ग्राहक तक्रार क्र. 259/2014
अर्ज दाखल तारीख : 26/11/2014
अर्ज निकाल तारीख: 10/07/2015
कालावधी: 0 वर्षे 07 महिने 15 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. अनंत देविदास पाठक,
वय - 45 वर्षे, धंदा – नौकरी,
रा.साळुकेनगर, बेंबळी रोड, उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. प्रो.प्रा. प्लॅटिनम कलेक्शन फॉरमेन,
गाळा क्र.1/2, नगर परिषद कॉम्पलेक्स,
जिल्हा न्यायालयासमोर, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. प्र.अध्यक्षा.
2) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.ए.ए.पाथरुडकर.
विरुध्द पक्षकारा विरुध्द एकतर्फा आदेश पारीत.
न्यायनिर्णय
मा.प्र.अध्यक्ष श्रीमती विद्युलता जे.दलभंजन यांचे व्दारा:
अ) अर्जदार अनंत देविदास पाठक हे साळुंकेनगर बेंबळी रोड उस्मानाबाद. येथील रहिवाशी असून त्यांनी विरुध्द पक्ष (विप) यांचे विरुध्द नुकसान भरपाईची तक्रार दाखल केलेली आहे.
1. अर्जदार यांना दि.04/05/2014 रोजी त्यांच्या मुलाचा उपनयन (मुंजीचा) विधी कार्यक्रम असल्यामुळे दि.02/05/2014 रोजी विप यांचे दुकानातून 1 पॅन्ट व 1 शर्ट रु.2,185/- खरेदी केला. पॅन्टचा प्रोडक्ट नं.3699 पॅन्ट 42, Zilleri ब्रँन्ड 1550/- बील नं.450000194 असा आहे. अर्जदाराने पॅन्ट खरेदी करतांना पॅन्ट व्यवस्थित पाहिली नव्हती अर्जदार विप चा ग्राहक आहे.
2. अर्जदाराने उपनयन विधिच्या दिवशी सदर पॅन्ट शर्टचे बारकोड केबल काढून नवे कपडे परीधान करत असतांना पॅन्टच्या मागील बाजूस चाय लागून खोचाटे पडलेले दिसले व पायाजवळ ही पॅन्टला चाय लागून खोचाटे पडलेले दिसले. सदर खोचाटे स्पष्ट दिसत असल्याने व स्पष्ट जानवत असल्याने कार्यक्रमात नवीन कपडे परीधान करता आले नाही व अर्जदारास जुन्या कपडयांवर मुलाचा उपनयन संस्कार विधी पार पाडावा लागला. पाहूण्यामध्ये अर्जदारची नाहक बदनामी झाली त्यामुळे अर्जदाराचे मानसिक संतुलन बिघडले त्यामुळे स्वत:च्या मुलाच्या उपनयन विधिच्या कार्यक्रमाची मजा घेता आली नाही. सदर कपडे एकदाही परीधान केले नाहीत.
3. त्यानंतर अर्जदाराने विप दुकानात येऊन बिल व डिफेक्टीव पॅन्ट दाखवली तेव्हा विप ने सदरचा डिफेक्ट मान्य केला व मालकाला विचारुन सांगतो असे सांगितले त्यानंतर अर्जदार व त्यांची पत्नी विप च्या दुकानात वारंवार भेट देऊन पॅन्ट बदलून देण्याबाबत विनंती केली असता सोलापूर येथे गेले व आई आजारी आहे असे कारण सांगितले शेवटी विप यांनी दि.07/09/2014 रोजी पॅन्ट बदलून देण्यास नकार दिला.
4. विप यांनी डिफेकटीव्ह पॅन्ट दिल्यामुळे अर्जदारास आर्थिक मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागला. विप यांनी दिलेल्या त्रुटीयुक्त सेवेमुळे नवीन ड्रेस परीधान करता आला नाही त्यास विप जबाबदार आहेत.
5. त्यानंतर अर्जदाराने दि.13/09/2014 रोजी विधिज्ञांमार्फत नोटिस पाठवली ता. विप ला दि.16/09/2014 ला मिळाली परंतु पॅन्ट बदलून दिली नाही त्यामुळे प्रस्तुत तक्रारीमार्फत पॅन्टची किंमत रु.1,550/- किंवा पॅन्ट बदलून द्यावी आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.10,000/-, खर्चापोटी रु.5,000/- विप कडून मिळावेत अशी विनंती केलेली आहे.
ब) विप यांना नोटीस मिळूनही हजर न झालेमुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा चौकशीचा आदेश दि.21/02/2015 रोजी पारीत करण्यात आला.
क) अर्जदाराने तक्रारी सोबत पॅन्ट खेरदीची पावती, नोटीस पोष्टाची पावती नोटीस इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्या कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले. विधिज्ञांचा तोंडी युक्तिवाद थोडक्यात ऐकला असता सदर प्रकरणात खालील प्रमाणे मुददे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1) विप यांनी डिफेक्टीव पॅन्ट अर्जदारास विक्री करुन
सेवेत त्रुटी केली का ? होय.
2) अर्जदार पॅन्ट बदलून किंवा पॅन्टीची किंमत आणि नुकसान
भरपाई मिळण्यास पात्र आहे का ? होय.
3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
ड) कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 :
1. अर्जदाराने विप कडून पॅन्ट खरेदी केली व ती डिफेक्टीव निघाली ही प्रमुख तक्रार अर्जदाराची आहे.
2. अर्जदार विप कडे पॅन्ट बदलून दुसरी पॅन्ट घेण्यासाठी गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिले कारण सांगून वेळ टाळली. अर्जदाराची नोटीस मिळूनही विप ने काही दाद दिली नाही. मंचाची नोटीस मिळूनही विप प्रकरणात हजर झालले नाही नंतरही हजर राहून त्यांची बाजू मांडलेली नाही किंवा त्यांचे वरचा आरोप खोडून काढण्याची तसदी घेतलेली नाही याचाच अर्थ असा होतो की विप यांनी अर्जदाराला विक्री केलेली पॅन्ट डिफेक्टीव आहे किंवा प्रकरण दरम्यान मंचात हजर राहून तडजोड करण्याचा प्रयत्न केलेला नाही. याचा अर्थ विप ने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे हे स्पष्ट होते. अर्जदाराने सदर प्रकरणातील डिफेक्टीव पॅन्ट मंचात हजर केलेली आहे मंचासमोर तिचे सुक्ष्म अवलोकन केले सदर पॅन्टला खोचाटे दिसून आले ही बाब सेवेतील त्रुटी आहे. प्रस्तुत प्रकरणात ग्राहक संरक्षण कायदा कलम 13-क यानुसार वादग्रस्त पॅन्ट तपासणी करणेकामी पाठविणे गरजेचे यासाठी वाटले नाही कि, वस्तुमधील दोष हा सहज व पथम दर्शनी दिसुन येतो. त्यामुळे 13-क प्रमाणे अधिक तपासाची आवश्यकता भासली नाही.
2. वरील सर्व विवेचनावरुन आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहचलो आहोत की, अर्जदाराने केलेली मागणी रास्त आहे व ते नुकसान भरपाई मिळण्यास अंशत: पात्र आहेत म्हणून मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
1) अर्जदार यांनी मंचात जमा केलेली सदर वादग्रस्त पॅन्ट ताब्यात घेऊन विप यांना द्यावी व विप ने अर्जदारास सदर वादग्रस्त पॅन्ट बदलून द्यावी किंवा पॅन्टची किंमत रु.1,530/- (एक हजार पाचशे तीस फक्त) आदेश पारीत दिनांकापासून 30 दिवसात द्यावी.
2) विप यांनी अर्जदारास तक्रार खर्च, शारीरिक मानसिक, आर्थिक त्रासाबद्दल व सेवेत त्रुटी केल्या बद्दल रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) आदेश पारीत केलेल्या तारखेपासून 30 (तीस) दिवसात द्यावेत.
- (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
4) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत
मंचात अर्ज द्यावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य प्र.अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.