जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १२८/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २६/०७/२०१२
तक्रार निकाली दिनांक – १६/०४/२०१३
श्री. अयनोददीन मोजम पिंजारी
वय- ६६ वर्षे, धंदा – निवृत्त
राहणार – मु.पो. बुरझड, ता.जि.धुळे. .............. तक्रारदार
विरुध्द
भावसार इलेक्ट्रॉनिक्स, सेल्स अॅण्ड सर्व्हिस
प्रोपायटर साहेब,
ग्राम पंचायत, शॉपिंग सेंटर, सोनगीर ता.जि. धुळे. ........... विरूध्द पक्ष
कोरम
(मा. अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा. सदस्या – सौ.एस.एस. जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.के.आर. लोहार)
(विरुध्दपक्ष तर्फे – एकतर्फा)
निकालपत्र
सौ.एस.एस. जैन, सदस्याः विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना नादुरूस्त टि.व्ही. दुरूस्त न करून देवून सदोष सेवा दिल्याने तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेकडुन दि.०३/०७/२०११ व्हिडिओकॉन कंपनीचा २१ इंची रंगीत टि.व्ही. आणि त्यासोबत डि.टि.एच. डिश असे साहित्य अनुक्रमे रू.६३९०/- आणि रू.१२५०/- असे एकुण रू.७६४०/- देवून खरेदी केलेला आहे.
३. दोन महिन्यातच सदरचा टि.व्ही. वरील चित्र अर्धेच दिसु लागल्याने तक्रारदार यांनी विरूध्द पक्ष यांचे कडे तक्रार केली व सदरचा टि.व्ही. विरूध्द पक्ष यांचे दुकानात आणून दिला. त्यावेळेस दुकानात लाईट नसल्याने विरूध्द पक्ष यांनी तक्रारदार यास दुस-या दिवशी येण्यास सांगितले. तक्रारदार दुस-या दिवशी विरूध्द पक्ष यांचेकडे गेला असता, विरूध्द पक्ष यांनी सदर टि.व्ही. ची पिक्चर टयुब खराब असलेचे सांगून कंपनीतून टि.व्ही. बदलवून ८ ते १० दिवसांत देतो असे सांगितले. तक्रारदार विरूध्द पक्ष यांनी सांगितलेल्या दिवशी त्यांचेकडे गेला असता, टि.व्ही. दुरूस्त झाला आहे, परंतु सामानामध्ये ठेवला गेलेने लगेच काढता येणार नाही, आपण नंतर या असे विरूध्द पक्ष यांनी तक्रारदारास सांगितले.
४. त्यानंतरही तक्रारदार यांनी अनेक वेळा विरूध्द पक्ष यांचेकडे जावून वेळोवेळी टि.व्हि. ची मागणी करूनही विरूध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना टि.व्हि. दिलेला नाही अथवा तक्रारदारची रक्कम परत केलेली नाही. यामुळे तक्रारदार यांनी विरूध्द पक्ष यांना दि.०३/०१/२०१२ रोजी नोटीस पाठविली असता, विरूध्द पक्ष यांनी दि.१६/१२/२०१२ रोजी नोटीसला उत्तर पाठवून त्यांची जबाबदारी नाकारली आहे. सबब विरूध्द पक्ष यांचे कडून नादुरूस्त टि.व्हि. दुरूस्त करून मिळावा अथवा बदलून मिळावा किेंवा टि.व्ही. ची तक्रारदाराने अदा केलेली रक्कम खरेदी तारखेपासून द.सा.द.शे. १८% व्याजासहित परत मिळावी. तसेच अर्जाचा खर्च देववावा. अशी विनंती तक्रारदार यांनी केलेली आहे.
५. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्टयार्थ पान क्र.८ वर टि.व्हि. खरेदीची पावती, पान क्र.१० व ११ वर तक्रारदारने विरूध्द पक्ष यांना पाठविलेली नोटीस, पान क्र.१२ वर नोटीसची पोहच पावती. पान क्र.१३ ते १७ वर यांचे नोटीस उत्तर इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
६. विरूध्द पक्ष यांचे विरूध्द एकतर्फा आदेश पारित करण्यात आला आहे.
७. तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे व युक्तीवाद ऐकला असता आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
१. तक्रारदारयांचीतक्रारव दाखल कागदपत्रे व युक्तीवाद यांचा विचार होता तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
१.
मुद्दे उत्तर
१. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या
सेवेतत्रुटीकेलीआहेकाय? होय.
२. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे? अंतिमआदेशा प्रमाणे.
३. आदेशकाय? खालीलप्रमाणे.
विवेचन
८. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांची मुख्य तक्रार अशी आहे की, त्यांनी विरूध्द पक्ष यांच्या दुकानातून व्हिडिओकॉन कंपनीचा रंगीत टिव्ही व त्यासोबत डि.टी.एच.डिश दि.०३/०७/२०१० रोजी विकत घेतला होता. सदर टि.व्ही. वरील चित्र दोन महिन्यातच अर्धेच दिसु लागले. त्यांनी लगेच विरूध्द पक्ष यांना कळविले असता, सदर टि.व्ही. दुकानात आणून देण्यास विरूध्द पक्ष यांनी सांगितले. तक्रारदार टि.व्ही. घेवून दुकानात गेला असता विरूध्द पक्ष यांनी टि.व्ही. ठेवून जाण्यास सांगितले. दुसरे दिवशी तक्रारदार विरूध्द पक्ष यांचे कडे गेले असता त्यांनी टि.व्ही. ची पिक्चर टयूब खराब असलेचे सांगून ८ ते ११ दिवसांत बदलवून देतो असे सांगितले.
९. तक्रारदार मुदतीनंतर परत विरूध्द पक्ष यांचेकडे वेळोवेळी गेले असता आज-उदया करतो असे सांगून त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत तक्रारदारने जाब विचारला असता टि.व्ही. दुरूस्त झाला आहे, परंतु सामानामध्ये ठेवला गेलेने लगेच काढता येणार नाही, नंतर या असे विरूध्द पक्ष यांनी सांगितले.परंतु आजपावेतो विरूध्द पक्ष यांनी तक्रारदारास टि.व्ही.बदलवून अथवा दुरूस्त करून दिलेला नाही किेंवा त्याची रक्कमही तक्रारदारास दिलेली नाही.
१०. याबाबत तक्रारदारने विरूध्द पक्ष यांनी दि.०३/०१/२०१२ रोजी नोटीस पाठविली असता विरूध्द पक्ष यांनी दि.१६/०१२/२०१२ रोजी नोटीस उत्तर पाठवून त्यांची जबाबदारी नाकारली आहे.
११. विरूध्द पक्ष यांनी नोटिस नाकारल्याने पाकीट परत आले आहे. त्यामुळे त्यांच्या विरूध्द एकतर्फा आदेश पारित करण्यात आलेला आहे. विरूध्द पक्ष यांनी मे. मंचात हजर होऊन तक्रारदारचे तक्रारीतील कथन नाकारलेले नाही. विरूध्द पक्ष यांची ही कृती सेवेतील त्रृटी हया सदरात मोडते असे आम्हांस वाटते. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तरआम्ही होकारार्थी देत आहोत.
१२. मुद्दा क्र.२- तक्रारदारयांनी विरूध्द पक्ष यांचेकडून नादुरूस्त टि.व्ही. दुरूस्त करून दयावा, टि.व्ही. ची रक्कम खरेदी तारखेपासून द.सा.द.शे. १८% व्याजासहित परत मिळावी, तक्रार अर्जाचा खर्च मिळावा. अशी मागणी केली आहे. वरील विवेचनावरून विरूध्द पक्ष यांचेकडून तक्रारदार हे टि.व्ही. बदलून मिळण्यास पात्र आहेत व तक्रार अर्जाचा खर्च रू. ५००/- मिळण्यास पात्र आहेत असे आम्हांस वाटते.
१३. मुद्दा क्र.३ - वरील विवेचनावरून आम्हीआम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२.(अ) विरूध्द पक्ष यांनी तक्रारदारास या आदेशाच्या दिनांकाच्या प्राप्तीपासून ३० दिवसाचे आत नादुरूस्त टि.व्ही. दुरूस्त करून दयावा.
(ब) तसेच ३० दिवसाचे आत टि.व्ही. दुरूस्त करून न दिल्यास अर्जदाराने विरूध्द पक्ष यांना अदा केलेली रक्कम रू.५,६४०/- या आदेशाच्या दिनांकापासून ६० दिवसात परत करावी. सदर रक्कम मुदतीत न दिल्यास रक्कम परतफेड होईपावेतो सदर रककम ६ टक्के दराने व्याजासहीत विरूध्द पक्ष यांनी तक्रारदारास अदा करावी.
३. विरूध्द पक्ष यांनी तक्रारदारास तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रू.५००/- या
आदेशाच्या दिनांपासून३० दिवसाचे आत अदा करावेत.
(सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.