जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 279/2008. प्रकरण दाखल तारीख - 12/08/2008 प्रकरण निकाल तारीख - /11/2008 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य शैलेश विश्वनाथराव पाटनूरकर अर्जदार. रा. वय, 37 वर्षे, धंदा, व्यापार रा. गोकूळनगर, नांदेड. विरुध्द. आर.टी.ओ. अधिकारी. एम.आय.डी.सी. नांदेड, गैरअर्जदार ता. व जि. नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड. व्ही.डी. पाटनूरकर गैरअर्जदार तर्फे वकील - स्वतः. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार आर.टी.ओ. नांदेड यांनी रु.3150/- करापोटी जास्त घेतले ते परत मिळावे म्हणून अर्जदाराने तक्रार दाखल केली आहे. अर्जदार यांनी दि.23.5.2008 रोजी शेव्हरलेट कंपनीचे AVEO-LIVA हे वाहन रु.3,55,000/- ला खरेदी केले आहे व त्यावर 12.5 % वॅट म्हणजे रु.44,440/- सह एकूण किंमत रु.3,99,999/- ला कार खरेदी केलेली आहे. दि.29.5.2008 रोजी पासींग करताना आर.टी. ओ. यांनी वन टाईम टॅक्स हा रु.3,99,999/- वर लावलेला आहे. जो की चूक आहे. वॅटची रक्कम सोडून रु.3,55,000/- वर हा टॅक्स लावायला पाहिजे. हा टॅक्स वर टॅक्स होईल. मूळ किंमतीवर टॅक्स लावल्यास तो रु.24,850/- होईल म्हणजे रु.3150/- एवढी रक्कम जास्त घेतली आहे. तेवढी रक्कम व मानसिक ञासापोटी रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.1,000/- वापस मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार यांनी आपले म्हणणे दाखल केले आहे. त्यांनी मोटार वाहन कर कायदा,1958 नियम संदर्भासाठी दिला आहे. यानुसार कर वसूल केलेला आहे. अर्जदाराचे म्हणणे की. खरेदी किंमतीवर व वॅटवर सूध्दा कर वसूल करण्यात आला व वसूल केलेला कर योग्य आहे. वाहनाची किंमत कशी धरावी यावीषयीची व्याख्या हे (I-A) Cost opf vehicle, in relation to. (a) a vehicle manufactured in India meanscost as per the purchase invoice of the vehicle issued either by the manufacturer or the dealer of the vehicle and shall include the basic manufacturing cost, excise duty and the sales tax payable in the State of Maharashtra; एकुण कर रु.28,000/- इतका होतो व तो कर वसूल केला आहे व तो योग्य आहे. त्यामूळे त्यांनी कोणतीही सेवेत ञूटी केलेली नाही. हे जर मान्य नसेल तर अर्जदाराने अपील मा. परिवहन आयूक्त यांच्याकडे करावे. संबंधीत मंच यांनी अपील नंबर 537/1999 मध्ये दिलेल्या न्यायालयीन आदेशान्वये प्रादेशीक परीवहन यांना ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे कार्य करते व या तरतूदीनुसार होणारे काम हे ग्राहक संरक्षण कायदा,1986 नुसार सेवा या तत्वात बसत नाही असे आदेश दिले आहेत. त्यामूळे अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात यावी. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केले आहे व दोन्ही पक्षानी दाखल केलेला दस्ताऐवज बारकाईने तपासल्यास असे दिसून येते की, तक्रारदार यांनी उपस्थित केलेला वाद हा ग्राहक वाद होत नाही. कारण आर.टी. ओ. यांनी जो कर घेतलेला आहे तो वन टाईम रोड टॅक्स म्हणून घेतलेला आहे. कराचा भरणा हा मोबदला या स्वरुपात मोडत नाही म्हणून ग्राहक संरक्षण कायदा,1986 प्रमाणे कलम 2 (ड) (1) यानुसार अर्जदार हे ग्राहक या संज्ञेत मोडत नाहीत व या करावीषयी अर्जदार यांची तक्रार असेल तर त्यासाठी त्यांनी परिवहन आयूक्त यांच्याकडे अपील दाखल करावयास पाहिजे.वाहनाची किंमत काय असावी यावीषयी THE BOMBAY MOTOR VEHICLES TAX ACT, 1958 A Cost of vehicle या संज्ञेखालील पोट कलम (अ) प्रमाणे (a) a vehicle manufactured in India meanscost as per the purchase invoice of the vehicle issued either by the manufacturer or the dealer of the vehicle and shall include the basic manufacturing cost, excise duty and the sales tax payable in the State of Maharashtra; ही वाहनाच्या किंमतीची व्याख्या धरल्यास यामध्ये डयूटी, सेल्स, टॅक्स इत्यादी कर समाविष्ट करुन एकूण येणारी किंमत ही त्या वाहनाची कॉस्ट असेल असे म्हटले आहे. मा. राज्य आयोगांनी The Service rendered by the R.T.O. can not be sent when the commercial nature. असे म्हटले आहे. अर्जदारांनी टॅक्स इनव्हाईस दाखल केलेले आहे यात एकूण किंमत रु.3,99,999/- वर 7 टक्के प्रमाणे वन टाईम टॅक्स रु.28,000/- घेतल्या बाबतची पावती दाखल केली आहे व ती योग्य आहे असे दिसून येते. यात अर्जदार हे ग्राहक या संज्ञेत बसत नसल्याकारणाने व गैरअर्जदार यांची कृती ही योग्य आहे असे दिसते. प्रस्तूतचा तक्रार अर्ज नामंजूर करण्याचे आदेश होतात. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो. 2. दावा खर्च आपआपला सोसावा. 3. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक. |