Maharashtra

Nagpur

CC/716/2019

SMT. NAZIMA SHEIKH SALEEM - Complainant(s)

Versus

RAG INNOVATIONS, MANUFACTURING PLANT - Opp.Party(s)

ADV. VRUSHALI PRADHAN

22 Jan 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/716/2019
( Date of Filing : 21 Dec 2019 )
 
1. SMT. NAZIMA SHEIKH SALEEM
R/O. NEAR MASJID, PLOT NO.27/28 BAJPEI NAGAR, KALAMANA UPPLWADI, NAGPUR-440026
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. RAG INNOVATIONS, MANUFACTURING PLANT
B-NEST INCUBATION CENTER, CABIN NO. 09, NR. NATRAJ PETROL PUMP, SECTOR A, BERKHEDA, BHOPAL-462023
BHOPAL
MADHYAPRADESH
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. VRUSHALI PRADHAN, Advocate for the Complainant 1
 
Dated : 22 Jan 2021
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अंतर्गत प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात नमूद केले आहे की, तिने विरुध्‍द पक्षाकडून पंतप्रधान रोजगार योजने अंतर्गत सॅनिटरी पॅड बनविण्‍याची मशीन विकत घेतली व त्‍याकरिता बॅंक ऑफ इंडिया या बॅंकेकडून पंतप्रधान योजने अंतर्गत लघु उद्योगाकरिता दि. 18.04.2019 रोजी रुपये 3,64,620/- चे कर्ज घेतले. सदरची मशीन 3 DIE ची असून या मशिनद्वारे प्रत्‍येक दिवशी 2000 सॅनिटरी पॅड बनविण्‍यात येणार होते. त्‍याकरिता तक्रारकर्तीने एका महिन्‍याचे प्रशिक्षण सुध्‍दा घेतलेले होते.  तक्रारकर्तीने एका दिवसात 2000 सॅनिटरी पॅड बनविण्‍याचा प्रयत्‍न केला, परंतु मशीनचे तापमान कमी/जास्‍त होत असल्‍यामुळे तक्रारकर्ती एका दिवसात केवळ 400 ते 500 सॅनिटरी पॅड बनवू शकली. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडून विकत घेतलेल्‍या मशिनच्‍या तापमानात अचानकपणे चढ-उतार होत असते, त्‍यामुळे सदरच्‍या मशिनद्वारे सॅनिटरी नॅपकिन योग्‍य दर्जाचे बनत नसल्‍यामुळे सदरची मशिन दुरुस्‍त करुन देण्‍याची विनंती केली होती व त्‍याकरिता तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाला रुपये 24,402/- L.D. Bags and Block Charges करिता अतिरिक्‍त रक्‍कम अदा केली होती, परंतु तक्रारकर्तीला त्‍याचा कुठलाही उपयोग झालेला नाही  व आजतागायत सदरचे सॅनिटरी पॅड निकृष्‍ट दर्जाचे बनत असून ते वापरण्‍या योग्‍य नाही. या संदर्भात विरुध्‍द पक्षाकडे अनेक वेळा तक्रार केली. तसेच विरुध्‍द पक्षाने दिलेल्‍या जाहिरातीप्रमाणे दर दिवशी 2000 सॅनिटरी नॅपकिन बनत नसल्‍याने तक्रारकर्तीने सदरच्‍या मशिनच्‍या बदल्‍यात तिने विरुध्‍द पक्षाला दिलेली रक्‍कम परत करण्‍याची विनंती केली. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीच्‍या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्‍यामुळे तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाला वकिलामार्फत दि. 18.09.2019 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. त्‍यावर ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीच्‍या तक्रारीची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन  मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीकडून सदरच्‍या मशिनकरिता बॅंके तर्फे कर्ज काढून दिलेली रक्‍कम रुपये 3,64,620/- व त्‍यावर  दिनांक 14.05.2019 पासून द.सा.द.शे. 18 टक्‍के दराने व्‍याजसह रक्‍कम परत करण्‍याचा आदेश द्यावा. तसेच तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडे रुपये 24,402/- अतिरिक्‍त भरलेली रक्‍कम परत करण्‍याचा व शारीरिक, मानसिक त्रासाकरिता व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्षाला आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्ष आयोगासमक्ष हजर झाले नाही अथवा त्‍यांनी आपला लेखी जबाब दाखल न केल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 18.01.2021 रोजी पारित करण्‍यात आला.

 

  1.      तक्रारकर्तीने तक्रारी सोबत जोडलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले व तिने केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

अ.क्रं.             मुद्दे                                                    उत्‍तर

 

  1. तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे काय?         होय

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली काय?  होय

 

  1.  काय आदेश?                             अंतिम आदेशाप्रमाणे

निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक  1 व 2 बाबत  ः-  तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडून दि. 14.05.2019 रोजी राग इनोव्‍हेशन नावाची सॅनिटरची नॅपकिन बनविण्‍याची मशिन विकत घेतली होती हे दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  तक्रारकर्तीने पंतप्रधान रोजगार योजने लघु उद्योगाकरिता बॅंक ऑफ इंडिया मार्फत रुपये 3,64,620/- चे कर्ज घेतले होते हे दस्‍तावेज क्रं. 5 वर स्‍पष्‍ट होते. सदरच्‍या मशिनद्वारे सॅनिटरी नॅपकिन योग्‍य दर्जाचे बनत नसल्‍यामुळे सदरची मशिन दुरुस्‍त करुन देण्‍याची विनंती केली होती व त्‍याकरिता तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडे रुपये 24,402/- L.D. Bags and Block Charges करिता अतिरिक्‍त रक्‍कम अदा केली होती. त्‍यानंतर ही सदर मशीन द्वारे सॅनिटरी नॅपकिन योग्‍य दर्ज्‍याचे बनत नसल्‍यामुळे तिने अनेक वेळा विरुध्‍द पक्षाकडे तक्रार करुन ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीची मशीन दुरुस्‍त करुन दिली नाही अथवा मशीन पोटी घेतलेली रक्‍कम ही परत केली नाही ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते. सबब वर्तमान तक्रार अंशतः मंजूर करणे आवश्‍यक आहे. तसेच विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीला दिलेली दोषपूर्ण मशिनरी ही विरुध्‍द पक्षाला परत करणे आवश्‍यक आहे.

                                         सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

              1.         तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीकडून घेतलेली मशिनची किंमत रक्‍कम रुपये 3,64,620/- परत करावी व त्‍यावर दि. 14.05.2019 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 10 टक्‍के दराने व्‍याजासह परत करावे.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च महणून रुपये 5,000/- द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दिलेली मशिनरी (तांत्रिक सामग्री) म्‍हणजे 1. Triple Die Pneumatic Sealing & Impression Machine with wings. 2. Air Compressor. 3. UV Sterilizer. 4. Training Kit. त्‍वरित स्‍वखर्चाने परत न्‍यावे आणि तक्रारकर्तीने वर्तमान तक्रारीतील अंतिम आदेशाच्‍या दिनांकापासून 15 दिवसांच्‍या आंत विरुध्‍द पक्षाला मशिनरी घेऊन जाण्‍यासाठी रजिस्‍टर्ड पोस्‍टाने, ई-मेल द्वारा आणि एस.एम.एस. द्वारा नोटीस पाठवून कळवावे.

 

  1. विरुध्‍द पक्षाने उपरोक्‍त आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक महिन्‍याच्‍या आत करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्तीला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.  

 

                              

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.