(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 04/02/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 20.04.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्यांनी नमुद केले आहे की, गैरअर्जदारांचा भुखंड खरेदी विक्रीचा व्यवसाय असुन भागीदारी संस्था आहे. तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदारांकडून मौजा-पेवठा येथील भुखंड क्र.65, खसरा नं.128/1, 128/2, 128/3, 129 व 131/1, प.ह.नं. 41 येथील लेआऊट मधील भुखंड ज्याचे क्षेत्रफळ 1500 चौ.फूट आहे ते खरेदी करण्याचे ठरविले होते. सदर भुखडाची किंमत रु.1,42,500/- ठरली होती, तक्रारकर्त्यांनी दि.27.11.2005 रोजी सदर भुखंडाचे बुकींग करीता रु.1,000/- गैरअर्जदारांना दिले आणि दि.09.01.2007 पर्यंत एकूण रु.1,60,125/- एवढी रक्कम दिल्याचे नमुद केलेले आहे. तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदाराला संपूर्ण रक्कम दिल्यानंतर सुध्दा त्यांनी विक्रीपत्र करुन दिले नाही. याकरीता तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली असुन त्याव्दारे विक्रीपत्र करुन देण्याचा आदेश देण्यांत यावा किंवा त्याच ले-आऊटमधील दुसरा भुखंड तेवढयाच क्षेत्रफळाचा द्यावा जर ते शक्य नसेल तर तक्रारकर्त्यांची रक्कम रु.1,60,125/- दि.27.11.2005 पासुन द.सा.द.शे. 12% व्याजासह परत मिळावी. शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.10,000/- मिळावे अशा मागण्या केल्या आहेत. 3. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदाराला बजाविण्यांत आली असता त्यांनी तक्रारीला आपले उत्तर दाखल केले नाही व मंचाची नोटीस प्राप्त झाल्यावर सुध्दा मंचात उपस्थित झाले नाही, त्यामुळे मंचाने दि.23.09.2010 रोजी गैरअर्जदारां विरुध्द एकतर्फी आदेश पारित केलेला आहे. 4. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.24.01.2011 रोजी आली असता मंचाने तक्रारकर्त्यांचा युक्तिवाद त्यांचे वकीला मार्फत ऐकला. तसेच तक्रारीत दाखल दस्तावेज व तक्रारकर्त्यांचे कथन यांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 5. सदर प्रकरणामध्ये तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदाराकडून भुखंड खरेदी करण्याकरता रु.1,60,125/- दिल्याची बाब प्रतिज्ञेत नमुद केलेली आहे. सदर बाब गैरअर्जदारांनी कोणत्याही प्रतिज्ञालेखा व्दारे खोडून काढली नसल्यामुळे किंवा त्या संबंधाने कोणतेही उत्तर दाखल केले नसल्याने तक्रारकर्त्यांची सदर बाब मान्य करण्यांत येते व तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदाराकडून भुखंड क्र.65 करीता रु.1,60,125/- दिले होते ही बाब ग्राह्य धरण्यांत येते. 6. तक्रारीन नमुद भुखंडाची संपूर्ण किंमत गैरअर्जदारांना मिळाली असतांना सुध्दा त्यांनी तक्रारकत्यांना विक्रीपत्र करुन दिले नाही ही त्यांचे सेवेतील त्रुटी असुन अनुचित व्यापार प्रणाली असल्याचे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारकर्ते हे वादग्रस्त भुखंड क्र.65 चे विक्रीपत्र करुन मिळण्यांस पात्र ठरतात किंवा तेवढयाच क्षेत्रफळाचा त्याच लेआऊटमधील दुसरा भुखंड गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांना द्यावा जर ते शक्य नसेल तर गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांना रु.1,60,125/- भुखंडाची बुंकिंग केल्याचा दि.27.11.2005 पासुन द.सा.द.शे.9% दराने व्याजासह मिळण्यांस पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. 7. गैरअर्जदारांनी भुखंडाची संपूर्ण रक्कम मिळून सुध्दा तक्रारकर्त्यांना विक्रीपत्र करुन दिले नाही व सेवेत त्रुटी दिलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाकरीता रु.10,000/- मिळण्यांस पात्र ठरतात. तसेच तक्रारीच्या खर्चाकरीता रु.3,000/- मिळण्यांस पात्र ठरतात असे मंचाचे मत आहे. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता वरील परिस्थितीचा विचार करुन आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास सेवेत त्रुटी दिल्याचे घोषीत करण्यांत येते. 3. गैरअर्जदार यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यांना भुखंड क्र.65 चे विक्रीपत्र करुन द्यावे अथवा 1500 चौ.फुट क्षेत्रफळाचा त्याच लेआऊटमधील दुसरा भुखंड द्यावा व त्याचे विक्रीपत्र करुन ताबा द्यावा. जर वरील दोन्ही बाबी शक्य नसल्यास गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याकडून स्विकारलेली रक्कम रु.1,60,125/- भुखंड बुंकिंग केल्याचा दि.27.11.2005 पासुन द.सा.द.शे.9% दराने व्याजासह परत करावी. 4. गैरअर्जदार यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चाचे रु.3,000/- अदा करावे. 5. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |