( आदेश पारित द्वारा- श्री नितीन घरडे, मा.सदस्य )
- आदेश -
(पारित दिनांक – 20 ऑगस्ट 2013)
1 तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारकर्त्याचे कथन थोडक्यात येणेप्रमाणे –
तक्रारकर्त्याने महाराष्ट्र शासनातर्फे शासकीय पद भरतीकरिता MSCIT हा डिप्लोमा कोर्स सक्तीचा केल्याने विरुध्द पक्ष क्रं.1 यानी शासन मान्य अधिकृत संस्था, विरुध्द पक्ष क्रं.2 चे अधिपत्याखाली काम करतात याची खात्री झाल्याने या संस्थेत प्रवेश घेतला व दिनांक 15/06/2010 रोजी रुपये 2500/- एवढी फी हप्तेवारीने मंजूर करुन दोन महिन्याचा कोर्स पुर्ण केला. विरुध्द पक्षाकडे संपुर्ण फी रक्कम जमा केल्यानंतर विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास हॉल तिकीट दिले. हॉल तिकीटावर नमुद केल्यानुसार तक्रारकर्त्याने दिनांक 19/9/2010 रोजी सदर परिक्षा मॅक्झीम कम्प्युटर कामठी येथे परिक्षा दिली. तक्रारकर्त्याचा आसन क्रं.एन 307968117 एकमेसीएल, लर्नर आय डी 45589321006201 एलएलसी 14210304 दिनांक 19/9/2010 असा होता. सदर परिक्षा झाल्यावर तक्रारकर्त्याचा निकाल पास आल्याने त्याची प्रत परिक्षा केन्द्राद्वारे सही शिक्क्यानिशी तक्रारकर्त्यास देण्यात आली. कोर्सचा डिप्लोमा मुंबईवरुन मिळण्याकरिता 1 ते 2 महिन्याचा कालखंड लागतो असे विरुध्द पक्षाने सांगीतल्याने विरुध्द पक्षाकडे नोव्हेबर 2010 मध्ये सातत्याने भेट दिली. परंतु विरुध्द पक्ष केवळ आश्वासन देत होता. पुढे तक्रारकर्त्यास नोकरीची गरज असल्याचे कळल्याने व गरीब परिस्थितीचा अंदाज घेऊन विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास पुरवणी परिक्षेस बसविले. त्यावेळी तक्रारकर्त्याचा आसन क्रं.308851224, एकमेसीएल लर्नर आय डी 45589321006201 एलएलसी 14210304 असा होता. दिनांक 23/9/2011 रोजी सॉफ्टवे अकॅडमी ऑफ कम्प्युटर एज्युकेशन कामठी येथे परिक्षेस बसविण्यात आले. त्यावेळेस विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास पास झाल्याचे प्रमाणपत्र केद्राचा शिक्का सही करुन दिला. अशा पध्दतीने तक्रारकर्त्याने दोन्ही परिक्षा पास करुनही विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 यांनी आजपर्यत तक्रारकर्त्यास डिप्लोमा प्रमाणपत्र प्रदान न केल्याने तक्रारकर्त्याचा वेळ, पैसा, व नोकरीची संधी विरुध्द पक्षाच्या दुर्लेक्षपणामुळे गमवावी लागत आहे. म्हणुन तक्रारकर्त्याने ही तक्रार दिनांक 02/08/2012 रोजी मंचासमक्ष दाखल करुन खालील प्रमाणे मागणी केली आहे.
तक्रारकर्त्याची प्रार्थना-
1. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास संगणक अभ्यासक्रमाचा डिप्लोमा प्रमाणपत्र त्वरीत रितसर द्यावे.
2. तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.50,000/- मिळावे.
3. तक्रारीच्या खर्चापोटी रु.20,000/- मिळावे.
3. सदर तक्रारीचे अनुषंगाने, मंचाद्वारे सदर प्रकरणात विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 यांना नोटीस बजावण्यात आली. नोटीस प्राप्त होताच विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 मंचासमक्ष हजर झाले व आपला लेखी जवाब प्रकरणात दाखल केला.
4. विरुध्द पक्ष क्रं.1 आपले जवाबात मान्य करतात की, महाराष्ट्र शासनाचे नियमाप्रमाणे फी घेऊन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देऊन तक्रारकर्त्यास MSCIT च्या परिक्षेस बसविले. विरुध्द पक्ष आपले अतिरिक्त कथनात नमुद करतात की, तक्रारकर्ता हा MSCIT च्या मुख्य परिक्षेत बसला परंतु वारंवार सांगुनही आंतरिक सराव परिक्षा (Interim Practice Test ) व लर्निंग प्रोग्रेसीव्ह (LP ) परिक्षा दिली नाही व मीड टर्म ( M T ) परिक्षेतही बसला नाही. म्हणुन तक्रारकर्त्याच्या नुकसानीस विरुध्द पक्ष क्रं.1 जबाबदार नाही म्हणुन तक्रारकर्त्याची तक्रार दंडास फेटाळण्यात यावी अशी विनंती केली.
- विरुध्द पक्ष क्रं.2 आपले जवाबात तक्रारकर्त्याने पक्ष म्हणुन चुकीचे नमुद केल्याचा आक्षेप घेतला.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा MSCIT परिक्षेकरिताचा अर्ज महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांचे कडुन प्राप्त झाल्याने तक्रारकर्त्यास हॉल तिकीट देण्यात आले. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने दिनांक 19.9.2010 ची परिक्षा दिली व त्यास उपस्थिती प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. (Appearing Certificate ) विरुध्द पक्ष पुढे नमुद करतात की विद्यार्थ्याचे ऑनलाईन परिक्षेत मिळालेले गुण हे त्या त्या परिक्षाकेद्राकडुन प्राप्त होतो व अंतर्गत परिक्षेमधे मिळालेले गुण हे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांचेकडुन प्राप्त होतात.या दोन्ही परिक्षांचे गुण एकत्रित करुन MSCIT परिक्षेचा अतीम निकाल मंडळामार्फत जाहीर करण्यात येतो. या दोन्ही परिक्षांचे ऑनलाईन परिक्षेत -20 गुण व अंतर्गत परिक्षेत -30 गुण असे एकत्रित 50 गुण मिळविणे आवश्यक असते, व अशाच विद्यार्थ्याना मंडळामार्फत उत्तीर्ण असे जाहिर करण्यात येते व अंतिम प्रमाणपत्र देण्यात येते. असे असतांना तक्रारकर्त्यास सप्टेंबर -2010 मधे झालेल्या ऑनलाइन परिक्षेत 33 गुण (Objective-12 व Practical – 21 ) व अंतर्गत परिक्षेत शुन्य गुण मिळालेले आहेत, दोन्ही परिक्षेत ऐकत्रित 33 गुण मिळाले आहे व आवश्यक गुण 50 असल्याने तक्रारकर्ता अनुतीर्ण झाला व त्यास अंतिम प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. तक्रारकर्ता परत सप्टेबर 2011 मधे झालेल्या MSCIT परिक्षेस बसला असता त्या परिक्षेत तक्रारकर्त्यास ऑनलाइन परिक्षेत 25 गुण ( Objective-09 व Practical–16) मिळाल्याने तक्रारकर्ता अनुत्तीर्ण झाला म्हणुन त्यास अंतिम प्रमाणपत्र देण्यात आले नाही.
- तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षावर केलेले सर्व आरोप खोटारडे व गैरकायदेशीर आहे. विरुध्द पक्ष क्रं.2 ही शासकीय व स्वायत्त स्टॅच्युटरी बॉडी महाराष्ट्र राज्य बोर्ड ऑफ टेक्नीकल एज्युकेशन अॅक्ट 1997 अंतर्गत कार्य करते. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार दंडासह खारीज करण्यात यावी अशी विनंती केली.
- विरुध्द पक्ष क्रं.1 ने आपले लेखी जवाबासह बोर्डाची मार्कलिस्ट दाखल केली आहे व विरुध्द पक्षक्रं.2 ने आपले लेखी जवाबासह एकुण 6 कागदपत्रे दाखल केली आहेत त्यात मेमोरंडम ऑफ अंडरस्टॅण्डींग, MSCIT सप्टेंबर 2010 व सप्टेबर 2011 चे परिक्षा इव्हेंट अटेन्डंन्टस डिटेल व वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल केले आहे.
- तक्रारकर्ता गैरहजर. विरुध्द पक्ष क्रं.1 गैरहजर. विरुध्द पक्ष क्रं.2 चे वकीलांचा युक्तिवाद ऐकला.
//*// कारण मिमांसा //*//
- तक्रारकर्त्याने दाखल केलेली कागदपत्रे व लेखी युक्तिवाद यांचे सुक्ष्म अवलोकन केले असता, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं.1 कडे MSCIT या संगणक कार्स करिता आवश्यक ते शुल्क भरुन प्रवेश घेतल्याची बाब सिध्द होते. परंतु तक्रारकर्ता विरुध्द पक्ष क्रं.2 चे स्वायत्त स्टॅच्युटरी बॉडी महाराष्ट्र राज्य बोर्ड ऑफ टेक्नीकल एज्युकेशन यांचे अटी व शर्ती नुसार परिक्षा उत्तीर्ण होण्याकरिता आवश्यक 50 गुण तक्रारकर्ता मिळवु शकला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यास अनुत्तीर्ण जाहीर करण्यात आले.
- विरुध्द पक्ष क्रं.2 चे नियमानुसार सदर परिक्षा उत्तीर्ण होण्याकरिता परिक्षार्थीस एकुण 50 गुण मिळविणे आवश्यक असते परंतु तक्रारकर्त्यास सप्टेबर 2010 मधे झालेल्या ऑनलाइन परिक्षेत 33 गुण ( Objective-12 व Practical – 21 ) व अंतर्गत परिक्षेत शुन्य गुण मिळालेले आहेत. दोन्ही परिक्षांचे एकत्रित 33 गुण मिळाले आहे व आवश्यक गुण 50 असल्याने तक्रारकर्ता अनुतीर्ण झाला. तक्रारकर्ता पुन्हा सप्टेबर 2011 मधे झालेल्या MSCIT परिक्षेस बसला असता त्या परिक्षेत तक्रारकर्त्यास ऑनलाइन परिक्षेत 25 गुण ( Objective-09 व Practical–16) मिळाल्याने तक्रारकर्ता अनुत्तीर्ण झाला म्हणुन त्यास अंतिम प्रमाणपत्र देण्यात आले नाही. दोन्ही ऑनलाईन परिक्षा झाल्यावर संबंधीत परिक्षाकेद्रांवर तक्रारकर्त्यास उपस्थिती प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे.(Appearing Certificate सदर प्रमाणपत्रात ऑनलाईन परिक्षेतील उत्तीर्ण झाल्याबाबतचे गुण नमुद असुन अंतर्गत परिक्षेतील गुण नमुद नाही. ऑनलार्इन परिक्षेतील गुण व अंतर्गत परिक्षेतील गुण मिळुन एकुण 50 गुण परिक्षार्थीस मिळविणे आवश्यक असते परंतु तक्रारकर्ता अंतर्गत परिक्षेत उपस्थित न राहिल्याने त्यास शुन्य गुण मिळाले व एकुण गुण आवश्यक 50 गुणांपेक्षा कमी असल्याने तक्रारकर्ता दोन्ही परिक्षेत अनुत्तीर्ण झाला. त्यामुळे तक्रारकर्त्यास अंतिम प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. त्यास तक्रारकर्ता स्वतः जबाबदार असुन विरुध्द पक्षास जबाबदार धरता येणार नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे. करिता हे मंच पुढील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- आदेश -
1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
2) उभयपक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.
3) सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना नि:शुल्क देण्यात याव्या.
| Nitin Manikrao Gharde, MEMBER | Amogh Shyamkant Kaloti, PRESIDENT | , | |