निकालपत्र :- (दि.28/10/2010) (श्री एम.डी.देशमुख,अध्यक्ष) (01) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाले यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांना नोटीस लागू होऊनसुध्दा ते सदर कामी हजर झालेले नाहीत किंवा त्यांनी आपले लेखी म्हणणेही दाखल केलेले नाही. सुनावणीचे वेळेस तक्रारदाराचे वकीलांनी युक्तीवाद केला. (02) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :- अ) सामनेवाला क्र.1 ही महाराष्ट्र राज्य सहकार कायदयाखाली नोंद झालेली सहकारी पत संस्था असून ती शेती मालाची खरेदी विक्री करण्याचा आणि पत पुरवठयाचा व ठेवी स्विकारणेचा बँकींग व्यवसाय करीत आहे. सामनेवाला क्र.1 या संस्थेचे सामनेवाला क्र. 2 व 3 हे अनुक्रमे चेअरमन व व्हा.चेअरमन आहेत तर सामनेवाला क्र. 4 ते 8 हे संचालक असून सामनेवाला क्र.9 हे मॅनेजर आहेत. यातील तक्रारदार संस्था ही सुध्दा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कलम 1960 मधील तरतुदीनुसार नोंदणी झालेली कायदेशीर सहकारी संस्था आहे. तक्रारदार हे सामनेवाला संस्थेचे ठेवीदार ग्राहक आहेत. ब) यातील तक्रारदार यांनी सामनेवाला संस्थेत दि.14/08/2008 रोजी कॉल डिपॉझीट पावती क्र.45 अन्वये रक्कम रु.96,722/- द.सा.द.शे.15.5 टक्के व्याजाने ठेवले होते. तर दि.31/03/2008 रोजी कॉल डिपॉझीट पावती क्र.47 अन्वये रक्कम रु.9,488/- द.सा.द.शे.15.5 टक्के व्याजाने ठेवले होते. तक्रारदाराने सदरच्या ठेवी तक्रारदार संस्थेची तरलता व स्थिरता सांभाळणेसाठी गुंतवणूक म्हणून अडीअडचणीला मागताक्षणीच पैसे मिळावे आणि तक्रारदार संस्थेचे ठेवीदारांचा व सभासदांचा विश्वास तक्रारदार संस्थेवर रहावा म्हणून व खेळत्या भांडवलाच्या गुंतवणुकीची तरतुद म्हणून तसेच ठेवीदारांना ज्यात्या वेळी व्याजासह ठेव परत करण्यास मदत व्हावी म्हणून भविष्यकालीन तरतुदीसाठी गुंतवणूक म्हणून सामनेवाला संस्थेमध्ये ठेवली होती व आहे. क) तक्रारदार संस्थेने खेळत्या भांडवलाचा तुटवडा होऊ लागल्याने आणि सभासदांच्या ठेवी व्याजास परत करणे अडचणीचे होऊ लागलेने तक्रारदार संस्थेने सामनेवालांकडे असलेल्या कॉल डिपॉझीटच्या रक्कमा व्याजासह परत मागितल्या असता सामनेवाला यांनी आज देतो, उदया देतो असे वायदे सांगून सदर ठेवीच्या रक्कमा व्याजासह देणेची टाळाटाळ केली आहे. यावरुन तक्रारदारांची फसवणूक करणेचे हेतुने व अनुचित व्यापारी प्रथा अवलंबिणेचे हेतूने यातील सामनेवाला हे बेकायदेशीरपणे जाणूनबुजून तक्रारदाराची ठेव रक्कम बुडविणेच्या गैरहेतूनेच वागत असलेने तक्रारदार यांनी त्यांचे वकीलांमार्फत दि.12/11/2009 रोजी कायदेशीर नोटीस रजिस्टर पोष्टाने सामनेवाला यांना पाठवून सदर कॉल डिपॉझीटच्या रक्कमांची व्याजासह मागणी केली आहे. सदरची नोटीस लागू होऊनसुध्दा सामनेवाला यांनी तक्रारदाराची ठेव रक्कम परत केलेली नाही. म्हणून नाईलाजाने सदरची तक्रार मे.मंचासमोर दाखल करावी लागत आहे. अशाप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदाराची ठेव परत न करता आर्थिक, मानसिक व शारिरीक नुकसान केले आहे. यामुळे सामनेवाला हे तक्रारदारांच्या ठेव रक्क्मा व्याजासह परत करण्यास वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या जबाबदार आहेत. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन तक्रारदारांची कॉल डिपॉझीटची रक्कम रु. 1,06,210/- व्याजासह मिळावी तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रारीचा खर्च व वकील फी ची रक्कम रु.25,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विंनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (03) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत कॉल डिपॉझीटच्या पावत्या, तक्रारदाराने वकीलांमार्फत सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस, त्याच्या नोटीस पाठविल्याच्या पोष्टाच्या रिसीट इ.कागदपत्रे जोडलेली आहेत व शपथपत्र दाखल केलेले आहे. (04) सामनेवाला यांना नोटीस लागू होऊनसुध्दा ते सदर कामी हजर झालेले नाहीत किंवा त्यांनी आपले लेखी म्हणणेही दाखल केलेले नाही. सदर सामनेवाला यांचे वर्तणूकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या ठेव खातेची रक्कम परत करणेकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्न केलेले नाहीत हे स्पष्ट दिसून येते. तसेच सामनेवाला यांनी सदर प्रकरणी आपले म्हणणे दाखल न करुन सामनेवाला यांना तक्रारदारांचा तक्रार अर्ज मान्य असल्याचे दाखवून दिले आहे. सबब सामनेवाला क्र. 1 ते 8 यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या व सामनेवाला क्र.9 हे सामनेवाला संस्थेचे मॅनेजर म्हणजे कर्मचारी असलेने त्यांना फक्त संयुक्तिकरित्या तक्रारदारांच्या कॉल डिपॉझीट पावतीवरील रक्कमा व्याजासह परत करण्याकरिता जबाबदार धरणेत यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (05) तक्रारदारांचा शपथेवरील तक्रार अर्ज, दाखल कागदपत्रे यांचा साकल्याने विचार करता तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केलेप्रमाणे सामनेवाला यांचेकडे कॉल डिपॉझीट ठेव खातेवर रक्कम ठेवल्याचे निदर्शनास येते. तथापि, सदर ठेव खातेवरील रक्कमेची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कम परत न केल्याने तक्रारदारांनी सदरील तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेला आहे. (06) तक्रारदारांनी दाखल केलेल्या कॉल डिपॉझीट पावती क्र.45 चे अवलोकन केले असता सदर ठेव पावतीवरील ठेव रक्कम रु.96,722/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सदर रक्कमेवर दि.14/08/2008 पासून ते वकील नोटीस पाठवून ठेव रक्कमेची मागणी केलेल्या दि.09/11/2009 रोजी पर्यंतच्या कालावधीकरिता ठेव पावतीवर नमुद व्याजदर म्हणजे 15.5 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तदनंतर म्हणजे दि.10/11/2009 नंतर संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत सदर रक्कमेवर द.सा.द.शे.6 टक्के व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच कॉल डिपॉझीट पावती क्र.47 चे अवलोकन केले असता सदर ठेव पावतीवरील ठेव रक्कम रु.9,488/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सदर रक्कमेवर दि.31/03/2008 पासून ते वकील नोटीस पाठवून ठेव रक्कमेची मागणी केलेल्या दि.09/11/2009 रोजी पर्यंतच्या कालावधीकरिता ठेव पावतीवर नमुद व्याजदराप्रमाणे म्हणजे 15.5 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तदनंतर म्हणजे दि.10/11/2009 नंतर संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत सदर रक्कमेवर द.सा.द.शे.6 टक्के व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. सदर रक्कम सामनेवाला क्र. 1 ते 8 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या व सामनेवाला क्र.9 यांनी फक्त संयुक्तिकरित्या तक्रारदारास अदा करावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला क्र. 1 ते 8 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.9 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना त्यांचे कॉल डिपॉझीट पावती क्र.45 वरील रक्कम ठेव रक्कम रु.96,722/- त्वरीत अदा करावी. सदर रक्कमेवर दि.14/08/2008 पासून ते वकील नोटीस पाठवून ठेव रक्कमेची मागणी केलेल्या दि.09/11/2009 रोजी पर्यंतच्या कालावधीकरिता ठेव पावतीवर नमुद व्याजदराप्रमाणे म्हणजे 15.5 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे व दि.10/11/2009 नंतर संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत सदर रक्कमेवर द.सा.द.शे.6 टक्के व्याज अदा करावे. तसेच कॉल डिपॉझीट पावती क्र.47 वरील ठेव रक्कम रु.9,488/- त्वरीत अदा करावी. सदर रक्कमेवर दि.31/03/2008 पासून ते वकील नोटीस पाठवून ठेव रक्कमेची मागणी केलेल्या दि.09/11/2009 रोजी पर्यंतच्या कालावधीकरिता ठेव पावतीवर नमुद व्याजदराप्रमाणे म्हणजे 15.5 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. दि.10/11/2009 नंतर संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत सदर रक्कमेवर द.सा.द.शे.6 टक्के व्याज अदा करावे. 3) सामनेवाला क्र.1 ते 8 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.9 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु;एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |