Maharashtra

Pune

CC/11/121

A.X.Saxena - Complainant(s)

Versus

Professional Courier - Opp.Party(s)

26 Apr 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/11/121
 
1. A.X.Saxena
C/o Pdt Chinchware plot no 253/3,Khese park colony Lohagaon Pune-32 &SEW Section,TACED,Airforce station Maharajapura,Gwalior
Pune
Maha
...........Complainant(s)
Versus
1. Professional Courier
Shop no,Gopal Anand CHS Near Kedari Garden Fatima Nagar,Wanawarie,Pune-40
Pune
Maha
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Anjali Deshmukh PRESIDENT
  Shri. S. K. Kapase MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

द्वारा-  श्री. एस.के. कापसे, मा. सदस्‍य यांचेनुसार 
                                     निकालपत्र
                      दिनांक 26 एप्रिल 2012
 
तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणे-
1.           तक्रारदार एअर फोर्स मध्‍ये काम करतात. तक्रारदारांनी त्‍यांच्‍या नातेवाईकांच्‍या 75 व्‍या वाढदिवसासाठी भेट म्‍हणून जाबदेणारांमार्फत रुपये 10,000/- किंमतीचे वुलन आयटेम दिनांक 02/11/2010 रोजी पाठविले होते. चार आठवडयानंतरही जाबदेणार यांनी पार्सल पोहचवले नाही. जाबदेणारांकडे वारंवार पाठपुरावा करुनही उपयोग झाला नाही. म्‍हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्‍याकडून वस्‍तूची किंमत रुपये 10,000/- व नुकसान भरपाई पोटी रुपये 10,000/- मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली.
2.          जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्‍हणून जाबदेणार यांच्‍याविरुध्‍द मंचाने एकतर्फा आदेश पारीत केला.
3.          तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या जाबदेणार यांच्‍या दिनांक 02/11/2010 च्‍या पावतीचे मंचाने अवलोकन केले असता त्‍यावर तक्रारदारांचे नाव, ज्‍यांना पाठवायचे त्‍यांचे नाव व पत्‍ता, वजन 500 ग्रॅम व त्‍यासाठी जाबदेणार यांनी रुपये 100/- आकारल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारदारांनी पाठविलेले पार्सल मोबदला स्विकारुनही जाबदेणार यांनी पोहचविले नाही, ही जाबदेणार यांच्‍या सेवतील त्रुटी आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. परंतू त्‍याच पावतीवर जाबदेणार यांनी त्‍यांची जबाबदारी रुपये 100/- पर्यन्‍तच मर्यादित राहिल असे नमूद केलेले आहे. तक्रारदारांना ही अट माहित होती. त्‍यामुळे जाबदेणार वर नमूद अटीनुसार रुपये 100/- तक्रारदारांना देण्‍यास जबाबदार आहेत असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. परंतु जाबदेणार यांनी तक्रारदारांनी दिलेले पार्सल पोह‍चविले नाही, तक्रारदारांनी त्‍यांच्‍या नातेवाईकांना दिलेले ती भेट होती, त्‍यामुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे. म्‍हणून तक्रारदार जाबदेणार यांच्‍याकडून नुकसान भरपाई पोटी व तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 2000/- मिळण्‍यास पात्र आहेत असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तक्रारदारांनी त्‍या वस्‍तूची किंमत रुपये 10,000/- होती यासंदर्भात कुठलाही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही त्‍यामुळे तक्रारदारांची ही मागणी मंच नामंजुर करीत आहे.
वर नमूद विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्‍यात येत आहे-
                              :- आदेश :-
            [1]    तक्रार अंशत: मंजुर करण्‍यात येत आहे.
            [2]    जाबदेणार यांनी तक्रारदारांना रुपये 100/- आदेशाची प्रत प्राप्‍त  झाल्‍या
पासून सहा आठवडयांच्‍या आत अदा करावे.
[3]    जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई व तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 2000/- आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून सहा आठवडयांच्‍या आत अदा करावे.
      आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्‍क पाठविण्‍यात यावी.
 
 
 
[ Smt. Anjali Deshmukh]
PRESIDENT
 
[ Shri. S. K. Kapase]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.