Maharashtra

Nagpur

CC/682/2019

KU. AARYA GAJANANRAO KADU, THROUGH SHRI. GAJAJNANRAO MADHAV KADU - Complainant(s)

Versus

RAHATE I.I.T. & MECHANICAL HOME, THROUGH DIRECTOR- KRANTI RAHATE - Opp.Party(s)

ADV. A.T. SAWAL

06 Sep 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/682/2019
( Date of Filing : 28 Nov 2019 )
 
1. KU. AARYA GAJANANRAO KADU, THROUGH SHRI. GAJAJNANRAO MADHAV KADU
R/O. H.NO. 315-C, GANESHPETH ROAD, BEHIND GANESHPETH POLICE STATION, NAGPUR-440018
NAGPUR
MAHARASHTRA
2. SHRI. GAJANANRAO MADHAV KADU
R/O. H.NO. 315-C, GANESHPETH ROAD, BEHIND GANESHPETH POLICE STATION, NAGPUR-440018
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. RAHATE I.I.T. & MECHANICAL HOME, THROUGH DIRECTOR- KRANTI RAHATE
39, JUNA SUBHEDAR LAYOUT, JUNA CRICKET CLUB GROUND, SHARDA CHOWK, AYODYA NAGAR, NAGPUR-440024
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. A.T. SAWAL, Advocate for the Complainant 1
 ADV. MANOJ S. MENDULKAR, Advocate for the Opp. Party 1
Dated : 06 Sep 2021
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये -

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, तक्रारकर्ती क्रं. 1 ही अज्ञान असून तक्रारकर्ता क्रं. 2 हे तक्रारकर्ती क्रं. 1 चे वडील आहेत.  विरुध्‍द पक्षाचा आय.आय.टी. अॅन्‍ड मेडिकल होम या नावाने व्‍यवसाय असून तक्रारकर्ता क्रं. 2 ला प्राप्‍त झालेल्‍या पॉम्‍प्‍लेटवरील माहितीनुसार त्‍याने तक्रारकर्ती क्रं. 1 ची शिकवणी वर्ग लावण्‍याकरिता विरुध्‍द पक्षाकडे गेला असता विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्ता क्रं. 2 ला अगोदर रुपये 50,000/- जमा करण्‍यास सांगितले व नंतरची फी नियम आणि शर्तीप्रमाणे निश्चित करु असे सांगितले. त्‍यानुसार तक्रारकर्ता क्रं. 2 ने विरुध्‍द पक्षाच्‍या बोलण्‍यावर विश्‍वास ठेवून दि. 14.06.2019 रोजी पावती क्रं. 742  प्रमाणे रुपये 50,000/- विरुध्‍द पक्षाकडे तक्रारकर्ती क्रं. 1 च्‍या नांवाने नावांने जमा केले व त्‍यानंतर असे सांगितले की, 7 दिवसाने तुमचा फॉर्म भरुन टाकू.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, तो व त्‍याची मुलगी 7 दिवसानंतर विरुध्‍द पक्षाकडे गेले असता विरुध्‍द पक्षाने रुपये 2,50,000/- एवढी एक वर्षाची फी भरावी लागेल असे सांगितले, परंतु तक्रारकर्त्‍याला 2 मुली असून तो गरीब असल्‍यामुळे शिक्षणाकरिता एवढी फी भरणे शक्‍य नसल्‍यामुळे त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे दि.14.06.2019 रोजी जमा केलेली फी ची परत करण्‍याची विनंती केली असता विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला एक महिन्‍याच्‍या आंत फी ची रक्‍कम परत करण्‍याचे आश्‍वासन दिले होते. तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या मुलीची दुस-या कॉलेज मध्‍ये दाखल करावयाचा असल्‍याने  त्‍याने एक महिन्‍यानंतर पुन्‍हा विरुध्‍द पक्षाकडे फी ची रक्‍कम परत करण्‍याची विनंती केली असता विरुध्‍द पक्षाने फी ची रक्‍कम  देण्‍यास टाळाटाळ केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दि. 16.09.2019 ला कायदेशीर नोटीस पाठविली. विरुध्‍द पक्षाला सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही त्‍याने तक्रारकर्त्‍याच्‍या नोटीसची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून फी स्‍वरुपात स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 50,000/-, दि. 14.06.2019 पासून द.सा.द.शे. 24 टक्‍के दराने व्‍याजासह परत करण्‍याचा आदेश द्यावा.  तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्षाला मंचामार्फत पाठविण्‍यात आलेली नोटीस प्राप्‍त झाल्‍यावर वि.प. दि. 27.02.2020 ला मंचासमक्ष हजर झाले. परंतु विरुध्‍द पक्षाने विहित मुदतीत लेखी उत्‍तर दाखल न केल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द विना लेखी जबाब प्रकरण पुढे चालविण्‍याचा आदेश दि. 17.03.2020 रोजी पारित करण्‍यात आला.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले दस्‍तावेजाचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता  व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर आयोगाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

   मुद्दे                                              उत्‍तर

  1. तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे काय ?            होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली काय?      होय
  3. काय आदेश?                                 अंतिम आदेशानुसार

 

निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -  तक्रारकर्ता क्रं. 1 अज्ञान असून ती  तक्रारकर्ता क्रं. 2 ची मुलगी आहे. तक्रारकर्त्‍याने आपल्‍या मुलीच्‍या शिकवणीकरिता विरुध्‍द पक्षाच्‍या इन्स्टिटयूटमध्‍ये दि. 14.06.2019 ला पावती क्रं. 742 अन्‍वये रुपये 50,000/- जमा केल्‍याचे नि.क्रं. 2(4) वरील दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ते हे विरुध्‍द पक्षाचे ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दि. 14.06.2019 ला संपूर्ण शिकवणी वर्गाच्‍या फी ची कल्‍पना दिली नव्‍हती व 7 दिवसानंतर फॉर्म भरुन नंतरची फी निश्चित करण्‍यात येईल असे सांगितले होते. त्‍यानंतर तक्रारकर्ता 1 व 2 हे विरुध्‍द पक्षाकडे सात दिवसाने गेले,  त्‍यावेळी विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला एक वर्षाकरिता रुपये 2,50,000/- भरण्‍यास सांगितले. परंतु तक्रारकर्त्‍याला एवढी मोठी फी ची रक्‍कम भरणे शक्‍य नसल्‍यामुळे त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे दि. 14.06.2019 रोजी भरलेली फी ची रक्‍कम परत करण्‍याची विनंती केली. परंतु विरुध्‍द पक्षाने एक महिन्‍याच्‍या आंत फी परत करण्‍याचे आश्‍वासन देऊन ही फी स्‍वरुपात स्‍वीकारलेली रक्‍कम परत केली नाही. त्‍याचप्रमाणे विरुध्‍द पक्षाला मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त झालेली असतांना ही विरुध्‍द पक्षाने विहित मुदतीत लेखी उत्‍तर दाखल केले नाही अथवा आपल्‍या बचावाच्‍या समर्थनार्थ कुठलेही दस्‍तावेज दाखल केलेले नाही. तसेच तक्रारकर्त्‍याकडून फी स्‍वरुपात स्‍वीकारलेली रक्‍कम ही परत केली नाही ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी असल्‍याचे दिसून येते.

 

      सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून दि. 14.06.2019 रोजी फी पोटी स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 50,000/- व त्‍यावर दि. 14.06.2019 पासून तर प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला परत करावी.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यांना झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 30,000/-  व  तक्रारीचा खर्च म्‍हणून  रुपये 10,000/- द्यावा.

 

  1. विरुध्‍द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.