Maharashtra

Akola

CC/15/12

Dr.Amol Pratapsing Narwal - Complainant(s)

Versus

Proprietor,Celullar Concept Mobile Shop - Opp.Party(s)

Self

01 Sep 2015

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Akola ( Maharashtra )
District Consumer Disputes Redressal Forum Akola ( M.S.)
 
Complaint Case No. CC/15/12
 
1. Dr.Amol Pratapsing Narwal
Behind Govt. Godown,Dhobi Khadan,Akola
Akola
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Proprietor,Celullar Concept Mobile Shop
Lokmat Bhawan, Ramdaspeth, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. S.M. Untawale PRESIDENT
 HON'ABLE MRS. Bharati Ketkar MEMBER
 HON'ABLE MR. Shri Kailas Wankhade MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

::: आ दे श :::

( पारीत दिनांक : 01/09/2015 )

आदरणीय अध्‍यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार

1.        ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …

         तक्रारकर्त्याने दि. 24/4/2014 रोजी सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन, ज्याचा आयएमइआय नं. 359843-05-045618-5, 359844-05-045618-3, ज्याचे उत्पादक विरुध्दपक्ष क्र. 2 असून विरुध्दपक्ष क्र. 1 च्या दुकानातुन कॅश मेमो नं. 104662 नुसार खरेदी केला. खरेदी केल्यापासून दोन महिन्याच्या आंत त्यात वेगवेगळे दोष आढळून आले.  ह्या समस्या तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 3 सर्व्हीस सेंटर, यांच्या निदर्शनास आणून दिल्या व खराब चार्जर बदलवून द्यावा, अशी विनंती केली,  परंतु पुर्ण तोडमोड होईपर्यंत चार्जर बदलून देण्यास विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी नकार दिला.  दिवसेंदिवस मोबाईलची समस्या वाढत गेल्या व तो मोबाईल थोडावेळ वापरल्यावर सुध्दा गरम होत होता.  त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 3 कडे जावून मोबाईल फोन दुरुस्ती करण्यास  दि. 7/11/2014 रोजी वर्क ऑर्डर क्र. 39198 नुसार दिला.  दुस-या दिवशी दुरध्वनीद्वारे विरुध्दपक्ष क्र. 3 शी संपर्क साधला असता, त्यांनी दुरुस्ती खर्च रु. 1200/- सांगितला.  तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्र. 3 कडे गेला असता आय.सी. शॉर्ट झाली असे समजुन आले.  दोन दिवसानंतर जेंव्हा तक्रारकर्त्याने विचारणा केली असता, त्याला दुरुस्ती खर्च रु. 9500/- सांगण्यात आला व मोबाईलचे मदरबोर्ड बिघडल्याचे सांगण्यात आले.  सदर मोबाईल वारंटी कालावधी मध्ये असल्यामुळे तक्रारकर्त्याने सदर मोबाईल विनाखर्च दुरुस्ती करुन देण्याची विनंती केली असता, विरुध्दपक्ष क्र. 3 ने, लिक्वीड डॅमेज सांगून, नकार दिला.  जेव्हा तक्रारकर्त्याने वस्तुस्थिती जाणुन घेण्यासाठी खर्चाचा अंदाज मागुन घेतला असता, मदरबोर्ड बदलण्याचा खर्च रु. 7830/- चे जवळपास असल्याचे निदर्शनास आले,  यात तक्रारकर्त्याची फसवणुक करण्यात आली.  सदर मोबाईल मध्ये कोणत्याही प्रकारचे लिक्वीड डॅमेज झालेले नसून मोबाईल सर्व्हीस सेंटरमध्ये जमा करतांना वर्कींग कंडीशन मध्ये होता.  या सर्व बाबींमुळे तक्रारकर्त्यास  मानसिक, शारीरिक त्रास झाला.  तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, मोबाईल फोनची किंमत रु. 15000/-, 18 टक्के व्याज दरासह परत मिळावी.  तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु. 20,000/- व तक्रार खर्च रु. 1000/- देण्यात यावा.

               सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 05 दस्‍तऐवज पुरावे म्हणून  जोडण्‍यात आले आहेत.

विरुध्‍दपक्ष  क्र. 1 यांचा लेखीजवाब :-

2.        विरुध्दपक्ष क्र. 1  यांना सदर प्रकरणाची नोटीस बजावणी झाल्यानंतर सुध्दा  ते या प्रकरणात हजर झाले नाही.  त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 विरुध्द सदर प्रकरण “एकतर्फी” चालविण्याचा आदेश मंचाने पारीत केला.

 

 

विरुध्‍दपक्ष  क्र. 2 यांचा लेखीजवाब :-

3.   सदर तक्रारीचे अनुषंगाने, विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांनी आपला   लेखीजवाब,   शपथेवर दाखल केला  त्यानुसार तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल करुन  असे नमुद केले आहे की,…

      सदर मोबाईल हा पाण्यामुळे खराब झालेला आहे.  वारंटी कार्ड मधील अटी व शर्ती प्रमाणे पाण्यामुळे खराब झालेला मोबाईल वारंटी मध्ये येत नाही.  याबाबत विरुध्दपक्ष क्र. 2 ने तक्रारकर्त्याला त्वरीत सांगितले की, सदर मोबाईल पाण्यामुळे खराब झाला आहे सदर मोबाईलचे  PBA GH 82-07286A (Printed Board Assembly) हे पाण्यामुळे खराब झाले आहे.  इन्स्ट्रक्शन मॅन्युअल मध्ये स्पष्ट नमुद आहे की, सदर मोबाईल हा वॉटर रेसीस्टंट नाही.  सदर मोबाईल मध्ये कसल्याही प्रकारचा उत्पादन दोष नाही व सदर मोबाईल तक्रारकर्त्याच्या चुकीमुळे व पाण्याने खराब झालेला आहे.  विरुध्दपक्ष क्र. 2 ने वारंटी प्रमाणे तक्रारकर्त्यास विनामुल्य सेवा वेळेवर दिली आहे.  विरुध्दपक्ष क्र. 3 ने तक्रारकर्त्यास दुरुस्तीचे रु. 7830/- चे इस्टीमेट दिले होते.  सदर मोबाईल हा लिक्वीड डॅमेज, पाण्यामुळे खराब झाला आहे हे दर्शविण्याकरिता सदर मोबाईलचे छायाचित्र यासोबत जोडले आहे.  सदर तक्रार दाखल करण्याचे कारण कधीच उद्भवलेले नाही व वॉरंटीच्या अटी प्रमाणे अर्जदार व गैरअर्जदार क्र. 3  मधील कोणताही वाद हा फक्त दिल्लीतील कोर्टात चालु शकतो,  त्यामुळे सदर तक्रार मा. मंचासमक्ष चालू शकत नाही.  त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार योग्य तो दंड आकारुन खारीज करण्यात यावी. 

विरुध्‍दपक्ष  क्र. 3 यांचा लेखीजवाब :-

4.        सदर तक्रारीचे अनुषंगाने,विरुध्‍दपक्ष क्र. 3 यांनी आपला   लेखीजवाब,   शपथेवर दाखल केला  त्यानुसार तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल करुन विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्या जबाबाप्रमाणेच बचावाचे कथन केलेले आहे.

::: का र णे  व  नि ष्‍क र्ष :::

5.     तक्रारकर्त्याची तक्रार,   विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांचा स्वतंत्र लेखी जवाब,  उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज व   उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद, यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देऊन पारीत केला तो येणे प्रमाणे –

       तक्रारकर्ते यांची तक्रार अशी आहे की, त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 उत्पादीत सॅमसंग कंपनीचा मोबाईल विरुध्दपक्ष क्र. 1 च्या दुकानातून खरेदी केला होता,  दोन महिन्याच्या आतच त्यात वेगवेगळे दोष आढळून आले,  मोबाईल गरम होत होता, त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 3 कडे तो दुरुस्ती करीता टाकला असता,  त्यांनी दुरुस्त खर्च रु. 1200/- सांगितले.   वास्तविक मोबाईल वॉरन्टी कालावधीत होता.   मोबाईलची आय.सी. शॉर्ट झाली, असे सांगत, नंतर विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी तो खर्च रु. 9500/- सांगितला,  तसेच मदरबोर्ड बिघडल्याचे सांगितले,  तो लिक्वीड डॅमेज सांगुन विनाखर्च दुरुस्तीस नकार दिला.  जेव्हा तक्रारकर्त्याने खर्चाचा अंदाज घेतला, तेंव्हा मदरबोर्ड बदलण्याचा खर्च रु. 7830/- सांगितला गेला.  परंतु तक्रारकर्त्याचा मोबाईल विरुध्दपक्षाकडे जमा करतांना तो वर्कींग कन्डीशन मध्ये होता.  त्यामुळे विरुध्दपक्षाकडून मोबाईल फोनची किंमत सव्याज व इतर नुकसान भरपाई मिळावी.

     यावर, विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांनीच फक्त युक्तीवाद केला.  कारण विरुध्दपक्ष क्र. 1  यांना मंचाची नोटीस बजाविल्यानंतर देखील ते प्रकरणात गैरहजर राहीले, सबब विरुध्दपक्ष क्र. 1 विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्यात यावे, असे आदेश मंचाने पारीत केले होते.  विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांच्या युक्तीवादानुसार असे आहे की, तक्रारकर्त्याच्या मोबाईलमध्ये खरेदी दिनांकापासून दोनच महिन्यात वेगवेगळे दोष आले, हे खरे नाही,  कारण तक्रारकर्ता दि. 7/11/2014 पर्यंत विरुध्दपक्षाकडे कधीही आला नव्हता व कसलीही तक्रार केली नव्हती.  तक्रारकर्त्याचा मोबाईल पाण्याने खराब झाला आहे व वॉरन्टी कार्ड मधील अटी व शर्ती प्रमाणे पाण्यामुळे खराब झालेला मोबाईल वॉरन्टी मध्ये येत नाही.  मोबाईल वॉटर रेसीस्टंट नाही व पाण्यामुळे मोबाईलचे  Printed Board Assembly  खराब झाले आहे व हा उत्पादीत दोष होत नाही.  तसेच  Instruction Manual  मध्येही नमुद आहे की, सदर मोबाईल वॉटर रेसीस्टंट नाही,  म्हणून तो वारंटी मध्ये येत नाही,  म्हणून तो दुरुस्त करण्यास खर्च रु. 7830/- येणार होता व यात  कोणतीही सेवेतील न्युनता येत नाही. 

     अशा प्रकारे उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मंचाच्या मते असे आहे की, तक्रारकर्त्याने सदर मोबाईल दि. 24/4/2014 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 कडून खरेदी केला होता,  तो विरुध्दपक्ष क्र. 2 कडील उत्पादीत होता,  त्यामुळे तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3  यांचा ग्राहक आहे व या बद्दल विरुध्दपक्षाचा पण वाद नाही.  रेकॉर्डवर तक्रारकर्त्याने दि. 7/11/2014 ची Work Order  ची प्रत दाखल केली आहे,  त्यावरुन असे दिसते की, तक्रारकर्त्याने सदर मोबाईल  बरेच महिने विना तक्रार वापरला होता व दि. 7/11/2014 ची तक्रार अशी होती, Heating Problem, Phone Auto On/Off, Battery back-up. Touch Problem  ई.  व सदर तक्रारीचे निवारण करणेसाठी तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्त  “विरुध्दपक्षाकडील दि. 20/11/2014 चे  Estimate प्रत,” यावरुन असा बोध होतो की, विरुध्दपक्षाने सदर मोबाईलचा Mother Board Replace  करणेकरिता खर्च रु. 7830/- रकमेचे इस्टीमेट तक्रारकर्त्याला दिले होते.  तक्रारकर्त्याच्यामते मोबाईल वॉरंन्टी कालावधीत असल्यामुळे तो विनामुल्य दुरुस्त होणे भाग आहे.  परंतु विरुध्दपक्षाने या दुरुस्तीचा खर्च पहीले रु. 1200/-, रु. 9500/- व नंतर 7830/- रुपये सांगितला.  विरुध्दपक्षाच्या मते त्यांनी सदर मोबाईल जेंव्हा दुरुस्ती करिता त्यांच्या  Technical Team कडून तपासला, तेंव्हा तो  Liquid Logged  झाला आहे, असा आढळला, म्हणजे मोबाईल पाण्यामुळे खराब झाला होता.  विरुध्दपक्षाने सांगितलेला हा दोष मोबाईल मध्ये आहे का ? हे पाहण्याकरिता रेकार्डवर तक्रारकर्त्याने, “सदर मोबाईल विरुध्दपक्षाने मंचासमोर सादर करावा व त्याची तपासणी तज्ञ व्यक्तीकडून करुन घ्यावी,” असा अर्ज दाखल केला होता,  परंतु नंतर तो अर्ज तक्रारकर्त्याने  Not press  केला, तरी युक्तीवादाच्या दिवशी मंचाने विरुध्दपक्षाचे  Branch Service Head  श्री रुपक इंगळे यांना मोबाईल तपासणी बद्दलचे मत विचारण्यास विरुध्दपक्षाद्वारे मंचात बोलाविले होते व विरुध्दपक्षाला सदर मोबाईल मंचात घेवून येण्याबद्दल  सांगितले होते,  त्या प्रमाणे मंचासमक्ष तक्रारकर्त्याने मोबाईलचा मॉडेल नंबर पाहून, तो त्याचाच आहे, असे सांगितल्यावरुन मंचाने तो मोबाईल  श्री इंगळे यांना दाखवून त्याबद्दल मत देण्यास सांगितले असता, त्यांनी देखील असे मत व्यक्त केले की, सदर मोबाईल पाण्यामुळे खराब झालेला आहे व त्यातील Litmus paper  हा Pink  रंगाचा झालेला दिसून आला.  सदर इंगळे यांच्या या मताला नकारार्थी मत रेकॉर्डवर तक्रारकर्त्यातर्फे देण्यात आले नाही,  त्यामुळे मंचाने श्री इंगळे यांचे मत स्विकारले आहे.  विरुध्दपक्षाने दाखल केलेले दस्तऐवज, जसे की,  Instruction Manual ची प्रत, यावरुन असे दिसते की, तक्रारकर्त्याला मोबाईल घेते वेळीच सदर मोबाईल हा वॉटर रेसीस्टन्ट नाही, असे माहीत होते,  त्यामुळे सदर दोषाकरिता विरुध्दपक्ष जबाबदार राहत नाही, असेही त्यात नमुद आहे. शिवाय मोबाईल बिल वरुन, फक्त  Handset ची वॉरन्टी ही एका वर्षाची होती, असे देखील दिसते,  त्यामुळे सदर मोबाईल मधील  हा दोष उत्पादीत नव्हता, या निर्णयाप्रत सदर मंच आले आहे,  म्हणून तक्रारकर्ते यांची प्रार्थना मंजुर करता येणार नाही.  तक्रारकर्ते यांनी सदर मोबाईल  मंचासमक्ष दि. 6/8/2015 रोजी विरुध्दपक्षाकडून स्विकारला व त्यानंतर पुन्हा असा अर्ज केला की, सदर मोबाईल बंद अवस्थेत आहे,  त्याचे  Main Menu Button Change  करण्यात आले, Primary Camera नाही,  Mobile Back Cover  नाही. परंतु सदर दोष हे या तक्रारीत पाहता येणार नाही,  त्याकरिता वेगळी तक्रार दाखल करण्यास ते कारणे होवू शकतात, असे मंचाचे मत आहे.  सबब अंतिम आदेश पारीत केला तो येणे प्रमाणे. 

                              :::अं ति म  आ दे श:::

  1. तक्रारकर्ते यांची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
  2. न्यायिक खर्चाबाबत कोणतेही आदेश पाहीत नाही.
  3. सदर आदेशाच्‍या प्रती उभयपक्षांना निशुल्‍क देण्‍यात याव्‍या. 
 
 
[HON'ABLE MRS. S.M. Untawale]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Bharati Ketkar]
MEMBER
 
[HON'ABLE MR. Shri Kailas Wankhade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.