खोटे तयार केलेले आहे.

       परंतु, सदर दोन्ही व्यक्तीचा उल्लेख तक्रारकर्तीने तिच्या दि. 10/12/2014 रोजी दाखल केलेल्या तक्रारीत केलेला असून, सदर प्रतिज्ञालेख अनुक्रमे दि. 2/4/2015 व दि. 31/3/2015 रोजी नोटराईज्ड केलेले दिसून येतात.  त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 च्या आक्षेपात मंचाला सत्यता आढळून येत नाही.

      मंचाच्या आदेशावरुन नियुक्त केलेल्या तज्ञाने दि. 1/12/2015 रोजी तक्रारकर्तीच्या घराची संपुर्ण पाहणी करुन अहवाल सादर केला.  परंतु सदर पाहणी, मंचाच्या आदेशाप्रमाणे, विरुध्दपक्षाच्या उपस्थितीत न करता, अहवाल सादर केल्याने विरुध्दपक्ष क्र. 1 ने दि. 7/12/2015 रोजी अहवालावर आक्षेप घेतला. तो आक्षेप ग्राह्य धरुन मंचाने विरुध्दपक्षाच्या उपस्थितीत तज्ञाने पाहणी करुन, पुन्हा अहवाल सादर करण्याचा आदेश दि. 19/12/2015 रोजी दिला.  त्या आदेशानुसार उभय पक्षांच्या उपस्थितीत दि. 10/1/016 रोजी पुन्हा स्थळ निरीक्षण करुन अहवाल दिला. या अहवालात तज्ञ श्री गजानन फाटे                ( सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता. सार्वजनिक बांधकाम अकोला, B.E.Civil ) त्यांच्या या पुर्वीच्या दि. 7/12/2015 च्या अहवालावरच ठाम असल्याचे नमुद केले आहे व दि. 7/12/2015 च्या अहवालात येणे प्रमाणे नमुद केले आहे.

“ वरील प्रमाणे संपुर्ण घराची पाहणी करण्यात आली.  पहील्या माळयावर बहुतेक भागातील भितीवर स्लॅबमधुन पावसाचे पाणी झिरपून खाली खोलीमध्ये आले असल्याचे निदर्शनास आले.  सकृतदर्शनी आज पाहणी केली असता घराचे बांधकाम तथा प्रामुख्याने स्लॅबचे बांधकाम करतांना झालेले काम निश्चितच निकृष्ठ दर्जाचे झालेले आहे, असे दिसते.  तसेच पहील्या माळयावरील खोलीचे वर जेथे वरच्या भागात उताराचा स्लॅब टाकण्यात आलेला आहे. उताराचा चे वरील भागातून पावसाळयाचे पाणी अगदी सहज न थांबता वाहून जाऊ शकते. खोलीमध्ये सुध्दा बऱ्याच प्रमाणात भिंतीवर गळती झाल्याचे दिसून येते.  तसेच बाजुच्या खोलीमध्ये प्रत्येक भिंतीवर गळती झाल्याचे स्पष्ट दिनर्शनास दिसून येते.

      श्रीमती श्रीदेवी साबळे यांचे सोबत चर्चा केली असता, सदर पावसाचे पाणी पहील्या माळयावरुन खालच्या माळयावर आले असल्याचे सांगण्यात आले.  त्यांनी  सांगीतलेली बाब अगदी स्पष्ट असून त्यामध्ये निश्चित सत्यता आहे.  हे सदर बांधकाम बघुन स्पष्ट होते.

      श्रीमती श्रीदेवी साबळे यांनी चर्चेमध्ये सांगीतल्यानुसार जिन्याचे बांधकाम जिन्याचा स्लॅब कोसळला सदर पुर्ण इमारतीचे बांधकाम करतांना विशिष्ट काळजी घेण्यात आली नसावी, जसे 1. मुदतबाह्य सिमेंट वापरणे, 2. स्लॉब टाकतांना आवश्यक सामुग्री विशिष्ट दर्जाची नसणे, 3. लोहा बांधणी योग्य प्रकारे न करणे व कमी प्रमाणात लोहा बांधणे, 4. सिमेंट रेती, गिट्टी पाणी यांचा योग्य प्रमाणात वापर न करणे, 5. स्लॉब टाकल्यानंतर झालेल्या कामावर 28 दिवस पाणी न टाकणे, यापैकी कुठेही निष्काळजीपणा स्लॉब निश्चितच कोसळेल आणि कामाची देखरेख करणाऱ्या अभियंताचे या बाबतीत काळजी घेणे हे त्याचे प्रथम कर्तव्य होते. अन्यथा निकाल पाहतच आहोत

     वरील प्रमाणे अहवालासोबत घराचे कामाची पाहणी केल्यानंतर झालेले काम हे निकृष्ट झाल्याचे दिसत असून बांधकामावर तांत्रिक दृष्टया काळजी न घेण्यात आल्याचे निदर्शनास येते.”

     या दोनही अहवालाचा खर्च तक्रारकर्तीने मंचाच्या आदेशाने केला.  तज्ञाच्या दुस-या पाहणीच्या वेळी विरुध्दपक्ष व त्यांचे वकील हजर होते.  परंतु तज्ञ त्यांच्या पुर्वीच्याच मतावर ठाम असल्याने त्यांनी इन्स्पेक्शन केले नाही, असा आक्षेप घेऊन विरुध्दपक्षाने सदर अहवालावर दि. 15/1/2016 रोजी हरकत घेतली. परंतु उभय पक्षाच्या उपस्थितीत तज्ञाने पुन:परिक्षण केल्याचे, तक्रारकर्तीने दि. 2/2/2016 च्या हरकतीच्या जबाबात म्हटले आहे.

       विरुध्दपक्षाने तज्ञाच्या अहवालावर आक्षेप घेतल्यावर स्वखर्चाने दुसऱ्या तज्ञातर्फे पाहणी करण्याची कुठलीही तयारी दर्शवली नाही.  मंचापुढे दुसरा तज्ञाचा अहवाल नसल्याने, मंचाने नेमणुक केलेल्या  तज्ञाने दाखल केलेल्या अहवालातील निष्कर्ष मंच ग्राह्य धरत आहे.

     विरुध्दपक्ष क्र. 1  व 3 यांनी तक्रारकर्तीचा उलट तपास घेण्याची मागणी मंचासमोर केली. परंतु विरुध्दपक्षांची मागणी न्यायोचित नसल्याने मंचाने सदर मागणी खारीज केली.  परंतु विरुध्दपक्षातर्फे तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दोन साक्षीदारांचा प्रश्नावली मार्फत उलट तपास घेण्याची मागणी करण्यात आली नाही.

     विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 तर्फे त्यांच्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ कोणताही पुरावा मंचासमोर सादर केलेला नाही.

       विरुध्दपक्ष क्र. 1 च्या जबाबातील व युक्तीवादातील काही मुद्द्यांमध्ये मंचाच्या तफावत आढळली, म्हणुन मंचाने उभय पक्षाने घेतलेल्या प्रत्येक आक्षेपाचा, दाखल दस्तांच्या आधारे उहापोह केल्यावर मंच या निष्कर्षाप्रत आले की, विरुध्दपक्ष क्र. 1 हे केवळ आर्कीटेक्ट असूनही व त्यांच्या स्वत:च्याच म्हणण्यावरुन त्यांना सिमेंट वाळुच्या प्रमाणाचे व प्रत्यक्ष बांधकामाची माहीती नसतांनाही, त्या बद्दल तक्रारकर्तीला अंधारात ठेवून तक्रारकर्तीच्या बांधकामाचे कंत्राट घेतले व बांधकामाचे ज्ञान नसल्याने, तज्ञाच्या अहवालानुसार त्रुटीपुर्ण सदोष बांधकाम करुन दिले.  सन 2007 पासून सन 2014 पर्यंत व त्यापुढे प्रकरण दाखल झाल्यानंतर अंतीम आदेशापर्यंत आणखी 2 वर्षाच्या कालावधीत तक्रारकर्तीला सतत झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी तक्रारकर्ती ही विरुध्दपक्ष क्र. 1 कडून रु. 1,00,000/- नुकसान भरपाई व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 3000/- मिळण्यास पात्र असल्याच्या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.  विरुध्दपक्ष क्र. 3 हे गवंडी काम करणारे मजुर असल्याने व त्यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 च्या मार्गदर्शनानुसार काम केले असल्याने, त्यांचेवर नुकसान भरपाईची जबाबदारी टाकण्यात आली नाही.

 

     सबब अंतीम आदेश पारीत केला, तो येणे प्रमाणे

 

                                                    (अंतीम आदेश पुढील पानावर )

  •  
  1. तक्रारकर्ती यांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
  2. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्तीच्या घराचे केलेल्या सदोष व त्रुटीपुर्ण बांधकामामुळे तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसान भरपाईपोटी विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्तीला रु. 1,00,000/- ( रुपये एक लाख फक्त ) द्यावेत व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 5000/- ( रुपये पाच हजार फक्त ) द्यावेत.
  3. सदर आदेशाचे पालन निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावे. अन्यथा मंजुर रकमेवर आदेश दिनांकापासून प्रत्यक्ष अदाई पर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज आकारण्यात येईल.

  सदर आदेशाच्‍या प्रती उभयपक्षांना निशुल्‍क देण्‍यात याव्‍या. 

 
 
[HON'BLE MRS. S.M. Untawale]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Kailas Wankhade]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Bharati Ketkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.