ग्राहक तक्रार अर्ज क्र.228/2011
तक्रार अर्ज दाखल दि.10/10/2011
अंतीम आदेश दि.18/01/2012
नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नाशिक
सौ.सुजाता सच्चिदानंद पराडकर, अर्जदार
तर्फे सच्चिदानंद वि.पराडकर, (स्वतः)
रा.5, कैलास सागर, सावरकर नगर जवळ,
गंगापूर रोड, नाशिक.422013
विरुध्द
1) प्रोप्रायटर मे.मधु इलेक्ट्रॉनिक्स, सामनेवाला
12,13,14,पिंगळे कॉम्प्लेक्स,
शरणपूर रोड, नाशिक. 422005.
2) व्यवस्थापकीय संचालक, (सामनेवाला क्र.2 व 4 तर्फे
एल.जी.इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि. अँड.सौरभ कुलकर्णी)
प्लॉट नं.51, सुरजपूर कासना रोड,
ग्रेटर नोएडा 201306.
3) बजाज फिनसर्व्ह लि., (सामनेवाला क्र.3 तर्फे
बजाज ऑटो कॉम्प्लेक्स, अँड.जिवन जाधव)
मुंबई पुणे रोड, पुणे 411035.
4) ए.जी.सर्व्हीस सेंटर,
कॉलेज रोड, नाशिक.422005.
(मा.सदस्या सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडून अर्जदार यांना एल.सी.डी.दुरचित्रवाणी संचाची किंमत रु.45,000/- परत मिळावेत, या रक्कमेवर रक्कम वसूल होईपर्यंत द.सा.द.शे.18% प्रमाणे व्याज मिळावे, मानसिक त्रासाबद्दल भरपाई रक्कम रु.20,000/- मिळावेत, अर्जाचा खर्च रु.5000/- मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला क्र.3 यांनी पान क्र.18 लगत लेखी म्हणणे व पान क्र.19 लगत प्रतिज्ञापत्र तसेच सामनेवाला क्र.2 व 4 यांनी पान क्र.22 लगत लेखी म्हणणे दाखल
तक्रार क्र.228/2011
केलेले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी पान क्र.29 लगत व सामनेवाला क्र.4 यांनी पान क्र.29 लगत प्रतिज्ञापत्रे सादर केलेली आहेत. सामनेवाला क्र.1 हे नोटीस मिळाल्यानंतरही गैरहजर राहीलेले आहेत त्यामुळे सामनेवाला क्र.1 यांचेविरुध्द दि.05/01/2012 रोजी एकतर्फा आदेश करण्यात आलेले आहेत.
अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत.
मुद्देः
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?-होय.
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय?- नाही.
3) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द नामंजूर करण्यात येत आहे.
विवेचनः
अर्जदार यांनी पान क्र.27 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे. सामनेवाला क्र.3 यांनी पान क्र.32 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे. सामनेवाला क्र.2 व 4 यांनी पान क्र.33 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे.
सामनेवाला क्र.2 व 4 यांनी त्यांचे एकत्रीत लेखी म्हणणे कलम 4 व प्रतिज्ञापत्र यामध्ये “अर्जदार यांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडून सामनेवाला क्र.2 यांनी उत्पादीत केलेला दुरचित्रवाणी संच खरेदी घेतला असून त्याचा बिल मेमो नं.61722 असा असल्याचे मान्य केलेले आहे.” अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला क्र.3 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “सामनेवाला क्र.3 ही कर्जपुरवठा करणारी वित्तीय संस्था असून अर्जदार यांचे मागणीनुसार ग्राहक उपयोगी वस्तु खरेदी करण्याकरीता रक्कम रु.45,600/- इतक्या रकमेचा कर्जपुरवठा सामनेवाला क्र.3 यांनी अर्जदार यांना केलेला आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तुबाबतीत सामनेवाला क्र.3 यांचा कोणताही संबंध येत नाही. अर्ज नामंजूर करण्यात यावा.” असे म्हटलेले आहे.
सामनेवाला क्र.2 व 4 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “एल.सी.डी. दुरचित्रवाणी संच खरेदी करतेवेळी अर्जदार यांनी संचाची पुर्णपणे तपासणी करुन समजून उमजून विचारपुर्वक संच खरेदी केलेला आहे. त्याचे मुळ
तक्रार क्र.228/2011
बिल दिलेले आहे. वारंटी कार्डाच्या अटी व शर्ती समजावून सांगितलेल्या आहेत. टी.व्ही.संचाची वारंटी खरेदीपासून 12 महिन्यापर्यंत वैध राहाते. अर्जदार यांचे टी.व्ही.बाबतची वारंटी दि.16/10/2010 रोजी संपलेली आहे. दि.20/04/2011 रोजी अर्जदाराच्या निष्काळजीपणामुळे टी.व्ही.संचात बिघाड झालेला आहे. वारंटीचा अवधी संपुष्टात आल्यानंतर सहा महिन्यांनी बिघाड झाला आहे, त्यामुळे विनामुल्य टी.व्ही.दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी नाही. सामनेवाला क्र.4 यांनी अर्जदार यांचा टी.व्ही. तपासणीसाठी सर्व्हीस सेंटरला आणलेला आहे. त्याची तपासणी केली असता टी.व्ही. संचाचा डिस्प्ले निकामी झालेला आहे असे लक्षात आले. वारंटी पिरीयड संपल्यामुळे स्क्रिन डिस्प्ले दुरुस्त होत नसल्यामुळे तो नवीन टाकावा लागेल व त्याचा योग्य खर्च द्यावा लागेल असे सामनेवाला यांनी अर्जदार यांना सांगितले आहे. नवीन स्क्रिन डिस्प्ले देतांना कंपनीने अर्जदार यांना किमतीत सुट देण्याची हमी दिली. परंतु अर्जदार हे स्क्रिन डिस्प्लेसाठी 10 वर्षाची वारंटी मागत आहेत. अर्ज नामंजूर करण्यात यावा.” असे म्हटलेले आहे.
या कामी अर्जदार यांनीच त्यांचे तक्रार अर्ज कलम 3.3 मध्ये “मुळात 12 महिन्याची वारंटी कालावधी हा अतीशय कमी आहे. इतक्या महागडया वस्तुची वारंटी 12 महिनेच आहे, ही कल्पना तक्रारदारास दिली गेली नाही तसेच वारंटी कार्डसुध्दा भरुन दिले नाही.” असे मान्य केलेले आहे. जर अर्जदार यांना टी.व्ही.चे वारंटी पिरीयडबाबत व वारंटी कार्डबाबत काही तक्रार करावयाची होती तर ती तक्रार त्यांनी टी.व्ही. खरेदी करतांनाच सामनेवाला यांचेकडे करणे गरजेचे होते. टी.व्ही.ची वारंटी किती वर्षाची आहे याची माहिती घेवूनच अर्जदार यांनी टी.व्ही.खरेदी करणे गरजेचे होते. वारंटी पिरीयड कमीजास्त करणे हा विषय ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत येत नाही. जर अर्जदार यांना वारंटी कार्ड भरुन मिळालेले नव्हते तर त्याबाबत त्यांनी टी.व्ही.खरेदी करतांनाच सामनेवाला यांचेकडे तक्रार करणे गरजेचे होते. वारंटी कार्ड भरुन मिळाले नव्हते तर अर्जदार यांनी टी.व्ही.खरेदी करुन ताब्यात घेण्याची गरजच नव्हती.
अर्जदार यांचे तक्रार अर्ज कलम 3.3 मधील कथन व सामनेवाला क्र.2 व 4 यांचे लेखी म्हणण्यामधील कथन याचा विचार होता अर्जदार यांनी दि.16/10/2009 रोजी खरेदी केलेल्या एल.सी.डी. टी.व्ही. करीता 12 महिन्याचीच वारंटी होती व अर्जदार यांचा टी.व्ही.वारंटी पिरीयड संपल्यानंतर दि.20/04/2011 रोजी बंद पडलेला आहे हे स्पष्ट झालेले आहे. वारंटी पिरीयडनंतर कोणतीही वस्तु मोफत दुरुस्त करुन किंवा पार्ट बदलून मिळत नसते. वारंटी पिरीयड संपल्यामुळे अर्जदार यांचे
तक्रार क्र.228/2011
टी.व्ही.मधील स्क्रिन डिस्प्ले बदलण्याकरीता सामनेवाला यांनी अर्जदार यांना किमतीत सुटही देण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु अर्जदार हे स्क्रिन डिस्प्लेसाठी 10 वर्षाची वारंटी मागत आहेत. सामनेवाला यांचे वस्तुला किती वर्षाची वारंटी/ गॅरंटी द्यावयाची हा पुर्ण अधिकार सामनेवाला यांचा आहे. ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत वारंटी पिरीयड जास्त वर्षाचा असावा याबाबत दाद मागता येत नाही.
वारंटी पिरीयड संपल्यानंतर टि.व्ही. नादुरुस्त झाल्यामुळे अर्जदार यांना कोणतीही सेवा मोफत मिळणार नाही तसेच पार्टसही मोफत बदलून मिळणार नाहीत. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे.
जरुर तर अर्जदार हे त्यांचा नादुरुस्त टी.व्ही. सामनेवाला कडून परत घेणेस पात्र आहेत.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाला क्र.2 ते 4 यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, लेखी युक्तीवाद आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द नामंजूर करण्यात येत आहे.
2) अर्जदार यांनी स्वतःहून सामनेवाला यांचेकडे जावून त्यांचा नादुरुस्त टी.व्ही.
स्वतःहून सामनेवालाकडून ताब्यात घ्यावा.
(आर.एस.पैलवान) (अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी)
अध्यक्ष सदस्या
ठिकाणः- नाशिक.