Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/15/255

Shri Arun Mangluji Patle & Other - Complainant(s)

Versus

Rahi Housing Builders & Developers Through Partner Shri Dilip Raut - Opp.Party(s)

Smt S K Paunikar

18 Jan 2016

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. CC/15/255
 
1. Shri Arun Mangluji Patle & Other
R/O Navin Ramdaspeth Old Kachipura Near Mandir Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Shri Prabhakar Natthuji Paraskar
Occ: Service R/O 18 Rajabaksha Medical Chouk Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Rahi Housing Builders & Developers Through Partner Shri Dilip Raut
Regd Office Bhable Sabhagruh Mahajanwadi Tah. Hingna
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Shekhar P.Muley PRESIDENT
 HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 HON'BLE MRS. Manisha Yashwant Yeotikar MEMBER
 
For the Complainant:Smt S K Paunikar , Advocate
For the Opp. Party:
ORDER

      ( आदेश पारित व्दारा -श्री नितीन घरडेमा.सदस्य )

    - आदेश -

(पारित दिनांक18 जानेवारी 16)

 

  1. तक्रारकर्त्याने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 खाली दाखल केली  असुन तक्रारीचे स्वरुप असे आहे की, तक्रारकर्त्यानी स्वतःचे मालकीचे घर बांधण्‍याकरिता त्याचा संबंध विरुध्‍द पक्ष यांचेशी झाला. विरुध्‍द पक्ष हे भुखंड खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे असल्याने त्यांची राही हाऊसिंग बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स खाजगी संस्था आहे व श्री दिलीप राऊत या संस्‍थेचे प्रोप्रायटर असल्याने त्यांनी मौजा वानाडोंगरी तह हिंगणा जि. नागपूर येथे त्यांच ले-आऊट टाकलेले होते त्यातील भुखंड कं.46 49 50 व 51 असे खसरा क्रं. 136 येथील एकुण क्षेत्रफळ 3000 चौ फुट घेण्‍याचा करारनामा तक्रारकर्ते व विरुध्‍द पक्ष यांचेत 14/1/2004 रोजी बयाणपत्रान्वये करण्‍यात आला तक्रारकर्त्यानी त्याचदिवशी रुपये 30,000/- विरुध्‍द पक्ष संस्‍थेत जमा केले व राहिलेली उर्वरित रक्कम रुपये 90,000/- प्रतिमाह 7,500/- प्रमाणे 12 महिन्याचे हप्ते पाडण्‍यात आले. करारनाम्याप्रमाणे विक्रीपत्र करुन देण्‍याची मुदत दि.13/12/2004 पर्यत राहिल असे नमुद केले. तक्रारकर्ते पुढे असे नमुद करतात की दि 16/2/2005 पर्यत एकुण 70,000/- विरुध्‍द पक्ष संस्थेला दिले व उर्वरित रक्कम 50,000/- विरुध्‍द पक्षाला देण्‍याची तक्रारकर्त्याची तयारी आहे. परंतु विरुध्‍द पक्षाने सदरचे भुखंडाचे विक्रीपत्र करण्‍याकरिता जमिन अकृषक झाल्याबाबतचे नगर रचना विभाचे प्रमाणपत्र आजतागायत प्राप्त न केल्यामुळे सदर भुखंडाचे विक्रीपत्र होऊ शकत नाही असे कळले. परंतु विरुध्‍द पक्ष संस्‍थेने विक्रीपत्राकरिता तक्रारकर्त्यांना कधीच बोलविले नाही व उर्वरित रक्कमेची मागणी देखिल केली नाही.
  2. तक्रारकर्ते उर्वरित रक्कम देऊन विक्रीपत्र करुन घेण्‍याकरिता विरुध्‍द पक्षाकडे तगादा लावला परंतु विरुध्‍द पक्ष विक्रीपत्र करुन देण्‍यास इच्छुक व उत्सुक नाही असे तक्रारकर्त्यानां वाटले त्यामुळे तक्रारकर्त्यानी  दिनांक 1/9/2015 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविला तो  विरुध्‍द पक्षाला दि. 3/9/2015 रोजी प्राप्त झाला परंतु विरुध्‍द पक्षाने त्यास आजतागायत उत्तर दिलेले नाही. म्‍हणुन तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन पुढील मागण्‍या केल्या आहेत.
  3. विरुध्‍द पक्ष भुखंड  क्रं.46,49,50 व 51 असे खसरा क्रं. 136 येथील एकुण क्षेत्रफळ 3000 चौ.फुटचे नोंदणीकृत खरेदीखत करुन द्यावे व भुखंडाची मोजणी करुन भुखंडाचा ताबा द्यावा. त्याचबरोबर कुठल्याही तांत्रिक अडचणीमुळे भुखंडाचे खरेदीखत करुन देणे शक्य नसल्यास आजचे सरकारी बाजार भावाप्रमाणे येणारी रक्कम तक्रारकर्त्यास अदा करावी. तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 1,000,000/-मिळावे अशी मागणी

केली.  

  1. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत एकुण 4 दस्‍तऐवज दाखल केले असुन त्यात बयाणापत्र, पावत्या, नोटीसची प्रत व पोचपावती इ.दस्‍तऐवज दाखल केले आहे.
  2. यात विरुध्‍द पक्षाला मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली असता   नोटीस विरुध्‍द पक्षाला झाली परंतु विरुध्‍द पक्ष मंचात उपस्थित झाले नाही व आपले लेखी उत्तर सादर केले नाही म्‍हणुन मंचाने दि. 11/12/2015 रोजी तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.

 

                    -//- निष्‍कर्ष -//-

  1. तक्रारकर्त्यांनी सदरची तक्रार ही विरुध्‍द पक्ष राही हाऊसिंग बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स यांनी पाडलेल्या भुखंड कं.46 49 50 व 51 असे खसरा क्रं. 136 येथील एकुण क्षेत्रफळ 3000 चौ फुट याचे खरेदीखत नोंदणीकृत करुन दिले नाही म्हणुन दाखल केली आहे. तक्रारकर्त्याच्या दाखल दस्‍तएवेजातील बयाणापत्र व पावत्यांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की,तक्रारकर्त्याने पावती क्रं.103 दि 11/2/2004 रोजी श्री अरुण मंगलालजी पटले यांचे नावे विरुध्‍द पक्षाने स्विकारले व पावती क्रं.032 दि 16/2/2005 रोजी श्री अरुन मंगलालाजी पटले व प्रभाकर नथ्‍थ्‍ुलालीजी विरुध्‍द पक्षाने स्विकारलेले दिसून येते व बयाणापत्राचे अवलोकन केले असता दिनांक 14/01/2014 रोजी नगदी रुपये 30,000/- विरुध्‍द पक्षाला दिल्याचे दिसते. भुखंड कं.46 49 50 व 51 श्री मंगुजी पटेल व श्री प्रभाकर पारसकर यांचे नावाचे दिसून येते. परंतु दाखल पावत्यांचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्यांनी केवळ रुपये 10,000 व 30,000/- व बयाणा रक्कम रुपये 30,000/- असे एकुण रुपये 70,000/- विरुध्‍द पक्षाकडे भरल्याचे स्पष्‍ट होते. त्यामुळे तक्रारकर्ते हे प्रत्येकी जमा केलेली रक्कम परत मिळण्यास पात्र आहे.

 

          अं ती म  आ दे श  -

 

  1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्षाला आदेशीत करण्‍यात येते की, करारनाम्याप्रमाणे उर्वरित रक्कम घेऊन तक्रारकर्त्याला संबंधीत भुखंडाचे सर्व कागदपत्रांसह तक्रारकर्त्याच्या भुखंडाचे विक्रीपत्र करुन दयावे. 
  3. विक्रीपत्र करुन देण्‍यास असमर्थ असल्यास तक्रारकर्त्याची विरुध्‍द पक्षाकडे जमा रक्कम दिनांक 16/2/2005 पासुन जमा रु.70,000/- तक्रारकर्त्याना प्रत्येकी रुपये 35,000/- प्रमाणे अदा करावे व त्यावर द.सा.द.शे.12 टक्के दराने येणारी रक्कम तक्रारकर्त्यांना आदेश प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत परत करावी.
  4. तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासापोटी प्रत्येकी रुपये 3,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये प्रत्येकी 2000/- अदा करावे.
  5. वरील आदेशाचे पालन विरुध्‍द पक्षाने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे.
  6. आदेशाच्‍या प्रती उभयपक्षकरांना नि:शुल्क पाठविण्‍यात याव्या.
 
 
[HON'BLE MR. Shekhar P.Muley]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Manisha Yashwant Yeotikar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.