Maharashtra

Ahmednagar

CC/14/450

Dadapatil Prabhu Wale - Complainant(s)

Versus

Prop.M/s.Padmawati Automobiles, - Opp.Party(s)

Arote/Shaikh/??????

29 Apr 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/14/450
( Date of Filing : 19 Nov 2014 )
 
1. Dadapatil Prabhu Wale
Mangalapur,Tal Sangamner,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Prop.M/s.Padmawati Automobiles,
Opp.Dyanmata Vidyalaya,Kolhar-Sangamner Road,Sangamner,Tal Sangamner,
Ahmednagar
Maharashtra
2. M/s.General Manager,Hiro Moto Corp.Ltd.
34,Basant Chowk,Vasant Vihar,New Delhi-110 057
New Delhi
3. M/s.General Manager,Hiro Moto Corp.Ltd.
15-A,Bhale Estate,Rear Wing,3rd Floor,Wakadewadi,Pune-411 003
Pune
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Arote/Shaikh/मुंदडा, Advocate
For the Opp. Party: D.S.Akolkar, Advocate
Dated : 29 Apr 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.महेश एन.ढाके - मा.सदस्‍य )

1.   तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे.

2.   तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात येणे खालील प्रमाणे ः-

     तक्रारदार हे व्‍यवसायाने शेतकरी असून त्‍यास मोटार सायकल विकत घ्‍यावयाची होती. तक्रारदाराने सामनेवाला क्र.2 व 1 यांनी स्‍वतःचे उत्‍पादन विक्री करण्‍याकरीता विविध जाहिरातीव्‍दारे मोटार सायकल विक्रीची जाहिरात केली होती. व सामनेवाला यांनी उत्‍पादीत केलेल्‍या व वितरीत केलेल्‍या मोटार सायकली हया अत्‍यंत मजबुत, टिकावू व चांगल्‍या प्रतिच्‍या धातुंपासून बनविलेल्‍या आहेत. व दनकट व टिकावू आहे या बाबतची माहिती जाहिरातीव्‍दारे तक्रारदार यांना झाली होती. सामनेवाला नं.1 यांनी हिरो पॅशन प्रो मोटार सायकल अत्‍यंत धनकट व टिकावूपणाबद्दल खात्री दिली व तिच मोटार सायकल खरेदी करण्‍याची शिफारस केली. तसेच हिरो मोटार सायकल लिमिटेड म्‍हणजेच सामनेवाला नं.2 हे मोटार सायकल उत्‍पादीत नामाकिंत कंपनी आहे. सदरील कंपनीची मोटार सायकल वापरतांना मशीनमध्‍ये महत्‍वाचा दोष किंवा स्‍टीलच्‍या धातु संबंधात काही गंभीर त्रुटी आढळून आल्‍या तर मोटार सायकल बदलून मिळेल अशी हमी सामनेवाला नं.1 यांनी दिली होती. दिनांक 25.07.2010 रोजी सामनेवाला नं.1 यांचेकडून पॅशन प्रो या मॉडेलची मोटार सायकल खरेदी केली होती. त्‍याचे इंजिन नं.एच.ए.10/ई.डी.ए. जी.जी. 14455 असा आहे व चॅसिज नंबर एम.बी.एल.एच.ए.10 एएचएजीजी 20001 असा आहे. तक्रारदार यांनी रु.51,500/- रोख जमा करुन सामनेवाला नं.1 यांचेकडून खरेदी केली आहे. व तिचे पासींग करुन घेतलेले आहे. सदरील गाडीचा नं. एम.एच.17एएच.8650 असा आहे.

3.   तक्रारदार यांनी मोटार सायकल खरेदी केल्‍यानंतर सामनेवाला नं.1 यांचेकडून तसेच सोयीनुसार इतर मोटार सायकल कारागिराकडून मोटार सायकल सर्व्‍हीसिंग करुन घेतलेली आहे. सदर मोटार सायकल ही स्थिरपणे व ग्रिप धरुन रस्‍त्‍यावरुन चालत नाही व व्‍हायबल होत असल्‍याचे तक्रारदाराचे लक्षात आले. तक्रारदाराने सामनेवाला नं.1 यांचेकडे तक्रार केली असता त्‍यांचेकडे असलेल्‍या कुशल तांत्रीक कारागिराने सदरहू मोटार सायकलची पाहाणी केली असता मोटार सायकलची चॅसिज ही पुर्णपणे गंजुन गेली आहे व तिचा कधीही तुकडा पडू शकतो व त्‍यामुळे मोटारसायकल दोन तीन किंवा अनेक विभागात विभागली जावू शकते असे सदरहू कारागिरास आढळून आले व सदरहू बाब तक्रारदार यांनी स्‍वतःच्‍या डोळयाने पाहिली आहे. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास सांगितले की, सदर मोटार सायकल दुरुस्‍त होणार नाही. मोटार सायकल अॅव्‍हरेजकरता योग्‍य नाही असा सल्‍ला दिला. सामनेवाला नं1 यांनी गि-हाईकाचे जीविताशी खेळणारा असा अमानवीय सल्‍ला दिला आहे. वास्‍तविक पाहता सदरहू उत्‍पादन, त्‍याची सुरक्षितता व त्‍या पश्‍चात त्‍याचे विपरीत परिणाम याची जबाबदारी सर्व सामनेवाला यांची आहे.

4.   तक्रारदार यांनी सर्व सामनेवाला यांना दिनांक 23.01.2014 रोजी मोटार सायकल नं.एम.एच.17.एएच8650 मधील दोष, चॅसि गंजणे बाबतची कल्‍पना रजि.नोटीसीने दिली होती व सदरहू मोटार सायकल सामनेवाला यांनी जमा करुन त्‍या ऐवजी तक्रारदार यांना विना मोबदला नविन मोटार सायकल देणे बाबतची मागणी केली होती. सदरहू रजि. नोटीसची प्राप्‍ती सर्व सामनेवाला यांना होवून देखील सामनेवाला यांनी सदरहू रजि.नोटीसचे उत्‍तर दिले नाही. सामनेवाला नं.1 यांनी पुणे येथील इंजिनिअर येणार आहेत तुम्‍ही मोटार सायकल शोरुमला आणून जमा करा याबाबत कळविल्‍याने प्रथमतः दिनांक 04.02.2014, दिनांक 13.02.2014 व दिनांक 04.03.2014 या तारखांना तक्रारदार यांनी सदरहू नादुरुस्‍त मोटार सायकल अॅपे व्‍हॅन मध्‍ये ठेवून शोरुममध्‍ये आणून ठेवली होती व सामनेवाला नं.1 यांनी सदरहू मोटार सायकल जमा करुन घेण्‍यास व जमा करुन घेतले बाबतची पोहोच पावती देण्‍यास नकार दिल्‍याने तिनही वेळेस सदरहू मोटार सायकल पुन्‍हा अॅपे व्‍हॅनमध्‍ये ठेवून घरी नेली होती. सामनेवाला यांनी दोषपुर्ण वाहन देऊन तक्रारदाराची फसवणूक केली आहे. तसेच सदरहू मोटार सायकल क्र.एम.एच.17 ए.एच 8650 ही सामनेवाला क्र.1 मार्फत जमा करुन घ्‍यावी व तिची खरेदीची किंमत रोख स्‍वरुपात तक्रारदारास देण्‍यात यावी किंवा तक्रारदारास दुसरी नविन मोटार सायकल देण्‍याबाबत योग्‍य ते आदेश व्‍हावेत. याकरीता  तक्रार अर्ज तक्रारदाराने दाखल केलेला आहे.

5.   तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह मंजुर करावा, सामनेवाले नं.1 व 2 यांनी तक्रारदाराचे सामनेवाले नं.3 यांचे कर्ज खात्‍यात तक्रारदाराचे क्‍लेम / नुकसान भरपाईच्‍या मागणी अर्जात मागणी केल्‍याप्रमाणे रक्‍कम रु.1,86,300/- व्‍याजासह जमा करणेबाबतचा हुकूम व्‍हावा. तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी रक्‍कम रु.50,000/- व तक्रारदारास मानसिक व शारीरीक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- मिळणेचा आदेश व्‍हावा. 

6.   तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाला नं.1 यांचेकडून खरेदी केलेली मोटार सायकल नं.एम.एच.17 एएच 8650 ही नादुरुस्‍त झाल्‍या कारणाने सामनेवाला यांनी सदरहू मोटार सायकल जमा करुन घ्‍यावी व सदरहू मोटार सायकलची खरेदी किंमत रुपये 51,500/- किंवा नविन मोटार सायकल विना मोबदला तक्रारदार यास देणे कामी योग्‍य तो हुकूम व्‍हावा. सदरहू मोटार सायकल एकंदरीत चार वेळेला अॅपे व्‍हॅन मधून नेली व आणली याकरीता रु.1600/- तक्रारदार यास देण्‍याचा हुकूम व्‍हावा. सामनेवाले नं.1, 2 व 3 यांनी सदोष मोटार सायकलची निर्मीती करुन त्‍याची विक्री तक्रारदारास केली त्‍यामुळे तक्रारदाराचे जिवीतास अपाय घडल्‍याचे कारण घडले व मोटार सायकल बदलून दिली नाही या सामनेवालाच्‍या दुषीत कृत्‍यामुळे तक्रारदारास मानसिक, शारीरीक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्‍यामुळे तक्रारदारास सहन कराव्‍या लागलेल्‍या शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.20,000/- देण्‍याचा हुकूम व्हावा. तसचे सर्व सामनेवाले यांनी जाणीवपुर्वक तक्रार तक्रारदाराचे तक्रारीची दखल घेतली नाही. त्‍यामुळे तक्रारदारास सदरहू तक्रार अर्ज दाखल करणे भाग पडले आहे. या बद्दल तक्रार अर्जाचा खर्च सामनेवाला यांनी तक्रारदार यास देणे बाबतचा हुकूम व्‍हावा.

7.   तक्रारदाराने तक्रारीसोबत निशाणी 2 ला अॅफिडेव्‍हीट दाखल केले. तसेच निशाणी 6 ला कागदपत्रे खालील प्रमाणे दाखल केली आहेत.

1) सामनेवाला नं.1 यांचेकडून खरेदी केलेली बिलाची झेरॉक्‍स प्रत दिनांक 25.07.2010 2) सामनेवाला यांना रजि.पोस्‍टाने पाठविलेल्‍या नोटीसची स्‍थळप्रत दिनांक 27.01.2014 3) रजि.पोच पावती मुळ प्रत दिनांक 27.01.2014 4) गाडी खरेदीचे कॅश रिसिटची झेरॉक्‍स प्रत दिनांक 25.07.2010 5) आर.सी.बुकची झेरॉक्‍स दिनांक 21.08.2010 6) मो.सा.नं.एम.एच.17 एएच.8650 चे फोटो मुळ कॉपी  7) साई विक्रम अॅटोमोबाईल्‍स येथील तज्ञाचे पत्र दिनांक 01.11.2014 इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.

8.   तक्रारदाराची तक्रार दाखल करण्‍यात येऊन सामनेवाले यांना नोटीस काढण्‍याचे आदेश करण्‍यात आला. त्‍याप्रमाणे सामनेवाला क्र.1 हे हजर झाले व त्‍यांनी निशाणी 14 ला कैफियत दाखल केली. सामनेवाला क्र.1 ने अर्ज कलम 1 मधील मजकुर अंशतः बरोबर आहे. अर्ज कलम 2 मधील मजकुर खरा नाही व कबूल नाही. व तक्रारीतील म्‍हणणे खोटे असल्‍याचे म्‍हंटले आहे. सामनेवाला नं.1 ने पुढे असे कथन केले आहे की, सामनेवाला नं.3 ही कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत कंपनी आहे. सामनेवाला नं.1 हे सामनेवाला नं.3 या कंपनीचे अहमदनगर जिल्‍ह्याकरीता अधिकृत सब डिलर आहे. संगमनेर तालुक्‍यात त्‍यांचे कार्यक्षेत्र आहे. सामनेवाला नं.1 हे सामनेवाला नं.3 कंपनीने ठरवुन दिलेल्या नियम व अटीनुसार सामनेवाला नं.3 कंपनीने उत्‍पादीत केलेल्‍या दुचाकी वाहनांची विक्री करतात.

9.   तक्रारदार हा मंगळापुर ता.संगमनेर येथील रहिवासी आहे. तक्रारदाराने ता.25.07.2010 रोजी पॅशन प्रो हे दुचाकीचे मॉडेल खरेदी केले. त्‍यानंतर सदरचे वाहन तक्रारदाराने चार वर्षे वापरली. सामनेवाला नं.1 यांचेकडून वाहन खरेदी केल्‍यानंतर पहिल्‍या तीन मोफत सर्व्‍हीसिंग करुन घेतल्‍यानंतर तक्रारदार याने सामनेवाला नं.1 चे शोरुमला वाहन रिपेअरींग करीता येणे बंद केले. तक्रारदार हा वर नमुद वाहनाची बाहेरुनच परस्‍पर दुरुस्‍ती करुन घेत असे. तक्रारदाराचे वाहन वापरणे हे अतिशय रॅश स्‍वरुपाचे आहे. त्‍या कारणाने वाहनाचा व शोरुममधील कारागिरांचा कधीही फ्री सर्व्‍हीसिंग संपल्‍यानंतर संपर्क आला नाही.

10.  सामनेवाला नं.1 यांचे वर्क शॉपला दुचाकी वाहनाची दुरुस्‍ती करण्‍याकरीता हिरो मोटो कॉर्फ कंपनीकडून ट्रेनींग घेतलेले कारागीर आहेत. त्‍यातील काही कारागीर मधुनच काम सोडून जातात व स्‍वतःचे नवीन दुकान बाहेर जावुन सुरु करतात. तक्रारदाराने अर्जासोबत दिनांक 12.11.2014 चे साई विक्रम अॅटोमोबाईल्‍स या दुकानातील सर्टीफिकेट जोडले आहे. वर नमुद दुकान हे विठ्ठल चासकर यांचे मालकीचे आहे. सदर इसम हा सामनेवाला नं.1 कडे सर्व्‍हीस स्‍टेशनला नोकरीस होता. पुढे सामनेवाला नं.1 बरोबर त्‍यांचे वाद झाल्‍यानंतर सामनेवाला नं.1 कडील नोकरी सोडली व स्‍वतःचे साई विक्रम अॅटोमोबाईल्‍स नावाचे दुकान टाकले. सामनेवाला नं.1 बरोबर असलेली जुनी खुन्‍नस काढण्‍याकरीता, नोकरी सोडल्‍याचा राग मनात असल्‍याने त्‍याने  तक्रारदाराचे वाहन गंजलेले असुन ते कधीही तुटू शकते असे आशयाचे प्रमाणपत्र तक्रारदारास दिले व त्‍या प्रमाणपत्रावर आधारीत तक्रारदाराने हा तक्रार अर्ज केला आहे. सदरचे प्रमाणपत्र कायदयाचे भाषेत कोणतेही महत्‍व नाही., येणार नाही. तक्रारदाराने मागणी केल्‍यावरुन त्‍याचे सांगण्‍यानुसार प्रमाणपत्र घेतले व ते अर्जासोबत दाखल केले. अर्जातील नमुद ता.04.02.2014 ता.13.02.2014 या दोन्‍ही दिवशी मंगळवार सामनेवाला नं.1 चे सर्व्‍हीस स्‍टेशन बंद असते.  त्‍याची माहिती सर्व ग्राहकांना आहे. तक्रारदारास देखील त्‍याची माहिती आहे. त्‍या कारणाने अॅपे रिक्षातुन तक्रारदाराने दुरुस्‍ती करीता वर नमुद तारखांना सदरचे वाहन आणले हे खरे नाही, कबुल नाही.

11.  सामनेवाला नं.1 याने व त्‍याचे कारागीराने तक्रारदाराचे वाहनाची सर्व्‍हीस

स्‍टेशनला संपुर्ण तपासणी केली, त्‍यात वाहनाची चेसीज खराब झाल्‍याचे सामनेवाला नं.1 याने तक्रारदाराचे लक्षात आणुन दिले. चेसीज बदलण्‍याची तयारी देखील दाखविली. परंतु चेसीस बदलण्‍याकरीता आवश्‍यक कागदोपत्रांची पुर्तता व खर्च याबाबत सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदारास जाणीव करुन दिल्‍यानंतर तक्रारदाराने सामनेवाला नं.1 कडे फुकटात चेसीज बदलुन देण्‍याची मागणी केली. तक्रारदाराचे वाहन हे वॉरंटीमध्‍ये नसल्‍याने विनामोबदला चेसीज बदलुन मिळणार नाही. याची जाणीव सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदारास करुन दिले. चेसीज बदलण्‍याकरीता एक विनंती अर्ज तक्रारदारास करण्‍याकामी सामनेवाला नं.1 यांनी सांगितले. त्‍यानंतर गाडीची मुळ कागदपत्रे दाखल करण्‍यास सांगितले. त्‍याची पुर्तता करुन प्रकरण आर.टी.ओ.श्रीरामपुर यांचेकडे चेसीज बदलण्‍याकरीता पाठवावे लागेल व त्‍यांचेकडून परवानगी आल्‍यानंतरच चेसीजचे काम करता येईल ते बदलुन मिळेल याची जाणीव सामनेवाला नं.1 याने तक्रारदारास करुन दिली. आर.टी.ओ.श्रीरामपूर यांचेकडून परवानगी आल्‍यानंतर चेसीज बदलुन मग पुन्‍हा चेसीज नंबर मिळण्‍याकरीता, पेपर ट्रेसींग करण्‍याकरीता वाहन पुन्‍हा श्रीरापूरला न्‍यावे लागेल. याची जाणीव सामनेवाला नं.1 याने तक्रारदारास करुन दिली. परंतु वर नमुद कोणतीही पुर्तता करण्‍यास तक्रारदार तयार नव्‍हता, तयार नाही. त्‍या करीता आर्थिक भार सोसण्‍यास तक्रारदाराची तयारी नाही. सामनेवाला नं.3 कंपनीचे पॉलीसीनुसार नविन चेसीस देण्‍याची तरतुद नाही. परंतु ग्राहक हित लक्षात घेवुन वॉरंटीमध्‍ये नविन चेसीस देण्‍याचे सामनेवाला नं.1 याची तयारी आहे. या चेसीसचा खर्च उचलण्‍यास तयार असुन परंतु इतर कायदेशीर पुर्तता व त्‍यासाठी येणारा खर्च उचलण्‍यास तयार असुन परंतु इतर कायदेशिर पुर्तता व त्‍यासाठी येणारा खर्च हा तक्रारदाराने करावयाचा आहे. त्‍यास तक्रारदाराची तयारी नाही. खोटी केस करुन कोर्ट कारवाई करुन नोटीसा पाठवुन सामनेवाला नं.1 वर दबाव निर्माण करुन फुकटात चेसीज बदलुन मिळाली तर पाहावे. या दृष्‍ट हेतुने तक्रारदाराने सदरचा अर्ज दाखल केलेला आहे. तो रद्द होण्‍यास पात्र आहे. तक्रारीतील सामनेवाला नं.1 विरुध्‍दचा मजकुर हा गळेपडुपणाचा व मे.कोर्टाचे मन सामनेवाला बद्दल कलुषीत करण्‍याचे दृष्‍ट हेतुने मजकुर अर्जात समाविष्‍ट केला आहे. सबब अर्ज रद्द होण्‍यास पात्र आहे.

12.  सामनेवाला नं.1 याने तक्रारदाराचे नोटीसीला अॅड.राजेश भुतडा संगमनेर यांचेमार्फत नोटीस उत्‍तर केलेले आहे. सदरची बाब जाणीवपुर्वक दडवुन ठेवुन खोटा अर्ज केला आहे. तो रद्द होण्‍यास पात्र आहे. नोटीस उत्‍तरात उपस्थित केलेल्‍या कायदेशिर हरकतींना कोणतीही बाधा येवु न देता कैफियत दाखल केलेली आहे. सामनेवाला नं.1 हा तक्रारदाराचे वाहन चेसीज बदलुन देण्‍यास प्रथम पासुन तयार होता व आहे. परंतु त्‍याकरीता आवश्‍यक कागदपत्रांची पुर्तता आर.टी.ओ. श्रीरामपूर यांची परवानगी व येणारा खर्च हा तक्रारदारास सोसणे आवश्‍यक आहे. परंतु कायदेशिर प्रक्रियेचा अवलंब न करता सामनेवाला नं.1 याने दिलेला सल्‍ला न जुमानता कोर्ट केसचा बागुलबुवा उभा करुन सामनेवाला नं.1 वर दडपण आणुन फुकटात नविन वाहन मिळाले तर पाहवे व जुन्‍या वाहनाचे रोख पैसेही वसुल करुन घ्‍यावे या दृष्‍ट हेतुने तक्रारदाराने अर्ज केलेला आहे व नाहक सामनेवाला नं.1 यास खर्चात टाकलेले आहे. सबब अर्ज रद्द होण्‍यास पात्र आहे. सामनेवाला नं.1 यास नाहक खर्चात टाकले बद्दल कॉम्‍प्‍नेसेटरी कॉस्‍ट म्‍हणुन तक्रारदाराचे विरुध्‍द रक्‍कम रु.10,000/- देण्‍याचा हुकूम व्‍हावा अशी विनंती केली आहे.

13.  सामनेवाला नं.2 व 3 यांना नोटीस बजावणी होऊनसुध्‍दा ते मे.कोर्टात हजर झाले नाही. म्‍हणून सामनेवाला क्र.2 व 3 यांचे विरुध्‍द निशाणी 1 वर दिनांक 30.11.2017 रोजी त्‍यांचे विरुध्‍द सदरील तक्रार एकतर्फा चालविण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात आला.

14.  तक्रारदाराने निशाणी 17 ला लेखी युक्‍तीवाद दाखल केलेला आहे. तक्रारदार यांनी त्‍यांचे लेखी युक्‍तीवादात असे कथन केले आहे की, सामनेवाला नं.1, 2 व 3 यांनी उत्‍पादीत व विक्री करुन तक्रारदारास विक्री केलेल्‍या मोटार सायकलची चेसीस ही सदोष होती. म्‍हणजेच ती बनविण्‍याकरीता वापरलेले लोखंड / स्‍टील हे अपेक्षीत उच्‍च दर्जाचे नसुन ते हलक्‍या दर्जाचे आहे. त्‍यामुळेच चॅसीज खराब झाली. तिने गंज पकडला व ती सडण्‍यास सुरुवात झाली. त्‍यामुळे मोटार सायकलला कधीही अपघात घडू शकला असता व तक्रारदारास त्‍याचे जिवीतास मुकावे लागले असते. या सर्व बाबी प्रामाणिकपणे मान्‍य करुन तक्रारदाराची मोटार सायकल रिप्‍लेस करुन देणे हे सर्व सामनेवाला यांचे कर्तव्‍य होते. परंतु तसे न करता तक्रारदाराच्‍या अडाणीपणाचा, त्‍यास कायदेशिर बाबीचे ज्ञान नाही, याचा गैर फायदा घेवून त्‍याच्‍यावर अन्‍याय केला व त्‍यास मोठया प्रमाणात आर्थिक, शारीरीक व मानसिक हाल अपेष्‍टांना तोंड देण्‍यास भाग पाडले. या कारणावरुन तक्रारदाराची मोटार सायकलची खरेदी किंमत सामनेवालाकडून मिळण्‍यास तक्रारदार पात्र आहे किंवा सामनेवाला यांनी तक्रारदारास या मोटार सायकलच्‍या ऐवजी दुसरी नविन मोटार सायकल देण्‍याकामी आदेश व्‍हावेत.

15.  चार वेळेला तक्रारदार याने सदर मोटार सायकल स्‍वतःचे निवास स्‍थानापासून बाधीत मोटार सायकल सामनेवाला नं.1 यांचे दुकानात आणली व परत नेली त्‍या करीता चार चाकी वाहन वापरले व रुपये 1600/-  खर्च केला आहे. सदरहू रक्‍कम देखील तक्रारदारास देण्‍याचा हुकूम व्‍हावा ही विनंती.

16.  तक्रारदारास मोटार सायकल त्‍वरीत बदलून दिली नाही. त्‍यामुळे तक्रारदारास असुविधांचा सामना करावा लागला त्‍याकरीता शारीरीक, मानसिक, आर्थिक त्रासापोटी व गैरसुविधेपोटी रुपये 20,000/- देण्‍यात यावेत ही विनंती. तक्रारदारास मिळणा-या एकूण भरपाई रकमेवर जानेवारी 2014 पासुन 15 टक्‍के व्‍याज देण्‍याचा हुकूम व्‍हावा.

17.  सामनेवाला यांना युक्‍तीवादासाठी वांरवार संधी देऊनसुध्‍दा त्‍यांनी युक्‍तीवाद केला नाही. म्‍हणून सदरील प्रकरण अंतिम आदेशाकरीता ठेवण्‍यात आले.

18.  तक्रारदार व सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाला क्र.1 चा जबाब, तक्रारदाराने दाखल केलेला लेखी युक्‍तीवादाचे अवलोकन केले. यावरुन न्‍याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी दिली आहे काय.?                    

 

... होय.

2.

सामनेवाला नं.1 ते 3 कडून तक्रारदार हा तक्रारीतील नमुद वाहनाची नुकसान भरपाई व तक्रारीतील नमुद मागणी मिळण्‍यास पात्र आहे काय.  ?                    

 

... अंशतः होय.

3.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

का र ण मि मां सा

19.  मुद्दा क्र.1  – तक्रारदाराने त्‍यांचे निशाणी 17 वरील लेखी युक्‍तीवाद व सामनेवाला नं.1 ते 3 यांनी उत्‍पादीत व विक्री करुन तक्रारदारास विक्री केलेली मोटार सायकलचे चेसीसमध्‍ये दोष आहे व त्‍यात वापरलेले लोखंड / स्‍टील हे हलक्‍या स्‍वरुपाचे असल्‍यामुळे चेसीस खराब होऊन त्‍यास गंज चढलेला आहे व त्‍यामुळे ते सडण्‍यास सुरुवात झाली. त्‍यामुळे मोटार सायकलचा कधीही अपघात घडू शकला असता. तक्रारदाराला त्‍याचे जिवीतास मुकावे लागले असते. ही बाब सामनेवालांनी प्रामाणिकपणे मान्‍य करुन तक्रारदाराची मोटार सायकल रिप्‍लेस करुन देणे हे सामनेवालाचे कर्तव्‍य आहे. परंतु मोटार सायकलची चेसीस रिप्‍लेस करुन दिली नाही. त्‍यामुळे तक्रारदाराचे मोठया प्रमाणात आर्थिक, शारीरीक हाल झाले व तक्रारदाराची फसवणूक सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी केली असे लेखी युक्‍तीवाद दाखल करुन तक्रारदाराने सामनेवाला कडून तक्रारीत नमुद मोटार सायकल ऐवजी दुसरी नविन मोटार सायकल देण्‍याकामी आदेश व्‍हावेत. तसेच 1600/- खर्च आणि शारीरीक व मानसिक व आर्थिक त्रासापोटी रुपये 20,000/- द्यावेत. तसेच एकुण नुकसान भरपाई रुपयेवर जानेवारी 15 पासून 15 टक्‍के व्‍याज देण्‍याचा हुकूम व्‍हावा असा लेखी युक्‍तीवाद केला आहे. तक्रारदारातर्फे तोंडी युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. सामनेवाला नं.1 यांना वेळोवेळी संधी देऊनही त्‍यांनी लेखी युक्‍तीवाद दाखल केला नाही. अथवा तोंडी युक्‍तीवाद केला नाही. सामनेवाला नं.1 यांनी त्‍यांचे लेखी कैफियतीत तक्रारदाराचे वाहनाचे चेसीस बदलण्‍याची तयारी सामनेवाला क्र.1 ने कळविली. परंतू चेसीस बदलण्‍याकरीता आवश्‍यक कागदपत्राची पुर्तता व खर्च हा तक्रारदाराने करावा अशी जाणीव सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदारास केली. परंतू तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 कडे फुकटात चेसीस बदलून देण्‍याचे मान्‍य केले. तक्रारदाराचे वाहन हे वॉरंटीमध्‍ये नसल्‍याने विना मोबदला चेसीस बदलून मिळणार नाही याची जाणीव सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास करुन दिली व त्‍या बद्दल एक विनंती अर्ज करावा असे सांगितले. त्‍याच बरोबर आर टी ओ श्रीरामपूर यांचेकडे चेसीस बदलण्‍याकरीता परवानगीस पाठवावे लागेल. व त्‍यांचेकडून परवानगी आल्‍यानंतरच चेसीसचे काम करण्‍यात येईल याची तक्रारदारास जाणीव करुन दिली. तसेच सामनेवाला नं.3 कंपनीचे पॉलीसीनुसार नविन चेसीस बदलून देण्‍याची तरतुद नाही. परंतु ग्राहक हित लक्षात घेऊन वॉरंटीमध्‍ये नविन चेसीस देण्‍याची सामनेवाला नं.1 ची तयारी आहे. या चेसीसचा खर्च उचलण्‍याचा सामनेवाला नं.1 हे तयार आहेत. परंतू इतर कायदेशिर पुर्तता व त्‍यावर योग्‍य खर्च हा तक्रारदाराने करावा. परंतू तक्रारदाराची त्‍यांची तयारी नाही. खोटी केस करुन कोर्ट कारवाई करुन नोटीस पाठवून सामनेवाला नं.1 हे दबाव निर्माण करुन, सदरचा अर्ज तक्रारदाराने दाखल केलेला आहे असे सामनेवाला नं.1 यांचे म्‍हणणे आहे.

20.  तक्रारदाराचा लेखी युक्‍तीवाद व सामनेवालाचे कैफियतीचे अवलोकन केले असता, सामनेवाला नं.1 ने तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी दिलेली आहे. तसेच वाहनाची चेसीस बदलून दिली नाही. म्‍हणून ती सेवेत त्रुटी दिलेली आहे. सामनेवाला क्र.2 व 3 हे या मंचाची नोटीस मिळूनही प्रकरणात हजर झालेले नाही. परंतू सामनेवाला क्र.2 हे तक्रारीत नमुद मोटार सायकल उत्‍पादक आहेत. सामनेवाला नं.2 यांचे करीता सामनेवाला नं.3 हे पश्चिम विभागामध्‍ये या विभागाकरीता वितरक, विक्री व दुरुस्‍ती व तक्रारदाराचे तक्रारीचे निवारण करण्‍याचे कार्य आहे.

21.  सामनेवाला क्र.2 व 3 यांनी सुध्‍दा सदोष मोटार सायकल उत्‍पादनाची विक्री तक्रारदारास केल्‍याबद्दल सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदारप्रति सेवेत त्रुटी दिली आहे. या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. म्‍हणून मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

22.   मुद्दा क्र.2 – मुद्दा क्र. 1 चे विवेचनावरुन तक्रारदार हा सामनेवाला क्र.1 ते 3 यांचेकडून तक्रारीतील नमुद वाहनाचे चेसीस बदलून मिळण्‍याविषयी पात्र आहे. सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारास मोटार सायकल क्र.एम.एच.17 एएच-8650 या मोटार सायकलची चेसीस नविन सामनेवाला नं.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या बदलून द्यावी. व सर्व खर्च सामनेवाला नं.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या द्यावा. तसेच कागदपत्रांचा खर्च हा सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या करावा. तसेच तक्रारदारास झालेल्‍या शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला त्‍यापोटी रक्‍कम रुपये 10,000/- सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारास द्यावा. तक्रारदाराने तक्रारीत नमुद मोटार सायकल एकंदरीत अॅपे मधून मोटार सायकलची वाहतूक करावी लागली. व सामनेवाला क्र.1 कडे आणली व नेली व त्‍यासाठी रक्‍कम रुपये 1600/- खर्च मागितला आहे. परंतू त्‍या संदर्भात तक्रारदाराने कोणताही पुरक पुरावा प्रकरणात दाखल केलेला नाही. ही रक्‍कम तक्रारदाराला देण्‍याचा आदेश पारीत करता येत नाही. सबब मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

23.  मुद्दा क्र.3 -मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.   सामनेवाला नं.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांस वादातील नमुद वाहनाची चेसीस बदलून नविन द्यावी व त्‍यासाठी येणारा खर्च सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या करावा.

3.   सामनेवाला नं.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना झालेल्‍या शारीरीक, आर्थिक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- (रक्‍कम रु.दहा हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु.5,000/- (रक्‍कम रु.पाच हजार फक्‍त ) तक्रारदाराला द्यावे.

4. वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला नं.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या या आदेशाची प्रत मिळण्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.

5. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

6. तक्रारदार यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.