नि. २७
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष : श्री.अनिल य.गोडसे
मा.सदस्या : श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या : सौ सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र.४७१/२०१०
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : १७/९/२०१०
तक्रार दाखल तारीख : २०/९/२०१०
निकाल तारीख : ०४/११/२०११
-------------------------------------------
श्री आप्पा उर्फ त्रिंबक गुंडो साबडे
वय ८० वर्षे, धंदा – पेन्शनर
रा.श्रीफळ, माजी सैनिक वसाहत, मिरज ..... तक्रारदारú
विरुध्द
१. आर.के.इको तर्फे भागीदार
अ) श्री सतिश व्ही.घोरपडे
वय सज्ञान, व्यवसाय-व्यापार
ब) श्री निलेश आर.काळे
वय सज्ञान, व्यवसाय-व्यापार
दोघे रा.द्वारा आर.के.ट्रॅक्टर्स
५५७, कोल्हापूर रोड, सांगली
२. इको व्हेईकल्स प्रा.लि.बेंगलोर
तर्फे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री अनिल अनंथकृष्णा
वय सज्ञान, व्यवसाय-व्यापार
रा.द्वारा कासाबिरगिट्टा, १०, ब्रुनटन रोड,
एम.जी.रोड क्रॉस, बेंगलोर – २५ .....जाबदार
तक्रारदारú तर्फेò : +ìb÷. सी.एस.नरवाडकर
जाबदार क्र.१अ व १ब : +ìb÷. ए.व्ही.पाटील
जाबदार क्र.२ : एकतर्फा
नि का ल प त्र
द्वारा- सदस्या : सौ सुरेखा बिचकर
१. सदरची तक्रार तक्रारदाराने जाबदार यांचेविरुध्द त्यांनी जाबदार यांचेकडून खरेदी केलेली व बॅटरीवर चालणारी दुचाकी इको कॉस्मीक गाडी ही वारंवार बंद पडू लागल्याने व गाडीत दोष असल्यामुळे गाडी खरेदीची व्याजासहित होणारी रक्कम रु.६४,२५०/- तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.२५,०००/- मिळणेसाठी दाखल केलेली आहे.
२. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारदाराने जाबदार क्र.१ यांचेकडून दि.२८/५/२००८ रोजी जाबदार क्र.२ कंपनीच्या बॅटरीवर चालणारे दुचाकी इको कॉस्मिक मॉडेल हे वाहन रक्कम रु.३८,८००/- भरुन खरेदी केले. सदरचे वाहन दि.७/६/२००८ रोजी आर.टी.ओ. सांगली यांचेकडे जाबदार क्र.१ यांनी नोंदविले. सदर वाहन नोंदवितेवेळी जाबदार क्र.१ ने वाहनाची किंमत रु.३५,४००/- घेतली असताना बिलाची किंमत रु.३०,३७५/- दाखविली आहे व नोंदणी फीपोटी रक्कम रु.१,८९०/- खर्च केले असताना तक्रारदाराकडून रक्कम रु.२,५००/- घेतले आहेत. तसेच विम्याचे रक्कम रु.९००/- घेतले आहेत.
परंतु सदरचे वाहन खरेदी केल्यानंतर त्यामध्ये वारंवार किरकोळ तक्रारी चालूच राहिल्या व जाबदार क्र.१ यांचेकडे दुरुस्तीस नेले असता त्यांना रक्कम रु.१,३५०/- चे स्पेअर पार्टस घालणेस भाग पाडले. तसेच बॅटरी चार्ज होत नसलेने जाबदार क्र.१ यांनी चार्जर बदलून दिला. सदरचा चार्जर बदलूनही गाडीतील दोष दूर न झालेने दि.२२/७/०८ रोजी सदरचे वाहन जाबदार क्र.१ यांनी बॅटरी बदलणेसाठी तक्रारदाराकडून नेले.
तक्रारदाराने जाबदार क्र.१ यांचेकडे गाडी दुरुस्त करुन परत मिळणेसाठी सुमारे १ वर्ष तगादा लावला, त्यावेळी जाबदार क्र.१ यांनी कंपनीकडून क्लेम झाल्यावर गाडी मिळेल असे सांगितले. त्यानंतर दि.३०/६/२००९ रोजी तक्रारदाराने जाबदार क्र.१ व २ यांना लेखी तक्रार करुन वाहनाची मागणी केली परंतु त्यासही जाबदार यांनी उत्तर दिले नाही. त्यामुळे तक्रारदाराने दि.११/२/१० रोजी जाबदार यांना वकीलामार्फत रजिस्टर्ड नोटीस पाठविली. सदरची नोटीस पोहोचूनही त्यांनी उत्तर दिले नाही व नोटीसीप्रमाणे मागणीची पूर्तता केली नाही म्हणून तक्रारदारास सदरची तक्रार जाबदार यांचेविरुध्द दाखल करणे भाग पडत आहे.
तक्रारदाराने तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.५ चे यादीसोबत एकूण ९ कागदपत्रे दाखल केली आहेत.
३. प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र.१अ व १ब यांना नोटीसची बजावणी झालेनंतर जाबदार क्र.१अ व १बयांनी त्यांचे म्हणणे नि.१८ ला व शपथपत्र नि.१९ ला दाखल केले आहे. तसेच नि.२० चे यादीसोबत एकूण ७ कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
जाबदार क्र.१अ व १ब यांनी त्यांचे म्हणणेमध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बरेच मुद्दे अमान्य केलेले आहेत. त्यांचे म्हणणेमध्ये असे नमूद केले आहे की, त्यांनी तक्रारदार यांना दि.२७/५/०८ रोजी इको कॉस्मीक दुचाकी वाहनाचे रक्कम रु.३८,८००/- चे कोटेशन दिले आहे. त्यास तक्रारदार यांनी पावती म्हटले आहे. परंतु ती पावती नसून ते कोटेशन आहे. तदनंतर दुसरे दिवशी दि.२८/५/०८ रोजी पुन्हा तक्रारदार जाबदार यांचेकडे आले व गाडीमध्ये सुट देणेबाबत विचारणा केली. त्यावेळी सदर जाबदार यांनी नवीन व्यवसायाचा जम बसवणेच्या दृष्टीने कोटेशन रकमेत सूट देवून करासह रक्कम रु.३१,५४०/- इतक्या निव्वळ रकमेस गाडी देणेचे ठरविले व गाडीचे विम्याची रक्कम रु.८६८/-, पथकर रक्कम रु.१,८९०/-, नोंदणी फी +ìक्सेसरीज व नोंदणी सेवाशुल्क रक्कम रु.७०८/- अशी एकूण रक्कम रु.३५,०००/- या रकमेस देणेचे वाटाघाटीने ठरले.
तक्रारदार यांचेकडे एवढी एकरक्कम नसल्याने त्यांनी जाबदार यांचेकडे सुरुवातीस रक्कम रु.२०,०००/-, दि.४/६/०८ रोजी रक्कम रु.१०,०००/- व दि.२०/६/०८ रोजी रक्कम रु.५,०००/- अशा रकमा दिलेल्या आहेत. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदर वाहनाचा वापर कशा प्रकारे करावयाचा याबाबत सर्व सूचना दिलेल्या होत्या परंतु त्यांनी निश्चितच सर्व अथवा काही सूचनांचे पालन केले नसलेने बॅटरीची क्षमता कमी झालेली आहे. तसेच सदर बॅटरीस सहा महिने इतकी वॉरंटी होती त्या काळात जर बॅटरी संबंधी काही तक्रार असले तर ती जाबदार क्र.१ यांना नजरेस आणून देणे आवश्यक होते. तसेच तक्रारदार यांनी गाडी वेळेत केव्हाही सर्व्हिसिंगसाठी आणलेली नाही.
तक्रारदार यांनी सदर जाबदार यांचेकडे ज्या ज्या वेळी गाडी सर्व्हिसिंगसाठी दिली त्या त्या वेळी त्यांनी योग्य ती दुरुस्ती करुन दिलेली आहे. दि.२१/१०/०८ रोजी व दि.४/७/०९ रोजी तक्रारदार यांनी जाबदार क्र.१ कडे जनरल चेकअपसाठी गाडी आणली होती त्यावेळेस जाबदार क्र.१ यांनी चार्जरचा इंडिकेटर दाखवित नसल्यामुळे दुसरा नवीन चार्जर विनामूल्य बसवून दिला. तसेच किरकोळ दुरुस्तीही करुन दिलेल्या आहेत. त्यावेळेस तक्रारदार यांचे वाहन ३१७० कि.मी. इतके चालले होते. जाबदार यांनी गाडीची वॉरंटी संपलेनंतरही सेवा दिलेली आहे त्यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही त्रुटी ठेवली नाही.
तक्रारदार यांनी जाबदार यांना वकीलांमार्फत दि.११/२/२०१० रोजीची नोटीस पाठविणेपूर्वी सुमारे एक महिना अगोदर जाबदार यांचेकडे येवून बॅटरी विनामूल्य घालून द्या अन्यथा मला गाडीच नको असा त्रागा करुन गाडी सोडून गेले. जाबदार यांनी तक्रारदार यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक केलेली नाही.
४. जाबदार क्र.२ यांना नि.१७ अन्वये नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाही तसेच त्यांनी आपले लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब त्यांचेविरुध्द दि.१०/१०/११ रोजी एकतर्फा आदेश नि.१ वर करण्यात आला.
५. तक्रारदार यांचे विधिज्ञांनी दि.६/९/११ रोजी व जाबदार यांचे विधिज्ञांनी दि.१०/१०/११ रोजी लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे.
६. मंचाने तक्रारदाराची तक्रार, जाबदार क्र.१अ व १ब यांचे म्हणणे व त्यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारअर्जात असे नमूद केले आहे की, त्यांनी जाबदार क्र.१ कडून दि.२८/५/०८ रोजी दुचाकी इको कॉस्मिक हे वाहन रक्कम रु.३८,८००/- देवून खरेदी केलेले आहे. तक्रारदाराने नि.१५ सोबत रक्कम रु.३८,८००/- ची पावती दाखल केलेली आहे. मंचाने त्याचे अवलोकन केले असता त्यावर कोटेशन असा उल्लेख आहे. त्यामध्ये जाबदार यांना तक्रारदाराकडून रु.३८,८००/- मिळाले आहेत असा कुठेही उल्लेख केलेला दिसून येत नाही. परंतु जाबदार यांनी त्यांचे म्हणणेसोबत नि.२०/१, २०/२, २०/३ ला तक्रारदार यांचे वाहन खरेदीच्या पावत्या दाखल केलेल्या आहेत. सदरच्या पावत्यांचे मंचाने अवलोकन केले असता तक्रारदार यांनी जाबदार क्र.१ यांना वाहन खरेदीपोटी दि.२८/५/०८ रोजी रक्कम रु.२०,०००/-, दि.४/६/०८ रोजी रक्कम रु.१०,०००/- व दि.२०/६/०८ रोजी रक्कम रु.५,०००/- अशी एकूण रक्कम रु.३५,०००/- दिल्याचे दिसून येते म्हणजे जाबदार यांना तक्रारदाराकडून वाहन खरेदी पोटी रक्कम रु.३५,०००/- मिळाल्याचे स्पष्ट होते.
तक्रारदार यांनी जाबदार क्र.१ यांचेकडून वाहन खरेदी केलेपासून वारंवार गाडीच्या किरकोळ तक्रारी चालूच राहिल्या व दि.९/६/०८ रोजी जाबदार क्र.१ यांचेकडे दुरुस्तीस आणले असता सदरच्या दुरुस्त्या हमी या सदरात मोडत नाहीत असे सांगून सुमारे रु.१,३५०/- चे स्पेअर पार्टस गाडी खरेदी केलेनंतर लगेचच तक्रारदार यांना घालणेस भाग पाडले हे तक्रारदार यांनी दाखल केलेल्या नि.५/५ चे पावतीवरुन स्पष्ट होते.
दि.२१/१०/०८ रोजी तक्रारदार यांनी जाबदार क्र.१ यांचेकडे गाडी सर्व्हिसिंगसाठी नेली असता गाडीचा चार्जर खराब असल्यामुळे बदलून दिलेला आहे व दि.४/७/०९ रोजी पुन्हा गाडी सर्व्हिसिंगसाठी नेली असता हॉर्न, ब्रेक, हेडलाईट, या बाबतच्या विनामूल्य दुरुस्त्या करुन दिलेल्या आहेत. सदरची बाब जाबदार क्र.१ यांनी नि.२०/५ व नि.२०/६ ने दाखल केलेल्या जॉब कार्डवरुन स्पष्ट होते म्हणजे तक्रारदार यांनी जाबदार क्र.१ यांचेकडून गाडी खरेदी केल्यापासून ती व्यवस्थित चालत नाही व त्यामध्ये दोष आहे हे स्पष्ट होते.
तक्रारदार यांची गाडी दि.४/७/०९ पर्यंत त्यांचेच ताब्यात होती हे जाबदार यांनी नि.२०/६ ला जॉबकार्ड दाखल केलेले आहे त्यावरुन स्पष्ट होते. जाबदार यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदार यांनी जाबदार यांना दि.११/२/१० रोजीची नोटीस पाठविणेपूर्वी १ महिना जाबदार क्र.१ यांचेकडे येवून बॅटरी विनामूल्य घालून द्या अन्यथा मला गाडीच नको असे म्हणून गाडी सोडून गेले. यावरुन तक्रारदार यांची गाडी जाबदार यांचेच ताब्यात आहे हे स्पष्ट होते.
तक्रारदार यांनी जाबदार क्र.१ कडून गाडी खरेदी केल्यापासून त्यामध्ये दोष होता हे तक्रारदार यांनी कागदपत्रान्वये सिध्द केलेले आहे तसेच जाबदार यांनीही तक्रारदार यांना खुल्या बाजारातून बॅटरी विकत घेतलेस बॅटरीचे किंमतीची अर्धी रक्कम देणेचा प्रस्ताव दिला. म्हणजेच तक्रारदार यांचे गाडीमध्ये सुरुवातीपासून दोष आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार यांची गाडी जाबदार यांचे ताब्यात असूनही त्यांनी गाडी पूर्णपणे दुरुस्ती करुन तक्रारदार यांना दिलेली नाही ही जाबदार यांची कृती ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम २(१) (ग) प्रमाणे सेवेतील त्रुटी ठरते. तसेच तक्रारदार यांची गाडी बरेच दिवस जाबदार यांचे ताब्यात आहे. त्यामुळे गाडीची कंडीशनही खराब झालेली असेल व भविष्यातही ती दुरुस्त होवून व्यवस्थित चालेल याबाबत जाबदार यांनी कोणतीही हमी दिलेली नाही. ही गाडी खरेदी करुनही त्या गाडीचा तक्रारदार हे समाधानकारकरित्या उपभोग घेवू शकले नाहीत. सदरची गाडी सातत्याने नादुरुस्त होत होती व अद्यापही बंद अवस्थेत जाबदार यांचेकडे ब-याच कालावधीपासून पडून आहे, त्यामुळे जाबदार हे तक्रारदार यांना गाडी खरेदीची रक्कम रु.३५,०००/- द.सा.द.शे.७ टक्के व्याजाने देणेस जबाबदार ठरतात या निर्णयाप्रत हे मंच आलेले आहे.
वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदाराची तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
२. जाबदार क्र.१अ व १ब आणि जाबदार क्र.२ यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदार यांना त्यांनी खरेदी केलेल्या दुचाकी इको कॉस्मिक गाडीची रक्कम रु.३५,०००/- ही तक्रार दाखल तारखेपासून म्हणजे दि.१७/९/२०१० पासून रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे.७ टक्के व्याजाने द्यावी.
३. जाबदार क्र.१अ व १ब आणि जाबदार क्र.२ यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदार यांना शारिरिक व मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.२,०००/- अदा करावेत.
४. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार क्र.१अ व १ब आणि जाबदार क्र.२ यांनी दि.१९/१२/२०११ पर्यंत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दिनांकò: ०४/११/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११
VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११