नि.२०
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा. अध्यक्ष - अनिल य.गोडसे
मा. सदस्या – श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २२१/२०१०
सौ प्रतिभा चंद्रकांत राजमाने
व.व.सज्ञान, धंदा – घरकाम
रा.द्वारा खिलारे जयेंद्र कल्लाप्पा
१३६०४/५१, हॉटेल +ìम्बॅसिडरच्या मागे,
गेस्ट हाऊस जवळ, सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
राजारामबापू सहकारी बॅंक लि. पेठ
ता.वाळवा जि.सांगली
शाखा गांवभाग, सांगली ...... जाबदार
सदरहू प्रकरणातील पक्षकारांचे दरम्यान तडजोड झाली असून त्यांच्या सहया असलेल्या तडजोडीचा मसुदा या प्रकरणी नि. १९ अन्वये दाखल आहे. हा मसुदा मान्य असल्याचे पक्षकारांनी मंचासमोर सुध्दा कबूल केले आहे. सदर नि.१९ वरील तडजोड पुरशिसमधील अटी व शर्ती खालीलप्रमाणे -
१. जाबदार बॅंकेने निवृत्ती ठेव योजने अंतर्गत सेव्हींग खातेत जमा असलेली रक्कम रु.४१५१५६/- (रक्कम रुपये चार लाख पंधरा हजार एकशे छपन्न मात्र) दि.३०/१२/२००३ पासून १० वर्षाकरिता म्हणजे ३१/१२/२०१३ पर्यंत जाबदारांकडे ठेव ठेवणेचे आहे. सदरची रक्कम मुदत ठेवीत गुंतविणेची आहे.
२. सदर रक्कम रु.४१५१५६/- वर द.सा.द.शे. १५% प्रमाणे रु.५०००/- दरमहा दि.३१/१२/२००३ पासून ३१/१२/२०१३ पर्यंत रु.५,०००/- अर्जदारांना देणेचे आहे. (जाबदार बॅंकेने सदर व्याज अर्जदार यांना दि.२७/०३/२०१० पर्यंत दिले आहे). त्यापुढील सरळ व्याज म्हणजे दरमहा रु.५,०००/- दि.२८/०३/२०१० पासून ३१/१२/२०१३ पर्यंत अदा करणेचे आहे. सदरची व्याज रक्कम तक्रारदार यांचे याच बॅंकेतील सेव्हींग खातेवर जमा करणेची आहे.
३. दि.३१/१२/२००३ रोजी जमा झालेली / केलेली रक्कम रु.४१५१५६/- एकरकमी दि.३१/१२/२०१३ रोजी तक्रारदारांना देणेचे आहेत.
४. सदरची तडजोड इंडीयन बॅंकर्स असोसिएशन व रिझर्व बॅंक ऑफ इंडिया यांचे आदेश व नियमास अधिन राहून तक्रारदार व जाबदार या दोघांनी एका विचाराने केली आहे. या तक्रार अर्जाचा खर्च अर्जदार व जाबदार यांनी आपापला सोसणेचा आहे. जाबदार यांनी वरील अटींचे पालन काटेकोरपणे करणेचे आहे. निवृत्ती ठेव योजना बंद केलेचे अर्जदारास मान्य आहे. तक्रार अर्जातील इतर सर्व तक्रारी अर्जदारांनी सोडून दिल्या आहेत. मे. मंचाने तक्रारअर्ज वर नमूद तडजोडीनुसार निकालात काढणेस तक्रारदार व जाबदार यांची संमती आहे.
आदेश
सदर नि.१९ वरील तडजोड पुरशिसचे अनुषंगाने प्रस्तुत प्रकरण निकाली करण्यात येत आहे.
सांगली
दि. ९/०८/२०११
(गीता घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच,सांगली जिल्हा मंच, सांगली
प्रतः-
तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११