निकालपत्र :- (दि.16.05.2011)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 यांनी म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.2 यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाला क्र.1 बांधकाम व्यावसायिक आहेत व सामनेवाला क्र.2 हे नोंदणीकृत झालेली अपार्टमेंट आहे. तक्रारदार हे सदर अपार्टमेंटमधील युनिटधारक आहेत. सदर तक्रारदारांनी श्री.प्रदिप शिवलालजी जैन व श्री.शिवराजजी वरदीचंद जैन यांना वटमुखत्यारपत्र दिलेले आहे. सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी युनिट खरेदीधारकांना युनिट खरेदी देताना सदर सोसायटी घरकुल योजनेमध्ये त्रुटी ठेवलेल्या आहेत. सदरच्या त्रुटी या खालीलप्रमाणे :- बेकायदेशीरपणे अंबिकामाता मंदिर बांधलेले आहे. स्ट्रीट लाईट दुरुस्त करुन दिलेले नाही. ड्रेनेज व्यवस्थित नाही. पार्किंग सोय करुन मार्किंग व्यवस्थित करुन दिलेले नाही. लिफटच्या बाहेर इंटरकॉम नाही. दक्षिण बाजूची कंपौंड भिंत वाढवून अंगण व तारांचे कुंपण बसविलेले नाही. सदर भिंती या निकृष्ट दर्जाच्या आहेत. स्विमिंग टँक गार्डनचे गेट बंद केलेले नाही. गार्डनमधील मुलांचे खेळण्याचे साहित्य मोडलेले आहे, ते दुरुस्त करुन तसेच नविन साहित्य बसवून देणे. भक्ती अपार्टमेंटमधून दुकानाला जाण्याचा रस्ता बंद करणे. साउंड सिस्टीम जुनी झालेली आहे. जनरेटर जुना दिलेला आहे. ए लाईनच्या बंगल्याचे कंपौंट वॉलवर अँगल व तारांचे कुंपण घालणे, तसेच पॅसेजमधील रस्ता दुरुस्त करुन मोझॅक टाईल्स बसविणे, कामगारांना पाणी कनेक्शन बाहेर बसवून देणे. स्विमींग टँकची संपूर्ण सिस्टम खराब असलेने ती दुरुस्त करुन देणे. क्लब हाऊसमधील पहिल्या मजल्यावर दरवाजे निकृष्ट दर्जाचे आहेत. सदर ठिकाणी असलेल्या टॉयलेट-बाथरुमची कामे अपूर्ण आहेत. जिमचे साहित्य निकृष्ट आहे. क्लब हाऊसजवळील चेंबर झाकणे, वायरिंग व जंक्शन पाईपिंग करुन देणे. तसेच, क्लब हाऊस टेरेसवरील काही भागाचा गिलावा बाकी आहे, तो पूर्ण करुन देणे. तसेच, टेरेस वॉटरप्रुफिंग करुन देणे व हॉलमध्ये सर्व गेम्स् पुरविणे. तसेच, ओव्हरहेड टँकमध्ये पाणी चढविणेसाठी मोटर बसविणे. अपार्टमेंट समोरील स्पिकर दुरुस्त करुन देणे. कॉंक्रीट रोडची चुकलेली लेव्हल दुरुस्त करुन देणे, तसेच क्रॅक्स दुरुस्त करुन देणे, मोठया लॉनच्या पायरीवर फरशी बसविणे, तसेच अग्नीप्रतिबंधक व अग्नीशामक यंत्रणा बसविणे. (3) उपरोक्तप्रमाणे सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी त्रुटी ठेवलेल्या आहेत व त्यांना कळवूनही त्यांनी त्रुटींची पूर्तता केलेली नाही. तसेच, तक्रारदारांना सोसायटीमध्ये वावरु देणार नाही अशी दमदाटी केलेली आहे. सबब, सामनेवाला यांनी उपरोक्त नमूद त्रुटी दूर करुन देणेचे आदेश व्हावेत व तक्रारदारांच्या शांततामय कब्जेवहिवाटीत हरकत व अडथळा करु नये असे आदेश व्हावेत. तसेच, तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- देणेबाबत आदेश व्हावेत. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत सामनेवाला यांना दि.06.01.2006 रोजी दिलेले पत्र, जुना राजवाडा पोलीसांना दि.12.12.2009 रोजी दिलेली तक्रार, पोलीसांची तक्रारदारांना दि.12.12.2009 रोजी नोटीस, वटमुखत्यारपत्र दि.10.12.2009 इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (5) सामनेवाला क्र.1 बांधकाम व्यावसायिक यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, अपार्टमेंट अॅक्टमधील तरतुदीनुसार डीड ऑफ डिक्लेरेशनचे नोंदणी दि.22.03.2005 रोजी केलेली आहे. दि.26.01.2008 पर्यन्त तक्रारदार क्र.6 हे सोसायटीचे अध्यक्ष होते. सामनेवाला क्र.2 सोसायटीचे तत्कालिन अध्यक्ष व सेक्रेटरी यांनी दि.06.01.2006 रोजी दिलेल्या लेखी अर्जाप्रमाणे संपूर्ण कामे दि.28.02.2006 रोजीच केलेली आहेत. प्रस्तुतची तक्रार सदर सामनेवाला यांचेविरुध्द खोटी दाखल केलेली आहे. तसेच, प्रस्तुत तक्रारीस मुदतीचा बाध येत आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी व सामनेवाला यांना कॉम्पेनसेटरी कॉस्ट देणेबाबत आदेश व्हावेत. (6) सामनेवाला क्र.2 यांनी म्हणणे दाखल करुन तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. (7) प्रस्तुत प्रकरणी डिड ऑफ डिक्लेरेशनची नोंद दि.22.03.2005 रोजी झालेली आहे. तसेच, अपार्टमेंटमधील सोसायटीने सामनेवाला बांधकाम व्यावसायिकांकडे दि.06.01.2006 रोजी त्रुटी बाबत कळविले आहे व सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी सदर त्रुटींची पुर्तता दि. 28.02.2006 रोजीअखेर करुन दिलेली आहे असे प्रतिपादन केले आहे. सदर तक्रारीस कारण हे दि.06.01.2006 रोजी निर्माण झालेले आहे व प्रस्तुतची तक्रार ही दि.16.12.2009 रोजी दाखल केलेली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 24(ए) यातील तरतुद विचारात घेतली असता सदरची तक्रार तक्रारदारांनी मुदतीत दाखल केलेली नाही. सबब, सदर तक्रारीस मुदतीचा बाध येत आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदर विवेचनास पूर्वाधार पुढीलप्रमाणे :- (1) (Supreme Court) (CP) p.481 - State Bank of India v. B.S.Agricultural Industries Banking - Consumer Protection Act, 1986 - Section 24A - Deficiency in service - Section 2(1)(g) - Section 2 (1)(o) - complainant-respondent carrying on business of manufacturing and supplying engines and pump sets - Seven bills of the amount of Rs.2,47,154/- sent by it to the opposite party - appellate bank on 21.04.1994 drawn on Unique Agro Service, P.O. Heria (West Bengal) together with GRs of transporters for collection and remitance of the proceeds toit i.e. the complainant - Bank instructed to deliver the bills and GRs to the drawee against payment - Bank also instructed to return the documents if not honoured by the drawee by 7.6.1994 - Complaint to the District Forum that the Bank neither sent the amount of Rs.2,47,154/- to the complainant nor returned the said bills and GRs - Bank resisted the complaint on the ground of its being time barred and that it had returned the bills and GRs to the complainant’s B.M. Konar, Sales Manager - District Forum allowed the complaint directing the Bank to pay Rs. 2,47,154/- to the complainant with 15% interest and Rs.5,000/- as compensation - Despite the specific plea of the complaint being time barred, point for determination in this regard neither framed nor considered - Bank’s appeal failed toget it any relief from the State Commission - National Commission upheld the concurrent orders of the Forums by the Bank aggrieved by the said order - Provision of Section 24A, which prescribes limitation period for admission of a complaint by a Forum, is peremptory in nature - It requires a Forum to see before it admits the complaint that it has been filed within twoyears from the date of accral of cause of action - Delay in filing the complaint may be condoned by the Forum for the reasons tobe recorded in writing if sufficient cause is shown - Expression ‘shall not admit a complaint, occurring in the Section is a sort of legislative command to the Consumer Forum to examine on its own whether the complaint has been filed within limitation period prescribed thereunder - In other words, it isthe duty of the Consumer Forum to take notice of Section 24A and give effect toit -Whether the complaint in this case filed within time i.e., within two years of the accrual of cause of action ? Letter dated 21.04.1994 of the complainant clearly instructed the Bank to return the documents if not honoured by the drawee by 7.6.1994 - Obviously, the cause of action accrued to the complainant on 7.6.1994 when it did not receive the amount of Rs. 2,47,154/- nor the documents - Limitation thus began to run from 7.6.1994 - Therefore, the complaint filed on 5.5.1997 was apparently time barred, having been not filed within two years - Bank also wrote to the complainant in its letter dated 28.3.1995 that it had returned the bills to its B.M.Konar on 10.5.1994 - Complaint filed on 5.5.1997 even beyond two years therefrom - Complaint held tobe barred by time and, therefore, dismissed on that count - Appeal allowed - Decision rendered by the National Commission set aside. (2) 2009 CTJ 951 (Supreme Court)(CP) - Kandimalla Raghavaiah & Co. versus National Insurance Co.Ltd. and another. Limitation - Insurance - Consumer Protection Act, 1986 - Section 24A - Appeal - Section 23 - Fire Policy “c” taken by the appellant from the respondent No.1, National Insurance Co.Ltd. for a period of 4 months on 4.12.1987 against loss or damage by fire - On 8.3.1988 they obtained a loan from respondent No.2, Indian Bank by hypothecating the tobacco stored in the godown - In the intervening night between 22nd and 23rd March, 1988 a fire broke out in the godown allegedly due to electrical short circuit burning the entire stock of tobacco - Matter reported both to the insurance company and the bank - Bank preferred a claim with the insurance complay on 14.07.1988 but not pursued it any further - A claim form asked by the appellant from the insurance company for the first time n 06.11.1994 - Getting no response, a legal notice issued to it on 26.10.1995 - reply sent by the insurance company on 21.03.1986 delaying the cactum of fire and refusing to issue a claim form, the claim being time barred - Filing of two complaints by the apellant before National Commission on 21.10.1997 - Contention raised that haing regard to the insurance company’s letter dated 21.3.1996, their complaints were well within time - Appellant’s stand failed to find favour with the Commission - Cause of action admittedly arose in the intervening night of 22nd/23rd March, 1988 - Complaints, therefore, held to be barred by limitation of two years having regard to section 24A of the Act - Aggrieved, the present appeal filed challenging the commission’s order - Provision of Section 24A casts a duty on a Consumer Forum todismiss a complaint unless the complainant satisfies it that the complainant had sufficient cause for not filing the complaint within the period of two years from the date on which the cause of action arose - Cause of action for the appellant clearly arose on 22nd/23rd March, 1988 - By no stretch of imagination the insurance company’s letter dated 21.3.1996 in relply to the appellant’s legal notice dated 4.1.1996 declining to issue the claim form, resulted in extending the period of limitation - Accordingly held : the complaint of the appellant and that too without an application for condonation of delay was manifestly barred by limitation - Commission’s action of dismissing the same upheld - Appeal dismissed. (8) उपरोक्त संपूर्ण विवेचन विचारात घेवून हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार काढून टाकणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |