जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 55/2011
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः- 01/02/2011
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 04/02/2014
श्री.रघुनाथ गुलाब मंगरुळे,
वयः सज्ञान, धंदाः नौकरी,
रा.जळगांव, ता.जि.जळगांव. ........ तक्रारदार
विरुध्द
1. पुर्णवाद नागरी सह.पतसंस्था मर्यादीत,
शाखा ख्वॉजामियाजवळ,गणेश कॉलनी रोड,जळगांव,
तर्फे मॅनेजर सौ.कल्पना शेखर लंके व इतर 8. ..... विरुध्द पक्ष.
कोरम –
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष.
श्री.चंद्रकांत मो.येशीराव सदस्य.
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या
--------------------------------------------------
नि.क्र. 1 वरील आदेश व्दाराःश्रीमती पुनम नि.मलीक,सदस्याः तक्रारदार व त्यांचे वकील दि.13/04/2012 पासुन पुढे नेमलेल्या अनेक तारखांना सतत गैरहजर. तक्रारदाराने माहे फेब्रुवारी2012 पासुन कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाहीत. तक्रारदाराची सततची गैरहजेरी पाहता त्यांना तक्रार अर्ज चालविण्यात काहीएक स्वारस्य नसल्याचे स्पष्ट होते. परिणामी तक्रारदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा,1986 च्या कलम 13(2)(सी) अन्वये त्याच्या अधिकारास बाधा न येता फेटाळण्यास पात्र आहे. यास्तव आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज तक्रारदाराच्या हक्कास बाधा न येता अंतिमरित्या
निकाली काढण्यात येतो.
2) खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
ज ळ गा व
दिनांकः- 04/02/2014.
(श्रीमती पुनम नि.मलीक ) ( श्री.चंद्रकांत मो.येशीराव) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.