(मंचाचे निर्णयान्वये, श्री अनिल एन.कांबळे, अध्यक्ष(प्रभारी))
(पारीत दिनांक : 24 जानेवारी 2012)
1. अर्जदार/फिर्यादी हिने सदरची दरखास्त ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 27 अन्वये दाखल करुन, गैरअर्जदारावर जास्तीत-जास्त दंड ठोठावण्यात यावा व आदेशाची अंमलबजावणी होऊन पुर्तता करुन मिळावे, या करीता अर्ज दाखल केला.
2. अर्जदार/फिर्यादी हिने सदर दरखास्त मध्ये आक्षेपाची पुर्तता केली नाही. दरखास्त पडताळणी जबाबाकरीता ठेवा असा आदेश नि.क्र.1 वर दि.28.12.2012 ला पारीत केला. त्यानंतर, दरखास्त अर्जदाराचे पडताळणी जबाबाकरीता दि.16.1.2012, 23.1.2012 व 24.1.2012 रोजी ठेवण्यात आले. परंतु,
... 2 ... (चौ.अ.क्र.9/2011)
अर्जदार/फिर्यादी व तिचे वकील सतत गैरहजर राहून अर्जदार हीने पडताळणी जबाब दिला नाही. अर्जदाराने कुठलीही स्टेप घेतली नाही. अर्जदार व तिचे वकील सतत गैरहजर राहून कुठलीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे, अर्जदाराकरीता प्रलंबीत आहे.
3. अर्जदारास दरखास्त चालवायचे नाही असेच दिसून येत असून अर्जदार सतत गैरहजर असल्यामुळे दरखास्त (for want of non-prosecution) म्हणून काढून टाकून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आंदेश //
अर्जदार सतत गैरहजर असल्यामुळे काढून टाकण्यात येत आहे.
गडचिरोली.
दिनांक :- 24/01/2012.