जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 316/2008. प्रकरण दाखल तारीख - 25/09/2008 प्रकरण निकाल तारीख - 20/01/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. सौ.शालीनी भ्र. बळंवतराव जोशी वय, 52 वर्षे, धंदा, - घरकाम रा. स्वामी विंवेकानंद नगर, तरोडा (खु) नांदेड. अर्जदार विरुध्द. 1. व्यवस्थापक, आर.के.मोटार्स, 213, लिंक वे इस्टेट, लिंकीग रोड, मालाड, पश्चिम मुंबई-400 064 गैरअर्जदार 2. श्री. बालाजी सेल्स, द्वारा, श्री. मुद्रणालय, मेन रोड, शिवाजी नगर, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड. एच.जी.पांचाळ गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील - अड.डि.आर.सावंत गैरअर्जदार क्र.2 तर्फे वकील - अड.व्ही.एस.गोळेगांवकर निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे, पाटील, अध्यक्ष ) गैरअर्जदार यांच्या सेवेच्या ञूटी बद्यल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदार आपल्या तक्रारीत म्हणतात की, अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून इलेक्ट्रानिक्स मॅट्रीक्सचे दूचाकी वाहन जे की आधूनिक तंञज्ञान व प्रदूषण मूक्त आहे ते दि.15.09.2007 रोजी रु.28,500/- देऊन विकत घेतले. सूरुवातीपासूनच दोष आढळून येऊ लागला. गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे वाहन दाखविले असता त्यांनी मॅकेनिक पाठवून दोष दूर केला. यानंतर परत दि.03.04.2008 रोजी वाहनात दोष निर्माण होऊन ते बंद पडले. तेव्हापासून ते वाहन बंदच आहे. गैरअर्जदार क्र.2 यांचे मॅकेनिकने वाहनाची तपासणी केली व गाडीचे कन्र्व्हर्टर कंट्रोलर काढून नेले व बाकी काही पार्टस नागपूरहून मागवावे लागतील असे सांगितले. अद्यापही ते पार्टस मागविले नाहीत किंवा गाडीची दूरुस्ती देखील केली नाही म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, अर्जदाराचे वाहन दूरुस्त करुन दयावे किंवा रु.28,500/- 12 टक्के व्याजाने परत करावेत. तसेच मानसिक ञासाबददल रु.10,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 हे उत्पादक कंपनीचे मूख्य वितरक आहेत. त्यांनी आपले म्हणणे पोस्टाद्वारे दाखल केले आहे. त्यात त्यांनी प्राथमिक मूददा उपस्थित केला आहे. मॅट्रीक्स बाईक्स या उत्पादक कंपनीचे गैरअर्जदार हे मूख्य वितरक आहेत व त्यांचा सरळ अर्जदार यांचेशी काहीही संबंध नाही व त्यांचेत करारनामा देखील अस्तित्वात नाही त्यामूळे त्यांचा काहीही संबंध नाही व त्यांना या प्रकरणातून वगळण्यात यावे असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र. 2 हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले म्हणणे दाखल केले आहे. अर्जदाराचा तक्रार अर्जातील परिच्छेद क्रंमाक 1 हे त्यांना मान्य आहे. अर्जदारांने संपूर्ण विचार करुनच त्यांचेकडून वाहन खरेदी केलेले आहे. गैरअर्जदाराने वाहना बददल कोणतेही आश्वासन दिलेले नाही. तक्रारीतील परिच्छेद क्रंमाक 3,4,व 5 यातील अर्जदारांचे म्हणणे त्यांना अमान्य आहे. अर्जदाराच्या वाहनामधील किरकोळ तक्रार वेळोवेळी गैरअर्जदारांनी दूरुस्त करुन दिलेल्या आहेत. त्यांमूळे सेवा देण्याच्या बाबतीत त्यांनी कमतरता केलेली नाही. दि.03.04.2008 रोजी नंतर त्यांचे मॅट्रीक्स वाहन बंद पडलेले आहे हे म्हणणे खोटे आहे. अर्जदार त्या वाहनाचा उपभोग घेत आहेत. दि.20.09.2008 रोजी देखील वाहन चांगल्या स्थितीत व चालू होते. त्यांनी मॅकेनिक पाठवून कंट्रोलर काढून नेले व पार्टस नागपूरहून मागवावे लागतील असे म्हटले आहे. वाहना संबंधी दिलेल्या वॉरंटी पर्यतच वॉरंटी आहे. अर्जदाराने गाडीतील दोषा बाबत तोंडी अथवा लेखी तक्रार केलेली नाही. अर्जदाराची तक्रार ही वॉरंटीच्या कालावधीनंतरची आहे त्यामूळे वॉरंटीनंतर आता त्यांची दूरुस्ती होणार नाही. वॉरंटी ही दि.15.09.2008 रोजी संपली आहे. अर्जदाराने बॅटरीच्या दोषा बाबत दि.20.09.2008 रोजी गैरअर्जदारांना सांगितले. त्यामूळे त्यांची वॉरंटी कालबाहय झालेली होती. गैरअर्जदार यांच्या सेवेमध्ये ञूटी नसल्याकारणाने अर्जदार यांचा तक्रार अर्ज दंडासह फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केले आहे तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेला दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांना गैरअर्जदार क्र.2 यांनी दिलेले बिल नंबर 11 दि.15.09.2007 चे मॅट्रीक्स हे वाहन रु.28,500/- विकत घेतल्या बददलचे बिल दाखल केलेले आहे. सोबत त्यांचे वॉरंटी कार्ड दाखल आहे. ज्यात वाहनातील उत्पादक दोष व बॅटरीची एक वर्षाची वॉरंटी दिलेली आहे. गैरअर्जदारांच्या म्हणण्यानुसार वॉरंटी संपलेली आहे. वॉरंटी ही दि.15.09.2008 रोजी संपलेली आहे व अर्जदाराने तक्रार ही दि.25.09.2008 रोजी दाखल केली आहे. त्यामूळे तक्रार ही वॉरंटीच्या नंतरची आहे. परंतु अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे ते गैरअर्जदार यांचेकडे गेले पण त्याबददल त्यांच्याकडे पूरावा नाही असे जरी असले तरी अर्जदार यांनी दि.23.06,2008 रोजी गैरअर्जदार यांना कायदेशीर नोटी पाठविली आहे यांचा अर्थ गाडी बददल दोष असल्याबददलची सूचना गैरअर्जदार यांना मिळालेली आहे व ही सूचना वॉरंटीमध्ये आहे. वाहन हे वॉरंटी असेल तर वॉरंटीमध्ये असलेले वाहन दूरुस्त करुन देण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्र.2 यांचे वर आहे. पण गैरअर्जदार क्र. 1 हे मुंबईला असतात व वाहनाची सर्व्हीस ही गैरअर्जदार क्र.2 यांचेकडेच आहे. त्यातील पार्ट काही खराब असतील तर ते कंपनीकडून घेऊन देण्याची जबाबदारी ही गैरअर्जदार क्र.2 यांचीच आहे. दि.23.06.2008 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांना ही नोटीस प्राप्त झालेली आहे. त्या नोटीसला त्यांनी काही उत्तर ही दिलेले नाही. अर्जदार यांचे वाहन दोषयूक्त न केल्यामूळे गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केलेली आहे हे दिसून येते. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र. 2 यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांचे मॅट्रीक्स बाईक हे वाहन विनामूल्य दूरुस्त करुन चालू स्थितीत आणून दयावे. 3. मानसिक ञासाबददल रु.1,000/- व दावा खर्च म्हणून रु.1,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे श्रीमती सुजाता पाटणकर सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य. जे.यु.पारवेकर लघूलेखक. |