जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड यांचे समोर …...
ग्राहक तक्रार क्रमांक – 02/2011 तक्रार दाखल तारीख- 06/01/2011
निकाल तारीख - 30/08/2011
------------------------------------------------------------------------------------
शेख ईसाक पि. शेख हुसेन,
वय -40 वर्षे, व्यवसाय – मोटार मॅकेनिक,
रा.तलवाडा, ता.गेवराई, जि.बीड. ....... तक्रारदार
विरुध्द
प्रो.प्रा.श्री सतगुरु एन्टरप्रायजेस,
शास्त्री चौक, गेवराई ता.गेवराई जि.बीड ........ सामनेवाले.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य
तक्रारदारातर्फे – वकील – आर.बी.धांडे,
सामनेवालेतर्फे – वकील – ए.पी.पळसोकर,
।। निकालपत्र ।।
( घोषितद्वारा अजय भोसरेकर, सदस्य)
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हा तलवाडा ता.गेवराई जि.बीड येथील रहिवाशी असुन तो मोटारसायकल दुरुस्तीचा व्यवसाय करतो. त्यांने स्वत:चे घरी वापरत असलेल्या फ्रिजसाठी एक इलेक्टॉनिक उपकरण विकत घेण्याचे उद्देशाने चौकशी केली असता सामनेवाले यांचेकडून होल्टेज स्टॅपीलाईजर दि.15.11.2010 रोजी खरेदी केले. हा स्टॅपीलायझर कुलगार्ड कंपनीचा असुन त्यावर एक वर्षे गॅरंटी से बॉक्सवर नमुद केले होते. तसेच सामनेवाले यांनी बीलावर लिहून दिले आहे. सदर कुलगार्ड स्टॅपीलायझर हा तक्रारदाराने रु.500/- खरेदी केले. दि.25.11.2010 रोजी विद्युत पुरवठा चालू असताना फ्रिज ज्या रुमध्ये ठेवला होता त्या रुममध्ये जोराचा आवाज झाला व 10 दिवसापूर्वी खरेदी केलेला होल्टेज कुलगार्ड स्टॅपीलायझर पूर्णपणे जळून गेला. त्याच बरोबर फ्रिजवरचा टॉप, कॉम्प्रेसर, वायरींग, थ्रमोसेट असे सर्व जळून गेले. तक्रारदाराने दि.26.11.2010 रोजी सामनेवाले यांच्या दुकानात सदर प्रकार सांगीतला असता सामनेवाले यांनी तक्रारदारास उडवाउडवीचे उत्तर दिले व सदर कुलगार्ड स्टॅपीलायझर बदलून देण्यास नकार दिला. आर्वाच्छ भाषा करुन तक्रारदारास हाकलून लावले असे तक्रारदाराने म्हंटले आहे.
तक्रारदाराने फिजच्या नुकसानीपोटी रु.7,500/-, कुलगार्ड स्टॅपीलायझरची किंमत रु.500/-, मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु.2,000/- असे एकुन रु.15,000/- व त्यावर द.सा.द.शे.18 टक्के व्याजाची मागणी केली आहे.
तक्रारदारांनी आपले तक्रारीचे म्हणनेच्या पुष्टयार्थ एकुन 3 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाले यांनी आपले लेखी म्हणने दि.13.4.2011 रोजी न्यायमंचात दाखल केले असुन तक्रारदाराची सर्व तक्रार अमान्य केली आहे. सदर तक्रार ही बनावट असुन सामनेवाले यांना त्रास देण्याचे उद्देशाने केली आहे. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करावी अशी मागणी केली आहे.
सामनेवाले यांनी आपले खेली म्हणनेचे पुष्टयार्थ तक्रारदाराने केलेले अरोप हे खोटे आहेत हे सिध्द करण्याचे उद्देशाने कोणताही पुरावा भारतीय पुरावा कायदयानुसार मंचासमोर कांहीही दाखल केले नाही. म्हणजेच तक्रारदारांनी दाखल केलेली तक्रार ही योग्य आहे से दिसून येते. व सामनेवाले यांनी तक्रारदारास देवू केलेल्या सेवेत त्रुटी केली आहे हे सिध्द होते. तसेच अनुचित व्यापारी प्रथा केल्याचे सिध्द होते.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारानी खरेदी केलेला होल्टेज स्टॅपीलायझरची किंमत रु.500/- ( अक्षरी रुपये पाचशे फक्त ), फ्रिज जळालेने झालेल्या दुरुस्ती खर्चापोटी रक्कम रु.5,000/-( अक्षरी रुपये पाच हजार फक्त ) आदेश मिळाल्या तारखेपासुन 30 दिवसाचे आत तक्रारदारास अदा करावी.
3. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र.2 चे पालन मुदतीत न केल्यास दि.26.11.2010 पासुन तक्रारदाराचे पदरी पडेपर्यन्त द.सा.द.शे.9 टक्के व्याज देण्यास सामनेवाले जबाबदार राहतील.
4. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/- ( अक्षरी रुपये दोन हजार फक्त ), व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु.1,500/- ( अक्षरी रुपये एक हजार पाचशे फक्त ) आदेश मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत तक्रारदारास अदा करावी.
5. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारास परत करावीत.
( अजय भोसरेकर ) ( पी. बी. भट )
सदस्य, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि.बीड