अर्जदाराने सदरची तक्रार, गैरअर्जदाराचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. अर्जदाराने, गै.अ.कडून मनोब्लॉक पंप एच.पी. विकत घेतला होता, तो वॉरंटी कालावधीत बिघाड आल्यामुळे दुरुस्त करुन मागितले, परंतु दुरुस्त करुन दिले नाही व योग्य प्रकारे सेवा दिली नाही, म्हणून सदर तक्रार गैरअर्जदाराचे विरुध् दाखल केली आहे. तक्रार नोंदणी करुन गै.अ.स नोटीस काढण्यात आले. गै.अ. हजर होऊन अर्जदाराच्या तक्रारीतील मजकूर मान्य करुन, नवीन पंप व गॅरंटी देण्यास तयार आहे, असा अर्ज नि.7 नुसार दि.11.1.2011 रोजी दाखल केला होता. अर्जदाराने, आज हजर होऊन नि.9 नुसार पुरसीस दाखल केली. सदर पुरसीस मध्ये गै.अ.यांनी नवीन किर्लोस्कर कंपनीचा मोनोब्लॉक पंप 1 एच.पी. बदलवून देण्यात आलेला आहे, आणि जुना पंप अर्जदाराने गै.अ.स परत केलेला आहे. गै.अ.ने, अर्जदारास रुपये 5000/- नुकसान भरपाई व शारीरीक, मानसीक ञासापोटी नगदी देत आहे, म्हणून अर्जदार सदर मामला गै.अ.चे विरुध्द पुढे चालवायचे नाही, अशी पुरसीस अर्जदाराने आपले सही व वकीलाचे सहीनिशी दाखल केले. गैरअर्जदारातर्फे प्रतिनीधी बंटी कानकाटे याची त्यावर सही आहे. अर्जदाराने पुरसीस मधील मजकूर मान्य करुन तक्रार गै.अ.चे विरुध्द पुढे चालवायचे नाही, असे सांगितल्यामुळे, तसेच अर्जदार व गै.अ. यांच्यातील वाद मिटलेला असल्याने तक्रार अंतिमतः निकाली काढून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश // (1) अर्जदाराने तक्रार परत घेतल्यामुळे निकाली. (Complaint disposed off by way of withdrawal) (2) अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपआपला खर्च सहन करावा. (3) उभयतांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
| [HONABLE MR. Sadik M. Zaveri] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT[HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER | |