Maharashtra

Amravati

CC/16/31

Sau. Kalpana Prakashrao Deshmukh - Complainant(s)

Versus

Propriter.Rakesh Gupata Vyanketesh Krushi Kendra - Opp.Party(s)

Adv.P.S.Jade

29 Jun 2016

ORDER

District Consumer Redressal Forum,Amravati
Behind Govt. PWD Circuit House,(Rest House) Jailroad,Camp Area,Amravati
Maharashtra 444602
 
Complaint Case No. CC/16/31
 
1. Sau. Kalpana Prakashrao Deshmukh
R/o Lakhanvadi Ta. Ajangaion
Amravati
Maharasthra
...........Complainant(s)
Versus
1. Propriter.Rakesh Gupata Vyanketesh Krushi Kendra
R/o Vyanketesh Krusikendar Cottanmarket Road Amravati
Amravati
Maharastra
2. Manager,Vestren Agro Seeds Ltd.
Palot No. 802/11 Vestran House G.I.D.C. ( Engineer ) State sadar 28 Gandhi Nagar 382028 ( Gujrat)
Gujarat
Gujarat
3. Manager, M/s Daptari Agro Pvt.
R/o Daptari House Bhar RoadSelu-442104 Wardha Distt. Wardha
Wardha
Maharasthra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. S.M. Untawale PRESIDENT
 HON'ABLE MR. R.K.Patil MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

    

::: आ दे श प त्र  :::-

 

मा. अध्‍यक्षा, सौ. एस.एम. उंटवाले यांनी निकाल कथन केला :-

1.   तक्रारकर्तीने सदर अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सादर केला.    

2.   तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांचे जवळून दि. 30-01-2015 रोजी व्‍यंकटेश कृषी केंद्र, कॉटन मार्केट रोड, अमरावती येथून शेतीला लागणा-या बियाणे तिळ ज्‍याचा क्रमांक 55255 डब्‍ल्‍यू.आर.एस. 2014-51 वजन 500 ग्राम संख्‍या पाकीट 16 नग तसेच डी.डी. 14-5007 वजन 500 ग्राम संख्‍या पाकीट 32 नग खरेदी केले.  एकूण बियाण्‍यांची रक्‍कम रु. 6,400/- एकमुस्‍त प्रो. व्‍यंकटेश कृषी केंद्र, अमरावती यांना देण्‍यात आले.   सदर बियाणे हे शेतामध्‍ये 2 हेक्‍टर याप्रमाणे हेक्‍टरी 2.500 ते 3.00 कि. ग्रामप्रमाणे बिज प्रक्रिया केलेले बियाणे पेरणी केली.  परंतु, बियाण्‍यांच्‍या पॅकेटस वर बियाणे तपासणीचा दिनांक 15-09-2014 मुद्रित आहे व बियाण्‍यांची अंतिम मुदत 14 जून 2015 मुद्रित आहे व सेमी रब्‍बी व खरीप हंगाम मुद्रित आहे. उन्‍हाळी हंगामासाठी बियाणे असे मुद्रित नसल्‍यामुळे प्रो. व्‍यंकटेश  कृषी केंद्र तसेच व्‍यवस्‍थापक, वेस्‍टर्न कृषी सिडस लि. गांधीनगर, गुजरात यांनी कोणत्‍याही प्रकारची उन्‍हाळी हंगामासाठी बियाणे उपयुक्‍त नाही, याबद्दल बियाणे विकत घेतांना तक्रारकर्तीस कल्‍पना दिली नाही.  त्‍यामुळे, तक्रारकर्तीला हेक्‍टरी 15 ते 16 क्विंटल तिळाचे उत्‍पादन होणे अपेक्षित असतांना पूर्णतः तिळ पिक याचे नुकसान झाले.  सदयपरिस्थितीत,  तिळ 100/- रुपये प्रति किलो याप्रमाणे प्रति क्विंटल 10,000/- रुपये याप्रमाणे हेक्‍टरी 15 ते 16 क्विंटल या प्रमाणात 1,50,000/- ते 1,60,000/- रुपयाचे नुकसान झाले.  तक्रारकर्तीने शेतात 2 हेक्‍टर तिळ पेरणी केली.  यानुसार तक्रारकर्तीला 3,00,000/- रुपयाचे उत्‍पादन उन्‍हाळी तिळ पेरणीद्वारे तक्रारकर्तीस शेतात उत्‍पन्‍न मिळाले असते.  परंतु, विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारकर्तीची फसवणूक केली त्‍यामुळे तक्रारकर्तीला मिळणारे 3,00,000/- रुपयाचे उत्‍पन्‍न बुडाले.  तसेच 2 हेक्‍टर शेती करिता करावी लागणारी मशागत पेरणी तसेच मजुरांचा खर्च हेक्‍टरी रु. 50,000/- याप्रमाणे 2 हेक्‍टरचा खर्च रु. 1,00,000/- सुध्‍दा वाया गेला, यास विरुध्‍दपक्ष जबाबदार आहेत.

3.    सबब, तक्रारकर्तीची विनंती की, 1) तक्रारकर्तीस विरुध्‍दपक्ष यांचेकडून रु. 6,00,000/- व्‍याजासह मिळावे. 2) तक्रारकर्तीस न्‍यायालयीन खर्च सुध्‍दा मिळावा. 3) ईतर न्‍यायाची दाद मिळावी, अशी विनंती तक्रारकर्तीने तक्रारीत केली आहे.    

4.     सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्‍यासोबत एकंदर 10 दस्‍तऐवज पुरावे म्‍हणून जोडण्‍यात आले आहेत.

विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 3 चा अतिरिक्‍त जवाब :-

5.     विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 3 यांनी तक्रारीतील कथन अमान्‍य करुन असे नमूद केले की, तक्रारकर्ता व त्‍यांची आई यांनी विरुध्‍दपक्षाविरुध्‍द वेगवेगळी प्रकरणे दाखल केलेली आहे.  परंतु, दोघांचाही 7-12 दस्‍त एकच आहे.  तसेच बियाणे खरेदीची पावती तक्रारकर्त्‍याचे नावे नाही. त्‍यामुळे तक्रार चालू शकत नाही.  विरुध्‍दपक्ष क्रमांक 3 ची कंपनी महाराष्‍ट्र शासनद्वारा नोंदणीकृत परवानाधारक आहे.  तक्रारकर्त्‍याने बियाणे असमाधानकारक उगविले याची तक्रार या विरुध्‍दपक्षाकडे केली नव्‍हती, समितीने जो अहवाल दिला तो शासनाच्‍या परिपत्रकानुसार नाही व त्‍यात अनेक त्रुटी आहेत.  बियाणे उगवणशक्‍तीची तक्रार पेरणीनंतर खूप उशिरा केलेली आहे. तसेच तक्रारकर्त्‍याने अजून दुस-या कंपनीचे बियाणे देखील पेरले होते व ईतके बियाणे पेरण्‍याकरिता तक्रारकर्त्‍याजवळ शेत जमीन नाही, तक्रारकर्त्‍याची तक्रार लेबल संबंधी आहे, असे दिसते. त्‍यामुळे समितीने बियाणे कायदयाच्‍या कलम 23-अ (1) बाबतीतील कार्यपध्‍द्ती अवलंबणे भाग होती.  परंतु, समितीने तसे न करता अहवाल दिला व निश्चित उगवणशक्‍ती नमूद केली नाही, त्‍यामुळे तक्रार खारीज करावी.              

विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 चा लेखी जवाब :-

6.     विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी प्रस्‍तुत प्रकरणात लेखी जवाब दाखल केला असून त्‍यानुसार त्‍यांनी तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबूल करीत  अतिरिक्‍त जवाबात असे नमूद केले आहे की, सदर प्रकरणामध्‍ये मुळात तक्रारकर्ती ही विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 ची ग्राहक होत नाही.  कारण बियाणे खरेदीची पावती तिच्‍या नावे नाही.  तसेच तक्रारकर्तीने तक्रारीमध्‍ये बियाण्‍याची पेरणी कधी केली, कोणत्‍या पध्‍द्तीने केली, शेतीसाठी सिंचनाची काय सुविधा होती, इत्‍यादीबाबत काहीही माहिती दिलेली नाही.  तसेच तक्रारकर्तीने बियाणे खरेदी केल्‍यानंतर पेरणी करेपर्यंत कोणत्‍या स्थितीमध्‍ये ठेवले याबाबतही तक्रारीमध्‍ये काहीही नमूद केले नाही आणि केवळ समितीने वरवर पाहणी करुन दिलेल्‍या अहवालावर विसंबून अवाच्‍यासव्‍वा नुकसान भरपाईची मागणी केली आहे.  मजेशीर गोष्‍ट म्‍हणजे तक्रारकर्तीने पिकाच्‍या पेरणीसाठी झालेला खर्च व त्‍यापासून मिळणारे उत्‍पादन या दोन्‍ही बाबत नुकसान भरपाई मागितलेली आहे.  परंतु, खर्चाबाबत किंवा मिळणा-या उत्‍पादनाबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही.

7.       तक्रारकर्तीने तिच्‍या पिकाच्‍या उगवणीबाबत विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांना कधीही माहिती दिली नाही.  तक्रारकर्तीने कृषी अधिकारी यांच्‍याकडे बियाणे उगवणीबाबत तक्रार देतांना विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 कंपनीस काहीही माहिती दिली नाही.   विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 कंपनी एक ख्‍यातनाम बियाणे उत्‍पादक कंपनी आहे. कोणतेही बियाणे उत्‍पादित केल्‍यानंतर विक्रीसाठी बाजारात खुले करण्‍यापूर्वी नियमानुसार शासनाच्‍या आवश्‍यक त्‍या चाचण्‍या करुन जर ते बियाणे नियमाप्रमाणे आवश्‍यक त्‍या सर्व गोष्‍टींची पूर्तता करीत असेल तरच प्रमाणित केले जाते आणि त्‍यानंतर विक्रीसाठी खुले केले जाते. कंपनीने तिळ वेस्‍टर्न 11 चे लॉट क्रमांक डब्‍ल्‍यू आर एस 2014-51 चे बियाणे सर्वप्रथम कंपनीच्‍या प्रयोगशाळेमध्‍ये सर्व चाचण्‍या घेतल्‍यानंतर मा. कृषी सहायक संचालक गुजरात राज्‍य शासनाच्‍या बियाणे चाचणी प्रयोगशाळेमध्‍ये सदर लॉटच्‍या बियाण्‍याच्‍या उत्‍पादकता, अनुवंशिकता, शुध्‍दता इत्‍यादी बाबतच्‍या सर्व चाचण्‍या घेऊन त्‍याबाबत दिनांक 19-09-2014 रोजी बियाणे तपासणी अहवाल दिला आहे.  त्‍यामुळे कोणत्‍याही प्रयोगशाळेमध्‍ये सदर बियाण्‍याची तपासणी न करता, बियाणे तपासण्‍यासाठी कोणत्‍याही शास्‍त्रीय पध्‍द्तीचा वापर न करता, समितीने केवळ वरवर पाहणी करुन बियाण्‍याची उगवण झाली नाही म्‍हणून बियाणे सदोष आहे, असा निष्‍कर्ष काढणे आणि त्‍यासाठी कंपनीस जबाबदार धरणे विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 कंपनीवर अन्‍याय करण्‍यासारखे आहे.  विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 कंपनीने सदर लॉटचे तिळाचे शेकडा क्विंटल बियाणे महाराष्‍ट्रामध्‍ये विक्री केले असून तक्रारदारा व्‍यतिरिक्‍त इतर कोणत्‍याही शेतक-याची त्‍याबद्दल काहीही तक्रार नाही. याचाच अर्थ बियाण्‍यामध्‍ये कोणत्‍याही प्रकारचा दोष नाही, असा होतो.  त्‍यामुळे, अर्जदाराने दाखल केलेली तक्रार ही स्‍वतःच्‍या चुकीचे खापर बियाणे उत्‍पादक कंपनीवर फोडून, उलट कंपनीकडूनच मोठया रकमेची मागणी करुन येनकेनप्रकारे तक्रारकर्तीने पैसे मिळविण्‍याचा केलेला प्रयत्‍न दिसत आहे.  म्‍हणून सदरची तक्रार ही चुकीची, खोटी व तथ्‍यहीन असल्‍यामुळे फेटाळण्‍यात यावी, अशी विनंती विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 ने केली आहे.       

               :: कारणे व निष्‍कर्ष ::

8.      या प्रकरणातील तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 3 चा संयुक्‍त लेखी जवाब,  विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 चा स्‍वतंत्र लेखी जवाब,  उभयपक्षाने दाखल केलेले सर्व दस्‍ताऐवज, तक्रारकर्तीचे प्रतिउत्‍तर व उभयपक्षाचा लेखी युक्‍तीवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन खालील निष्‍कर्ष कारणे देऊन नमूद केला.

9.     तक्रारकर्तीचा युक्‍तीवाद असा आहे की,  तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांच्‍या दुकानातून विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 व 3 यांच्‍या कंपनीचे बियाणे, पावतीनुसार खरेदी केले होते, खरेदी करतांना विरुध्‍दपक्षाने सदर बियाणे हे उन्‍हाळी हंगामासाठी उपयुक्‍त नाही, याबद्दलची कोणतीही माहिती तक्रारकर्तीला दिली नाही.  त्‍यामुळे, बियाण्‍यांच्‍या उत्‍पन्‍नात नुकसान झाले व विरुध्‍दपक्षाने फसवणूक केली म्‍हणून यांची तक्रार अध्‍यक्ष, तालुकास्‍तरीय तक्रार निवारण समितीकडे केली.  त्‍यांच्‍या पाहणीत विरुध्‍दपक्षाचे बियाणे निकृष्‍ट दर्जाचे आहे असे आढळले, त्‍यामुळे, प्रार्थनेनुसार नुकसान भरपाई मिळावी. 

10.      यावर विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 3 यांचा युक्‍तीवाद असा आहे की, एकाच बियाणे खरेदी पावतीवरुन तक्रारकर्ती व ति‍च्‍या मुलाने वेगवेगळया केसेस दाखल केल्‍या आहेत.  तक्रारकर्तीच्‍या नांवे बियाणे पावती नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ती ग्राहक होऊ शकत नाही.  पेरणी केल्‍यानंतर, किती दिवसांनी पाहणी केली, हे स्‍पष्‍ट होत नाही तसेच बियाणे उगविण्‍यासाठी ईतरही घटक जबाबदार असतात.  ईतर कोणत्‍याही शेतक-याची तक्रार प्राप्‍त झाली नाही.  दोन वेगवेगळया कंपनीचे बियाणे खरेदी केल्‍याचे दिसते व तेवढी जमीन तक्रारकर्तीची नाही.  तक्रारकर्तीचे कथन व अहवाल यात साम्‍य नाही. समितीने पाहणी कायदेशीररित्‍या केली नाही.  समितीच्‍या अहवालात निश्चितपणे किती उगवण झाली हे नमूद नाही, त्‍यामुळे यात विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 3 चा दोष सिध्‍द् होत नाही.

11.        विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 चा युक्‍तीवाद असा आहे की, त्‍यांचे बियाणे हे प्रयोगशाळेत तपासून त्‍यानंतरच विक्री केले जाते,  तसे कागदपत्रे दाखल केले.  विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांचे ईतर आक्षेप हे विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 3 सारखेच आहे, त्‍यामुळे दाखल सर्व दस्‍त, युक्‍तीवादानुसार तपासले असता असे दिसते की, बियाणे खरेदीची पावती ही तक्रारकर्तीच्‍या नांवे नसून प्रकाश देशमुख हया नावाने आहे व तक्रारीत याबद्दलचे स्‍पष्‍टीकरण दिलेले नाही.  तसेच हया खरेदी पावतीवरुन असा बोध होतो की, प्रकाश देशमुख यांनी विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 या कंपनीच्‍या बियाण्‍यांच्‍या 16 बॅग व विरुध्‍दपक्ष क्रमांक 3 या कंपनीच्‍या बियाण्‍यांच्‍या 16 बॅग असे बियाणे खरेदी केले होते.  मात्र, तालुका तक्रार निवारण समितीच्‍या अहवालावरुन  असा बोध होतो की, तक्रारकर्ती जवळ एवढे बियाणे पेरण्‍याइतपत जमीनच नाही तसेच समितीने कोणत्‍या क्षेत्रात, कोणते बियाणे पेरले होते, याबद्दलचा उल्‍लेख अहवालात दिलेला नाही.  समितीचा अहवाल अशाप्रकारे आहे की,  “ वेस्‍टर्न -11 (विरुध्‍दपक्ष क्रमांक 2) या बियाण्‍याच्‍या पॅकेटसवर सेमी रब्‍बी व खरीप हंगाम मुद्रित आहे.  उन्‍हाळी हंगामासाठी बियाणे असे मुद्रित नसल्‍यामुळे शेतक-यांची फसवणूक होत असल्‍याचे समितीचे मत आहे.  कमी उगवण शक्‍ती ही सदोष बियाण्‍यांमुळे झाली, असे समितीला वाटते.”  त्‍यामुळे अशा प्रकारच्‍या अहवालावरुन यात विरुध्‍दपक्षाची सेवा न्‍युनता म्‍हणता येणार नाही.  तसेच या अहवालावरुन विरुध्‍दपक्ष क्रमांक 3 यांची देखील सेवा न्‍युनता स्‍पष्‍ट होत नाही. कारण, तक्रारकर्तीने बियाणे खरेदी करतांनाच त्‍याबद्दलची योग्‍य ती शहानिशा करणे भाग होती व अशा वादाची तक्रार समितीने बियाणे निरीक्षकाकडे करावयास पाहिजे होती, असे विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी दाखल केलेल्‍या “ महाराष्‍ट्र शासनाचे परिपत्रक ” या दस्‍तावरुन समजते.  त्‍यामुळे, अशी बियाण्‍यांच्‍या सत्‍यतादर्शक लेबल संबंधीची तक्रार ग्राहक मंचात दाखल करणे योग्‍य राहणार नाही, असे मंचाचे मत आहे.

12.      विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी दाखल केलेल्‍या दस्‍तांवरुन वादातील बियाण्‍यांची उगवण क्षमता, त्‍यांच्‍या ठरलेल्‍या परिमानानुसार, शासनाच्‍या प्रयोगशाळेत सिध्‍द् झालेली आहे असे दिसते, त्‍यामुळे अशा परिस्थितीत तक्रारकर्तीची प्रार्थना मंजूर करता येणार नाही. सबब, तक्रार खारीज करण्‍यात येते.   

                    - अं‍तिम आदेश -

1)     तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्‍यात येते.                 

2)     न्‍यायीक खर्चाबाबत कोणतेही आदेश पारीत नाही.

3)     उभयपक्षकारांना सदर आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात याव्‍या.

                       

 
 
[HON'BLE MRS. S.M. Untawale]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. R.K.Patil]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.