(मा.अध्यक्ष, श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून नवीन शॉक अँबसॉरबर खरेदी करण्यासाठी रोख स्वरुपात नुकसान भरपाई मिळावी, तसेच प्रवास भाडे व कोर्टकामी झालेला खर्च मिळावा, अर्जाचा निकाल अर्जदाराचे लाभात व्हावा, या मागणीसाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा तक्रार अर्ज या मंचात दाखल केलेला आहे.
सामनेवाला क्र.2 यांनी या कामी पान क्र.18 लगत लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी मंचाची नोटीस घेण्यास नकार दिल्यामुळे सामनेवाला क्र.1 यांचेविरुध्द दि.22/06/2011 रोजी एकतर्फा आदेश करण्यात आलेला आहे.
अर्जदार व सामनेवाला क्र.2 यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत.
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय.
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय?-नाही.
3) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार सामनेवाला यांचेविरुध्द नामंजूर करण्यात
येत आहे.
विवेचन
अर्जदार यांनी या कामी पान क्र.32 लगत लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे. सामनेवाला क्र.2 यांनी पान क्र.35 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “सामनेवाला क्र.2 हे मॅनेजींग डायरेक्टर असून अर्जदार यांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडून स्पेअर पार्ट खरेदी केलेला आहे. त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांचे अर्जदार हे ग्राहक होत नाहीत. अर्जदार यांनी त्यांची मोटार सायकल चुकीचे व हयगयीमुळे 50,000 किलोमिटरपेक्षा जास्त चालवल्यामुळे शॉक अँबसॉरबर नादूरुस्त झालेले आहे. शॉक अँबसॉरबर पुन्हा पुन्हा नादुरुस्त होते हे दर्शवण्यासाठी अर्जदार यांनी पुरावा दिलेला नाही. अर्ज रद्द करण्यात यावा.” असे म्हटलेले आहे.
या कामी अर्जदार यांनी पान क्र.22 लगत सामनेवाला क्र.1 यांची दि.07/10/2010 रक्कम रु.1318/- ची शॉक अँबसॉरबर खरेदीची पावती दाखल केली आहे. पान क्र.25 लगत “बजाज सर्व्हीस” या सर्व्हीस स्टेशनचा मुळ अस्सल फोटोग्राफ दाखल केलेला आहे. पान क्र.22 ची पावती व पान क्र.25 फोटोग्राफ याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 व 2 यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
या कामी अर्जदार यांनी नादुरुस्त झालेला शॉक अँबसॉरबर किंवा पान क्र.22 चे पावतीप्रमाणे खरेदी केलेला नवीन शॉक अँबसॉरबर मंचासमोर दाखल केलेला नाही तसेच दोनही शॉक अँबसॉरबरची तपासणी तज्ञ व्यक्तीमार्फत होवून त्यांचा अहवाल मंचासमोर येण्यासाठी अर्जदार यांनी कोणतीही मागणी केलेली नाही. सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये “अर्जदार यांनी चुकीच्या पध्दतीने हयगयीने 50,000 कि.मी. पेक्षा जास्त मोटार सायकलचा वापर केलेला आहे व शॉक अँबसॉरबर खराब झालेले आहेत” असे म्हटलेले आहेत.
वादातील मोटार सायकल 61000 कि.मी. फिरलेली आहे व 53000 कि.मी. रनिंग झाल्यानंतर शॉक अँबसॉरबर बदललेला आहे ही बाब युक्तीवादाचे वेळी अर्जदार यांनी मंचासमोर मान्य केलेली आहे. कोणत्याही दुचाकी वाहनाचे कोणतेही पार्टस व शॉक अँबसॉरबर 50,000 कि.मी. पेक्षा जास्त रनिंग झाल्यानंतर नादुरस्त होणे स्वाभाविक आहे. वर उल्लेख केलेप्रमाणे या कामी शॉक अँबसॉरबर कोणत्या कारणामुळे नादुरुस्त झालेले आहेत हे स्पष्टपणे शाबित करण्याकरीता अर्जदार यांनी कोणताही योग्य तो लेखी व जादा पुरावा, तज्ञ व्यक्तीचे सर्टिफिकेट व प्रतिज्ञापत्र या कामी दाखल केलेले नाही. वरील कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना खराब व दोषयुक्त शॉक अँबसॉरबरची विक्री केलेली आहे ही गोष्ट अर्जदार यांनी स्पष्टपणे शाबित केलेली नाही. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे.
या कामी मंचाचे वतीने वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहे .
1) 3(2011) सि.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 42. सिमा गांधी विरुध्द
मारुती सुझुकी.
2) 1(2011) सि.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 254. कमल किशोर विरुध्द
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्रे, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच सामनेवाला क्र.2 यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, लेखी युक्तीवाद, वर उल्लेख केलेली व मंचाचे वतीने आधार घेतलेली वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे आणि वरील सर्व विवेचन याचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.