जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/233. प्रकरण दाखल तारीख - 14/10/2009 प्रकरण निकाल तारीख – 19/01/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा पिंगळीकर,देशमूख - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य अरंविद भगवानराव भोसले वय, 35 वर्षे, धंदा शेती, रा.वाघी ता. जि. नांदेड अर्जदार विरुध्द. प्रो.प्रा.गयाबाई पूरभाजी सूर्यवंशी गिता मशिनरी स्टोअर्स, श्री गूरुगोविंदसींघजी रोड, गैरअर्जदार नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.एस.डी.भोसले गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.एस.एस.वाकोडे निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे, अध्यक्ष ) गैरअर्जदार यांनी ठरल्याप्रमाणे पीव्हीसी पाईपचा पूरवठा न करुन सेवेत ञूटी केली या बददल अर्जदार यांनी आपली तक्रार नोंदविली आहे. याप्रमाणे अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून दि.8.9.2009 रोजी रु.3315/- अदा करुन 75 एमएम पीव्हीसी पाईप 13 नग यांची मागणी केली परंतु त्यावेळी गैरअर्जदार यांचेकडे पाईप उपलब्ध नसल्याकारणाने आपणास लवकरच पाईप देण्यात येईल असे सांगितले. यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार यांचे दूकानात सतत चकरा मारल्या. एवढेच नव्हे तर दि.12.9.2009, 15.9.2009 व दि.19.9.2009 रोजी किरायाचे वाहन घेऊन त्यांचेकडे पाईपसाठी गेले असता पाईप तर मिळालेच नाहीत परंतु त्यांना रु.5,000/- चा वाहतूक ठरविल्यामुळे खर्च आला. शेतामध्ये पाईपसाठी दोन फूट खोलीचे खोदकाम केले होते. त्यासाठी पण त्यांना रु.2600/- खर्च आला. गैरअर्जदाराने कबूल करुनही सदरील पाईप न दिल्याकारणाने अर्जदार यांना पाईपची दिलेली रक्कम रु.,3315/- नूकसान उचलावे लागले. अर्जदार यांची मागणी आहे की, पाईपचे बददल रक्कम रु.3315/-, वाहतूकीचे खर्च रु.5000/-, पाईप खोदकामाचा खर्च रु.2600/- व मानसिक ञासापोटी रु.7400/- असे एकूण रु.15,000/- व दावा खर्च मिळावे असे म्हटले आहे. गैरअर्जदार हे वकिला मार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांचेकडून सेवेत ञूटी झाली नाही किंवा अनूचित व्यापार प्रथेचे उल्लंघन केलेले नाही. अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडे दि.9.1.2009 रोजी पाईप घेण्यासाठी आले होते. त्यांनी 75 मिमि चे 13 पाईप बूक केले, त्यांची रककम ही दिली होती व अर्जदारांना तसे सांगण्यात आले होते की, रक्कम जमा केल्यानंतरच त्यांना पाईप मागवून देण्यात येतील व त्यासाठी 5 ते 6 दिवस थांबावे लागेल. यांला अर्जदार यांनी होकार दिला. गैरअर्जदार यांनी होलसेल एजन्सी मे. पारसेवार अग्रो एजन्सी यांचेकडून दि.14.9.2009 रोजी 75 मिमि चे 20 पाईप त्यांचे दूकानात मागवून घेतले पण अर्जदार हे पाईप घेण्यासाठी आले नाहीत. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून पैसे उकळण्याचे उददेशाने तक्रार केलेली आहे. याप्रमाणे दि.12.9.2009, 15.9.2009 व दि.19.9.2009 रोजी किरायाने वाहन घेऊन आले व त्यांस रु.5000/- खर्च आला हे त्यांचे म्हणणे खोटे आहे. तसेच शेतीमध्ये पाईप टाकण्याठी खर्च केला व त्यावर रु.2600/- खर्च आला ही बाब सूध्दा खोटी आहे. अर्जदार हे पाईपची डिलेव्हरी घेण्यासाठी आलेच नाही उलट त्यांनी गैरअर्जदाराकडे जमा केलेले पैसे वापस मागितले व पाईप नको असे सांगितले. गैरअर्जदार यांनी स्पष्ट सांगितले की, तूमच्यासाठी पाईप आणलेले आहेत पैसे तूम्हाला वापस मिळू शकत नाहीत. पण पैसेच पाहिजे म्हणून ते नीघून गेले व खोटी तक्रार दाखल केली म्हणून अर्जदाराचा तक्रार अर्ज खोटा ठरवून तो खर्चासह फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी सूध्दा पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी दि.8.9.2009 रोजीचे बिल नंबर 291 दाखल केलेले असून त्यावर पीव्हीसी 75 एमएम पाईप 13 नग रु.3315/- दिल्याचे दिसते व त्यावर माल देणे बाकी असेही लिहीलेले आहे. यांचा अर्थ अर्जदाराने रक्कम भरुन पाईप बूक केले होते व गैरअर्जदाराकडे त्यावेळी पाईप उपलब्ध नव्हते म्हणून ते मे. पारसेवार अग्रो एजन्सी या होलसेल दूकदानदाराकडून दि.14.4.2009 रोजी म्हणजे सहा दिवसांतच 75 एमएम चे 20 पाईप त्यांनी मागितले होते हे त्यांनी दाखल केलेल्या बिलावरुन दिसून येते. आता दोघाचा वाद असा आहे की, अर्जदार यांनी पाईप नको होते व ते पैसे मागत होते व अर्जदार म्हणतात की, त्यांना पाईप पाहिजे होते, पण वेळेवर गैरअर्जदार यांनी त्यांना ते दिले नाहीत. गैरअर्जदार यांनी ज्याअर्थी पाईप मागितले त्याअर्थी ते पाईप ठेऊन घेतले असे दिसत नाही. कारण दोघात निश्चितच काही तरी वाद झाला असणार. अर्जदार हे पैसे मागत होते असा अर्थ काढला तर तो खरा होणार नाही. कारण प्रकरण चालू असताना गैरअर्जदाराने पाईप देण्याची तयारी दर्शविली व अर्जदाराने देखील पैसे न घेता पाईप घेण्याची तयारी दर्शविली. त्याप्रमाणे दि.14.01.2010 रोजी गैरअर्जदाराकडून अर्जदाराने पाईप स्विकारले आहेत. म्हणजे म्हणाल्याप्रमाणे अर्जदारांना फक्त पैसे पाहिजे हे म्हणणे खोटे ठरते. अर्जदाराची पाईपची मागणी प्रकरण चालू असताना पूर्ण झालेली आहे. गैरअर्जदार यांचे बिलावर फोन नंबर दिलेला आहे व अर्जदाराचे गांव वाघी हे शहरापासून अत्यंत जवळ अंतरावर आहे. त्यामूळे अर्जदार यांना गैरअर्जदार यांचेशी फोनवर संपर्क न करता व पाईप आलेले आहेत की नाही यांची खाञी न करता वरील तिन तारखेला वाहन घेऊन गेले व वाहनावर रु.5000/- खर्च केला हे म्हणणे न पटण्यासारखे आहे. कारण पाईप आल्याची खाञी झाल्यावर नांदेड येथून देखील वाघीला जाणारे वाहन भेटले असते. या कामी पूरावा म्हणून त्यांने श्री. श्रीराम बाबूराव भोसले यांचे शपथपञ दाखल केलेले आहे. त्यांने शपथपञावर असे सांगितले आहे की, वरील तिन तारखेस जिप मालवाहू घेऊन गेले होते व त्यावर रु.3000/- किराया घेतला, येथे अर्जदार रु.5000/- म्हणतात ? या शपथपञात वाहनाचा क्रमांक यांचे पूर्णतः उल्लेख केलेला नाही किंवा शपथपञधारकाचे ते वाहन होते या बददल ही कागदपञ नाही. म्हणून हे शपथपञ अमान्य करण्यात येते. दूसरे अर्जदार यांचे मते त्यांनी 13 पाईपसाठी दोन फूट खोलीची खोदकाम करण्यासाठी गोपिनाथ व्यंकटराव भोसले यांचे शपथपञ दाखल केलेले आहे व त्यासाठी त्यांनी रु.2600/- घेतल्याचे म्हटले आहे. अर्जदार यांचेकडे जेव्हा पाईपच आले नव्हते तर त्या आधीच त्यांनी खोदकाम करण्याची गडबड केली व खोदकाम जरी केले असले तरी पूर्ण खोदकाम हे बूजणार नाही थोडीशी माती पडेल व ती पून्हा काढता येईल. रु.2600/- खर्च दोन माणसे खोदण्यासाठी हे प्रमाण योग्य वाटत नाही. अर्जदाराला फार तर प्रति पाईप रु.50/- प्रमाणे एकूण रु.650/- खर्च येण्याची शक्यता आहे. यापेक्षा जास्त खर्च लागू शकत नाही. पाईपसाठी खोदकाम करावयाचे होते म्हणजे तेवढे पैसे लागणारच होते. ते बूजले असल्यास थोडेफार काम करण्यास अजून रु.300/- ते रु.350/- लागू शकतात. अर्जदाराने दि.19.9.2009 रोजी गैरअर्जदार यांचे नांवे एक नोटीस पाठविली आहे. तसेच अर्जदाराच्या नांवे शेती असल्याबददलचा 7/12 व ऊस पिक लावल्या संबंधीचे प्रमाणपञ दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांचेकडून पाईप पूरवठा करण्या संबंधी दोघामध्ये कराराचे पालन झाले नाही असे वाटते. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रारक अर्ज खालील प्रमाणे मजूर करण्यात येतो. 2. अर्जदार यांची पाईप बददलची मागणी पूर्ण झाली म्हणून त्या बददल आदेश नाही 3. खोदकाम बाबतचा खर्च रु.350/- व तसेच मानसिक ञासाबददल रु.1000/- व दावा खर्च म्हणून रु.500/- मंजूर करण्यात येतात. 4. संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर लघूलेखक. |