जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/234 प्रकरण दाखल तारीख - 14/10/2009 प्रकरण निकाल तारीख – 31/12/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते. - सदस्य मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या अड. मोहमद जलाल पि.मोहमद कासीम, वय वर्षे 50 धंदा वकीली व शेती, अर्जदार. रा.हैद्राबाद रोड, इकरा शाळेजवळ, देगलुर नाका, नांदेड. विरुध्द. प्रो.प्रा.श्रीनिवास इंटर प्राईजेस, वय सज्ञान, धंदा व्यापार, रा.गुरुद्वाराचा रस्ता, देना बॅकेच्या समोर, गैरअर्जदार. नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.मो.जलाल मो.कासीम. गैरअर्जदारा तर्फे वकील - स्वतः. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे पाटील,अध्यक्ष) गैरअर्जदार यांच्या सेवेच्या त्रुटीबद्यल अर्जदार म्हणतात ते गैरअर्जदार यांच्या दुकानात दि.07/05/2008 रोजी गेले असता त्या ठिकाणी गैरअर्जदारांना विचारुन लेदर बेल्ट खरेदी केला. त्या वेळी त्यांना बेल्ट कमीतकमी दोन वर्षापर्यंत वापरण्याता येईल असे सांगितले. परंतु सदरचा बेल्ट हा पंधरा दिवसांत खराब झाला तेंव्हा अर्जदाराने गैरअर्जदाराशी संपर्क करुन बेल्टची रक्कम वापस मागीतली, परंतु बेल्टची रक्कम वापस करण्यास तयार नव्हता, त्यामुळे दि.29/12/2008 रोजी वकीला मार्फत नोटीस पाठविली. अर्जदाराची मागणी आहे की, बेल्ट चार्जेस रु.199/- वकीलाची फीस रु.1,500/- व कॉपेन्सेशन म्हणुन रु.5,000/- असे एकुण रु.6,999/- गैरअर्जदाराकडुन मिळावेत म्हणुन ही तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदार स्वतः हजर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे दिले यानुसार त्यांनी अर्जदारास जो बेल्ट विकला त्या वेळेस गॅरंटी बाबत सांगितलेले नव्हते व कंपनीने गॅरंटी दिलेली नव्हती. अर्जदाराने केलेली तक्रार ही खोटी आहे. गैरअर्जदाराने दुकान बदलले त्याची जाहीरात पेपरमध्ये दिली होती, याची कल्पना असुन सुध्दा अर्जदाराने जाणुनबूजुन जुन्या पत्यावर पत्र व्यवहार केला. अर्जदारांना गैरअर्जदाराकडुन बेल्टच्या बदल्यात अन्य वस्तु घ्या असे सांगीतले असता, अर्जदाराने चिडुन तक्रार केलेली आहे म्हणुन तक्रार फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदाराने पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी आपले म्हणणे शपथेवर दिले आहे. अर्जदाराने दाखल केलेले बिल तपासुन व केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 – अर्जदाराने बिल क्र.1838 दि.07/05/2008 चे दाखल केलेले असून त्यावर बेल्ट बाबत रु.199/- किंमत लिहीलेले आहे. गैरअर्जदाराच्या जुन्या पत्यावर जी नोटीस पाठविली होती ती वापस आल्याबद्यल पाकीट दाखल केलेले आहे. बिल पाहीले असता, गैरअर्जदाराने बेल्टसंबंधी कुठलीही गॅरंटी अथवा वॉरंटी दिली नाही व बेल्टच्या किंमतीवरुन ते लेदर बेल्ट असावा असेही वाटत नाही किंवा ते बिलामध्ये तसे लिहीलेले नाही परंतु गैरअर्जदाराने स्वतः आपल्या लेखी म्हणण्यात अर्जदार त्यांचेकडे आले असता, त्यांनी त्यांच्याकडुन खराब झालेले बेल्ट वापस घेण्याची तयारी दर्शविली होती. परंतु रक्कम वापस न मागता त्या रक्कमेच्या बदल्यात एखादी दुसरी वस्तु घ्या असे म्हटले होते परंतु अर्जदारानेच त्यांची ऑफर स्विकारली नाही असे म्हटले आहे. अर्जदारांना दिलेला बेल्ट खराब असला तर अर्जदार हा बेल्ट बदलुन नवीन बेल्ट घेऊ शकतात किंवा त्या किंमतीची दुसरी कुठलीही वस्तु गैरअर्जदाराकडुन घेऊ शकतील परंतु त्यांना किंमत वापस मिळणार नाही. अर्जदाराने ही ऑफर स्विकारली नसेल असे वाटत नाही. गैरअर्जदाराकडे जर चांगला बेल्ट उपलब्ध नसेल तर अर्जदाराने दुसरी कुठलीही वस्तु घ्यावी. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराची तक्रार अशंतः मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार हा निकाल लागल्या पासुन 30 दिवसांच्या आंत अर्जदार यांना त्यांच्याकडुन जुना बेल्ट घेऊन त्या बदल्यात त्याच किंमतीचा दुसरा नविन बेल्ट द्यावा किंवा अर्जदारास तसे करावयाचे नसल्यास त्यांना त्याच किंमतीची दुसरी कुठलीही वस्तु गैरअर्जदाराकडुन घ्यावी. 3. झालेल्या मानसिक त्रास हा अर्जदार यांचे स्वःताहमुळे झालेला आहे. त्यामुळे मानसिक त्रासाबद्यल व दावा खर्चाबद्यल आदेश नाही. 4. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार,लघुलेखक. |