जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड यांचे समोर …...
ग्राहक तक्रार क्रमांक – 07/2011 तक्रार दाखल तारीख- 15/01/2011
लक्ष्मण पि लहानु तकीक,
वय – 44 वर्ष, धंदा – शेती
रा.उमरद (ज),ता.जि.बीड. ....... तक्रारदार
विरुध्द
1. प्रो.प्रा. मे.शहागडकर अँग्रो एजन्सीज,
जुना मोंढा रोड, बीड
2. मॅनेजर, नॅशलन सीडस् फर्टीलायझर्स,
सर्व्हे नं.71/3, पैठण-पंढरपूर रोड, डिघोळ,
ता.जामखेड, जि. अहमदनगर
3. मॅनेजर, रॅलीज इंडीया लि, अँग्रो केमीकल्स्,
डिव्हीजन रिज.ऑफिस 156/157, नरीमन भवन,
15 वा मजला, 227, नरीमन पॉईन्ट, मुंबई ........ सामनेवाले.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य
तक्रारदारातर्फे – वकील – एस.आर.काळे,
सामनेवाले1,2तर्फे – वकील – ए.डी.काळे,
सामनेवाले3तर्फे – वकील – पी.एच.नाईकवाडे,
।। निकालपत्र ।।
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हा मौजे उमरद (जहांगीर) ता.जि.बीड येथील रहिवाशी आहेत. सदर गावात गट नं.83 मध्ये 4 हेक्टर 18 आर जमीन आहे. ता. 15.6.2010 रोजी महिको 7351 व अजित 155 बीटी कापसी कंपनीच्या 7 बॅग प्रति 450 ग्रॅम टोकन पध्दतीने व सिंगल पाळी पध्दतीने लागवड केली. पीकाची लागवड 3.5 बाय 1.75 एक बी प्रमाणे लागवड केली.
लागवड केल्यानंतर कपासी पिकाची वाढ चांगली झाली. कपासीवर 17 ते 18 शेंडे व 5 ते 6 फुले लागल्यानंतर कपासी पिकावर मावा तुडतुडयांचा प्रादुर्भाव जास्त झाल्यामुळे तक्रारदाराने राधाकिशन गिन्यानदेव लाटे यांना घेवून सामनेवाले नं.1 यांचे कृषि सेवा केंद्रात ता.13.9.2010 रोजी दुपारी 1.0 वाजता गेले. मावा व तुडतुडयाचे नियंत्रणासाठी सदर पिकावर केली. सामनेवाले नं.1 यांनी खालील किटक नाशक औषधे घेवून जा म्हणून सांगीतले व ते तक्रारदाराने खरदी केले.
अ.क्र. | किटक नाशक औषधाचे नांव | बॅच नं. | उत्पादन दि. | किंमत |
01 | स्प्रिंट हयूमीक 1 लि. डब्बा | 5502 | जुन 2010 व पुढे 3 वर्षापर्यन्त | रु.300/- |
02 | स्प्रिंट हयूमीक 1/2 लि. डब्बा | एचयु 07 | जुन 2010 व पुढे 3 वर्ष | रु.160/- |
03 | टाटा असाटाफ 1 लि. पुडा | 5060 | जुन 2010 व पुढे 3 वर्ष | रु.380/- |
04 | टाटा असाटाफ 500 ग्रॅ. पुडा | 5307 | जुन 2010 व पुढे 3 वर्ष | रु.200/- |
तक्रारदार अडाणी/अशिक्षीत असल्यामुळे सामनेवाले नं.1 ने तक्रारदारास किटक नाशकाचे प्रमाण टाटा असाटाफ 60 ग्रॅम अधिक स्प्रिंट हयुमीक 30 मिली प्रति फवारा 16 लि. प्रमाणे पाठीवरील फवा-याने फवारण्याचे सांगीतले.
ता.15.9.2010 रोजी तक्रारदाराने सामनेवाले यांचे सांण्या प्रमाणे वरील नमुद त्यांचे संपूर्ण कपासी पिकावर वरील औषधाची फवारणी केली. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी संपूर्ण कपासी पिकाचे शेंडे वाकले, पाने कासुन गेली. दोन दिवसानी कापूस पिकाची पाने जळून गेली व करपून गेली.
तक्रारदाराचे कपासी पिकाची नुकसान झाल्यानंतर ता.23.9.2010 रोजी तक्रारदार सामनेवाले नं.1 यांचेकडे गेले व वरील नुकसानी बाबत दुकानदारास सांगीतले परंतु त्यांनी कांहीही एक ऐकले नाही. माणूस पाठवून देतो जा असे सांगीतले.
त्यांनतर तक्रारदाराने जिल्हा कृषि अधिकारी, बीड, तालुका कृषि अधिकारी बीड यांना कपासणी पिकाची नुकसान किटकनाशके औषध फवारणीमळे झाल्याची तक्रार केली. समितीने तक्रादार व सामनेवाले नं.1 ते 3 यांना ता.11.10.2010 रोजी नोटीस पाठवून ता.20.10.2010 रोजी तक्रारदाराचे शेतात गट नं.83 मध्ये पिकाची पाहाणी करुन पंचनामा करण्याचे कळविले होते. त्यानुसार सामनेवाले नं.1 ते 3 चे प्रतिनिधी तसेच तक्रारदाराचे कपासी पिकाचे शेतात ता.20.10.2010 रोजी दुपारी प्रत्यक्ष हजर झाले. नुकसानीची पाहणी केली, पंचनामा तयार केला, पंचनाम्यावर पंचानी, सामनेवाले नं.2 व 3 कंपनीचे प्रतिनिधी हाजर असुन त्यांनी सहया केल्या नाहीत.
तक्रारदाराचे कापसाचे पिकाची नुकसान दुकानदार किटकनाशके फवारणीचे प्रमाण जास्तीचे सांगीतलेने, औषध सदोष असल्याने कपासी पिकाचे 70 टक्के करपून नुकसान झाल्याचे निष्कर्ष जिल्हास्तरीय बियाणे समितीने दिला आहे.
सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारांना स्प्रिंट हयुमीक 500 ग्रॅम वरील 1 डब्बा मुदतबाहय झालेला देवून तक्रारदाराची फसवणूक केली. किटक नाशकाची उत्पादीत तारीख जुन 2007 आहे. एक्सपायरी तारीख उत्पादन तारखेपासून तीन वर्षे पुढे अशी आहे. म्हणजेच जुन,2010 ला किटकनाशक औषधाची तारीख संपते आणि तीन महिने मुदत बाहय किटकनाशक औषध देवून तक्रारदाराची फसवणूक केली. त्यामुळे तक्रारदाराचे 4 एकर 10 गुंठय क्षेत्रावर 7 कपासी पिकाची लागवड केली परंतु कंपनी नियमाप्रमाणे 15 किंवटल प्रमाणे 7 बॅगचे एकुन माल 105 किंवटल एकुन किमत रु.4,20,000/- आहे. परंतु पंचनामा निष्कर्षानुसार 70 टक्के नुसार म्हंटल्यास, रु.2,94,000/- नुकसान झाले. सदरची नुकसान भरपाई देण्याची सामनेवाले नं.1 ते 3 यांची आहे.
ता.30.11.2010 रोजी सामनेवाले नं.1 ते 3 यांना झालेल्या नुकसान भरपाई बाबत नोटीस पाठवली. नोटीस मिळूनही नुकसान भरपाई दिली नाही.
सामनेवाले नं.1 व 2 यांनी नोटीसीचे उत्तर चुकीचे पाठविले. सामनेवाले नं.3 यांनी उत्तरही पाठविले नाही. विनंती की, तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे सामनेवाले नं.1 ते 3 यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तीक रक्कम रु.2,94,000/- नुकसान भरपाई त्यावर 18 टक्के व्याज मिळण्या बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाले नं.1 यांनी सामनेवाले नं.2 यांनी उत्पादीत केलेले औषध एन्ट्राकॉलन प्रॉबीनेब 70WP (250 ग्रॅम) बॅच नं.852 निर्माण तिथी 30.7.2010 व डेसीस डेल्टा मेथीन ही औषधे पावती क्रं.3130 नुसार दिली. सदरील औषधी सामनेवाले नं.1 यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे व पध्दती प्रमाणे कपाशीच्या पिकावर फवारणी केली असता, दुस-या दिवशी कपाशीचा सर्व प्लॉट संपूर्णपणे जळून चालल्याचे निदर्शनास आले. तक्रारदाराने सामनेवाले नं.1 यांचेकडे विचारणा केली असता कोणतेही सहकार्य केले नाही.
तक्रारदाराने पंचायत समिती कृषि विभागात रितसर तक्रार दिली. सदरील तक्रारीचे अनुषंगाने दि.20.10.2010 रोजी मोहिम अधिकारी जिल्हा परिषद, बीड यांचे नियंत्रणाखालील तज्ञ समितीने कपाशी पिकाचे झालेल्या नुकसानी बाबतचा पाहणी करुन अहवाल दिला.
सामनेवाले नं.2 यांनी उत्पादीत घातक औषध सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारास विक्री केल्यामुळे तक्रारदाराचे कांदयाच्या पिकापासुन झालेली नुकसान भरपाई रक्कम रु.1,75,000/-, मानसिक, शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- असे एकुण रक्कम रु.2,05,000/- सामनेवाले नं. 1 व 2 यांचेकडून मिळण्याची मागणी केली आहे.
सामनेवाले नं.1 व 2 यांनी एकत्रीत लेखी म्हणणे दि.01.04.2011 रोजी दाखल केले. तक्रारीतील सर्व अक्षेप नाकाले आहेत. तक्रारदाराचे शेतात जो पंचनामा करण्यात आला तो मुळात उशिराने करण्यात आला. कपासीची लागवड जून मध्ये होते त्याचे उत्पादन कालावघी 90 दिवसाचा असतो. त्याच प्रमाणे तक्रारदाराचे शेतात कापसाची वेचणी नंतर कृषि अधिका-यांने पाहणी केली. सदरील पंचनाम्यामधील फवारणीचा पंप तक्रारदाराचा स्वत:चा नाही तो दुस-या शेतक-यांचा वापरल्याचे दिसते. तक्रारदाराने तणनाशक पंपाने किटकनाशाची फवारणी केली. कृषि अधिका-यांचा पंचनामा शासनाचे परिपत्रकानुसार केलेला नाही. निष्कर्ष शेतक-यांने दिलेल्या जबाबावरुन, पंचनाम्यावरुन दिलेले दिसते. तक्रारदाराचे तक्रारीत तथ्य कशाच्या आधारावरुन आहे याचा सविस्तर खुलासा, तसेच करपलेली झाडे ही किटकनाशके फवारणीचा आहे असे स्पष्ट अहवाल नाही. तो सामनेवाले नं.1 ते 3 यांचेवर बंधनकारक नाही.
सामनेवाले नं.1 हे बीड शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी असुन मोंढयात सामनेवाले नं.1 चे गेली 50 वर्षापासुन कृषि सेवा केंद्र आहे. एकाही शेतक-यांने त्यांचे विरुध्द अथवा तक्रार केलेली नाही. तक्रारदाराचे कांही नुकसान झाले असल्यास तक्रारदाराचे निष्काळजीपणामुळे झाले. सामनेवाले नं.1 चे दुकानातुन कधीही मुदतबाहय किटकनाश औषधाची विक्री केली जात नाही. सामनेवाले नं.1 दुकानदार असुन ते फक्त उत्पादीत मालाची विक्री करतात. शेतक-यांना फवारणीचा सल्ला देत नाहीत.
सामनेवाले नं.2 हे स्प्रिट हयुमीक किटक नाशक औषध तयार करते. या कंपनीचे उत्पादन उच्च दर्जाचे असुन ते प्रत्येक शेतक-यांना माहित आहे. कालबाहय औषध विक्रि केल्याचे तक्रारदाराने म्हंटले आहे. त्यासंदर्भात पुरावा आवश्यक आहे. सामनेवाले नं.2 कोणतेही किटक नाशके कालबाहय झाल्यानंतर ते विक्रीसाठी दुकानात ठेवले जात नाही. तक्रारदाराना नुकसान भरपाई देण्यास सामनेवाले नं.1 व 2 जबाबदार नाहीत. तक्रार खर्चासह खारीस करावी.
सामनेवाले नं.3 यांनी त्यांचे लेखी खुलासा ता.11.3.2011 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप नाकरलेली आहेत. सामनेवाले नं.1 व 2 यांचीशी सामनेवाले नं.3 यांचा संबंध नाही. सामनेवाले नं.3 नामांकित कंपनी आहे. तक्रारदाराचे निष्काळजीपणामुळे पिकाचे नुकसान झाले या सामनेवालेंचा संबंध नाही. सामनेवाले नं.1 व 2 यांनी कपंनीचे कायदेशीर एजंट अथवा डिलर म्हणून नेमणूक केलेली नाही. खोटया आरोपामुळे सामनेवाले नामांकित कंपनी असताना बदनामी होवून कंपनीचे नुकसान झाले आहे. कंपनीस नुकसान भरपाई म्हणुन तक्रारदाराने रक्कम रु.1,00,000/- देण्या बाबत आदेश व्हावा.
तक्रारदाराने निष्काळजीपणे स्प्रिट हयुमीक 1 लिटर डब्बा ज्याचा बॅच नं.5502, स्प्रिट हयुमीक 1/2 लिटर औषध कालबाहय होते. वरील औषध टाटा असाटाप 1 किलोचा पुडा बॅच नं.5060, व टाटा असाटाप 500 ग्रॅम पुडा बॅच नं.5307 आहे. वरील दोन्ही औषधी कालबाहय असताना तक्रारदारानी ते औषध या सामनेवालेचे फवारले असा त्यांचे पिकाचे नुकसान झाले तक्रारदाराचे कथनानुसार झाला असावा. वास्तविक या सामनेवालेंचे उत्पादनाबाबत एकाही शेतक-यांची तक्रार नाही. तक्रारदाराने सामनेवाले नं.2 कंपनीचे औषध, सामनेवाले नं.3 कंपनीचे औषध दोन्हीचे मिश्रण करुन व प्रमाणात बदल करुन फवारणी केल्यामुळे नुकसान झाले असावे. सामनेवाले नं.3 यांनी स्प्रिट हयुमीक कंपनी व तक्रारदारांकडून दंड आकारण्यात यावा, व नुकसान भरपाई आकारण्यात यावी. जेणे करुन सामनेवाले नं.3 ची झालेली बदनामी व नुकसान भरुन निघेल.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्र, तक्रारदाराचे शपथपत्र, तक्रारदारांचे साक्षीदार कांता बाबुराव शेळके, पंचनाम्यावरील साक्षीदार राधाकिसन ग्यानदेव लाटे, फवारणी पंप मालक, सामनेवाले नं.1 व 2 यांचा खुलासा, शपथपत्र, सामनेवाले नं.3 यांचा खुलासा, शपथपत्र युक्तीवादराची पुर्सिस यांचे सखोल वाचन केले. तक्रारदाराचे विद्वान वकिल एस.आर.डबडे, सामनेवाले नं. 1 व 2 यांचे विद्वान वकिल ए.डी.काळे यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदाराने त्यांचे शेतातील कापूस पिकावर मावा, तुडतुडयांचा प्रादुर्भाव झाल्याने नियंत्रणात आणन्यासाठी सामनेवाले नं. 2 व 3 यांनी उत्पादीत केलेले किटक नाशक औषध सामनेवाले नं.1 यांचेकडून विकत घेतले व फवारणी केली आहे. सदर फवारणीमुळे तक्रारदाराचे कापासाचे पिकाचे पाने करपुन गेली, शेंडे वाळून गेली. तक्रारदाराचे नुकसान झाल्याचे तक्रारदाराचे म्हणणे नाही. तसेच यासंदर्भात सामनेवाले नं.2 या कंपनीचे औषध कालबाहय असल्याचे तक्रारदाराची तक्रार आहे.
या संदर्भात तक्रारदाराने जिल्हा कृषि अधिकारी बियाणे समितीकडे तक्रार दिली आहे. जिल्हा बियाणे समिती मार्फत तक्रारदाराचे शेतातील पिकाची पाहणी केली आहे. सदरची पाहणी ता.20.10.2010 रोजी करण्यात आली आहे. सदर निष्कर्ष अहवालावरुन तक्रारदाराचे तक्रारीत तथ्य आढून येते असा अहवाल संबंधीतानी दिला आहे. परंतु सदर पंचनाम्यावरुन पिक पाहणी अहवालावरुन शेतात फवारणीमुळे कोणत्या औषधामुळे पिकाची शेंडे व पाने करपून गेल्याचा उल्लेख नाही. तसेच शेतक-यांचे जबाबावर आधारीत सदरचा निष्कर्ष आहे. यासंबंधात तक्रारदाराने सदर पिक पाहाणीचे वेळी हजर असलेल्या माहिती अधिकारी व जिल्हा व्यवस्थापक किंवा कृषि अधिकारी यांचे शपथपत्र दाखल करणे आवश्यक होते परंतु तसा त्यांचा पुरावा नाही. तक्रारीतील कागदपत्रे स्वत:होवून हजर सिध्द होत नाहीत. ते सिध्द करण्यासाठी त्यावरील मजकुर लिहणा-याचा जबाब व पुरावा आवश्यक अताना तसा कोणताही पुरावा तक्रारदाराने दिलेला नाही.
तज्ञाचा पुरावा नसल्याने कोणते औषध फवारल्यामुळे तक्रारदाराचे कितीचे नुकसान झाले ही बाब स्पष्ट होत नाही. तसेच सदरची पाहणी ही 90 दिवसाचे कालावधी नंतर म्हणजेच जुनमध्ये पेरणी केल्यानंतर 4 महिन्यानी झाली आहे, असा सामनेवालेंचा आक्षेप आहे. कापसाची वेचनी झाल्यानंतर पाहणी करण्यात आली आहे, त्यामुळे सामनेवालेंनी सदरचा अहवाल नाकरलेला आहे.
तक्रारीवरुन सामनेवाले नं.2 उत्पादीत केलेले स्प्रिट हयूमीक औषधाच्या आर्धा किलोचा पुडा कालबाहय असल्याने तक्रारदाराची फसवणूक झाल्याचे तक्रारदाराचे विधान आहे. परंतु कालबाहय औषध तक्रारदाराने विकत घेताना का पाहिले नाही ? यासंबंधात तक्रारदाराचा खुलासा नाही. सेल्स अँण्ड गुडस कायदयानुसार बायर बी अवेअर हे तत्व लागु होते. या तत्वामुळे तक्रारदाराने सदरची औषधाची मुदत पाहून घेण्याची जबाबदारी होती.
औषधी मुदत बाहय असल्यामुळे नुकसान झाल्याचे तक्रारदाराचे तक्रारीवरुन ध्वनीत होते परंतु त्यासंदर्भात तक्रारदाराचा तज्ञाचा कोणताही पुरावा नसल्यामुळे तक्रारदाराची सदरचे विधान ग्राहय धरणे उचित होणार नाही, असे न्यायमंचाचे मत आहे.
सामनेवाले नं.3 चे विरुध्द तक्रारदाराची तक्रार नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार रद्द करणे उचित होईल, असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदाराची तक्रार रद्द करण्यात येते.
2. सामनेवाले खर्चा बाबत कोणताही आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारास परत करावीत.
( अजय भोसरेकर ) ( पी. बी. भट )
सदस्य, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि.बीड