Maharashtra

Bhandara

CC/18/3

Sangita Rajkumar Dhurve - Complainant(s)

Versus

Pro.Somesh Rajkumar Lanjewar, Yogesh Erigation - Opp.Party(s)

MR. B.S.Wanjari

05 Mar 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/18/3
( Date of Filing : 30 Jan 2018 )
 
1. Sangita Rajkumar Dhurve
R/O Neri. Ta.Mohadi. Bhandara
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Pro.Somesh Rajkumar Lanjewar, Yogesh Erigation
Khat Road, Bhandara
BHANDARA
MAHARASHTRA
2. Manager, Netafim Erigation India P.V.T L.T.D
सात्विक कॉम्पालेक्स ए सोमेश्व3र, मार्गदर्शक केंद्र जवळ स्टे ट बॅंक ऑफ इंडिया च्या मागे नगर, अमरावती.त.जि.अमरावती
AMRAWATI
MAHARASHTRA
3. TALUKA KRUSHI ADHIKARI. BHANDARA
Ta.Mohadi.Bhandara
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE PRESIDING MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 05 Mar 2021
Final Order / Judgement

(पारीत व्‍दारा श्री नितीन माणिकराव घरडे, मा.पिठासीन अध्‍यक्ष)

                                                                        (पारीत दिनांक–  05 मार्च, 2021)

   

01.  तक्रारकर्तीने दोषपूर्ण ठिंबक चिंचना बाबत विरुदपक्ष क्रं 1 ठिंबक सिंचनचे अधिकृत विक्रेता आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 ठिंबक सिंचन संचाचे निर्माता याचे विरुध्‍द  नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली आहे.

 

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

     

    तक्रारकर्तीचे मालकीची  शेती मौजा नेरी, तालुका मोहाडी, जिल्‍हा भंडारा येथे असून सदर शेतीचा गट क्रं 967, आराजी-0.39 हेक्‍टर आर आणि गट क्रं-969, आराजी-0.39 हेक्‍टर आर तसेच साझा क्रं 21 असा आहे. तिचे शेतामध्‍ये विहिर आणि बोअरवेल व्‍दारे सिंचनाची सोय होती त्‍यामुळे ती संपूर्ण वर्षभरात ओलीता पासून वांगे, मिर्ची, चवळी, कारली व इतर भाजीपाल्‍याचे पिक घेत होती, त्‍यामुळे तिला दरवर्षी चांगले उत्‍पन्‍न मिळत होते व त्‍यावरच तिचे कुटूंबाचा उदरनिर्वाह होता. शासनाने 50 टक्‍के अनुदानावर शेतक-यां करीता ठिंबक सिंचन योजना लागू केली होती. तिने सदर योजनेचा लाभ मिळावा म्‍हणून  विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचेकडे दिनांक-03 जून, 2014 रोजी ऑन लाईन अर्ज सादर केला होता व सदरचा तिचा अर्ज दिनांक-22.08.2014 रोजी मंजूर झाला होता व तसे पत्र विरुध्‍दपक्ष क्रं 3 यांनी दिनांक-26.09.2014 रोजी दिले होते. तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष क्रं 1 ठिंबक सिंचन विक्रेता याचे कडून 4500 मीटर लांब ठिंबक सिंचन संच व इतर किरकोळ सामान दिनांक-06.10.2014 रोजी एकूण रुपये-85,220/- मध्‍ये विकत घेतले व सदर ठिंबक सिचंन संच विरुध्‍दपक्ष क्रं 1  याचे मार्फतीने तक्रारकर्तीचे शेतात लावण्‍यात आले व त्‍याप्रमाणे करारनामा करुन त्‍यात अटी व शर्ती नमुद केल्‍यात तसेच वॉरन्‍टी देण्‍यात आली. सोबत नेटाफीम ठिंबक संचा संबधी देखभाल पुस्तिका पुरविण्‍यात आली. सदर करारनाम्‍यातीबल प्रपत्र क्रं 9 मधील परिच्‍छेद क्रं 1 मध्‍ये सर्व साहित्‍य कृषी आयुक्‍तालयाने घालून दिलेल्‍या निकषा नुसार योग्‍य दर्जाचे आहे तसेच परिच्‍छेद क्रं 5 मध्‍ये ठिंबक सिंचन संच व्‍यवस्थित राहण्‍यासाठी तक्रारकर्तीचे शेतात नियमित भेटी देण्‍यात येतील व विक्री नंतर सेवा पुरविण्‍यात येईल. तंत्रज्ञा मार्फतीने महिन्‍यातून एक वेळा भेट देतील असेही नमुद आहे. ठिंबक संचा बाबत तक्रार असल्‍यास 07 दिवसाचे आत तक्रारीचे निराकरण करण्‍यात येईल. ठिंबक सिंचन संचाचा कोणताही घटक तांत्रीक दृष्‍टया खराब झाला तर तो तीन वर्षाचे कालावधी पर्यंत कंपनी बदलवून देईल. ठिंबक सिंचन संचाचे आयुष्‍य 05 वर्षाचे राहिल आणि पाच वर्षा पर्यंत दोष असल्‍यास त्‍यातील भाग साहित्‍य विनामुल्‍य बदलवून देण्‍यात येईल असेही नमुद आहे. ठिंबक संच नाकाम झाल्‍यास किम्‍मत परत करण्‍यात येईल.  

    तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, ठिंबक सिंचन संच कार्यान्‍वीत झाल्‍याचे प्रमाणपत्र विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांनी दिनांक-02.01.2015 रोजी दिले. फेब्रुवारी, 2016 मध्‍ये ठिंबक सिंचन संचा मध्‍ये निर्मिती प्रक्रियेत दोष असल्‍याने त्‍याला अनेक ठिकाणी छिद्र पडले व सदर संच निकामी झाला व त्‍यामुळे शेतामध्‍ये पाणी देता आले नाही. निकृष्‍ट दर्जाचे बनावटीमुळे अनेक ठिकाणी छिद्रे पडलीत. तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचेकडे दिनांक-31.03.2016 रोजी आणि दिनांक-16.05.2016 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 1 ठिंबक सिंचन विक्रेत्‍याकडे तक्रार केली. काही दिवसात संपूर्ण पाईप निकामी झालेत. तक्रारकर्तीचे तक्रारी नंतर विरुध्‍दपक्ष क्रं 2 ठिंबक सिंचन निर्मात्‍याने तपासणी करुन संचाचे निर्मिती मध्‍ये दोष नसल्‍याचा अहवाल दिला. सदर संच हा उंदीर व गिलहरी या सारख्‍या प्राण्‍यांनी कुरतडल्‍यामुळे खराब झाला असा खोटा निष्‍कर्ष काढला. वस्‍तुतः तिचे शेतातील पिक हे प्‍लॉस्‍टीक आच्‍छादन वापरुन घेण्‍यात होते व पाईप सुध्‍दा प्‍लॉस्‍टीक आच्‍छादनाने झाकलेले होते तसेच शेतात वेळोवेळी किटकनाशकाची फवारणी होत असल्‍यामुळे उंदीर किंवा गिलहरी प्राण्‍याने पाईप कुरतडण्‍याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. विरुध्‍दपक्षांनी तक्रारकर्तीला कोणतेही प्रशिक्षण दिले नाही व अटीची पुर्तता केली नाही.

           तिने पुढे असे नमुद केले की, अर्थ व सांखिकी संचनालयालय, नियोजन विभाग, महाराष्‍ट्र शासन मुंबई पुरस्‍कृत सिंचन योजनेचे मुल्‍यमापन अभ्‍यास पाहणी करीता जिल्‍हा सांखिकी कार्यालय भंडारा येथील कार्यालयातील कर्मचारी दिनांक-08.08.2016 रोजी तिचे शेतात आले होते व त्‍यांनी आपला अहवाल सादर केला, त्‍या अहवाला मध्‍ये ठिंबक संच खराब झाला असल्‍याने तो वितरकाने वेळीच बदलवून दयावा. तक्रारकती्रने कृषी विभागाला कळवूनही योग्‍य ते सहकार्य मिळाले नाही, कृषी विभागाने योग्‍य ते सहकार्य करावे असे नमुद केले. ठिंबक सिंचन संचाच्‍या लहान पाईपांना बारीक छिद्र पडल्‍यामुळे पाण्‍याचा पुरवठा शेवटच्‍या झाडा पर्यंत होत नसल्‍याने तिचे शेतातील पिक वाया गेले त्‍यामुळे तिला त्‍या वर्षात कमी उत्‍पन्‍न मिळाले. सदर ठिंबक सिंचन संच पूर्णपणे नादुरुस्‍त असल्‍यामुळे तिला कोणतेही पिक घेता आले नाही व शेत तसेच पडून आहे. ती आपल्‍या शेतामध्‍ये दरवर्षी भाजीपाला, चवळी, कारले, दोडके, वांगे मिर्ची इत्‍यादी पिके घेत होती परंतु सिंचन सिंच नादुरुस्‍त झाल्‍याने तिला सन-2015 ते सन-2018 या वर्षात पिक घेता आले नाही त्‍यामुळे प्रतीवर्षी रुपये-5,00,000/- प्रमाणे एकूण रुपये-15,00,000/- उत्‍पन्‍नाचे नुकसान झाले.

        तिने पुढे असे नमुद केले की, जिल्‍हा अधिक्षक, कृषी विभाग यांनी दिनांक-06.09.2016 रोजीचे पत्रा नुसार सेंट्रल इन्सिटयुट ऑफ प्‍लॅस्‍टीक इंजिनयरींग अॅन्‍ड टेक्‍नॉलॉजी, औरंगाबाद येथे संचाचे सॅम्‍प्‍ल तपासणी करीता पाठविले व त्‍यांनी विरुध्‍दपक्ष क्रं 2 ठिंबक सिंचन निर्मात्‍याने दिलेल्‍या अहवालापेक्षा भिन्‍न अहवाल दिला. अशाप्रकारे तक्रारकर्तीस निकृष्‍ट दर्जाचा माल पुरवून दोषपूर्ण सेवा आणि अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2  अनुक्रमे विक्रेता आणि निर्माता यांनी केला. तक्रारकर्तीने वकीलांचे मार्फतीने विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 यांना रजिस्‍टर पोस्‍टाने दिनांक-29.08.2016 रोजीची नोटीस पाठविली परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 1 याने सदर नोटीसला खोटे उत्‍तर पाठविले म्‍हणून शेवटी तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 अनुक्रमे ठिंबक सिंचन विक्रेता आणि निर्माता  यांचे विरुध्‍द खालील मागण्‍या केल्‍यात-

  1. विरुध्‍दपक्ष क्रं 1  व क्रं 2 अनुक्रमे ठिंबक सिंचन विक्रेता आणि निर्माता  यांना आदेशित करण्‍यात यावे की, त्‍यांनी तक्रारकर्तीचे शेतात नविन ठिंबक सिंचन संच स्‍वखर्चाने बसवून दयावा किंवा तक्रारकर्तीने ठिंबक सिंचन संचाची अदा केलेली किम्‍मत रुपये-85,220/- व्‍याजासहीत तिला परत करावी.
  2. ठिंबक सिंचन संचाचे नादुरुस्‍तीमुळे तक्रारकर्तीला सन-2015 ते सन-2018 वर्षात पिके न घेता आल्‍यामुळे प्रतीवर्षी रुपये-5,00,000/- प्रमाणे नुकसान झालेले असल्‍याने  सदर नुकसानीची भरपाई प्रतयक्ष अदायगी पावेतो वार्षिक-18 टक्‍के दराने व्‍याजासह विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 अनुक्रमे ठिंबक सिंचन विक्रेता आणि निर्माता  यांचे कडून मिळावी.
  3. प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

03.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 अधिकृत डिलर/विक्रेता याने लेखी उत्‍तर दाखल करुन तक्रारी मधील बहुतांश परिच्‍छेद नामंजूर केलेत. सदर ठिंबक सिंचन संचाचे निर्मितीमध्‍ये दोष असून पाईपला ठिकठिकाणी छिद्रे पडल्‍याने तो संपूर्णपणे नादुरुस्‍त झाला असल्‍याचा तक्रारकर्तीचा आरोप नामंजूर केला. तक्रारकर्तीचे नोटीसला त्‍यांनी उत्‍तर दिलेले आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 याने तक्रारकर्तीला मोफत सर्व्‍हीसचे एकूण 03 कुपन्‍स दिले होते. करारा प्रमाणे त्‍याने तक्रारकर्तीचे शेतात नियमित भेटी देऊन ठिंबक सिंचन संचाची पाहणी केली, त्‍यावेळी तक्रारकर्ती, तिचे पती आणि सासरे यांनी संचाचे निर्मितीमध्‍ये दोष असल्‍या बाबत कधीही तक्रार केली नाही. दिनांक-18.02.2015 आणि दिनांक-07.11.2015 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 1 याने मोफत संचाचे भाग बदलवून दिले होते त्‍यावेळी तक्रारकर्तीचा सासरा नामे देवचंद धुर्वे याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 याला सर्व्‍हीस कुपन दिले होते. तक्रारकर्तीचे मौखीक तक्रारी वरुन तिचे उपस्थितीत 10 मीटरचे सॅम्‍प्‍ल सेल्‍स इंजिनियर श्री दिपक जे.जाधव यांनी नेले आणि ते परिक्षणासाठी Netafim Irrigation India Pvt. Ltd. Sahuli G.I.D.C. Valodra पाठविले असता त्‍यांनी  खालील प्रमाणे अहवाल दिला-

 

A) The problem is appeared after two year from date of installation of   sanch.

B) Sample was checked in the ESCR pipe test and Hydrostatic water  pressure test and not observed any failure in test.

C) In the sample observed the small holes.

D) The sign of damages shows that, it is happened due to bite by  rodent (rat. Squirrel etc.)

E) It is happened in the field.

      वरील अहवाला नुसार दोष हा ठिंबक सिंचन संच बसविल्‍या नंतर दोन वर्षा नंतर उदभवला असून पाण्‍याचे प्रेशरची चाचणी केली असता काही दोष दिसून आला नाही. संचामध्‍ये बारीक छिद्र दिसून आलेत परंतु ते उंदीर आणि गिलहरी प्राण्‍याचे कुरतडल्‍यामुळे होऊ शकते. सदर अहवाला नुसार ठिंबक सिंचन संचाचे निर्मिती मध्‍ये कोणताही दोष दिसून येत नाही. सदर दिनांक-18.05.2016 रोजीचा अहवाल फोटोग्राफसह तक्रारकर्तीला श्री दिपक जाधव यांनी दिनांक-10.06.2016 रोजी पुरविला होता. सदर अहवाला मध्‍ये उंदीर आणि गिलहरी प्राण्‍यांवर प्रतिबंध लावण्‍याचे सुचित केले होते. तक्रारकर्तीचे शेताचे बाजूला तांदुळाची गिरणी आणि गोडाऊन आहे. तक्रारकर्तीने सदर ठिंबक सिंचन संचाची योग्‍य ती काळजी घेतली नाही.  तक्रारकर्तीचे जया शेतात संच बसविलेला आहे, त्‍या शेताचे जवळ तिचे राईसमिल व गोडाऊन असून संचाचा वापर केल्‍या नंतर ती संचाची ड्रिप लाईन वरील गोडाऊनमध्‍ये तसेच शेतात अस्‍त्‍व्‍यस्‍त ठेवीत होती. तक्रारकर्तीने गोडाऊनचे बाजूला उघडयावर संच ठेवला आणि त्‍या बाबतचे फोटो घेतलेत व ते दाखल केलेले आहेत. उघडयावर संच ठेवल्‍यामुळे उंदीर सारख्‍या प्राण्‍याने तो कुरतडला. तीन सर्व्‍हीस कुपन व्‍यतिरिक्‍त तक्रारकर्तीचे पती श्री राजकुमार धुर्वे यांनी आणखी एका कुपनची मागणी केली होती त्‍याप्रमाणे ते कुपन दिनांक-08.05.2017 रोजी दिले होते. दिनांक-13.08.2018 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 1 ने तक्रारकर्तीचे शेतात भेट देऊन Venchury injector योग्‍यरित्‍या स्‍थापीत केले आणि दिनांक-14.08.2018 रोजी सदर संचाचे Saddal  बदलवून दिला तसेच जी.आय. पाईपची वेल्‍डींग वेल्‍डर कडून करुन दिली व त्‍याचे फोटो घेतलेत ते सोबत दाखल करण्‍यात येत आहेत. अशाप्रकारे विरुध्‍दपक्षाने कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही.

      विरुध्‍दपक्ष क्रं 1 अधिकृत डिलर/विक्रेता याने पुढे असे नमुद केले की, सदर संचाची किम्‍मत रुपये-90,589/- एवढी होती आणि तक्रारकर्तीने फक्‍त रुपये-83,800/- विरुध्‍दपक्ष क्रं 1 याला दिले होते. तक्रारकर्तीला बिल दिले होते परंतु तिने अदयाप पर्यंत उर्वरीत रक्‍कम रुपये-6789/- विरुध्‍दपक्ष क्रं 1 ला दिलेली नाही. सदर ठिंबक सिंचन संच हा विरुध्‍दपक्ष क्रं 2 याने निर्मित केलेला होता, तो विरुध्‍दपक्ष क्रं 1 याने निर्मित केलेला नाही. तक्रारकर्तीने सदरचा संच हा व्‍यवसायीक हेतूने केलेला असल्‍यामुळे ती ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदी प्रमाणे ग्राहक होत नाही.  सध्‍या सुध्‍दा संच व्‍यवस्थित सुरु आहे. सबब तक्रारकर्तीची विरुध्‍दपक्ष क्रं 1 अधिकृत डिलर/विक्रेता याचे विरुध्‍दची तक्रार  खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली.

04.    विरुध्‍दपक्ष क्रं 2 ठिंबक सिंचन निर्माता याने लेखी उत्‍तर  दाखल केले. सदर तक्रार चालविण्‍याचे कार्यक्षेत्र प्रस्‍तुत जिल्‍हा ग्राहक आयोगास येत नाही. तक्रारकर्तीने ठिंबक सिंचन संच हा विरुध्‍दपक्ष क्रं 1 याचे कडून विकत घेतला होता आणि विरुध्‍दपक्ष क्रं 1 हा विरुध्‍दपक्ष क्रं 2 चा अधिकृत डिलर आहे या बाबी विवादास्‍पद नाहीत. तक्रारकर्ती आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांचेमध्‍ये ठिंबक सिंचन संचा बाबत करार करण्‍यात आला होता आणि त्‍यामध्‍ये अटी व शर्ती नमुद करण्‍यात आल्‍या होत्‍या. करारा प्रमाणे विरुध्‍दपक्ष क्रं 1 याचे तंत्रज्ञाने तक्रारकर्तीचे शेतात वेळोवेळी भेटी देऊन मोफत सर्व्‍हीस दिल्‍या होत्‍या. तक्रारकर्तीने मोफत सर्व्‍हीसचे कुपनचा वापर केला होता. तक्रारकर्तीने तक्रारी मध्‍ये ती जवळपास 51 लाखाचे उत्‍पादन घेत असल्‍याचे नमुद केले परंतु त्‍या संबधाने कोणताही दस्‍तऐवजी पुरावा सादर केलेला नाही. तक्रारकर्तीने विरुदपक्ष क्रं 1 व क्रं 3 यांचेकडे तक्रारी केलयात तो एक अभिलेखाचा भाग असून त्‍याचेशी विरुध्‍दपक्ष क्रं 2 ठिंबक सिंचन निर्मात्‍याचा संबध येत नाही. तक्रारकर्तीचे तक्रारी वरुन तंत्रज्ञाचे चमुने पाहणी करुन अहवाल दिलेला आहे, त्‍यानुसार सदर संचाचे निर्मिती मध्‍ये कोणताही दोष नसल्‍याचे नमुद आहे. सदर ठिंबक संचाची पाईप लाईन ही उंदीर आणि गिलहरी सारख्‍या प्राण्‍यांनी कुरतडली होती, सदर बाब फोटोग्राफस वरुन सिध्‍द होते. तक्रारकर्तीने तिचे तक्रारीचे समर्थनार्थ तंत्रज्ञांचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारकर्तीने पिकाचे नुकसानी बाबत केलेली विधाने चुकीची तथ्‍यहिन आहेत. सेंट्रल ईन्सिटयुट ऑफ प्‍लॅस्‍टीक इंजिनियरींग अॅन्‍ड टेकनॉलॉजी यांचा दिनांक-06.09.2016 रोजीचा अहवाल हा एक अभिलेखाचा भाग आहे परंतु सदरचे अहवालामध्‍ये संचामध्‍ये निर्मिती दोष असलया बाबत कुठेही नमुद केलेले नाही.  तक्रारकर्तीने पाठविलेल्‍या कायदेशीर नोटीसला कोणतेही उत्‍तर देण्‍याचे प्रयोजन विरुध्‍दपक्ष क्रं 2 यास वाटले नाही.  जयाअर्थी तक्रारकर्तीने मोफत सर्व्‍हीस कुपनचा वापर केला त्‍याअर्थी तिने सदर ठिंबक सिंचनचा वापर केल्‍याची बाब सिध्‍द होते.  जर ठिंबक सिंचना मध्‍ये निर्मिती दोष असता तरच तो संच बदलवून दिला असता. संचामध्‍ये जर निर्मिती दोष असता तर ती बाब एका आठवडयात वा एका महिन्‍यात उघड झाली असती परंतु सदर वादातीत संचाचा उपयोग हा दोन वर्ष केलेला आहे. सदर संच हा उंदीर आणि गिलहरी यांचे कुरतडल्‍याने खराब झाला.

       विरुध्‍दपक्ष क्रं 2 ठिंबक सिंचन निर्माता याने  पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्तीचे तक्रारी वरुन तिचे उपस्थितीत 10 मीटरचे सॅम्‍प्‍ल सेल्‍स इंजिनियर श्री दिपक जे.जाधव यांनी नेले आणि ते परिक्षणासाठी Netafim Irrigation India Pvt. Ltd. Savli G.I.D.C. Valodra पाठविले असता त्‍यांनी  खालील प्रमाणे अहवाल दिला-

  1.  The problem is appeared after two year from date of installation of sanch.
  2.  Sample was checked in the ESCR pipe test and Hydrostatic water pressure test and not observed any failure in test.

C)       In the sample observed the small holes.

D)      The sign of damages shows that, it is happened due to bite by  rodent (rat. Squirrel etc.)

E)       It is happened in the field.

   सदर अहवाला वरुन संचामध्‍ये निर्मिती दोष नसलयाचे स्‍पष्‍ट होते. दिनांक-18.05.2016 रोजीचा अहवाल फोटोग्राफसह तक्रारकर्तीला श्री दिपक जाधव यांनी दिनांक-10.06.2016 रोजी पुरविला होता. सदर अहवाला मध्‍ये उंदीर आणि गिलहरी प्राण्‍यांवर प्रतिबंध लावण्‍याचे सुचित केले होते. तक्रारकर्ती  ड्रिपलाईन गोडाऊन मध्‍ये ठेवते. तक्रारकर्तीने स्‍वतःच सदर संचाची योग्‍य ती काळजी घेतली नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 2 याने तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. सबब तक्रारकर्तीची तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी असे विरुध्‍दपक्ष क्रं 2 ठिंबक सिंचन निर्माता याने नमुद केले.

05.   विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, मोहाडी, जिल्‍हा भंडारा यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्‍यांनी लेखी निवेदना मध्‍ये तक्रारकर्ती सौ.संगिता राजकुमार धुर्वे हिने दिनांक-03 जून, 2014 रोजी ऑनलाईन अर्ज सादर केला होता त्‍यानुसार तिचे शेतातील गट क्रं 969 क्षेत्र 0.39 तर गट क्रं 967 क्षेत्र 0.39 क्षेत्रात ठिंबक सिंचन संच बसविण्‍यात आला होता. सदर संच बसविल्‍या बाबत मोका तपासणी श्री आर.जी.गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी यांनी केली होती व तो संच कार्यान्वित झाल्‍याचे प्रमाणपत्र व मोका तपासणीपत्र ते सोबत जोडत आहेत. सुक्ष्‍म सिंचन पध्‍दतीचे फायदे व व्‍यवस्‍थापनाचे प्रशिक्षण त्‍यांनी महालगाव येथे दिनांक-20.03.2016 रोजी शेतक-यांना दिले होते. सदर संचास दिनांक-30.01.2015 रोजी उपविभागीय कृषी अधिकारी यांचे मार्फतीने रुपये-29016/- अनुदान दिले होते. तक्रारकर्तीची तक्रार दिनांक-31 मार्च, 2016 रोजी त्‍यांचे कार्यालयास प्राप्‍त झालया नंतर संचाची तपासणी करीता इंमीटांग पाईप 30 मीटर लांबीचा नमुना घेण्‍यात आला होता व सदर नमुना दिनांक-01.09.2016 रोजीचे पत्रान्‍वये जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भंडारा यांचे कडे पाठविण्‍यात आला होता. सदर नमुना सेंट्रल ईन्सिटयुट ऑफ प्‍लास्‍टीक इंजिनियरींग अॅन्‍ड टेक्‍नॉलॉजी,एम.आय.डी.सी., चिकलथाना, औरंगाबाद यांचेकडे सादर करण्‍यात आले होते, त्‍यांचा तपासणी अहवाल ते सादर करीत असल्‍याचे नमुद केले.

06.   तक्रारकर्ती आणि विरुदपक्ष क्रं 1 सिंचन संच विक्रेता  व विरुध्‍दपक्ष क्रं 2  सिंचन संच निर्माता यांनी आप-आपले शपथे वरील साक्षी पुरावे दाखल केलेत. तक्रारकर्तीने तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 1 याने दसतऐवज दाखल केलेत. विरुध्‍दपक्ष क्रं 1 याने शेतातील फोटोग्राफस दाखल केलेत. तक्रारकर्तीने लेखी युक्‍तीवाद दाखल केला तर विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी लेखी युक्‍तीवादा बाबत पुरसिस दाखल केली. तक्रारकर्तीने भाजी पाला खरेदीची बिले दाखल केलीत. विरुध्‍दपक्ष क्रं 2 विक्रेता याने सिंचाई उपस्‍कर, उत्‍सर्जकी  पध्‍दतीया या बाबत दस्‍तऐवज दाखल केलेत.

07.  उभय पक्षां तर्फे दाखल दस्‍तऐवज व  साक्षी पुरावे, अहवाल ईत्‍यादीचे  जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे अवलोकन करण्‍यात आले तसेच तक्रारकर्तीचे वकील श्री एन.पी.मेश्राम आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 ठिंबक सिंचन निर्मात्‍याचे वकील श्री एच.एन.वर्मा यांचा मौखीक युक्‍तीवाद यावरुन  जिल्‍हा  ग्राहक आयोगा समोर न्‍यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-

अक्रं

मुद्या

उत्‍तर

1

तक्रारकर्ती ही विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांची ग्राहक होते  काय?

-होय-

 

 

 

2

तक्रारकर्तीला विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्मित आणि विरुध्‍दपक्ष क्रं 1 याने विक्री केलेला ठिंबक सिंचन संचाचे पाईप यामध्‍ये निर्मिती दोष असल्‍याची  बाब पुराव्‍यानिशी सिध्‍द होते काय

-होय-

3

काय आदेश?

अंतिम आदेशा नुसार

                                                                                     :: निष्‍कर्ष ::

मुद्दा क्रं 1 बाबत

08.   तक्रारकर्तीने तिचे शेतामध्‍ये सिंचना करीता विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्मित ठिंबक सिंचन संच विरुध्‍दपक्ष क्रं 1 अधिकृत विक्रेता यांचे मार्फतीने  विकत घेतले होते ही बाब सर्व पक्षांना मान्‍य आहे, त्‍या बाबत कोणताही विवाद नाही त्‍यामुळे तक्रारकर्ती ही विरुध्‍दपक्ष क्रं 1 व विरुध्‍दपक्ष क्रं 2 ची ग्राहक होते त्‍यावरुन आम्‍ही मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत.

मुद्दा क्रं 2 बाबत

09.   तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्मित ठिंबक सिंचन संच हा विरुध्‍दपक्ष क्रं 1 योगेश एरिगेशन, भंडारा या अधिकृत विक्रेत्‍या कडून दिनांक-06.10.2014 रोजी एकूण रुपये-85,220/- एवढया किमतीत विकत घेतल्‍या बाबत  बिल इन्‍व्‍हाईसची प्रत  प्रत  पान क्रं 22 वर दाखल आहे, सदर सिंचन संचा करीता काही रकमेचे शासकीय अनुदान सुध्‍दा तिला मिळालेले आहे परंतु विरुध्‍दपक्षांना मात्र त्‍यांचे सिंचनसंचाची संपूर्ण रक्‍कम मिळालेली आहे.  या प्रकरणा मधील महत्‍वाचा वाद असा आहे की, तक्रारकर्तीचे म्‍हणण्‍या प्रमाणे सदर ठिंबक सिंचन संचाला ठिक ठिकाणी छिद्रे पडलेली होती (Aries Drip liner 16008 got small holes and cut in between) तक्रारकर्तीचे तक्रारी संबधात विरुध्‍दपक्षाचा दिनांक-18 मे, 2016 रोजीचा अहवाल पान क्रं 26 वर दाखल आहे, त्‍या अहवालाचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये Analysis:- मध्‍ये खालील प्रमाणे नमुद केले.

 

  1. 10 mtrs samples received.
  1. Pipe is produced on 03/07/2013 and problem is appears after two year from date of installation.
  1. Sample was checked in the ESCR pipe test and Hydrostatic water pressure test and not observed any failure in test.
  1. In the sample observed the small holes.

     E) The sign of damages shows that, it is happened due to bite by    rodent (rat. Squirrel etc.) or others as shown in the photograph

     F) It is happened in the field.

          सदर ठिंबक सिंचन संचाला मोठमोठाले छिद्र पडल्‍याचे छायाचित्र पान क्रं-27 व 28 वर दाखल आहेत.

10.   तक्रारकर्तीने पान क्रं 30 ते 40 वर अर्थ व सांख्यिकी संचलनालय, नियोजन विभाग, महाराष्‍ट्र शासन, मुंबई केंद्र पुरस्‍कृत सूक्ष्‍म सिंचन योजनेची मूल्‍यमापन अभ्‍यास पाहणी केल्‍या बाबत  दिनांक-08.08.2016 रोजी तयार केलेला अहवाल दाखल केला. सदर अहवाला मध्‍ये योजने अंतर्गत बसविण्‍यात आलेले सिंचनाचे क्षेत्र 0.60 हेक्‍टर आर दर्शविलेले असून सिंचीत क्षेत्र- 4.05 दर्शविलेले आहे. सन-2012-13 मध्‍ये पिकाखालील क्षेत्रा मध्‍ये पुढील  प्रमाणे क्षेत्र दर्शविलेले आहे-चवळी-0.40, कारले-0.20, दोडके-0.20, वांगी-1.01, मिरची-1.61 असे नमुद आहे. तर सन-2013-14 मध्‍ये पिकाखालील क्षेत्रा मध्‍ये पुढील  प्रमाणे क्षेत्र दर्शविलेले आहे-चवळी-0.40, कारले-0.20, दोडके-0.20, वांगी-1.01, मिरची-1.61 असे नमुद आहे.  तर फलोत्‍पादन व भाजीपाला व्‍यतिरिक्‍त इतर पिके या मध्‍ये सन-2012-2013 मध्‍ये पिकाखालील क्षेत्र पुढील प्रमाणे दर्शविलेले आहे-धान-2.43, गहू-2.43 असे नमुद असून सन-2013-2014 मध्‍ये धान आणि गहू पिकाचे क्षेत्र सन-2012-2013 एवढेच दर्शविलेले आहे. सन-2014-2015 मध्‍ये भाजीपाला आणि ईतर पिकांचे क्षेत्र सुध्‍दा वरील प्रमाणेच नमुद केलेले आहे. सदर अहवाला मध्‍ये अक्रं 20 मध्‍ये सिंचन संच उत्‍पादक/वितरकाने विक्री पश्‍चात सेवा दिल्‍या काय या प्रश्‍नावर वारंवार संपर्क करुनही वितरकाने प्रतिसाद दिला नसल्‍याचे नमुद केले. अहवालातील अक्रं 25 मध्‍ये पाईपला ठिकठिकाणी बारीक छीद्र पडले असल्‍यामुळे पूर्ण शेतात पाणी पोहचत नाही. वितरकाने संच विक्री पश्‍चात सहकार्य करावयास हवे होते. संचाचा दर्जा चांगला असायला हवा होता. संच खराब असलयामुळे पिक लागवड करण्‍यात आली नाही. संच खराब असलयामुळे बदलवून द्दावयास हवा होता या बाबत कृषी विभागाकडे तक्रारी करुनही सहकार्य मिळाले नाही. सदर अहवाला मध्‍ये माहिती संकलीत करणारे संचालनालयाचे अधिकारी कर्मचारी यांचे अभिप्राया मध्‍ये ठिंबक सिंचनाच्‍या लहान पाईपांना बारीक छीद्र पडल्‍यामुळे पाण्‍याचा पुरवठा शेवटच्‍या झाडा पर्यंत होत नसल्‍यामुळे शेतक-याचे पिक वाया गेले त्‍यामुळे सदर वर्षात उत्‍पन्‍न खूप कमी झाले आहे. सध्‍या स्थितीत संच नादुरुस्‍त असल्‍यामुळे  शेतक-याने पिक घेतले नाही. संच घेतलेल्‍या जागेत शेतक-याने कोणतेही पिक घेतलेले नाही व शेत रिकामे असल्‍याचे नमुद केलेले आहे. अर्थ व सांख्यिकी संचलनालय, नियोजन विभाग, महाराष्‍ट्र शासन, मुंबई केंद्र पुरस्‍कृत सूक्ष्‍म सिंचन योजनेची मूल्‍यमापन अभ्‍यास पाहणी अहवालावर जिल्‍हा ग्राहक आयोगास अविश्‍वास ठेवण्‍याचे कोणतेही प्रयोजन वाटत नाही कारण सदर अहवाल हा महाराष्‍ट्र शासनाचे निःपक्ष शासकीय यंत्रणेने तयार केलेला आहे.

11.  तक्रारकर्तीने पान क्रं-41 ते 43 वर सेंट्रल ईन्सिटयुट ऑफ प्‍लॅस्‍टीक इंजिनियरींग अॅन्‍ड टेक्‍नॉलॉली, चिकलठाणा, औरंगाबाद यांनी प्‍लॉस्‍टीक्‍स परिक्षणा बाबत दिनांक-18.04.2017 रोजीचा अहवाल अभिलेखावर दाखल केला, सदर अहवाल हा विरुध्‍दपक्ष क्रं 1 निर्माता यांनी मागविलेला आहे. सदर अहवाला मध्‍ये खालील प्रमाणे नमुद आहे-

          Quantity-38 mtr. Cracks found at folded portion of pipe. Emitting Pipes & fittings should not have manufacturing defects. Resistance of emitting pipe to hydrostatic pressure at elevated temperature-Emitting pipe shall with stand test pressure without showing sign of damage.

     दोन्‍ही विरुध्‍दपक्षांचा असा युक्‍तीवाद आहे की, सदर ठिंबक संचाची पाईप लाईन ही उंदीर आणि गिलहरी सारख्‍या प्राण्‍यांनी कुरतडली होती, सदर बाब त्‍यांनी प्रकरणात दाखल केलेल्‍या फोटोग्राफस वरुन सिध्‍द होते. तक्रारकर्तीने तिचे तक्रारीचे समर्थनार्थ तंत्रज्ञांचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारकर्तीचे शेताचे बाजूला तांदुळाची गिरणी व गोडाऊन आहे आणि ती सदर   ड्रिपलाईन गोडाऊन मध्‍ये ठेवते त्‍यामुळे तक्रारकर्तीने स्‍वतःच सदर संचाची योग्‍य ती काळजी घेतली नाही. तक्रारकर्तीने पाठविलेल्‍या कायदेशीर नोटीसला कोणतेही उत्‍तर देण्‍याचे प्रयोजन विरुध्‍दपक्ष क्रं 2 यास वाटले नाही.  ज्‍याअर्थी तक्रारकर्तीने मोफत सर्व्‍हीस कुपनचा वापर केला त्‍याअर्थी तिने सदर ठिंबक सिंचनचा वापर केल्‍याची बाब सिध्‍द होते.  जर ठिंबक सिंचना मध्‍ये निर्मिती  दोष असता तरच तो संच बदलवून दिला असता. संचामध्‍ये जर निर्मिती दोष असता तर ती बाब एका आठवडयात वा एका महिन्‍यात उघड झाली असती परंतु सदर वादातीत संचाचा उपयोग हा दोन वर्ष केलेला आहे. सदर संच हा उंदीर आणि गिलहरी यांचे कुरतडल्‍याने खराब झाला.

12.   विरुध्‍दपक्षांनी उपरोक्‍त नमुद केलेला युक्‍तीवाद जिल्‍हा ग्राहक आयोगास समर्थनीय वाटत नाही, याचे कारण असे आहे की, उंदीर आणि गिलहरी सारख्‍या प्राण्‍यां पासून विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्मित सिंचन संचाला संरक्षण मिळावे हा हेतू लक्षात ठेऊनच सदर ठिंबक सिंचन संचाची निर्मिती करणे जरुरीचे आहे, सदर सिंचन संच निर्मिती करतानाच तो तकलादू स्‍वरुपाचा निर्मित करावयाचा नाही अशी काळजी संबधित निर्माता कंपनीने घेणे जरुरीचे आहे. तक्रारकर्तीने दिनांक-06.10.2014 रोजी सिंचन संच विकत घेतल्‍या नंतर सन-2016 मध्‍ये दोन वर्षा नंतर तक्रार केल्‍याचे विरुध्‍दपक्षाचे म्‍हणणे आहे परंतु या बाबत जिल्‍हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, कोणत्‍याही उत्‍पादीत वस्‍तुमध्‍ये काय दोष आहे हे कळण्‍यासाठी नक्‍कीच काही कालावधी जातो. सिंचन संचाचा वापर केल्‍या नंतर हळूहळू त्‍याचे पाईप मध्‍ये  निर्मिती दोष असल्‍याची बाब उघड झालेली आहे. तक्रारकर्तीने सन-2012-2013 चे भूमापन क्रं-967 आणि भूमापन क्रं-969 मौजा नेरी, तालुका मोहाडी 7/12 उता-याच्‍या प्रती दाखल केल्‍यात, त्‍यावरुन तिचे मालकीची अनुक्रमे 0.39 हेक्‍टर आर आणि 0.39 हेक्‍टर आर एवढी शेती असून सन-2012-13 चे खरीप हंगामात जल सिंचना मध्‍ये 0.38 क्षेत्रात आणि 0.37 क्षेत्रात पिके घेतल्‍याचे नमुद आहे.

13.   विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्मात्‍याने तक्रारकर्ती आणि त्‍यांच्‍या मध्‍ये ठिंबक सिंचन संचा बाबत दिनांक-30.09.2014 रोजी झालेल्‍या करारावर आपली भिस्‍त ठेऊन असे नमुद केले की, करारनाम्‍यातील अटी व शर्ती नुसार तक्रारकर्तीने ठिंबक सिंचन संचाची योग्‍य ती काळजी घेतलेली नाही. या बाबत जिल्‍हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, सदर करारातील मजकूर हा विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीने स्‍वतःच तयार केलेला असून त्‍यातील अटी व शर्ती सुध्‍दा आपल्‍याच फायद्दाच्‍या नमुद केल्‍यात आणि करारावर केवळ तक्रारकर्तीची स्‍वाक्षरी घेतली त्‍यामुळे या कराराचा फायदा विरुध्‍दपक्षांना घेता येणार नाही.

14.   विरुध्‍दपक्ष क्रं 2 सिंचन संच निर्मात्‍याने भारतीय मानक सिंचाई उपस्‍कर उत्‍सर्जकी पाईप पध्‍दतीया या बाबतचे माहितीपत्रक दाखल केले परंतु त्‍यांचे व्‍दारा निर्मित वादातीत ठिंबक सिंचन संचाचा पाईप हा  योग्‍य पध्‍दतीने उत्‍पादीत केल्‍या बाबत सक्षम अशा शासकीय यंत्रणेने प्रमाणित केल्‍या बाबतचे कोणतेही प्रमाणपत्र या प्रकरणात पुराव्‍या दाखल सादर केलेले नाही. उपरोक्‍त नमुद विवेचना वरुन तक्रारकर्तीने विकत घेतलेल्‍या सिंचन संचाचे पाईपला उंदीर आणि गिलहरी या सारख्‍या प्राण्‍यांनी कुरतडल्‍यामुळे छीद्र पडलेत असे म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीस आपली जबाबदारी झटकता येणार नाही कारण असा सिंचन संच निर्मित करतानाच त्‍याचे पाईपला  उंदीर, गिलहरी या सारख्‍या प्राण्‍यां पासून कोणतीही नुकसानी होणार नाही याची सर्वोतोपरी काळजी निर्माता कंपनीने घेणे आवश्‍यक आहे. तक्रारकर्तीचे शेतातील उंदीर आणि गिलहरी प्राण्‍यानेच वादातील सिंचन संचाचे पाईपला छिद्रे पाडलीत या बद्दल सक्षम असा कोणताही पुरावा विरुध्‍दपक्षांनी दाखल केलेला नाही, त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्मित ठिंबक सिंचन संचाचे पाईप मध्‍ये उत्‍पादकीय दोष (Manufacturing defect) आहे असा निष्‍कर्ष जिल्‍हा ग्राहक आयोगास काढण्‍यास कोणतीही अडचण नाही, तक्रारकर्तीला ठिंबक सिंचन विक्री करताना त्‍याचे पाईप मध्‍ये उत्‍पादकीय दोष असताना विक्री केल्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीने दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होत असल्‍याने आम्‍ही मुद्दा क्रं 2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत. मुद्दा क्रं 1 व क्रं 2 चे उत्‍तर होकारार्थी आल्‍याने मुद्दा क्रं 3 नुसार ती खालील प्रमाणे विरुध्‍दपक्ष क्रं 3 निर्मात्‍या कडून नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे.

15.    उत्‍पादकीय दोष याचा अर्थ असा दोष जो वारंवार दुरुस्‍ती करुनही तो दुरुस्‍त होण्‍यापलीकडील आहे. उत्‍पादकीय दोषा बाबत प्रस्‍तुत जिल्‍हा ग्राहक आयोग खालील मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयावर आपली भिस्‍त ठेवीत आहे-

NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION

NEW DELHI

 

REVISION PETITION NO. 589 OF 2020

Order Dated : 24 Jun 2020

 

     

(Against the Order dated 23/09/2019 in Appeal No. 2161/2011 of the State Commission Karnataka)

     

1. SKODA AUTO VOLKSWAGEN INDIA P LTD

.........Petitioner(s)

Versus

 

1. MEGHANA CORPORATES P LIMITED & ANR.

...........Respondent(s)

 

     उपरोक्‍त न्‍यायनिवाडया मध्‍ये मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने खालील प्रमाणे मत नोंदविलेले आहे-

        The District Forum noted that life span of vehicle as 15 years and vehicle had run 58,000 kms.It appears the complainant has taken vehicle for service frequently because of manufacturing defect. In the circumstances, it also appears though some free services are provided for 3 years and replacement of spare part, the fact remains that vehicle being taken to the authorized service centre of the manufacturer, then necessarily it speaks to the fact that vehicle was defective. Materials speak to the fact problems arose during warranty period itself. Complainant had taken vehicle for repair on many times is not at all in dispute. When such is the situation, Opposite Party/appellant should have placed job cards to indicate nature of repairs effected by them on many times.It is not explained by appellant/Opposite Party as to why they did not produce job cards before District Forum.In that view of the matter, it corroborates say of complainant regarding repeated troubles of the vehicle throughout which itself indicates about manufacturing defects of the vehicle. For repairs more than ₹98,983/- has been spent by the complainant and they are ready to surrender the vehicle. In the circumstances, it is to act according to the order of the District Forum. It is for the manufacturer/appellant herein to pay amount of ₹4,50,000/- within two months from the date of this order, failing which, it shall carry interest at 6% p.a. It is for the complainant to surrender the car

  आमचे समोरील हातातील प्रकरणात मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचा न्‍यायनिवाडा अंशतः लागू पडतो. हातातील प्रकरणात सुध्‍दा वादातील ठिंबक सिंचन संचाचा पाईप नादुरुस्‍त असल्‍यामुळे तक्रारकर्तीचे पिकाचे अभावी रिकामे होते असे नियोजन विभागाचे कर्मचा-यांनी केलेल्‍या अहवालात नमुद केलेले आहे. छायाचित्रावरुन असे दिसून येते की, ठिंबक सिंचन संचाचे पाईपला मोठ मोठी छिद्रे पडलेली आहेत, त्‍यावरुन स्‍पष्‍ट दिसून येते की, सदर ठिंबक सिंचन संचाचे पाईपचे निर्मितीमध्‍ये उत्‍पादकीय दोष होता व तशी खात्री जिल्‍हा ग्राहक आयोगाची झालेली आहे. संपूर्ण ठिंबक सिंचना मध्‍ये निर्मिती दोष होता असे म्‍हणता येणार नाही कारण तक्रारकर्तीची संपूर्ण तक्रार ही ठिंबक सिंचनचे पाईपला छिद्र पडल्‍या संबधीची आहे त्‍यामुळे ठिंबक सिंचनाचे पाईप मध्‍ये उत्‍पादकीय/निर्मिती दोष होता असा निष्‍कर्ष काढण्‍यास कोणतीही अडचण जिल्‍हा ग्राहक आयोगास येत नाही.

मुद्दा क्रं 3 बाबत

16.  तक्रारकर्तीने ती आपल्‍या शेतामध्‍ये दरवर्षी भाजीपाला, चवळी, कारले, दोडके, वांगे मिर्ची इत्‍यादी पिके घेत होती परंतु सिंचन सिंच नादुरुस्‍त झाल्‍याने तिला सन-2015 ते सन-2018 या वर्षात पिक घेता आले नाही त्‍यामुळे प्रतीवर्षी रुपये-5,00,000/- प्रमाणे एकूण रुपये-15,00,000/- उत्‍पन्‍नाचे नुकसान झाल्‍याचे नमुद केलेले आहे. तक्रारकर्तीने अर्थ व सांख्यिकी संचलनालय, नियोजन विभाग, महाराष्‍ट्र शासन, मुंबई केंद्र पुरस्‍कृत सूक्ष्‍म सिंचन योजनेची मूल्‍यमापन अभ्‍यास पाहणी केल्‍या बाबत  दिनांक-08.08.2016 रोजी तयार केलेला अहवाल दाखल केला. सदर अहवालातील अभिप्राया मध्‍ये ठिंबक सिंचनाच्‍या लहान पाईपांना बारीक छीद्र पडल्‍यामुळे पाण्‍याचा पुरवठा शेवटच्‍या झाडा पर्यंत होत नसल्‍यामुळे शेतक-याचे पिक वाया गेले त्‍यामुळे सदर वर्षात उत्‍पन्‍न खूप कमी झाले आहे. सध्‍या स्थितीत संच नादुरुस्‍त असल्‍यामुळे  शेतक-याने पिक घेतले नसल्‍याचे नमुद केलेले आहे. तक्रारकर्तीचे ठिंबक सिंचन संचाचे पाईप नादुरुस्‍त असल्‍यामुळे संपूर्ण पिकाचे नुकसान झाले असा निष्‍कर्ष काढता येणार नाही. तक्रारकर्ती कडून यशवंत सब्‍जी भंडारा, खमारी, तहसिल मोहाडी, जिल्‍हा भंडारा या ठोक भाजीपाला कमीशन एजंटने जानेवारी ते मार्च-2014 मध्‍ये अनुक्रमे रुपये-1,11,416/-, 2,04,042/-, 2,53,328/-,  अनुक्रमे दिनांक-18.01.2014, 10.02.2014  आणि 05.03.2014,  रोजीची बिले अभिलेखावर दाखल केलेली आहेत.  त्‍याच बरोबर सन-2015 मध्‍ये दिनांक-09.12.2015 चे बिल रुपये-37,640/- रकमेचे दाखल केले. त्‍याच बरोबर सन-2016 मध्‍ये दिनांक-07.01.2016 रोजीचे रुपये-2,32,546/-, दिनांक-03.02.2016 रोजीचे रुपये-1,69,105/- च्‍या देयकाच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत, यावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्तीला सन-2014 ते सन-2016 या वर्षात काही प्रमाणात उत्‍पन्‍न मिळालेले आहे.

17.   दुसरी महत्‍वाची बाब अशी आहे की, तक्रारकर्तीने वादातील ठिंबकसंच दोन वर्षा करीता वापरलेला आहे. तसेच संपूर्ण ठिंबक संचा बद्दल तिची तक्रार नसून ठिंबक सिंचन संचाचे पाईपला छिद्र पडल्‍याची तिची तक्रार असल्‍याने तक्रारकर्तीला ठिंबक सिंचन संचाची एकूण किम्‍मत रुपये-85,220/- चे 25 टक्‍के एवढी रक्‍कम रुपये-21,305/- विरुध्‍दपक्ष क्रं 2 कडून तिला मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. त्‍याच बरोबर तक्रारकर्तीचे काही प्रमाणात पिकाचे नुकसान झालेले असल्‍यामुळे तिला आर्थिक नुकसानी संबधाने रुपये-30,000/- नुकसान भरपाई मंजूर करणे तसेच तिला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-5,000/- अशा रकमा विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनी कडून तक्रारकर्तीला देण्‍याचे आदेशित करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. वादातील ठिंबक सिंचन संचाचे पाईप मध्‍ये उत्‍पादकीय दोष असल्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 ची तो विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीचा अधिकृत विक्रेता असल्‍याने कोणतीही जबाबदारी येत नसल्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विक्रेत्‍याचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.  त्‍याच बरोबर विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, मोहाडी, जिल्‍हा भंडारा हे एक शासकीय अधिकारी असून त्‍यांनी योग्‍यरितीने कर्तव्‍य पार पाडले असल्‍याने आणि त्‍यांचे विरुध्‍द तक्रारकर्तीची कोणतीही तक्रार व मागणी नसल्‍याने त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.  

18.   उपरोक्‍त नमुद वस्‍तुस्थिती वरुन आम्‍ही प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

 

                                                                        :: अंतिम आदेश ::

 

  1.  तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्‍दपक्ष क्रं-2) नेटाफीम एरिगेशन इंडीया प्रायव्‍हेट लिमिटेड, (Netafim Irrigation India Pvt. Ltd.) अमरावती ही ठिंबक सिंचन संच निर्माता कंपनी आणि सदर कंपनीचे मालक/संचालक  यांचे विरुध्‍द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍दपक्ष क्रं-2) नेटाफीम एरिगेशन इंडीया प्रायव्‍हेट लिमिटेड, अमरावती ही ठिंबक सिंचन संच निर्माता कंपनी आणि सदर कंपनीचे मालक/संचालक यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीला उत्‍पादीकीय दोष असलेला ठिंबक सिंचन संचाचा पाईप विक्री केल्‍यामुळे सदर ठिंबक संचाची एकूण किम्‍मत रुपये-85,220/- चे 25 टक्‍के एवढी किम्‍मत रुपये-21,305/- (अक्षरी रुपये एकविस हजार तीनशे पाच फक्‍त) परत करावी.
  3. विरुध्‍दपक्ष क्रं-2) नेटाफीम एरिगेशन इंडीया प्रायव्‍हेट लिमिटेड, अमरावती ही ठिंबक सिंचन संच निर्माता कंपनी आणि सदर कंपनीचे मालक/संचालक यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीचे पिकाचे नुकसानी बाबत आर्थिक नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-30,000/- (अक्षरी रुपये तीस हजार फक्‍त)  तक्रारकर्तीला अदा करावेत.    
  4. विरुध्‍दपक्ष क्रं-2) नेटाफीम एरिगेशन इंडीया प्रायव्‍हेट लिमिटेड, अमरावती ही ठिंबक सिंचन संच निर्माता कंपनी आणि सदर कंपनीचे मालक/संचालक यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी दिलेल्‍या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्‍या  मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) अशा रकमा तक्रारकर्तीला अदा कराव्‍यात.
  5.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 नेटाफीम एरिगेशन इंडीया प्रायव्‍हेट लिमिटेड या ठिंबक सिंचन संच निर्माता कंपनीचा अधिकृत विक्रेता योगेश एरिगेशन मार्फत- प्रोप्रायटर श्री लुमेश्‍वर राजकुमार लांजेवार याचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते. तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी,  मोहाडी, जिल्‍हा भंडारा यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

(06)  सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं-2) नेटाफीम एरिगेशन इंडीया प्रायव्‍हेट लिमिटेड, अमरावती ही ठिंबक सिंचन संच निर्माता कंपनी आणि सदर कंपनीचे मालक/संचालक यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या प्रस्‍तुत निकालपत्राची  प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. विहित मुदतीत आदेशाचे अनुपालन न केल्‍यास अंतिम आदेशातील मुद्दा क्रं-03 मध्‍ये नमुद केलेली आर्थिक नुकसान भरपाईची रक्‍कम रुपये-30,000/- आणि सदर रकमेवर मुदती नंतर पासून ते रकमेच्‍या प्रतयक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्‍के दराने व्‍याज यासह मिळून येणारी रक्‍कम तक्रारकर्तीला देण्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं-2) नेटाफीम एरिगेशन इंडीया प्रायव्‍हेट लिमिटेड, अमरावती ही ठिंबक सिंचन संच निर्माता कंपनी आणि सदर कंपनीचे मालक/चालक हे जबाबदार राहतील. 

(07) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध   करुन देण्‍यात याव्‍यात.

(08) उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्‍त फाईल्‍स त्‍यांना परत करण्‍यात याव्‍यात.              

 

 

 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
PRESIDING MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.