Maharashtra

Nagpur

CC/467/2020

SHRI. SUKHDEV PANDURANG DERE - Complainant(s)

Versus

RAI UDYOG LIMITED, BUILDERS & DEVELOPERS - Opp.Party(s)

ADV. VASANT V. TEKADE

11 Jan 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/467/2020
( Date of Filing : 10 Nov 2020 )
 
1. SHRI. SUKHDEV PANDURANG DERE
R/O. H.NO.13, JUNI NAVBHARAT PRESS, BEHIND JAISHREE TAKIJ, COTTON MARKET, NAGPUR-18
NAGPUR
MAHARASHTRA
2. SHRI. PRASHANT SUKHDEV DERE
R/O. H.NO.13, JUNI NAVBHARAT PRESS, BEHIND JAISHREE TAKIJ, COTTON MARKET, NAGPUR-18
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. RAI UDYOG LIMITED, BUILDERS & DEVELOPERS
OPP. S.T. BUS STAND, GANESHPETH, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 11 Jan 2022
Final Order / Judgement

 मा. सदस्या श्रीमती चंद‍्रिका बैसयांच्‍या आदेशान्‍वये

  1. तक्रारदाराने सदर ग्राहक सरंक्षण कायदा 2019 चे कलम 35(1) अन्वये दाखल केलेली आहे.तक्रारदाराने नागपूर सुधार प्रन्यास व महानगरपालीकेच्या हद्दीत येत असलेल्या वि.प.च्या प्रस्तावित राय टावर,प्रोजेक्ट साईट भारत टॉकीज कामठी रोड, कस्तुरचंद पार्क जवळील, नागपूर येथे राय उद्योग लि.बिल्डस अॅन्ड डेव्हलपर्स, एस टी स्टॅन्ड गणेशपेठ नागपूर  यांच्या प्रोजेक्टमधील पहिल्या माळयावरील दुकान क्रं. 1, एकुण किंमत रुपये 45,00,000/- पैकी 25 टक्के रक्कम रुपये 11,00,000/- वि.प.कडे जमा करुन तक्रारदाराने अग्रीम राशी देऊन खरेदीचा सौदा दिनांक 12.2.2019 रोजी पक्का केला. या दुकानाचे एकुण क्षेत्रफळ एकुण 19.16 चौ.मि. (207.07 चौ.फुट. ) असे आहे. सदरचे दुकान हे “ राय टावर  फुल्ली शॉपिंग कॉम्प्लेक्स ” या पुस्तीकेत नमुद आहे. परंतु तक्रारदाराने वि.प.बाबत अधिकृत कार्यालयात चौकशी केली असता ही मिळकत राय उदयोग लि.च्या मालकीची नसून सदरच्या जागेवर कोणताही बिल्डींग प्लॅन मंजूर नसल्याचे कळले. तसेच हि योजना स्थावर संपदा प्राधिकरण येथे नोंदणीकृत नाही व सदरच्या दुकानाचा विक्री करारनामा किंवा विक्रीपत्र नोंदणी होऊ शकत नाही असे कळले. अशाप्रकारे वि.प ने तक्रारदार यांची घोर फसवणूक केली आहे. त्यामूळे तक्रारदाराने दिनांक 15.6.2019 रोजी राय उद्योग लि.च्या कार्यालयात जाऊन प्रस्तावीत दुकान क्रं.1, पहिला मजल्याचा सौदा रद्द करुन रुपये 11,00,000/- परत मिळण्‍याकरिता अर्ज केला. परंतु त्यास वि.प.ने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामूळे तक्रारदाराने दिनांक 29.9.2020 रोजी रजिस्टर्ड पोस्टाने वि.प.ला नोटीस पाठविली. नोटीस प्राप्त होऊनसुध्‍दा वि.प.ने त्यास उत्तर दिले नाही यावरुन वि.प.ने अनुचित व्यापार पध्‍दतीचा अवलंब केला आहे व तक्रारदाराचे प्रती सेवेत त्रुटी केल्याचे दिसुन येते.   
  2. तक्रारदाराने सदर तक्रार दाखल करुन पूढील प्रमाणे मागणी केली आहे.  वि.प.1 व 2 यांनी त्यांच्याकडे जमा असलेली रक्कम रुपये 11,00,000/- व त्यावर द.सा.द.शे. 18 टक्के व्याज देण्‍यात यावी. तसेच तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कमेची मागणी केली आहे.
  3. तक्रादाराची तक्रार दाखल करुन वि.प.1 व 2 नोटीस काढण्‍यात आली. तक्रारीची नोटीस मिळुन वि.प. 1 व 2 तक्रारीत हजर झाले व त्यांनी आपले लेखी उत्तर दाखल केले.
  4. वि.प.1 व 2 आपले उत्तरात नमुद करतात की, त्यांनी तकारदाराकडुन उपरोक्त राय उद्योग लि.बिल्डस अॅन्ड डेव्हलपर्स, एस टी स्टॅन्ड गणेशपेठ नागपूर यांच्या प्रोजेक्टमधील पहिल्या माळयावरील दुकान क्रं.1,चे विक्रीपोटी अग्रीम रक्कम रुपये 11,00,000/- स्वीकारल्याचे मान्य केले आहे. वि.प.पूढे नमुद करतात की, सदर प्रस्तावीत योजनेचा नकाशा अधिकृत कार्यालयाकडुन मंजूर न झाल्याबाबात तक्रारदाराला मा‍हीती होती. तरीसुध्‍दा तक्रारदाराने वि.प.चे सदर योजनेत पैसे गुतंविले. तक्रारदाराने वि.प.चे संचालकाकडे रक्कम परत मागण्‍याकरिता गेले असता वि.प. ने तक्रारदाराला वारंवार रक्कम परत घेऊन जाण्‍यास कळविले होते, परंतु तक्रारदार जमा रक्कमेवर व्याजाची मागणी करीत होते त्यामूळे उभयपक्षात समझोता होऊ शकला नाही. आज‍ही वि.प.तक्रारदारास त्याची जमा रक्कम रुपये 11,00,000/- परत करण्‍यास तयार असल्यामूळे तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी मागणी केली आहे.    
  5.  तक्रारदाराची तक्रार व दाखल दस्तऐवज तसेच विरुध्‍द पक्षाचे लेखी उत्तर व कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता खालील मुद्दे उपस्थीत होतात.

 मुद्दे                                               उत्तरे

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय?             होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्राराचे सेवेत त्रुटी केली आहे काय ?        होय
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराचे प्रती अनुचित
  4. व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे काय ?                            होय
  1. आदेश?                                                           अंतीम आदेशाप्रमाणे

का र  मि मां सा

  1. तक्रारदाराने नागपूर सुधार प्रन्यास महानगरपालीकेच्या हद्दीत येत असलेल्या वि.प.च्या प्रस्तावित राय टावर,प्रोजेक्ट साईट, नागपूर येथे राय उद्योग लि.बिल्डस अॅन्ड डेव्हलपर्स,नागपूर यांच्या प्रोजेक्टमधील पहिल्या माळयावरील दुकान क्रं.1, एकुण किंमत रुपये 45,00,000/- पैकी रक्कम रुपये 11,00,000/- वि.प.कडे अग्रीम राशी देऊन खरेदीचा सौदा दिनांक 12.2.2019 रोजी पक्का केला. या दुकानाचे एकुण क्षेत्रफळ एकुण 19.16 चौ.मि. (207.07 चौ.फुट. )असे आहे. सदरचे दुकान हे “ राय टावर फुल्ली शॉपिंग कॉम्प्लेक्स ” या पुस्तीकेत नमुद आहे. परंतु तक्रारदाराने वि.प.बाबत चौकशी केली असता ही मिळकत राय उदयोग लि.च्या मालकीची नसून सदरच्या जागेवर कोणताही बिल्डींग प्लॅन मंजूर नसल्याचे कळले. तसेच हि योजना स्थावर संपदा प्राधिकरण येथे नोंदणीकृत नाही व सदरच्या दुकानाचा विक्रीचा करारनामा किंवा विक्रीपत्र नोंदणी होऊ शकत नाही असे कळले. अशाप्रकारे वि.प ने तक्रारदारासोबत अनुचित व्यापार पध्‍दतीचा अवलंब केल्याचे दिसून येते. त्यामूळे तक्रारदाराने दिनांक 15.6.2019 रोजी राय उद्योग लि.च्या कार्यालयात जाऊन प्रस्तावीत दुकान क्रं.1, पहिला मजल्याचा सौदा रद्द करुन रुपये 11,00,000/- परत मिळण्‍याची मागणी केली. परंतु त्यास वि.प.ने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामूळे तक्रारदाराने दिनांक 29.9.2020 रोजी रजिस्टर्ड पोस्टाने वि.प.ला नोटीस पाठविली. नोटीस प्राप्त होऊनसुध्‍दा वि.प. ने त्यास उत्तर दिले नाही यावरुन वि.प.ने तक्रारदाराचे प्रती सेवेत त्रुटी दिल्याचे स्पष्‍ट होते. तक्रारदाराने उपरोक्त राय उद्योग लि.बिल्डस अॅन्ड डेव्हलपर्स, यांच्या प्रोजेक्टमधील पहिल्या माळयावरील दुकान क्रं.1,चे विक्रीपोटी अग्रीम राशी रुपये 11,00,000/- वि.प.ला मिळाल्याबाबत उभयपक्षात याबाबत कोणताही वाद नाही.   तक्रारदाराने वि.प.कडे रक्कम परत मागण्‍याकरिता गेले असता तक्रारदार जमा रक्कमेवर व्याजाची मागणी करीत होते त्यामूळे उभयपक्षात समझोता होऊ शकला नाही. आज‍ही वि.प.तक्रारदारास त्याची जमा रक्कम रुपये 11,00,000/- परत करण्‍यास तयार आहे. वि.प.क्रं.1 व 2 यांनी तकारदाराला पहिल्या मजल्यावरील दुकान विकण्‍याचा करार दिनांक 12.02.2019 रोजी केला होता. तक्रारदाराने वि.प.चे जाहिरातीबाबत कागदपत्रे, पैसे भरल्याबाबतच्या पावत्या, प्रस्तावीत नकाशाचा प्रत, वकीलाची नोटीस इत्यादी नि.क्रं.2 वर दाखल केलेली आहे. परंतु वि.प.ने त्याची दखल सुध्‍दा घेतली नाही. वि.प.ने तक्रारदारास त्याचे आरक्षीत दुकान शासनातर्फे नकाश मंजूर करुन त्या दुकानाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करण्‍यात असमर्थ राहिले यावरुन वि.प.ने तक्रारदाराचे सेवेत त्रुटी केल्याचे दिसुन येते. तसेच वि.प.ने तक्रारदारास रक्कम परत करण्‍याचे आश्‍वासन देऊनही वि.प.ने  तक्रारदाराकडुन स्वीकारलेली रक्कम परत केली नाही. ही वि.प.ची ही कृती तक्रारदाराचे प्रती अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे सिध्‍द होते. सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

अंतीम आदेश

  1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. वि.प.क्रं.1 व 2 यांना आदेशीत येते की, त्यांनी तक्रारदाराला राय टावर,प्रोजेक्ट साईट भारत टॉकीज कामठी रोड, कस्तुरचंद पार्क जवळील, नागपूर या योजनेतील पहिल्या माळयावरील दुकान क्रं.1 चे विक्रीपोटी स्वीकारलेली रक्कम रुपये 11,00,000/-, द.सा.द.शे.12 टक्के व्याजदराने दिनांक 15.06.2019 पासून  रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगीपोवतो मिळुन येणारी रक्कम परत करावी.  
  3.  वि.प.1 व 2 ने तक्रारदारास झालेल्या मानसिक,शारिरिक व आर्थिक नुकसानापोटी रुपये 50,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये0 20,000/- तकारदारास द्यावे.
  4. सदर आदेशाचे पालन वि.प.ने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
  5. उभयपक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारीची ब व क प्रत तक्रारकर्त्यास परत करण्‍यात यावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.