Maharashtra

Nagpur

CC/579/2017

SAU. MINAKSHI J. HARIDAS WAKULKAR - Complainant(s)

Versus

PROP. GURUMAULI ENTERPRISES - Opp.Party(s)

ADV. L. R. MANDAOKAR

08 Jun 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/579/2017
( Date of Filing : 15 Dec 2017 )
 
1. SAU. MINAKSHI J. HARIDAS WAKULKAR
R/O. KORDHA, NAGBHID, CHANDRAPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. SHRI. HARIDAS V. MANGRUJI WAKULKAR
R/O. KORDHA, NAGBHID, CHANDRAPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. PROP. GURUMAULI ENTERPRISES
257, GUPTA TOWER, HANUMAN LANE, SITABUILDI MAIN ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 08 Jun 2020
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

 

  1. तक्रारकर्ते यांनी प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्ती क्रमांक १ ही सुशीक्षीत बेरोजगार असून तक्रारकर्ता क्रमांक २ यांनी त्‍यांचे पत्‍नी करीता मौजा मोर्धा येथील त्‍यांचे राहते घरी लहानसा अगरबत्‍ती बनविण्‍याचा लघुउद्योग सुरु करण्‍याचे ठरविले. त्‍यासंबंधी तक्रारकर्ता यांनी विरुध्‍द पक्षाचे मौजा सिताबर्डी, नागपूर येथील दुकानाला भेट दिली. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला अगरबत्‍ती बनविण्‍याचे मशिन मॉडेल ६ जी सोहम इंडस्‍ट्रीज मशिनरी लिमीटेड उधना, सुरत, दिनांक २०/०६/२०१७ ची निविदा दिली. तक्रारकर्ते यांनी विरुध्‍द पक्षाने दिलेल्‍या निविदानूसार सोहम इंडस्‍ट्री मशिनरी लिमिटेड, उधना, उद्योग नगर, सुरत, गुजरात यांनी निर्मिती केलेली व त्‍या मशिनीकरीता लागणारा कच्‍चा माल जसे लाकडी काड्या व अगरबत्‍ती बनविण्‍यासाठी लागणारे पावडर पुरविण्‍यासंबंधी विरुध्‍द पक्षाला दिनांक २९/०६/२०१७ रोजी ऑर्डर दिला. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला खालिलप्रमाणे मशिन व कच्‍चा मालाकरीता खालिल प्रमाणे बिल अदा करावयास सांगितले.

रुपये १,२०,०००/-      मशीन ६जी मॉडेल साहम कंपनीची अगरबत्‍ती 

                               बनविण्‍यासाठी

रुपये १२,५००/-        अगरबत्‍तीच्‍या काड्या बनविण्‍यासाठी लागणारे   

                                          रॉ मटेरियल

रुपये ११,०००/-        अगरबत्‍ती बनविण्‍यासाठी लागणा-या खुल्‍या  काड्या

रफपये १७,२२०/-       वॅट व इतर खर्च

रुपये १,६०,२७०/-         एकुण

 

     तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला मशिन व कच्‍च्‍या मालाचे खरेदीपोटी रुपये १,४०,०००/- त्‍याच दिवशी अदा केले व उर्वरीत रक्‍कम नंतर अदा केले. रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यावर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला मशिन तक्रारकर्त्‍याचे घरी पाठविण्‍याचे कबुल केले. विरुध्‍द पक्षाने त्‍याच दिवशी सायंकाळी मेकॅनिक सोबत मशिन तक्रारकर्त्‍याचे घरी पाठविले. मेकॅनिकने मशिन स्‍थापीत केली परंतु मशिन सुरु झाली नाही. त्‍यामुळे मशिन मेकॅनिकने मशिन आहे त्‍याच स्थितीत ठेवून मेकॅनिक नागपूर ला निघुन गेला. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास कच्‍च्‍या मालाचे रक्‍कम घेऊन कच्‍चा  माल तक्रारकर्त्‍याला पाठविला नाही. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने अनेकदा विनंती करुनही विरुध्‍द पक्षाने मेकॅनिक तक्रारकर्त्‍याचे गावाला पाठविला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला मशिन सुरु करता आले नाही. तक्रारकर्त्‍याने सदर मशिन चे फोटो मशिन चे निर्माते सोहम इंडस्‍ट्री सुरत यांचे मोबाईल वर पाठविले असता तक्रारकर्त्‍याला पाठविण्‍यात आलेली मशिन ही ६ जी ची नसुन ४ जी चे मॉडेल असल्‍याचे त्‍यांनी सांगितले व तसेच त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला सांगितले की, ४ जी ची मशिन ही ६ जी च्‍या मॉडेल पेक्षा कमी किंमतीची व हलक्‍या स्‍वरुपाची व कमी उत्‍पादन देणारी आहे. सदरची बाब तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला सांगितली. त्‍यानंतर विरुध्‍द  पक्षाने तक्रारकर्त्‍याला ६ जी मॉडेल मशिन त्‍याच किंमतीत तक्रारकर्त्‍याला देण्‍याचे आश्‍वासीत केले. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला ६ जी मॉडेल मशिन पाठविले नाही किंवा तक्रारकर्त्‍याकडे असलेली मशिन परत केली नाही. त्‍यामुळे सदर मशिन तक्रारकर्त्‍याकडे दिनांक १९/६/२०१७ पासुन पडुन आहे. व तक्रारकर्ता त्‍यामधुन कोणत्‍याही प्रकारचे उत्‍पादन घेऊ शकत नाही. तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्षाला दिलेल्‍या रुपये १,६०,७२०/- या रकमेवर व्‍याजादाखल नुकसान होत आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दिनांक २१/०९/२०१७ रोजी पोलिस स्‍टेशन, नागभीड येथे तक्रार दाखल केली परंतु त्‍याचा काहीही उपयोग झाला नाही करीता तक्रारकर्त्‍याने दिनांक २५/१०/२०१७ रोजी विरुध्‍द पक्षाला नोटीस पाठविली परंतु विरुध्‍द पक्षाने नोटीस ची दखल घेतली नाही करीता तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.

  1. विरुध्‍द पक्षाला निर्देश द्यावे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला मशिन विक्रीपोटी तसेच कच्‍चा माल विक्रीपोटी स्विकारलेली रक्‍कम रुपये १,६०,७२०/- तक्रारकर्त्‍याला १२ टक्‍के व्‍याजासह परत करावी व तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मा‍नसिक व शारीरिक ञासापोटी रुपये ३,००,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावा.

 

  1. विरुध्‍द पक्षाचे कथनानूसार तक्रारकर्त्‍याने दिनांक २९/०६/२०१७ रोजी मशिन व कच्‍चा मालाचा पुरवठा करण्‍याबाबत ऑर्डर दिला व तक्रारकर्त्‍याच्‍या  मागणीनूसार मशिन ची निविदा तक्रारकर्ता क्रमांक २ यांचे नावाने  व मशिन खरेदी तक्रारकर्ता क्रमांक १ हिच्‍या नावाने आणि रकमेची पावती तक्रारकर्ता क्रमांक २ च्‍या नावाने देण्‍यात आली यावरुन तक्रारकर्त्‍याचा विरुध्‍द पक्षाला फसविण्‍याचा  बेत होता हे सिद्ध होते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचे कडुन मशिन विकत घेऊन मशिन व्‍यवसायाचे ठिकाणी स्‍थापीत केली व मशिन सुरु झाली. जेव्‍हा मशिन अचानक बंद पडली तेव्‍हा तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाचे अभियंताला बोलाविले व मशिन ची तपासणी केली तेव्‍हा निर्दशनास आले की, सदरची मशिनीत आधीच बिघाड करुन ठेवलेली आहे. तक्रारकर्त्‍याने वाईट उद्देशाने व विरुध्‍द  पक्षाला फसविण्‍याचा उद्देशाने तक्रार मंचामध्‍ये  दाखल केली आहे त्‍यामुळे ती खारीज करण्‍यात यावी. विरुध्‍द पक्षाने त्‍याचे लेखी जबाबात नमुद केले की, सदर मशिनमध्‍ये निर्मिती दोष आहे व मशिनमधील दोष दुर करण्‍याची जबाबदारी निर्मात्‍याची आहे. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रारीमध्‍ये  मशिनच्‍या निर्मात्‍यास पक्षकार बनविले नाही. त्‍यामुळे सदरची तक्रार निर्मार्त्‍याला पक्षकार न‍ बनविण्‍याचे कारणास्‍तव खारीज करण्‍यात यावी. तक्रारकर्त्‍याने सदरची मशिन व्‍यापारी कारणास्‍तव खरेदी केली होती व तक्रारकर्त्‍याने स्‍वयंमरोजगाराकरीता मशिन खरेदी केल्‍याबाबतची एकही दस्‍ताऐवज तक्रारीमध्‍ये दाखल केली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ता ग्राहक संरक्षण कायद्यामधील ग्राहक सज्ञेनूसार ग्राहक होत नाही. त्‍यामुळे सदर तक्रार मंचासमक्ष चालु शकत नाही व ती खारीज होण्‍यास पाञ आहे.
  2. उभयपक्षांनी मंचाचे अभिलेखावर दाखल केलेले दस्‍ताऐवज व त्‍यांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करुन त्‍यावरील निष्‍कर्षे खालिलप्रमाणे नमुद आहे.

        अ.क्र.                  मुद्दे                                                     उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                   होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?         होय
  3. काय आदेश ?                                                         अंतिम आदेशाप्रमाणे 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्ता क्रमांक 1 ही सुशीक्षीत बेरोजगार असुन तक्रारकर्ता क्रमांक २ यांनी त्‍यांची पत्‍नी तक्रारकर्ती क्रमांक १ यांचे करीता मौजा मोर्धा येथे अगरबत्‍ती काड्या बनविण्‍याची मशिन मॉडेल ६ जी सोहम इंडस्‍ट्रीज मशिनरी लिमीटेड उधना, सुरत, विकत घेण्‍याकरीता विरुध्‍द पक्षाला वरील नमुद मशिन व कच्‍चा माल खरेदीपोटी एकूण रुपये १,६०,७२०/- अदा केले. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला त्‍याचे गावी अगर‍बत्‍ती मशिन चा पुरवठा केला परंतु विरुध्‍द  पक्षाने दिलेल्‍या निविदा प्रमाणे व तक्रारकर्त्‍याच्‍या ऑर्डर प्रमाणे तक्रारकर्त्‍याला अगरबत्‍ती मशिन मॉडेल ६जी ऐवजी मॉडेल ४ जी चा पुरवठा केला. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक १२ वर दाखल मॉडेल ६ जी व ४ जी चे फोटोग्राफचे अवलोकन केल्‍यावर तसेच तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्षाव्‍दारे पुरविण्‍यात आलेल्‍या मशिनचे फोटोग्राफचे अवलोकन केल्‍यावर निर्दशनास येते की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला ६ जी ऐवजी ४ जी मॉडेल चा पुरवठा केला आहे. तसेच तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक १२ वर दाखल केलेले ४ जी व ६ जी चे फोटोग्राफ बाबत काहीही आक्षेप मंचाचे अभिलेखावर दाखल केला नाही. यावरुन हे सिद्ध होते की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या  मागणीप्रमाणे ६ जी ऐवजी ४ जी चा पुरवठा करुन तसेच कच्‍च्‍या मालाचे विक्रीपोटी संपूर्ण रक्‍कम घेऊनही कच्‍च्‍या मालाचा पुरवठा केला नाही. ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्त्‍याप्रती ञुटीपूर्ण सेवा असुन अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करणारी कृती आहे व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येते की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला अगरबत्‍ती बनविण्‍याचे मशिन मॉडेल ६ जी चा पुरवठा करावा  आणि तक्रारकर्त्‍याला पुरविण्‍यात आलेली अगरबत्‍ती मशिन ४ जी ची उचल विरुध्‍द पक्ष यांनी   स्‍वखर्चाने करावी व तक्रारकर्त्‍याचे मागणीप्रमाणे व निविदाप्रमाणे  कच्‍चा मालाचा पुरवठा तक्रारकर्त्‍याला त्‍वरीत करावा.

किंवा

          तक्रारकर्त्‍याकडुन अगरबत्‍ती मशिन ६जी पोटी तसेच कच्‍चा मालाचा विक्रीपोटी स्विकारलेली रक्‍कम रुपये १,६०,७२०/- तक्रारकर्त्‍याला अदा करावी व सदर रकमेवर दिनांक २९/६/२०१७ पासुन द.सा.द.शे. १० टक्‍के दराने व्‍याज तक्रारकर्त्‍याला प्रत्‍यक्ष रक्‍कम अदा होईपर्यंत अदा करावे.

  1. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येते की, त्‍याने तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारीरिक ञासापोटी व नुकसान भरपाईपोटी रुपये ३०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावे.
  2. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  3. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  4. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.