Maharashtra

Wardha

MA/1/2012

RAMKRUSHN DASHRATH DHOTE - Complainant(s)

Versus

PROVINCIAL TRACTRS PVT.LTD.+1 - Opp.Party(s)

SAU.V.N.DESHMUKH

14 Mar 2012

ORDER


11
MA NO. 1 Of 2012
1. RAMKRUSHN DASHRATH DHOTEPIPALGAON POST GIRAD TQ. SAMUDRAPURWARDHAMAHARASHTRA ...........Appellant(s)

Versus.
1. PROVINCIAL TRACTRS PVT.LTD.+1KORADI ROAD, NAGPURNAGPURMAHARASHTRA ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. ANIL N. KAMBLE ,PRESIDENTHONABLE MRS. Sau.Sushama W/O Pradeep Joshi ,MemberHONABLE MR. Shri Milind R. Kedar ,MEMBER
PRESENT :

Dated : 14 Mar 2012
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

1.     अर्जदाराने सदरचा अर्ज, तक्रार दाखल करण्‍यास झालेला विलंब                                     माफ  होण्‍या करीता दाखल केलेला आहे. अर्जदाराने, गैरअर्जदार क्रमांक-2 यांचेकडे अग्रीम  


   किरकोळ अर्ज क्र. M.A.01/2012.

रुपये-1,00,000/- दिनांक-24.04.2009 रोजी महिन्‍द्रा कंपनीचा 595 टर्बो ट्रॅक्‍टर खरेदी करण्‍या करीता जमा केले. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी राष्‍ट्रीयकृत बँकेचे कर्ज मिळवून देण्‍याचे आश्‍वासन हिंगणघाट येथील वितरक विजय देशमुख यांनी दिले होते. गैरअर्जदार क्रमांक-2 यांनी दिनांक-05.05.2009 रोजी ट्रॅक्‍टर दिला. अर्जदाराला 02 वर्षाचे वॉरन्‍टीसह माहिती पुस्‍तीका देखील देण्‍यात आली.

2.    गैरअर्जदार क्रमांक-2 यांनी दिनांक-16.06.2009 रोजी ट्रॅक्‍टर हिंगणघाट येथील वर्कशॉप मध्‍ये आणण्‍यास सांगितले. सदर ट्रॅक्‍टर पासिंगसाठी वर्धेला पाठवावयाचे आहे असे सांगितले आणि ट्रॅक्‍टर ठेऊन घेतला.  कर्जाची रक्‍कम मंजूर होताच, तुम्‍हाला ट्रॅक्‍टर देण्‍यात येईल, असे सांगितले. वर्षभर गैरअर्जदारांनी टोलवाटोलव करुन ट्रॅक्‍टर परत दिला नाही. शेवटी अर्जदाराने दिनांक-31.07.2010 रोजी लेखी अर्ज दिला व रकमेची मागणी केली, रक्‍कम न दिल्‍यास आत्‍महत्‍ये बाबत नमुद केले, तरी देखील गैरअर्जदार यांनी अग्रीम रक्‍कम परत केली नाही. अर्जदाराने वारंवार तोंडी विनंती केली परंतु गैरअर्जदार यांनी अग्रीम रक्‍कम परत न केल्‍यामुळे, अर्जदाराने दिनांक 19.01.2011 रोजी विष प्राशन करुन आत्‍महत्‍या करण्‍याचा प्रयत्‍न केला.

 

3.    अर्जदारास वैद्यकीय उपचारा करीता रुपये-50,000/- खर्च आला. तसेच शारिरीक कमजोरीमूळे अर्जदार चालू देखील शकत नव्‍हता. कस्‍तुरबा हॉस्पिटल मधील डॉक्‍टरांनी कायमस्‍वरुपी काळजी घेण्‍या करीता सांगितले व नियमित मानसिक उपचार घेण्‍या बाबत सांगितले.

4.    अर्जदारास कमजोरीमुळे स्‍पांडलायटीसचा त्रास सुरु झाला व नियमितपणे डॉ.आर.बी.मुंढे यांचे कडून उपचार घ्‍यावे लागत आहे. गैरअर्जदार यांनी दिलेल्‍या अतोनात आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रासामुळे तक्रार दाखल करण्‍यास विलंब झाला. अर्जदाराचा ट्रॅक्‍टर दिनांक-16.06.2009 रोजी पासींगची बतावणी करुन विश्‍वासघाताने परत घेतला. ग्राहक संरक्षण कायदया अंतर्गत दिनांक-16.06.2011 पर्यंत 02 वर्षाचे आत तक्रार दाखल करावयास हवी होती, परंतु प्रकृती अस्‍वास्‍थामुळे विलंब झाला. तक्रार दाखल करण्‍यास झालेल्‍या विलंबास गैरअर्जदार हेच जबाबदार आहेत, तरी तक्रार दाखल करण्‍यास झालेला 06 महिन्‍याचा विलंब सहानुभूतीपूर्वक विचार करुन माफ करण्‍यात यावा.

5.    अर्जदाराने विलंब माफीचे अर्जा सोबत दस्‍तऐवज दाखल केलेत.

6.    गैरअर्जदार यांनी, विलंब माफीचे अर्जाला निशाणी क्रमांक-14 नुसार उत्‍तर दाखल केला.

 

7.    गैरअर्जदार यांनी, अर्जदाराचे म्‍हणणे अमान्‍य करुन, अर्जदार स्‍वतःच झालेल्‍या विलंबा करीता जबाबदार असून, विलंब हेतुपुरस्‍पर आहे, त्‍यामुळे विलंब माफ करण्‍यास पात्र नाही. अर्जदार विलंबा करीता स्‍वतःच जबाबदार आहे, एवढेच नव्‍हे तर, ट्रॅक्‍टरची कोणतीही

 

                                                                                    किरकोळ अर्ज क्र. M.A.01/2012.

मालकी नसताना, गैरकायदेशीररित्‍या हा ट्रॅक्‍टर अर्जदाराने वापरला. हे म्‍हणणे खरे नाही की, गैरअर्जदाराने, अर्जदाराला, आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रास दिला आणि म्‍हणून त्‍याला तक्रार दाखल करण्‍यास विलंब झालेला आहे. अर्जदारानी, गैरअर्जदाराचा विश्‍वासघात केला. अर्जदार कोणतीही रक्‍कम, गैरअर्जदारा कडून परत मिळण्‍यास पात्र नाही. अर्जदाराने महिन्‍द्रा कंपनीचा 595 टर्बो ट्रॅक्‍टर दिनांक 24.04.2009 रोजी 01 महिन्‍याचे आत, उर्वरीत रक्‍कम देतो व कसोटी करता ट्रॅक्‍टर देण्‍यात आले, असे सांगून नेला. अर्जदारा कडून              240 तास, गैरअर्जदाराचे मालकीचा ट्रॅक्‍टर वापरण्‍यात आलेला आहे. गैरअर्जदार क्रमांक-1 व 2 यांना, अर्जदाराने ट्रॅक्‍टरची पूर्ण किंमत दिलेली नव्‍हती, त्‍यामुळे ट्रॅक्‍टर अर्जदारास विकण्‍यात आलेला नव्‍हता. अर्जदाराचा  दिनांक-31.07.2010 चा कोणताही लेखी अर्ज त्‍यांना प्राप्‍त झालेला नाही, त्‍यामुळे सदर अर्जास उत्‍तर देण्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही. अर्जदाराचे हे म्‍हणणे खरे नाही की, उपचारा नंतर, अर्जदाराची हॉस्पिटल मधून सुटटी झाली तरी शारिरीक व मानसिक ताणामुळे तो काहीच करु शकत नव्‍हता, त्‍याला शारिरीक कमजोरी असल्‍यामुळे, तो चालू देखील शकत नव्‍हता. हे म्‍हणणे खरे नाही की, कमजोरीमुळे अर्जदारास स्‍पांडलायटीसचा त्रास सुरु झाला व त्‍यासाठी त्‍याला नियमितपणे डॉ.आर.बी.मुंढें यांचे कडून उपचार घ्‍यावे लागत आहे. तक्रार विलंबाने दाखल करण्‍यास अर्जदार हा स्‍वतःच जबाबदार असल्‍यामुळे, विलंब माफी देण्‍यास योग्‍य नाही.

8.    अर्जदार व गैरअर्जदार तर्फे सुनावणी ऐकून घेण्‍यात आली.

9.    अर्जदार यांनी, तक्रार दाखल करण्‍यास विलंब होण्‍याचे कारण प्रकृती अस्‍वास्‍थाचे सांगितले आहे. गैरअर्जदार यांनी, अर्जदाराचे विलंब माफीचे अर्जास दिलेल्‍या उत्‍तरात मान्‍य केले आहे की, दिनांक-24.04.2009 ला रुपये-1,00,000/- अग्रीम घेऊन, 01 महिन्‍याचे आत उर्वरीत रक्‍कम देण्‍याचे सांगितले. गैरअर्जदार यांनी पासिंगचे नावाने                   दिनांक-16.06.2009 रोजी ट्रॅक्‍टर, अर्जदारा कडून परत ठेऊन घेतला, तेंव्‍हा पासून वादाचे कारण घडले आहे. ग्राहक संरक्षण कायदयाचे तरतुदी नुसार कारण घडल्‍या पासून               02 वर्षात तक्रार दाखल करावयाची होती, तो कालावधी दिनांक-15.06.2011 असा येतो. परंतु अर्जदाराने  तक्रार न्‍यायमंचात दिनांक-05.01.2012 रोजी दाखल केलेली आहे, अर्जदारास तक्रार दाखल करण्‍यास जवळपास 06 महिन्‍याचा विलंब झालेला आहे.             या करीता अर्जदाराने वैद्यकीय प्रमाणपत्राची प्रत रेकॉर्डवर दाखल केले. अर्जदाराने विष प्राशन केले, त्‍यामुळे त्‍यास कस्‍तुरबा हॉस्पिटल, वर्धा यांचेकडे दिनांक-19 जानेवारी,2011 ते                            22 जानेवारी,2011 पर्यंत उपचार घ्‍यावा लागला. तसेच शारिरीक कमजोरी                        आल्‍यामुळे अर्जदार कोठेही जावू शकला नाही. अर्जदाराने  अ-6 वर डॉ. आर.बी.मुंढे                 यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल केले, त्‍यात फेब्रुवारी, 2011 पासून ते डिसेंबर, 2011 पर्यंत अर्जदार त्‍यांचेकडे वैद्यकीय उपचार घेत होता, या बाबतचे ते प्रमाणपत्र आहे.

 

 

 

         किरकोळ अर्ज क्र. M.A.01/2012. 

10.   अर्जदार यांनी विलंब माफी करीता दिलेले वैद्यकीय कारण आणि त्‍या कथना पुष्‍टयर्थ्‍य सादर केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र यावरुन अर्जदार विलंब माफी मिळण्‍यास पात्र आहे. अर्जदाराने विलंब माफी करीता दिलेले कारण न्‍यायदानाचे दृष्‍टीने ग्राहय धरण्‍या योग्‍य असल्‍यामुळे, अर्जदाराचा विलंब माफीचा अर्ज मंजूर होण्‍यास पात्र आहे, या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आलेले आहे.

 

11.    विलंब माफीचा अर्ज मंजूर करते वेळी सहानुभूतीपूर्वक विचार करण्‍यात यावा, असे अर्जदाराने आपले अर्जात नमुद केले. अर्जदाराने दाखल केलेले दस्‍तऐवज आणि गैरअर्जदार यांनी विलंब माफीचे अर्जाला दिलेल्‍या उत्‍तरात फक्‍त, अर्जदाराचे म्‍हणणे नाकारलेले आहे. विलंब माफीचा कालावधी विचारात घेता आणि तक्रारीतील वाद पाहता न्‍यायाचे दृष्‍टीने विलंब माफीचा अर्ज मंजूर करण्‍यास पात्र आहे.

 

12.   मा.उच्‍च न्‍यायालय, मुंबई खंडपिठ औरंगाबाद यांनी C.R.Application No.904 of 1990, decided on-23.03.1999, Sonerao Sadashivrao Patil, and other-V/s- Godawarabai w/o Laxmansingh Gahirewar and other या प्रकरणात विलंब माफीचा अर्ज निकाली काढते वेळी, उदार दृष्‍टीकोन ठेवावा, असे मत दिलेले आहे. सदर न्‍यायनिवाडयात दिलेले मत या प्रकरणालाही लागू पडते.  सदर न्‍यायनिवाडया वरुन अर्जदारास तक्रार दाखल करण्‍यास झालेला 06 महिन्‍याचा विलंब न्‍यायदानाचे दृष्‍टीकोनातून (For the end of justice) मंजूर होण्‍यास पात्र आहे, या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आलेले आहे

 

13.   एकंदरीत अर्जदाराने दाखल केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र आणि तक्रारीतील वाद पाहता, अर्जदारास तक्रार दाखल करण्‍यास सहा महिन्‍याचा झालेला विलंब माफी मिळण्‍यास पात्र आहे, या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आलेले असल्‍याने,खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

               ::आदेश::

1)          अर्जदाराचा विलंब माफीचा अर्ज मंजूर

2)      ग्राहक तक्रार क्रमांक-1/2012 नियमितपणे पुढे चालविण्‍यात यावे.

3)      विलंब माफीचा अर्ज या आदेशाद्वारे नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे.

वर्धा

‌दिनांक :14/03/2012.

 


[HONABLE MRS. Sau.Sushama W/O Pradeep Joshi] Member[HONABLE MR. ANIL N. KAMBLE] PRESIDENT[HONABLE MR. Shri Milind R. Kedar] MEMBER