अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नागपूर. |
दाखल दिनांक : 26/03/2008 पारीत दिनांक : 26/08/2008 तक्रार प्रकरण क्रमांक : 54/2008 तक्रारदार:– विजय देवरावजी वरघने, वय अंदाजे वर्षे, धंदा-काही नाही, मु.बुरांडे लेआऊट, आर्वी नाका, वर्धा, ता.जि.वर्धा. विरुध्द गैरअर्जदार:– प्रोप्रायटर, श्री. दत्ता टुर्स अँड ट्रॅव्हल्स, बुधवारी पेठ, सुभाष चौक काटोल, ता.काटोल,जि.नागपूर. गणपुर्ती:– श्रीमती गीता बडवाईक, मा.प्र.अध्यक्षा श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या उपस्थिती:– तक्रारदारातर्फे वकील श्री.एच.एम.बोबडे गैरअर्जदार -- गैरहजर (आदेश पारीत द्वारा- श्रीमती गीता बडवाईक, मा.प्र.अध्यक्षा) नि का ल प त्र (पारीत दिनांक – 26 ऑगस्ट, 2008) तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटीबाबत मंचामध्ये दाखल केल्यामुळे मंचाला ही तक्रार चालविण्याचा अधिकार आहे. ...2/- ...2... तक्रार क्रमांक 54/08 2) गैरअर्जदार ही ट्रॅव्हल्स कंपनी असून तिचे कार्यालय काटोल, जि. नागपूर येथे आहे. तक्रारदाराच्या बहिनीचे लग्न दिनांक 26/4/2007 ला वर्धा येथे असल्यामुळे लग्नाची वरात ठाणेगांव येथून वर्धा येथे आणण्यासाठी दिनांक 14/2/2007 ला प्रवासी वाहन भाड्याने घेण्याचा करार गैरअर्जदारासोबत केला व सदर प्रवासी वाहनाचे भाडे रुपये 6,500/- असून, तक्रारदाराने त्याच दिवशी आगाऊ रक्कम रुपये 4,000/- गैरअर्जदाराकडे जमा केली व उर्वरित रकमेपैकी रुपये 2,000/- गैरअर्जदाराकडे पुन्हा जमा करुन शिल्लक रक्कम रुपये 500/- प्रवासाच्या दिवशी प्रवास सुरु होण्याचे आधी देण्याचे कबूल केले. 3) दिनांक 26/4/2007 ला प्रवासाच्या दिवशी सकाळी 4-00 वाजता प्रवासी वाहन ठाणेगाव येथून वर्धा येथे प्रवाश्यांना आणण्यासाठी पोचले नाही. तसेच गैरअर्जदाराने तक्रारदारास कळविले की, ते वाहन पाठविण्यास असमर्थ आहेत. गैरअर्जदाराने वाहन न पाठविल्यामुळे तक्रारदारची त्याचे नातेवाईकांसमोर नामुष्की झाली व त्याच्या पाहुणे मंडळींची गैरसोय झाली. त्यामुळे वरातीची गैरसोय टाळण्या करीता तक्रारदाराने वेळेवर वर्धा येथील नूरी ट्रॅव्हल्स कंपनीच्या तीन प्रवासी गाड्या भाड्याने घेऊन वर्धेवरुन ठाणेगाव येथे पाठविल्या. गैरअर्जदाराने करार करुनही सदर कराराचे पालन केले नाही या गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटीसाठी तक्रारदाराने सदर तक्रार मंचासमोर दाखल केली आहे. 4) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ दस्ताऐवज अनुक्रमे पृष्ठ्य क्र.9 ते 20 वर दाखल केले आहेत. 5) तक्रारदाराची तक्रार नोंदणी करुन मंचाने गैरअर्जदारावर नोटीसची तामीली केली, परंतू गैरअर्जदाराने मंचाची नोटीस घेण्यास टाळाटाळ केली. गैरअर्जदार ...3/- ...3... तक्रार क्रमांक 54/08 मंचासमोर अनुपस्थित राहिला व त्यांचे लेखी म्हणणे सुध्दा सादर केले नाही. 6) तक्रारदाराची तक्रार व त्याने दाखल केलेले सर्व दस्ताऐवज यावरुन मंचासमोर खालील प्रश्न उपस्थित होतात. अ.क्र. | प्रश्न | निर्णय | 01. | तक्रारदाराची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय ? | होय | 02. | या तक्रारीचा अंतीम आदेश काय ? | कारणमिमांसेप्रमाणे |
का र ण मि मां सा 7) तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार व दस्ताऐवजांवरुन असे निदर्शनास येते की, तक्रारदाराच्या बहिणीचे लग्न वर्धा येथे दिनांक 26/4/2007 ला सकाळी 10-55 वाजता होते, तर लग्नाची वरात ही ठाणेगाव येथून येणार होती. त्या लग्नाची वरात आणण्यासाठी तक्रारदाराने गैरअर्जदाराचे प्रवासी वाहन भाड्याने घेण्याचा करार दिनांक 14/2/2007 ला रुपये 6,500/- केला असून गैरअर्जदाराकडे रुपये 6,000/- जमा केले होते व उर्वरित रक्कम रुपये 500/- प्रवास सुरु होण्याचे आधी घेण्याचे मान्य करुनही गैरअर्जदाराने दिनांक 26/4/2007 ला वरात आणण्या साठी प्रवासी वाहन पाठविले नाही व पाहुणे मंडळींसमोर तक्रारदाराला अपमान सहन करावा लागला. त्याचप्रमाणे वेळेवरच तक्रारदारास वर्धा येथून जादा वाहने भाड्याने घेऊन ठाणेगाव येथे आणावी लागली. त्यामुळे तक्रारदाराला जास्तीचा खर्च सहन करावा लागला असून शारीरिक व मानसिक त्रास सुध्दा सहन करावा लागला. 8) गैरअर्जदाराने तक्रारदारासोबत करार करुनही कराराचे पालन केले नाही ...4/- ...4... तक्रार क्रमांक 54/08 ही गैरअर्जदाराची सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. करीता तक्रारदाराची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. करीता हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आ दे श 1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदारानी तक्रारदारास रुपये 6,000/- (रुपये सहा हजार फक्त) 7% व्याजासह परत करावी. व्याजाची आकारणी दिनांक 26/4/2007 पासून ते रक्कम तक्रारदारास मिळेपर्यंत करण्यात यावी. 3) गैरअर्जदार यांनी तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी रक्कम रुपये 3,000/- (रुपये तीन हजार फक्त) व तक्रारखर्चाबाबत रक्कम रुपये 2,000/- (रुपये दोन हजार फक्त) द्यावी. सदर आदेशाची पूर्तता गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत पूर्ण करावी. (जयश्री येंडे) (गीता बडवाईक) सदस्या प्र.अध्यक्षा अति.जिल्हा ग्राहक मंच नागपूर.
......................Mrs. Geeta Badwaik ......................Mrs. Jayashri Yende | |