Maharashtra

Thane

CC/529/2015

Miss Shraddha H Bhosale - Complainant(s)

Versus

Punjab National Bank Through Branch Manager - Opp.Party(s)

10 Jul 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/529/2015
 
1. Miss Shraddha H Bhosale
At 35, 3rd floor, Narayan Smruti Near Hanuman Mandir, Wagle Estate, Shivaji Nagar, Thane 400604
Thane
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Punjab National Bank Through Branch Manager
At Gr floor, A wing Laxmi Residency Shivaji Nagar, Near Mulund check naka, Thane 400604
Thane
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 10 Jul 2015

               न्‍यायनिर्णय   

               (द्वारा सौ. माधुरी एस. विश्‍वरुपे- मा. सदस्‍या)

                                                           

  1.        तक्रारदार सामनेवाले बँकेचे खातेदार असून तक्रारदारांच्‍या खात्‍यातून डेबिट कार्डद्वारे दि. 26/04/2013 रोजी संध्‍याकाळी 9.15 वाजता रु. 8,500/- डेबिट झाल्‍याची माहिती तक्रारदारांना मोबाईल sms अन्‍वये मिळाली. सदर ट्रान्‍झेक्‍शन तक्रारदारांनी केले नसल्‍याबाबत सामनेवाले बँकेस दि. 27/04/2013 रोजी कळविले. तसेच ट्रान्‍झेक्‍शन कुठे घडले? याबाबतची चौकशी केली असता सामनेवाले बँकेने फक्‍त ट्रान्‍झेक्‍शन नंबर तक्रारदारांना दिला.
  2.       तक्रारदारांनी या संदर्भात लेखी तक्रार सामनवेाले बँकेकडे            दि. 26/04/2013 रोजी केली. तसेच तक्रारदार श्रीनगर पोलिस स्‍टेशन येथे फिर्याद नोंदविण्‍यास गेले असता ‘ट्रान्‍झेक्‍शन’ कुठे घडले? याबाबतची माहिती घेऊन त्‍याठिकाणी फिर्याद दाखल करता येणे शक्‍य नसल्‍याचे सांगितले. अखेर शेवटी तक्रारदारांनी              दि. 20/05/2013 रोजी ‘सायबर सेल’ ठाणे येथे यासंदर्भातील फिर्याद दाखल केली.

 

  1.          सामनेवाले बँकेने दि. 21/5/2013 रोजी सदर ट्रान्‍झेक्‍शन चार्लस् कॉम्‍प्‍युटर, चेन्‍नई येथे झाल्‍याची माहिती दिली.
  2.          तक्रारदारांना दि. 28/05/2013 रोजीच्‍या ई-मेलद्वारे बँक अॅम्‍बूडसमन, मुंबई यांना यासंदर्भातील माहिती दिली. त्‍यांचे रिप्‍लाय ईमेलद्वारे “CCTV Footage” पाठवले. परंतु सदर CCTV Footage बाबत विचारणा केली असता चुकीचे स्‍टेटमेंट पाठविल्‍याबाबत कळविले.
  3.  
  4.          सायबर सेल, ठाणे यांचे सूचनेनुसार श्रीनगर पोलिस स्‍टेशन, ठाणे येथे यासंदर्भातील एफ.आय.आर. दि. 04/12/2013 रोजी दाखल झाला.
  5.          तक्रारदारांनी त्‍यांचे डेबिट कार्डचा पीन नंबर कोणत्‍याही व्‍यक्‍तीला दिला नाही. तसेच कुटुंबातील व्‍यक्‍तींना कार्ड वापरण्‍यासाठी दिले नाही. तक्रारदार ट्रान्‍झेक्‍शनच्‍यावेळी मुंबई येथील ऑफिसमध्‍ये होते.
  6.         सामनेवाले बँकेने अदयापपर्यंत‍ तक्रारदारांना  त्‍यांच्‍या खात्‍यातून रक्‍कम रु. 8,500/- बाबत ट्रान्‍झेक्‍शन झाल्‍याची प्रत दिली नाही. तसेच सदर ट्रान्‍झेक्‍शनमधील स्‍लीपवरची सही तक्रारदाराचे स्‍पेसिमन सही केली आहे. तक्रारदारांनी डेबीट कार्डचा वापर केलेला नसूनही त्‍यांचे खात्‍यातून सामनेवाले यांनी रक्‍कम रु, 8,500/- वजा (debit) केली आहे. अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
  7.          तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता सामनेवाले बँकेचे अॅम्‍बूडसमन यांनी दि. 11/09/2013 रोजी पाठवलेल्‍या पत्राचे अवलोकन केले असता तक्रारदारांचे डेबिट कार्ड swipe केल्‍यानंतर transaction successful  ची प्रत बँकेला प्राप्‍त झाली आहे.
  8.           तक्रारदारांनी यासंदर्भात पोलिस स्‍टेशन श्रीनगर, ठाणे  येथे फिर्याद दाखल केली असून यासंदर्भात एफ.आय.आर. माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (5) अन्‍वये नोंदविण्‍यात आला आहे.
  9.          तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदाराची फसवणूक झालेली आहे व यासंदर्भातील फौजदारी प्रकरण प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत प्रस्‍तुतची बाब न्‍यायमंचाचे अधिकारक्षेत्रात (jurisdiction)  येत नाही असे मंचाचे मत आहे.

सबब खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतोः

                आ दे श

  1. तक्रार क्र. 529/2015 ग्राहक संरक्षण कायदा कलम 12(3) नुसार फेटाळण्‍यात येते.
  2. खर्चाबाबत आदेश नाही.
  3. संचिकेच्‍या अतिरिक्‍त प्रती तक्रारदारांना परत करण्‍यात याव्‍यात.

 

 
 
 
 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.