Maharashtra

Jalgaon

CC/08/100

Pandit Mohan Patil - Complainant(s)

Versus

Purnawad CO.OP.Credit So.LTD aND Others - Opp.Party(s)

Adv.Tandale

06 Nov 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/08/100
 
1. Pandit Mohan Patil
jalgaon
Jalgaon
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Purnawad CO.OP.Credit So.LTD aND Others
jalgaon
Jalgaon
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव यांचे समोर.
                        तक्रार क्रमांक 100/2008
                        तक्रार दाखल करण्‍यात आल्‍याची तारीखः- 23/01/2008
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-   06/11/2012
 
श्री.पंडीत मोहन पाटील,                                      ..........तक्रारदार
उ व 59 धंदा रिटायर्ड,
रा. मोहन,7, भुषण कॉलनी,जळगांव.
 
            विरुध्‍द
 
1.     पुर्णवाद नागरी सहकारी पतसंस्‍था मर्यादित,शिरसोली            .....विरुध्‍दपक्ष.
      पत्‍ता – 69 ते 72, युनिटी चेंबर्स गणेशकॉलनी रोड,
      जळागांव. शाखा – 4 स्‍वामी विवेकानंद शॉपींग कॉम्‍प्‍लेक्‍स,शिरसोली,
      ता.व जि.जळगांव.
2.    अड.श्री.सत्‍यशिल अविनाश अकोले, चेअरमन,
      रा.पुर्णवादनगर,पुर्णवाद भवन, रिंगरोड, जळगांव जि.जळगांव
3.    श्री.जगतराव बारकु पाटील, संचालक
      रा.शिरसोली ता व जि.जळगांव.
4.    डॉ.अशोक गणपती रावेरकर, संचालक.
      रा.वाघुळदेनगर, जळगांव.
5.    श्‍याम अविनाश अकोले, संचालक.
      रा.सोनाली कोल्‍ड्रींक्‍स, संभाजी चौक, सावदा ता.रावेर जि.जळगांव.
6.    नामदेव पांडरंग कोळी, संचालक.
      रा.तहसिल कार्यानयाजवळ, जळगांव.
7.    प्रदीप रावसाहेब पाटील,संचालक.
      रा.शिरसोली ता व जि.जळगांव.
8.    अड.गणेश विष्‍णुपंत पारनेरकर,संचालक.
      द्वारा – श्री.विष्‍णुपंत पारनेरकर महाराज,पारनेर ता.पारनेर जि.अहमदनगर.
9.    सौ.विजया अशोक रावेरकर, संचालक
      रा. पुर्णवाद नागरी सहकारी पतसंस्‍था मर्यादित,शिरसोली        
      द्वारा –डॉ.अशोक गणपती रावेरकर, वाघुळदेनगर,जळागांव.
10.   स्‍वरुपकुमार भागचंद लुंकड,संचालक.
      रा.धनलक्ष्‍मी ज्‍वेलर्स, आर.सी.बाफना दुकानमागे,भवानीपेठ,
      जळागांव.
11.    अड.श्री.राजेश प्रभाकर गडे,संचालक.
      रा.मेनरोड, यावल जि.जळगांव.
12.   श्री.मनोहर मधुकर बारी, संचालक.
      रा.मित्रनगर, खाजामियाजवळ,जळगांव.
13.   सौ.उषा यशवंत चौधरी, संचालक,   
रा.जयकीसानवाडी,जळगांव.
14.   मुरलीधर केशव ढेंगळे. संचालक.
      रा.शिरसोली ता व जि.जळगांव
15.   अड.शिरीषकुमार जयवंतराव भामरे, संचालक.
16.   श्री.रविंद्र प्रभाकर सोनार, संचालक.
17.   श्री.राजेश बाबुराव डोळे,संचालक.
18.   श्री.अविनाश शशिकांत कुलकर्णी,संचालक.
      स्‍वामी विवेकानंद शॉपींग कॉम्‍प्‍लेक्‍स,शिरसोली ता व जि.जळगांव.
19.   सौ.कल्‍पना शेखर लंके, मुख्‍य व्‍यवस्‍थापक,
द्वारा – शेखर लंके, नवप्रभात कॉलनी,कन्‍या शाळेच्‍या पुढे,
खाजामियाच्‍या मागे,जळगांव.
20.   श्री.प्रविण हिंमतराव पवार,प्र.शा.व्‍यवस्‍थापक.
शिरसोली, रा.4 स्‍वामी विवेकानंद शॉपींग कॉम्‍प्‍लेक्‍स,शिरसोली,
 ता व जि.जळगांव
                        कोरम
                     श्री. डी.डी.मडके.                       अध्‍यक्ष.
                     सौ.एस.एस.जैन.                    सदस्‍या.
                                               --------------------------------------------------
                        तक्रारदार तर्फे अड.महेंद्र जाधव 
                        विरुध्‍दपक्ष अड.ए.व्‍ही.वाणी.
                                 नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके,अध्‍यक्ष ः तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष पतसंस्‍थेत मुदत ठेव पावतीमधे गुंतवलेली रक्‍कम मागणी करुन ही परत दिली नाही म्‍हणुन त्‍यांनी प्रस्‍तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
2.    तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष पुर्णवाद नागरी सहकारी पतपेढी मर्यादित (यापुढे संक्षीप्‍तेसाठी पतसंस्‍था असे संबोधण्‍यात येईल) या पतसंस्‍थेत मुदत ठेव पावतीत रक्‍कम गुंतविली होती त्‍याचा तपशिल खालील प्रमाणे.
 
पावती क्रमांक
ठेव रक्‍कम     
ठेव दिनांक  
देय रक्‍कम  
देय दिनांक
जे 18176   
20,000
01/11/06  
20,277     
17/12/06  
जे 18177   
20,000
01/11/06  
20,277     
17/12/06  
 
3.    तक्रारदार यांनी मुदत ठेव रक्‍कमेची मागणी विरुध्‍द पक्ष पतसंस्‍थेत केली असता त्‍यांनी सदर रक्‍कम देण्‍यास नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब विरुध्‍द पक्ष यांचेकडुन मुदत ठेव पावतीतील व्‍याजासह होणारी संपुर्ण रक्‍कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्‍या खर्चापोटी भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
4.    विरुध्‍द पक्ष यांनी आपला खुलासा दाखल करुन तक्रारदार यांची ठेवीची रक्‍कम त्‍यांचेकडे जमा असल्‍याचे मान्‍य केले आहे. विरुध्‍दपक्ष यांचे असेही म्‍हणणे आहे की, तक्रार दाखल करण्‍यासाठी कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारदार यांनी केलेली मागणी व कथन चुकीचे व खोटी व बेकायदेशिर असल्‍याचे म्‍हटले आहे. तक्रारदाराचा वाद हा संस्‍था व सभासद यांचेमधील असल्‍यामुळे तो वाद महाराष्‍ट्र सहकारी संस्‍थेमार्फत सोडविण्‍याची तरतुद सहकार कायद्या अंतर्गत आहे, अशा प्रकारचा वाद कोणत्‍याही न्‍यायालयात दाखल करण्‍यापुर्वी नोटीस देणे आवश्‍यक आहे. तक्रारदार यांनी केलेली इतर सर्व विपरित विधाने विरुध्‍दपक्ष यांनी नाकबुल केली आणि असा उजर घेतला की, तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्‍यात यावी.
5.    तक्रारदार यांची तक्रार पाहता तक्रारीच्‍या न्‍यायनिर्णयासाठी आमच्‍या समोर खालील मुद्ये उपस्थित होतात व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्ये.                                             उत्‍तर.
1.     विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय? होय.
2     आदेश काय?                                           खालीलप्रमाणे.
                               विवेचन
6.    मुद्या क्र.1  प्रस्‍तुत प्रकरणांत तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्‍यांनी पतसंस्‍थेमध्‍ये मुदत ठेव पावतीची रक्‍कम गुंतवली होती ही बाब सिध्‍द होते. तक्रारदार यांनी सदरची रक्‍कम मिळणेसाठी मागणी केली असता, सदर रक्‍कम त्‍यांना देण्‍यात आली नाही. वास्‍तविक तक्रारदार यांनी मागणी केल्‍यानंतर तात्‍काळ विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडील जमा असलेली रक्‍कम त्‍यांना परत करणे पतसंस्‍थेचे कर्तव्‍य होते.   तक्रारदार यांनी मागणी करुनही संस्‍थेने रक्‍कम न देऊन सेवेत त्रुटी केली आहे या मतास आम्‍ही आलो आहोत. म्‍हणून मुद्या क्र. 1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.
7.    मुद्या क्र. 2  –– तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या बचत खात्‍यामधील व्‍याजासह होणारी रक्‍कम पुर्णवाद नागरी सहकारी पतपेढी मर्यादित संचालक मंडळ यांचेकडुन वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या मिळावी अशी मागणी केलेली आहे. परंतू मा.मुंबई उच्‍च न्‍यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्‍द राजश्री राजकुमार चौधरी या न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये पुढील प्रमाणे मत व्‍यक्‍त केले आहे.
      As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceeded against and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain able against the society, the Directors of members of the managing committee cannot be held responsible in view of the scheme of Maharashtra Co-operative Societies Act. To hold the Directors of the banks/members of the managing committee of the societies responsible, without observing the procedure prescribed under the Act, would also be against the principles of co-operation, which is the very foundation of establishment of the co-operative societies.
8.    वरील न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये संचालकांना रक्‍कम देण्‍यासाठी वैयक्‍तीकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्‍व विषद करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे त्‍यांना वैयक्तिकरित्‍या रक्‍कम देण्‍यास जबाबदार ठरविता येणार नाही. तक्रारदार हे विरुध्‍द पक्ष पुर्णवाद नागरी सहकारी पतपेढी मर्यादित यांचेकडुन पतसंस्‍थेत जमा असलेली व्‍याजासह होणारी रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत. तसेच पतसंस्‍थेच्‍या कृतीमुळे तक्रारदारास निश्चितच मानसिक व शारिरीक त्रास झाला आहे व मंचात तक्रारही दाखल करावी लागली आहे. तसेच त्‍यांना मानसिक त्रास होणे साहजिक आहे. त्‍यामुळे तक्रारदार अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.1,000/- व मानसिक त्रासापोटी रु.2,000/- मिळण्‍यास पात्र आहेत असे आम्‍हास वाटते.
9.    वरिल विवेचनावरुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
                              आ दे श
(1)   तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.
(2)   विरुध्‍द पक्ष क्र. 1 पुर्णवाद नागरी सहकारी पतपेढी मर्यादित यांनी तक्रारदार यांना वरील आदेश कलम 2 मध्‍ये नमुद केलेल्‍या मुदत ठेव पावत्‍या मॅच्‍युअर्ड झालेल्‍या असल्‍याने त्‍यावरील मुदती अंती देय असलेल्‍या रक्‍कमेवर देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्‍यापासून ) एकत्रित रक्‍कमेवर द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याजासह तक्रारदार यांना या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासुन 30 दिवसांचे आंत अदा करावेत तसेच दावा खर्चापोटी रु.1,000/- व मानसिक त्रासापोटी रु.2,000/- अदा करावेत.
(3)   वर नमुद आदेश क्र.2 मधील रक्‍कमेपैकी काही रक्‍कम अगर व्‍याज दिले असल्‍यास त्‍यावर कर्ज दिले असल्‍यास सदरची रक्‍कम वजावट करुन उर्वरित रक्‍कम अदा करावी.
 
                   (सौ.एस.एस.जैन )            ( श्री.डी.डी.मडके )
                      सदस्‍या                       अध्‍यक्ष 
                                     जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव
 
 
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.