Maharashtra

Thane

CC/576/2014

Mr. Ramdas S Dhaygude - Complainant(s)

Versus

Prop/Manager M/s. Teknika Electronics - Opp.Party(s)

__

26 Oct 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/576/2014
 
1. Mr. Ramdas S Dhaygude
At. Sarvoday Garden chs, Building No -2,Flat No 503,Behind Bhanu Sagar Theatre, Kalyan west 421301
Thane
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Prop/Manager M/s. Teknika Electronics
At .Shop No 7, Regency Avenue, Syndicate,Murbad Rd, Klayan west 421301
Thane
Maharashtra
2. Enginer Mr Jagdish Toke M/s. Teknika Electronics
At. Shop No 7, Regency Avenue, Syndicate, Murbad Rd,Kalyan west 421301, Dist Thane
Thane
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER
 

      न्‍यायनिर्णय   

               (द्वारा श्री. ना.द.कदम -मा.सदस्‍य)

 

  1.         सामनेवाले क्र. 1 हे मे. टेकनिका इलेक्‍ट्रॉनिक्‍स या संस्‍थेचे मालक आहेत. सदर संस्‍था ही सोनी टी.व्‍ही. यांचे अधिकृत सर्व्‍हीस सेंटर आहे. सामनेवाले क्र. 2 हे सामनेवाले क्र. 1 यांचे अभियंता आहेत. तक्रारदार कल्‍याण येथील रहिवाशी आहेत. तक्रारदारांनी आपला एल.ई.डी. टी.व्‍ही. दुरुस्‍त करण्‍यासाठी सामनेवाले क्र. 1 यांना विनंती केली असता, सामनेवाले यांनी तक्रारदाराच्‍या टी.व्‍ही. दुरुस्‍त करण्‍यासाठी कोणतीही कृती दीर्घकाळ न केल्‍याने प्रस्‍तुत वाद निर्माण झाला आहे.

 

  1.       तक्रारदारांच्‍या तक्रारीमधील कथनानुसार त्‍यांचा टी.व्‍ही. बंद पडल्‍याने सोनी टी.व्‍ही.चे अधिकृत सर्व्‍हीस सेंटर सामनेवाले क्र. 1 यांचेकडे तक्रार केली. सामनेवाले क्र. 1 यांनी सामनेवाले क्र. 2 यांना तक्रारदारांच्‍या नादुरुस्‍त टी.व्‍हीची पाहणी करुन योग्‍य ती कार्यवाही करण्‍यासाठी नेमले. सामनेवाले क्र. 2 हे दि. 04/10/2013 रोजी तक्रारदारांच्‍या घरी येऊन तक्रारदाराच्‍या एल.ई.डी. टी.व्‍ही. ची पाहणी केली. पाहणी करतांना सामनेवाले क्र. 2 यांनी एल.ई.डी. टी.व्‍ही. स्क्रिन जमिनीच्‍या दिशेने खाली ठेवला व टी.व्‍ही. मधील 2 पार्टस् त्‍यांनी काढून घेतले. शिवाय सदर पार्टस् चे टेस्‍टींग करण्‍यासाठी रु. 200/- तक्रारदारांकडून घेतले. मात्र सामनेवाले क्र. 2 यांनी तक्रारदारांच्‍या टी.व्‍ही.तील घेतलेले 2 पार्टस् तसेच रु. 200/- ची कोणतीही पावती अथवा पोच तक्रारदारांना दिली नाही. यानंतर तक्रारदारांनी दि. 02/12/2013 व दि. 05/12/2013 रोजी सामनेवाले यांना मोबाईलद्वारे एस.एम.एस. पाठवून योग्‍य ती कार्यवाही करण्‍याची विनंती केली. परंतु त्‍यांनी कोणताहीइ प्रतिसाद न दिल्‍याने तक्रारदारांनी दि. 15/02/2014 रोजी नोटीस पाठवून तक्रारदारांच्‍या टी.व्‍ही.चे काढलेले पार्टस् त्‍यांच्‍याकडून घेतलेले रु. 200/- यांची पोच देण्‍याची मागणी केली. शिवाय, टी.व्‍ही. इन्‍स्‍पेक्‍शन रिपोर्ट देण्‍याची विनंती केली. यानंतर सामनेवाले यांनी  टी.व्‍ही.ची दुरुस्‍ती करण्‍यासाठी रु. 17,450/- इतक्‍या रकमेचे अंदाजपत्रक तक्रारदारांना दि. 21/02/2014 रोजीच्‍या पत्रान्‍वये दिले. त्‍यावर तक्रारदारांनी दि. 15/03/2014 रोजी पत्र पाठवून तक्रारदारांच्‍या टी.व्‍ही.स झालेले नुकसान हे सामनेवाले क्र. 2 यांच्‍या निष्‍काळजीपणामुळे झाले असल्‍याने तक्रारदारांनी नविन एल.ई.डी. टी.व्‍ही. मिळावा अशी मागणी केली.  सामनेवाले यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्‍याने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन सामनेवाले क्र. 1 व 2 यांना जबाबदार धरुन त्‍यांच्‍याकडून टी.व्‍ही. किंमत रु. 44,300/-, 12% व्‍याजासह मिळावी, तक्रारदारांना झालेल्‍या शारिरीक, मानसिक त्रासाबद्दल रु. 3,75,000/- मिळावे व तक्रार खर्चाबद्दल रु. 25,000/- मिळावेत अशा मागण्‍या केल्‍या आहेत.

 

  1.        सामनेवाले यांना पाठविण्‍यात आलेली तक्रारीची नोटीस ‘Refused’ या पोष्‍टल शे-यासह परत आल्‍याची बाब मंचाने नोंद केली. सामनेवाले यांना न्‍यायाच्‍यादृष्‍टीने दि. 03/03/2015 रोजी कैफियत दाखल करणेकामी संधी देण्‍यात आली. परंतु सदर दिवशी सामनेवाले गैर‍हजर राहिल्‍याने प्रकरण त्‍यांच्‍याविरुध्‍द एकतर्फा चालविण्‍याचे आदेश मंचाने पारीत केले. यानंतर तक्रारदारांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्‍तीवाद दाखल केला. तक्रारदारांनी तक्रारीसंदर्भात दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचे वाचन मंचाने केले. तक्रारदारांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

 

  1.        तक्रारदारांच्‍या तक्रारीसंदर्भात सामनेवाले क्र. 1 व 2 यांना बराच काळ संधी देऊनही त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले नाही. त्‍यामुळे दि. 03/03/2015 रोजी तक्रार एकतर्फा चालविण्‍याचे आदेश करण्‍यात आले. सबब, तक्रारदारांची तक्रारीमधील बरीचशी कथने अबाधित राहतात.

 

  1.        तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचे वाचन मंचाने केले. त्‍यावरुन प्रकरणामध्‍ये खालीलप्रमाणे निष्‍कर्ष निघतातः

 

  1.       तक्रारदारांनी दि. 01/10/2013 रोजी एल.ई.डी. टी.व्‍ही. “नो पॉवर ऑनमुळे” बंद पडल्‍याने सामनेवाले क्र. 1 यांना फोन करुन टी.व्‍ही. दुरुस्‍त करण्‍याची विनंती केली. सामनेवाले क्र. 1 यांनी त्‍यांच्‍या संस्‍थेतील अभियंता श्री. जगदीश टोके सामनेवाले क्र. 2 यांना तक्रारदारांच्‍या घरी टी.व्‍ही.ची पाहणी करण्‍यासाठी दि. 04/10/2013 रोजी पाठविले.

 

  1.       सामनेवाले क्र. 2 यांनी तक्रारदारांच्‍या घरातील नादुरुस्‍त टी.व्‍ही.ची पाहणी केली. शिवाय पाहणीअंती तक्रारदारांच्‍या टी.व्‍ही.मधील  2 पार्टस् टेस्‍टींगसाठी घेत असल्‍याचे तक्रारदारांना सांगितले. तसेच टेस्‍टींगसाठी तक्रारदारांकडून रु. 200/- घेतले. मात्र या बाबींची लिखित नोंद सामनेवाले क्र. 2 यांनी दिली नाही.

 

  1.         तक्रारदारांनी टी.व्‍ही.चा इन्‍स्‍पेक्‍शन रिपोर्ट, रक्‍कम व पार्टस् ची पोच मिळण्‍याबाबत सामनेवाले यांना  वेळोवेळी दुरध्‍वनीद्वारे संपर्क साधला. परंतु त्‍यांना सामनेवालेकडून प्रतिसाद न मिळाल्‍याने दि. 02/12/2013 व दि. 05/12/2013 रोजी दोन एस.एम.एस. केले. तरीसुध्‍दा त्‍यांना प्रतिसाद न मिळाल्‍याने तक्रारदारांनी दि. 15/02/2014 रोजी प्रकरणाची सविस्‍तर माहिती देणारे पत्र पाठविले. त्‍यावर सामनेवाले यांनी लगेचच दि. 21/02/2014 रोजी प्रत्‍युत्‍तर देऊन तक्रारदारांकडून रु. 200/- व नादुरुस्‍त टि.व्‍ही. चा पी.सी.बी. सामनेवाले यांना मिळाल्‍याचे मान्‍य केले. त्‍याबरोबरच तक्रारदारांच्‍या टी.व्‍ही.ची दुरुस्‍ती  करण्‍यासाठी रु. 17,250/- इतक्‍या खर्चाचे अंदाजपत्रक दिले. परंतु तक्रारदारांनी  दि. 15/03/2014 रोजीच्‍या पत्रान्‍वये तक्रारदारांच्‍या टी.व्‍ही.चे नुकसान सामनेवाले क्र. 2 यांच्‍या निष्‍काळजीपणामुळे झाले असल्‍याने त्‍यांच्‍या जुन्‍या टी.व्‍ही.च्‍या बदल्‍यात तशाच प्रकारचा नविन टी.व्‍ही. मिळावा अशी मागणी केली आहे.

 

 (ड)      तक्रारदारांच्‍या नविन टी.व्‍ही. मिळण्‍याच्‍या मागणीसंदर्भात असे नमूद    

     करावेसे वाटते की दि. 01/10/2013 रोजी तक्रारदारांचा टी.व्‍ही. “नो पॉवर ऑनमुळे” या दोषामुळे नादुरुस्‍त अवस्‍थेत होता. त्‍यामुळे तक्रारदारांनी सामनेवाले क्र. 1 यांची टी.व्‍ही. दुरुस्‍ती साठी सेवा घेतली. सामनेवाले क्र. 2 या इंजिनिअरने टी.व्‍ही.ची पाहणी दि. 04/10/2013 रोजी केली. मात्र त्‍यावेळी सामनेवाले क्र. 2 यांनी टी.व्‍ही.ची तपासणी करतांना टी.व्‍ही.चा स्क्रिन जमिनीच्‍या दिशेने खाली ठवला व या कृतीमुळे टी.व्‍ही.चे नुकसान झाले असा तक्रारदारांचा आरोप आहे. तथापि, तक्रारदारांनी आपल्‍या सदरील कथनाच्‍यासंदर्भात कोणताही पुराववा अथवा टी.व्‍ही. मेकॅनिक/अभियंता अशा तज्ञांचे अभिप्राय सादर केले नाहीत. मूळतः तक्रारदारांचा टी.व्‍ही. “नो पॉवर ऑनमुळे” बंद पडला होता ही बाब तक्रारदारांनी स्‍वतः मान्‍य केली आहे. शिवाय सामनेवाले क्र. 2 यांच्‍या निष्‍काळजीपणामुळे तक्रारदारांच्‍या टी.व्‍ही.चे जास्‍तीचे नुकसान झाले याबाबत कोणताही पुरावा तक्रारदारांनी दाखल केला  नसल्‍याने तक्रारदारांचे सदरील कथन मान्‍य करता येत नाही.

 

 (इ)     तथापि, तक्रारदारांचा टी.व्‍ही. दि. 04/10/2013 रोजी तपासल्‍यानंतर सामनेवाले क्र. 2 यांनी तक्रारदारांना टी.व्‍ही.चे दोन पार्टस् काढून घेतल्‍याची पोच व तक्रारदारांकडून रु. 200/- घेतल्‍याची पोच दिली नाही ही बाब सामनेवाले यांनी दि. 21/02/2014 रोजीच्‍या पत्रान्‍वये 4 महिन्‍यांनंतर मान्‍य केली आहे. शिवाय, दि. 04/10/2014 रोजी खोलून त्‍यानंतर योग्‍य वेळेत तक्रारदारांना टी.व्‍ही. दुरुस्‍तीबाबत कोणताही प्रतिसाद न देता 4 महिन्‍यांनंतर, तेसुध्‍दा, तक्रारदारांच्‍या सातत्‍याच्‍या पाठपुराव्‍यामुळे देण्‍यात आला. यावरुन सामनेवाले क्र. 1 व 2 हे तक्रारदारांच्‍या टी.व्‍ही. दुरुस्‍तीबाबत गंभीर नव्‍हते ही बाब स्‍पष्‍ट होते. टी.व्‍ही. ची तपासणी केल्‍यानंतर  लगेचच काही दिवसांत तपासणी अहवाल/अंदाजपत्रक न देता ते 4 महिन्‍यांच्‍या दीर्घ कालावधीनंतर दिल्‍याचे उपलब्‍ध कागदपत्रांवरुन स्‍पष्‍ट होते. म्‍हणजेच तक्रारदारांचा टी.व्‍ही. 4 महिन्‍यांपेक्षा जास्‍त काळ डिसमेंटल अवस्‍थेत होता. त्‍यामुळे तक्रारदारांना आपल्‍या टी.व्‍ही.चा उपभोग दीर्घकाळ करुन न देण्‍यास सामनेवाले यांची अक्षम्‍य दिरंगाई कारणीभूत असल्‍याचे उपलब्‍ध कागदपत्रांवरुन स्‍पष्‍ट होते.

 

           उपरोक्‍त चर्चेनुरुप निष्‍कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतोः

 

            आ दे श

 

  1. तक्रार क्र. 576/2014 अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.
  2. सामनेवाले 1 व 2 यांनी तक्रारदारांच्‍या टी.व्‍ही. दुरुस्‍तीसंदर्भात सदोष सेवा/सुविधा दिल्‍याचे जाहिर करण्‍यात येते.
  3. तक्रारदारांच्‍या टी.व्‍ही. संदर्भात सामनेवाले यांनी टी.व्‍ही. दुरुस्‍ती खर्चाचे अंदाजपत्रक 4 महिन्‍यांपेक्षा जास्‍त कालावधीपर्यंत न देऊन व 4 महिने टी.व्‍ही. डिसमेंटल करुन सेवा सुविधा पुरविण्‍यामध्‍ये कसूर केल्याचे जाहिर करण्‍यात येते.
  4. सामनेवाले 1 यांनी स्‍वतःसाठी व सामनेवाले क्र. 2 यांचेवतीने तक्रारदारांना दिलेल्‍या सदोष सेवेबद्दल रू. 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार) नुकसान भरपाई व रु. 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार) तक्रार खर्च दि. 15/12/2015 पूर्वी दयावा. सदरील आदेश पूर्ती नमूद वेळेमध्‍ये न केल्‍यास दि. 16/12/2015 पासून 6% व्‍याजासह आदेशपूर्ती होईपर्यंत संपूर्ण रक्‍कम अदा करावी.
  5. आदेशपूर्तीसाठी सामनेवाले क्र. 1 व 2 हे वैयक्तीक तसेच संयुक्‍तपणे जबाबदार राहतील.
  6. आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना विनाविलंब/विनाशुल्‍क देण्‍यात याव्‍यात.
  7. संचिकेच्‍या अतिरिक्‍त प्रती असल्‍यास तक्रारदारांना परत करण्‍यात याव्‍यात.           

 

 
 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.