जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, अमरावती
ग्राहक तक्रार क्र.24/2015
दाखल दिनांक : 05/02/2015
निर्णय दिनांक : 27/02/2015
गोविंद चंद्रभानजी इसळ, :
अध्यक्ष श्री गुरुदेव बहुउद्देशीय सेवाभावी :
संस्था निंभाणी :
वय 58, धंदा – शेती- :
रा. निंभार्णी पो. राजुरवाडी, : .. तक्रारकर्ता..
विरुध्द
राजेश बामणोदकर पद्मश्री प्रकाशन मधुविजय :
सावदा ता. रावेर, जि.जळगांव : ..विरुध्दपक्ष...
गणपूर्ती : 1) मा.श्री.मा.के.वालचाळे, अध्यक्ष
2) मा.श्री.रा.कि.पाटील, सदस्य
तकतर्फे : स्वतः
: न्यायनिर्णय :
( दिनांक 27/02/2015 )
मा.श्री.मा.के.वालचाळे, अध्यक्ष यांचे नुसार :-
1.. तक्रारकर्त्याने सदरचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत कलम 12 अन्वये दाखल केलेला आहे.
..2..
ग्रा.त.क्र.24/2015
..2..
तक्रारकर्ता यांचे कथन असे आहे की, विरुध्दपक्ष सोबत त्यांनी करार केला होता व कराराप्रमाणे विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यास पुस्तके तसेच दिनदर्शीका छापून द्यावयाचे होते. परंतू विरुध्दपक्ष यांनी ठरलेल्या दराप्रामणे छपाई करुन न देता जास्तीची रक्कम मागीतली तसेच दिनदर्शीका छापून सुध्दा दिली नाही.
2. तक्रारकर्ता यांनी प्राथमिक युक्तीवादा दरम्यान असे कथन केले की, विरुध्दपक्ष हे जिल्हा जळगांव येथे त्यांचा छपाईचा व्यवसाय करतात व पुरस्तके व दिनदर्शीका हया जळगांव जिल्हयात छापून द्यावयाची होती. विरुध्दपक्ष यांना जी रक्कम दिली ती जळगांव जिल्हा येथे दिलेली आहे. असे कथन केल्यानंतर तक्रारकर्ता यास अशी विचारणा करण्यांत आली की, या मंचाच्या अधिकारक्षेत्रात छपाईबद्दल काही व्यवहार घडला आहे का यासाठी त्यांनी मुदत घेतली व नंतर दिनांक 23/02/2015 रोजी शपथपत्र दाखल केले. ज्यात त्यांनी असे कथन केले की, गुरुकुंज आश्रम मोझरी येथे छपाईबाबत बोलणी विरुध्दपक्षासोबत झाली होती परंतू यासाठी त्यांनी कोणताही पुरावा दाखल केला नाही.
..3..
ग्रा.त.क्र.24/2015
..3..
3. विरुध्दपक्ष हा या मंचाच्या अधिकारक्षेत्रात राहत नसून तसेच व्यवसाय ही करीत नाही. त्यांच्या छपाईचा व्यवसाय हा जळगांव जिल्हयात आहे. पुस्तके व दिनदर्शीका याची छपाई ही विरुध्दपक्ष यांना जळगांव जिल्हयात करावयाची होती व तक्रारकर्ता यांनी याबद्द्लचे पैसे दिले ते विरुध्दपक्ष याला जळगांव जिल्हयात दिलेले आहे त्यामुळे हा तक्रार अर्ज या मंचासमक्ष चालू शकत नाही.
4. वरील विवेचनावरुन असा निष्कर्ष काढण्यांत येतो की, या मंचाला हा तक्रार अर्ज या मंचाच्या कार्यक्षेत्रा बाहेर असल्याने तो चालविण्याचा या मंचास अधिकार येत नाही. सबब खालील आदेश.
अंतीम आदेश
- तक्रार अर्ज हा या मंचाच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याने तो रद्द करण्यांत येतो.
- तक्रार अर्ज हा योग्य त्या ग्राहक मंचापुढे दाखल करण्यासाठी तक्रारकर्ता याला परत करण्यांत येतो.
- तक्रारकर्ता याला आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यांत याव्यात.
दि.27/02/2015 (रा.कि.पाटील ) (मा.के.वालचाळे)
सदस्य अध्यक्ष