Maharashtra

Sangli

CC/11/153

Loknete Hanmantrao Patil Dudh Utpadak Prakriya Sangh Ltd., Vita through Accountant Shri.Ashok Dattatraya Kumbhar - Complainant(s)

Versus

Quality Packaging System through Prop.Shri.Milind Bhave - Opp.Party(s)

V.A.Patil

23 Jan 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/11/153
 
1. Loknete Hanmantrao Patil Dudh Utpadak Prakriya Sangh Ltd., Vita through Accountant Shri.Ashok Dattatraya Kumbhar
Vita, Tal.Khanapur,
Sangli
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Quality Packaging System through Prop.Shri.Milind Bhave
22A, Padmabhushan Hsg.Soc., Behind Ravat Bros.Showroom, Pune Satara Road, Pune - 411 009.
Pune
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Geeta Ghatge MEMBER
 
PRESENT:V.A.Patil, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

तक्रार अर्ज क्र.१५३/२०११
 
नि.१ वरील आदेश
 
 
व्‍दारा मा.अध्‍यक्ष, श्री.अनिल य. गोडसे 
 
प्रस्‍तुत तक्रार अर्ज आज रोजी दाखल करुन घेण्‍याच्‍या मुद्यावर युक्तिवादासाठी नेमण्‍यात आला. तक्रारदार यांनी तक्रारअर्ज दाखल केल्‍यावर तक्रारदार हे ग्राहक होतात का ? याबाबत व भौगोलिक क्षेत्राबाबत युक्तिवाद करणेत यावा असा आदेश नि.१ वर करण्‍यात आला होता. तक्रारदारतर्फे विधिज्ञांचा सदर मुद्याबाबत युक्तिवाद ऐकला. तक्रारदार यांनी जाबदार यांना दिलेली मशिनची ऑर्डर रद्द करुनही जाबदार यांनी रक्‍कम परत केली नाही या मागणीसाठी तक्रारदार यांनी प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांचे विधिज्ञांनी भौगोलिक अधिकारक्षेत्राबाबत युक्तिवाद करताना जाबदार यांनी मशिन अर्जदारास त्‍यांचे उद्योगाचे ठिकाणी पुरविण्‍याचे व सेवा देण्‍याचे ठरले होते असे नमूद केले. दाखल कागदपत्रांतील अटी व शर्तींचे अवलोकन केले असता जाबदार यांचे तंत्रज्ञांनी मशिन तक्रारदार यांचे उद्योगाचे ठिकाणी चालू करुन देण्‍याचे होते असे नमूद असल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे प्रस्‍तुतच्‍या तक्रारअर्जास अंशत: कारण या मंचाचे भौगोलिक अधिकारक्षेत्रात येईल असे या मंचाचे मत आहे. भौगोलिक अधिकारक्षेत्राचा मुद्दा विचारात घेतल्‍यानंतर तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक होतो का ? याबाबत तक्रारदार यांचे विधिज्ञांनी, सदरचे दूध उत्‍पादन संघाने जाबदारकडून मशिन खरेदी करणेसाठी ऑर्डर दिली असलेने ते ग्राहक होतात व दूध उत्‍पादक संघाच्‍या व्‍यवसायाचा उद्देश हा नफा कमविण्‍याचा नाही असे नमूद केले. ग्राहक संरक्षण कायद्यातील ग्राहक या शब्‍दाची व्‍याख्‍या पाहता मोबदला देवून एखादी वस्‍तू अगर सेवा विकत घेतली असेल तर अशी सेवा अगर वस्‍तू विकत घेणारी व्‍यक्‍ती ग्राहक होते. व्‍यक्‍ती या शब्‍दाची व्‍याख्‍या ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम २() () मध्‍ये दिली आहे, त्‍यामध्‍ये सोसायटीचा समावेश असल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे निश्चितच सदरची सोसायटी व्‍यक्‍ती या संज्ञेत येते. परंतु ग्राहक या व्‍याख्‍येच्‍या परंतुका मध्‍ये एखादी वस्‍तू व्‍यापारी कारणासाठी खरेदी केली असेल तर अशी वस्‍तू घेणारी व्‍यक्‍ती ही ग्राहक होत नाही असे नमूद करण्‍यात आले आहे. व्‍यापारी कारणाचा खुलासा करताना सदर व्‍याख्‍येमध्‍ये पुढे असेही नमूद करण्‍यात आले आहे की, एखादी व्‍यक्‍ती स्‍वत:चा चरितार्थ चालविण्‍यासाठी सदरचा व्‍यापार स्‍वयंरोजगारातून करीत असेल तर अशा व्‍यापाराचा समावेश ग्राहक या व्‍याख्‍येमध्‍ये करण्‍यात आला आहे. तक्रारदार यांची सोसायटी ही परिसरातील सभासदांकडून व दूध उत्‍पादक शेतक-यांकडून दूध खरेदी करुन संकलन करुन त्‍या दूधावर प्रक्रिया करुन त्‍या दूधाच्‍या विक्रीचा व्‍यवसाय करते. तक्रारदारांनी उपस्थित केलेला वाद हा लस्‍सी मशिनच्‍या वादाबाबत आहे यावरुन निश्चितच तक्रारदार यांचा सदरचा व्‍यवसाय हा व्‍यापारी कारणासाठी आहे ही बाब स्‍पष्‍ट आहे. सदरचा व्‍यापार हा सर्व सभासद स्‍वयंरोजगारातून करतात का ? हे या ठिकाणी पाहणे गरजेचे आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्ज दाखल करण्‍यास अकाऊंटंट यांची नेमणूक केली आहे. सदरचे अकाऊंटंट श्री अशोक कुंभार व पवन शिंदे यांना संचालक मंडळाने केसेस दाखल करण्‍यासाठी नियुक्‍त केलेले आहे. यावरुन सदर सोसायटीचे संचालक मंडळ व कर्मचारी भिन्‍न आहेत व सदर व्‍यवसायासाठी तक्रारदार यांचेकडून कर्मचा-यांची नियुक्‍ती करण्‍यात आल्‍याचे दिसून येते त्‍यामुळे सदरचा व्‍यवसाय हा स्‍वयंरोजगारातून नसल्‍याचे स्‍पष्‍ट आहे. तक्रारदार यांनी खरेदी केलेले मशिन हे व्‍यापारी कारणासाठी खरेदी केले असल्‍यामुळे व सदरचा वाद हा मशिनमधील दोषाबाबत नसून मशिन खरेदीच्‍या रद्द केलेल्‍या ऑर्डरचे पैसे परत मिळाले नाहीत या कारणास्‍तव असलेने तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार ग्राहक होत नाहीत या निष्‍कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रारअर्ज दाखल करुन न घेता काढून टाकणेत येत आहे.
 
दि.२३/०१/२०१२.
सांगली.
 
                              सदस्‍या                  अध्‍यक्ष
                         जिल्‍हा मंच, सांगली        जिल्‍हा मंच, सांगली
 
 
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Geeta Ghatge]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.